Friday, 16 January 2015

🌸धर्म के दोहे 🌸
पग पग बढता ही रहे, प्रबल रहे पुरुषार्थ ।
धरम पंथ दोनों सधे, स्वार्थ और परमार्थ।।
- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
सहसा चांगले कर्म करीत राहण्याचा मनुष्याचा प्रयत्न असतो। पण परिस्थिती समोर मनुष्य कच खातो।😫
चांगले वागायची आशावादी सुरुवात करताना, प्रयत्नांना  अमुक एका वेळे नंतर यश येईल अशी अपेक्षा असते। पण यश / सुख काही यायची चिन्ह दिसत नाही ।स्वतःच्या स्वप्नांना, इज्जतीला, सुखांना जपण्याच्या प्रयत्नात चांगली कामे करायचे थांबवुन, वाईट कर्मे करायला सुरुवात करतो।
अशा निराशेच्या वेळी पुर्वी केलेल्या सत्कर्मावर / प्रयत्नांवर पाणी सोडले जाते।
😔का होते असे?
🌞एखादी गृहिणी सकाळ, दुपार व संध्याकाळी घराला झाडु मारुन स्वच्छ करते। तसेच या दरम्यान काहीही  कारणाने घर अस्वच्छ तेव्हाही गरजे नुसार स्वच्छता करते।
एवढी काळजी घेत असताना ही हळुच नकळत प्रत्येक क्षणाला घाण - धुळ घरात येत असते। दारे - खिडक्या नेहमी बंद नाही ठेवु शकत। आणि जरी कधी बंद ठेवली तर आतली (न निघालेली) जुनी घाण व घरातील कामे नवीन घाणेची निर्मिती करतात। त्यामुळे नियमित सफाई गरजेचीच असते।
🌞त्याच प्रमाणे आपल्या शरीर रुपी घराच्या दारे - खिडक्या (नाक , जीभ, त्वचा, कान व डोळे) नेहमी निराशा / भीती / तंद्री / बैचेनी / वासना व पश्चात्तापाची घाण घरात (शरीरात + मनात) घेत असतात । मनुष्य जरी कोमात गेला (सर्व दारे खिडक्या "5 ज्ञानेंद्रिये" बंद) तरी मनातील न काढलेली जुनी घाण (कर्म संस्कार) ही नवीन घाण बनवीत असते।
मग आशा, जिद्द व एकुणच पुरुषार्थ कमी पडतो। सद्धर्म धारण करताना कळते कि अविचार / मानसिक कचरा कसा, कुठे, कधी व किती आला व किती अगोदर तपासुन होता।
🌞धर्म विपश्यनेद्वारे कचरा बाहेर काढायला व नवा कचरा न बनवायला शिकवतो। त्यामुळे आध्यात्मिक (स्वार्थ) व सांसारीक (परमार्थ) प्रगती होते।पण तसे न झाल्यास धर्म (शील + समाधि+ प्रज्ञा) न रुजल्याचे स्पष्ट होते ।
🌞अशा प्रकारे प्रत्येक पावलो-पावली धर्म आशा व पुरुषार्थ वाढवण्यात खुप मदत करतो।

भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी 🙏

No comments:

Post a Comment