Monday, 19 January 2015

🌸 धर्म के दोहे 🌸

पके कर्म की चित्त पर, जब उदीर्णा होय ।
नये कर्म बांधे नही, स्वतः निर्जरा होय।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
🏮बुद्ध शिकवणी नुसार कर्माचे परिणाम ह्या च जन्मात मिळाल्या शिवाय राहत नाही। पिकलेल्या/तयार कर्माचा परिणाम जेव्हा मन+शरीरावर होतो तेव्हा साधारण रोगाच्या लक्षणा (जसा ताप / सर्दी /खोकला)  सारखा  सहज ओळखण्या एवढा सोपा नसतो। जर ओळखता / समजताच नाही आला तर दुर कसा करणार? साधारण मनुष्य हे समजत नसल्याने बैचेनीत अजुन दुख देणारी कर्मे करीत राहतो, दुःख भोगीत असतो ।

🏮आचार्य म्हणतात  मनाच्या पडद्यावर जेव्हा अशा पिकलेल्या कर्माचा परिणाम  (चित्तात विचार व  शरीरावर  सुक्ष्म संवेदनांच्या) आधाराने होत असतो। ह्या संवेदनांमुळेच वाईट वस्तु प्रिय (जसे परस्त्री-बाटली) वाटते व चांगल्या गोष्टी अप्रिय (जसे कर्तव्य - सद्गूण). हीच आहे प्रतीत्य समुत्पादाची तोडता येणारी कडी।

🏮आणि प्रत्येक संवेदना (सुखद, दुःखद, असुखद-अदुःखद) ही एखाद्या परिणाम तयार झालेल्या कर्माच्या रुपाने बाहेर पडते, यालाच उदीरणा (  अंतर्मनातुन विचार बाह्य मनात डोकावणे ) म्हणतात।

🏮ह्या संवेदनांचा समतेने सामना केल्यावरच दुःखद / सुखद कर्मांचे परिणाम नष्ट करता येतात । शील तर समाधि (म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता) वाढवण्यास मदत करते। पण समाधि ने समता वाढत नाही प्रज्ञेने वाढते।

🏮 'समता' म्हणजे ( संवेदनांना महत्व न देणे / संवेदनांना भीक न घालणे)। समता ठेवली कि नवे कर्म संस्कार बनायचे थांबतात।

🏮प्रज्ञाच खरोखर संवेदनांचा जन्माबाबत जागृती व संवेदनांचा दुष्प्रभाव नष्ट (निर्जरा) करु शकते।

🏮ज्या ज्या वेळी मन विचलित होते तेव्हा समाधि उपयोगी असते। पण जेव्हा मन क्रोध / वासना / भयाने ग्रासते तेव्हा संवेदनांच्या उत्पाद-व्ययाकडे (निर्माण - अस्त) बारकाईने लक्ष द्यावे । अशांत मन शांत होत कर्मांचे दुष्परिणाम नष्ट होतील । याला निर्जरा म्हणतात।असे करीत राहिल्यास मागचे सर्व न पिकलेले कर्म संस्कार टप्या टप्याने मनाच्या पडद्यावर येत नष्ट होतात। व्यक्ति निर्मळ होते।

भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी 🙏

No comments:

Post a Comment