Wednesday, 28 January 2015

धर्म के दोहे

क्षण-क्षण क्षण-क्षण बीतता, जीवन बीता जाय।
इस क्षण का उपयोग करे, बीता क्षण नही आय।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
साधारण मनुष्य स्वतः च्या बर्याच कर्तव्यांना पूर्ण करण्याची टाळा टाळ करतो ।
इतकी टाळा टाळ कि स्वतःच्या मनाची बैचेनी/अस्वस्थता ओळखायचं व दुर करायला  ही त्याच्या कडे वेळ नसतो।

मृत्यू समयी ही व्याकुळता व बैचेनी उफाळून वर येते, पण तेव्हा वेळ गेलेली असते ।

आई-वडिलांची सेवा, बायको-मुलांना यथोचित निस्वार्थ स्नेह-प्रेम, ज्यांना दुखावले त्यांची माफी मागायची, कुलपुरूषाचे(ऊदा: बाबासाहेब) ऋण फेडणे, क्रोध/ वासना / ईर्षा / भीती / आळस पश्चातापातुन मुक्ती अशा अनेक

बैचेनीची उकल / सुटका झालेली नसते । एक- एक करत तास, दिवस, महिने, वर्षे निघून जातात ।

 ह्या जन्मदिवशी मी जास्त मनोविकार/पापकर्मे कमविली कि जास्त मनोविकार/पापकर्मांपासून मुक्त झालो याचा

हिशोब साधारण माणसाला करता येत नाही । कारण आपण अजुन अंतर्मनाच्या स्वच्छते बद्दल अज्ञानी असतो। अंतर्मनात ह्या व अनेक जन्माची बैचेनी साठली आहे। ती फक्त मनुष्य जन्मात विपश्यना मिळाली कि काढता येते ।

ती काढण्यासाठी आचार्य प्रवृत्त करत आहेत, कारण वर्षामागून वर्षे जात आहेत। पण किती वर्षे बाकी आहेत आपल्याला माहित नाहीत 😥 । न जाणे पून्हा कधी मनुष्य जन्म मिळो न मिळो।

म्हणून साधना करीत विकारमुक्त होत जन्म व वेळ सार्थकी लावावा। गेलेला वेळ परत येत नाही ।

भवतु सब्ब मंगलं।

-संबोधन  धम्मपथी

Wednesday, 21 January 2015

�� धर्म के दोहे: ��

धरम हमारा ईश्वर, धरम हमारा नाथ।
सदा सुरक्षित रहे हम, धरम हमारे साथ।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
�� साधारण मनुष्याचे मन आठ लोकधर्मां मुळे सदैव बैचेन/व्याकुळ/अस्वस्थ असते । जशी एखादी नौका वादळी वारा व अंधारामुळे हेलकावे खात असते । अशा वेळेस तिला मजबुत आसरा(जसे बेट/द्वीप) हवा असतो । पण आसपासचे लोकही कमीजास्त प्रमाणात व्याकुळ असतात।

��मग भगवान म्हणतात ईतर ठिकाणी शोधण्यापेक्षा मनुष्याने मनुष्याने सद्धर्माचाच शरण/आसरा घ्यावा । सद्धर्मात(शील+समाधि+प्रज्ञा) स्थिर मन आपले मार्गदर्शक बनेल ।

��अत्त दीप(द्वीप) भव।

��आठ लोकधधर्म : सुख-दुख/ निंदा-स्तुति/मान-अपमान/यश-अपयश

भवतु सब्ब मंगलं।

-संबोधन धम्मपथी

Monday, 19 January 2015

🌸 धर्म के दोहे 🌸

पके कर्म की चित्त पर, जब उदीर्णा होय ।
नये कर्म बांधे नही, स्वतः निर्जरा होय।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
🏮बुद्ध शिकवणी नुसार कर्माचे परिणाम ह्या च जन्मात मिळाल्या शिवाय राहत नाही। पिकलेल्या/तयार कर्माचा परिणाम जेव्हा मन+शरीरावर होतो तेव्हा साधारण रोगाच्या लक्षणा (जसा ताप / सर्दी /खोकला)  सारखा  सहज ओळखण्या एवढा सोपा नसतो। जर ओळखता / समजताच नाही आला तर दुर कसा करणार? साधारण मनुष्य हे समजत नसल्याने बैचेनीत अजुन दुख देणारी कर्मे करीत राहतो, दुःख भोगीत असतो ।

🏮आचार्य म्हणतात  मनाच्या पडद्यावर जेव्हा अशा पिकलेल्या कर्माचा परिणाम  (चित्तात विचार व  शरीरावर  सुक्ष्म संवेदनांच्या) आधाराने होत असतो। ह्या संवेदनांमुळेच वाईट वस्तु प्रिय (जसे परस्त्री-बाटली) वाटते व चांगल्या गोष्टी अप्रिय (जसे कर्तव्य - सद्गूण). हीच आहे प्रतीत्य समुत्पादाची तोडता येणारी कडी।

🏮आणि प्रत्येक संवेदना (सुखद, दुःखद, असुखद-अदुःखद) ही एखाद्या परिणाम तयार झालेल्या कर्माच्या रुपाने बाहेर पडते, यालाच उदीरणा (  अंतर्मनातुन विचार बाह्य मनात डोकावणे ) म्हणतात।

🏮ह्या संवेदनांचा समतेने सामना केल्यावरच दुःखद / सुखद कर्मांचे परिणाम नष्ट करता येतात । शील तर समाधि (म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता) वाढवण्यास मदत करते। पण समाधि ने समता वाढत नाही प्रज्ञेने वाढते।

🏮 'समता' म्हणजे ( संवेदनांना महत्व न देणे / संवेदनांना भीक न घालणे)। समता ठेवली कि नवे कर्म संस्कार बनायचे थांबतात।

🏮प्रज्ञाच खरोखर संवेदनांचा जन्माबाबत जागृती व संवेदनांचा दुष्प्रभाव नष्ट (निर्जरा) करु शकते।

🏮ज्या ज्या वेळी मन विचलित होते तेव्हा समाधि उपयोगी असते। पण जेव्हा मन क्रोध / वासना / भयाने ग्रासते तेव्हा संवेदनांच्या उत्पाद-व्ययाकडे (निर्माण - अस्त) बारकाईने लक्ष द्यावे । अशांत मन शांत होत कर्मांचे दुष्परिणाम नष्ट होतील । याला निर्जरा म्हणतात।असे करीत राहिल्यास मागचे सर्व न पिकलेले कर्म संस्कार टप्या टप्याने मनाच्या पडद्यावर येत नष्ट होतात। व्यक्ति निर्मळ होते।

भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी 🙏

Friday, 16 January 2015

🌸धर्म के दोहे 🌸
पग पग बढता ही रहे, प्रबल रहे पुरुषार्थ ।
धरम पंथ दोनों सधे, स्वार्थ और परमार्थ।।
- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
सहसा चांगले कर्म करीत राहण्याचा मनुष्याचा प्रयत्न असतो। पण परिस्थिती समोर मनुष्य कच खातो।😫
चांगले वागायची आशावादी सुरुवात करताना, प्रयत्नांना  अमुक एका वेळे नंतर यश येईल अशी अपेक्षा असते। पण यश / सुख काही यायची चिन्ह दिसत नाही ।स्वतःच्या स्वप्नांना, इज्जतीला, सुखांना जपण्याच्या प्रयत्नात चांगली कामे करायचे थांबवुन, वाईट कर्मे करायला सुरुवात करतो।
अशा निराशेच्या वेळी पुर्वी केलेल्या सत्कर्मावर / प्रयत्नांवर पाणी सोडले जाते।
😔का होते असे?
🌞एखादी गृहिणी सकाळ, दुपार व संध्याकाळी घराला झाडु मारुन स्वच्छ करते। तसेच या दरम्यान काहीही  कारणाने घर अस्वच्छ तेव्हाही गरजे नुसार स्वच्छता करते।
एवढी काळजी घेत असताना ही हळुच नकळत प्रत्येक क्षणाला घाण - धुळ घरात येत असते। दारे - खिडक्या नेहमी बंद नाही ठेवु शकत। आणि जरी कधी बंद ठेवली तर आतली (न निघालेली) जुनी घाण व घरातील कामे नवीन घाणेची निर्मिती करतात। त्यामुळे नियमित सफाई गरजेचीच असते।
🌞त्याच प्रमाणे आपल्या शरीर रुपी घराच्या दारे - खिडक्या (नाक , जीभ, त्वचा, कान व डोळे) नेहमी निराशा / भीती / तंद्री / बैचेनी / वासना व पश्चात्तापाची घाण घरात (शरीरात + मनात) घेत असतात । मनुष्य जरी कोमात गेला (सर्व दारे खिडक्या "5 ज्ञानेंद्रिये" बंद) तरी मनातील न काढलेली जुनी घाण (कर्म संस्कार) ही नवीन घाण बनवीत असते।
मग आशा, जिद्द व एकुणच पुरुषार्थ कमी पडतो। सद्धर्म धारण करताना कळते कि अविचार / मानसिक कचरा कसा, कुठे, कधी व किती आला व किती अगोदर तपासुन होता।
🌞धर्म विपश्यनेद्वारे कचरा बाहेर काढायला व नवा कचरा न बनवायला शिकवतो। त्यामुळे आध्यात्मिक (स्वार्थ) व सांसारीक (परमार्थ) प्रगती होते।पण तसे न झाल्यास धर्म (शील + समाधि+ प्रज्ञा) न रुजल्याचे स्पष्ट होते ।
🌞अशा प्रकारे प्रत्येक पावलो-पावली धर्म आशा व पुरुषार्थ वाढवण्यात खुप मदत करतो।

भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी 🙏

Thursday, 15 January 2015

धर्म के दोहे

शील समाधी ध्यान कि, बही त्रिवेणी धार।
डुबकी मारे सो तिरे, हो भवसागर पार।।

- कल्याणमित्र सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:

ऐकदा एका गृहस्थाने शास्त्यांना ( बुद्धांना ) ऐक प्रश्न विचारला:
शील जास्त महत्वाचे कि प्रज्ञा?
पहिले प्रथम कोण महत्वाचे?

🌞तथागत म्हणतात:
शील हे प्रथम प्राथमिक अंग आहे। ते समाधी ला बलवान / निर्मळ बनवते। समाधी ही प्रज्ञेला बलवान / निर्मळ बनवते। प्रज्ञा ही निर्वाणा साठी उपयोगी आहे। जसे तीन पायांचे आसन।💺

गृहस्थ: एखादे उदाहरण देवून स्पष्ट करावे । 🙏

🌞तथागत म्हणतात: जेव्हा एखाद्या चे दोन्ही हात घाणीने खराब झालेले असतात । तेव्हा तो व्यक्ती सुरुवातीला एक हात (शील) साफ करते. नंतर त्या पहिल्या धुतलेल्या हातानेच दुसरा हात (प्रज्ञा) साफ करते ।
आता दोन्ही हात साफ झाल्यावर तो दोन्ही हात एकमेकांवर रगडून खुप व्यवस्थित पणे एक हात दुसर्या हाताचे व दुसरा हात पहिल्या हाताचे कानेकोपरे अगदी स्वच्छ / निर्मळ करतात। हे दोन्ही हात एकमेकांचे पुरक ठरतात।

अगदी याच प्रमाणे हे गृहस्था, सुरुवाताचे माफक  शील प्रज्ञेला स्वच्छ बनवते। समाधि इथेही एकाग्रते च्या स्वरुपात असते।
 प्रज्ञा मिळाली कि शील आणखीन सहज व मनापासून होते। शील आणखीन पुष्ट झाले कि (समाधि, व समाधि मुळे ) प्रज्ञा  आणखीन स्वच्छ, खोल व गंभीर बनत जाते ।

त्यामुळे 🌷शील - समाधि - प्रज्ञा 🌷 हे धर्माचे परिपूर्ण व परिशुद्ध अंगे एकमेकांना बल देतात व मदतच करतात । त्यामुळे त्यांच्या संगमा शिवाय धर्म व निर्वाण शक्य नाही।

तो गृहस्था प्रसन्न झाला। 😊


भवतु सब्ब मंगलं।

- संबोधन धम्मपथी

Wednesday, 14 January 2015

माझे बरेच मित्र व ईतर ही अनेक तरुण-तरुणी मद्यपी बनतात, खास करुन 31 डिसेंबर च्याच रात्री.
आणि जीवनात जेव्हा कधी बैचेनी, व्याकुळता, आनंद व अस्वस्थता मनात थैमान घालते तेव्हा मग दारुचा  विटाळ वाटत नाही। उलट ती सहज मुक्तीदायिनी / विश्रांती दायिनी / आराम दायिनी वाटते। 😜😛
पण बेहोषीतल्या आरामात समस्या तीळभरही सुटत नाही, वेळ / लढण्याची सवय निसटते व ढळणारे आरोग्य परिस्थिती आणखीन कठीण करुन टाकतात ।
याबद्दल सर्वांनी जागरूक राहावे । शील- सदाचार व संयम ढळु देवु नये। आनंदी राहावे। नव्या वर्षात शुद्ध धर्मात ( शील + समाधि + प्रज्ञा )  प्रगती होवो व क्षांती लाभो ही सदिच्छा ।
भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी