Monday, 18 October 2021

धम्म चर्चा : उपासकाने भिक्षु चे पाय धुवावेत का?

प्रश्न: उपासकाने भिक्षु चे पाय धुवावेत का? ह्या फोटो प्रमाणे ?



 उत्तर:
बुद्धांनी उपासकाला भिक्षुचे पाय धुवायला सांगणे ही तर खुप दुर ची गोष्ट, बुद्धाने त्या काळातही अनावश्यक आदर/थाट, अनावश्यक खर्च व अनावश्यक सत्कार ही थांबवलेला होता. 

पहिली घटना:
तथागतांनी बोधिराजकुमाराने केलेला अनावश्यक खर्च व अनावश्यक सत्कार मौन राहुन नाकारला  

 कौशांबीचा‌ राजकुमाराने राजमहालात भगवंताला भिक्षु संघासहित बोलावले असताना, महालाच्या पायऱ्यावर भगवंतांच्या स्वागताठी पांढ-या शुभ्र पायघड्या घातल्या होत्या. अनेक वेळा महालात यायची विनंती करूनही भगवान तिथेच पायघड्याच्या बाजुला शांत उभे राहिले.  भिक्षु आनंद भगवंताचा आर्य-विनय / धर्म-विनय ओळखून होते, त्यांना याचे कारण कळाले.

तेव्हा भिक्षु आनंद म्हणाले, भावी काळातील जनतेला जमणार /पटणार नाही अशा रुढी भगवंताला ठेवायच्या नाही. ही भावी जनतेवर अनुकंपा(दया बुद्धी) आहे. तुम्ही राजकुमार आहात, जो खर्च तुम्हाला शक्य होईल ते इतर सामान्य माणसाला /गोर-गरीबाला पेलवणार नाही. त्या पायघड्या हटवल्या नंतरच तथागतांनी महालात प्रवेश केला. अशा प्रकारे भगवंताने त्या पायघड्या "अनावश्यक आदर" आहे, असे भिक्षु आनंदाद्वारे सांगुन काढायला सांगितल्या होत्या.


दुसरी घटना:
भगवतांनी परिनिर्वाणाची घोषणा केल्यावर अनेक भिक्षु भावुक होत  भगवंताची पुजा करू लागले. यावर  तथागतांनी प्रेमाने समजावले कि, फुले-हारांनी  बुद्ध पुजा ही तथागताला अभिप्रेत अशी नाही. बुद्ध म्हणाले माझी पुजा तशी होत नाही.

 ईमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पुजेमि!!

भाषांतर: ३६ बोधिपक्षिय अनुधम्म/उपधम्म यांचे उत्तम शिक्षण व पालन करीत, मी तथागतांना वंदन करीत आहे.. 

असेच मार्गदर्शन त्यांनी भिक्षू तिस्स च्या आचरणाकडे सुचना देत भिक्षूंना समजावले.
"जो माणुस धम्म-अनुधम्म/उपधम्म (म्हणजे पारमिता, बोध्यंग, स्मृती, सम्यक प्रधान इत्यादी ३६ बोधिपक्षिय अनुधम्म  यांचे उत्तम शिक्षण व पालन  करतो, तो‌ माझी पुजा करतो."
 संदर्भ: धम्मपद  अट्ठकथा २.१५५ तिस्सथेरवत्थु

तिसरी घटना: 




आरद्ध वीरिये पहितत्ते, निच्च मी दळ्हपरक्कमे।
समग्गे भालके पस्स, जतन बुद्धानवन्दनं।।

फुले हारांनी बुद्ध पुजा होत नसते. या श्रावकांना पाहा, जे समग्रपणे पराक्रम करीत (निरंतर विपश्यना ध्यान ) मनविशुद्ध करीत आहेत. तीच खरी वंदना.

 संदर्भ: थेरी अपदान २.२.१७१

चौथी घटना:



राजा प्रसेनजितला भगवंतांनी "धम्म काये"ला वंदन करण्यास सांगितले, "रूपकाये"ला नाही!!

वयाच्या ८०व्या वर्षी कोशलराजा भगवंतांना वंदन करताना त्यांच्या पायांचे चुंबन घेतले होते. त्यावर भगवतांनी त्यांना विचारले, "काय झाले महाराज? या शरीराविषयी एवढा आदर व असा विचित्र सन्मान का व्यक्त करीत आहात?" यावरून हे दिसते कि, भगवंताला असा आदर विचित्र व अनावश्यक वाटतो. महामानवाच्या गुणांना समजुन ते धारण करणे, हाच खरा आदर व सत्कार आहे; धर्म पालन करण्याबाबत बुद्धांची हि तीच अपेक्षा आहे. बाकीचे अवडंबर/कर्म-कांड  करण्यात काही लाभ नाही, उलट हानीच आहे.

धारण करें तो धरम हैं, वरना कोरी बात ।
सुरज उगे प्रभात है,  वरना काली रात ।।

(विपश्यना आचार्य गोयंकाजी ) 


बुद्धांनी अहंकार कमी करण्यासाठी अनेक नियम भिक्षु संघाला बुद्धाने आहेत. मागील लेखात धुतांगधारी महाकाश्यपपांबद्दल मी संगितलेलं आहे. 

उपासकांना पाय धुवायला सांगितल्याने भिक्षुंचा अहंकार वाढुन भिक्षुंची हानीच होईल. पाय धूवायला सांगणे हा तर भगवंताला अभिप्रेत असलेला बंधुभाव‌ही नाही आणि समाजसेवेची/कर्तव्याची भावना (........ बहुजन हिताय बहुजन सुखाय , लोकानुकंपाय) तर नाहीच नाही. खुपचं अशोभनीय व‌ दुर्दैवी आहे असे वर दिलेल्या ऐतेहासिक प्रसंगावरून स्पष्ट होते.

आजकाल आपल्याला त्रिपिटक आचार्य डॉ . धर्मरक्षित, महापंडित राहुल सांकृत्यायन, डॉ . जगदीश महाथेरो, महाथेरो आनंद कोशल्यायन अशा अभ्यासु, महापंडित व सेवाभावी भंतेची गरज असताना, असे पाय धुण्याची अपमानजनक किंवा अंधश्रद्धा वाढवणारी वागणुक देणारे भंतेजी दिसतात हे क्लेशदायक आहे. यावरून हे ही दिसते कि बुद्धवाणीचा पुरेसा अभ्यास नाही. मनोरंजनाचे साधने जरा कमी करत, समाजानेही बुद्ध वाणीचे वाचन केल्यास खूप फायदा होईल.

जो भिक्षू (सध्दर्मात) स्वतःला प्रेरित  करतो, आत्मपरीक्षण करतो, 
तो स्वतःची रक्षा स्वतःच करीत, स्मृतिमान भिक्षू (साधक) सुखपूर्वक विहार करील !!
संदर्भ : धम्मपद ३७९

भगवान बुद्ध आणि त्यांचा ऐतिहासिक संघ (भिक्षु-भिक्षुणी, उपासक-उपासिका) यांचे गुण आणि सामाजिक कर्तव्याचे भान  हे खुप प्रेरित करणारे व जीवनाला उभारी देणारे आहे. त्रिपिटकातील ऐतिहासिक सत्यकथांचा अभ्यास केला तर ते स्पष्ट होते. अशा कथा/गाथा हिंदीतही उपलब्ध आहेत. इथे क्लिक करा मज्झिम  निकाय   धम्मपद 

अभ्यासु व‌ समाजसेवी बुद्धांच्या संघाला वंदन करतो व अशी अशोभनीय वागणुक दिसणार नाही याची आशा करतो. 

संबोधन धम्मपथी
९७७३१००८८७

Wednesday, 30 June 2021

धम्मचर्चा : स्मृती-अनुस्मृती आणि धम्म-अनुधम्म यात काही फरक आहे की एकच आहेत

  उत्तर: 

अनु म्हणजे मुख्य विषयाचे उप-विषय, उपविभाग किंवा कप्पे  !!  




 उदाहरण : ईमाय धम्मा-नुधम्म(धम्म-अनुधम्म) पटिपत्तिया बुद्धं पुजेमि!!

 धम्म‌ आणि अनुधम्म:
 धम्म‌: शील, समाधि, प्रज्ञा
 अनुधम्म : ३६ बोधिपक्षिय उप-धम्म


 स्मृतीचे दोन अर्थ आहेत.
१. उजळणी/आठवण/memory
२. जागरुकता... awareness/mindfullness  

स्मृती म्हणजे एखाद्या विषयाची उजळणी/आठवण किंवा जागरुकता... awareness !

अनुस्मृती म्हणजे एखाद्या 
(विषयाच्या) स्मृतीच्या(इथे सजगता- सर्व उप-विषयांची विषयाची उजळणी/आठवण किंवा त्या उप-विषयांची जागरुकता... awareness!!!


धम्म अनुस्मृती म्हणजे, धम्माच्या sub-topic ची उजळणी!(अर्थ पहिला)

बुद्धानुस्मृती म्हणजे, बुद्धाच्या sub-topic ची उजळणी!(अर्थ पहिला)

नुसती "अनुस्मृती" (अर्थ दुसरा) म्हणजे स्मृती(विपश्यनेसाठी लागणारी स्मृती व संप्रज्ञान मधील *स्मृती* ) ‌च्या sub-topic (कायानुस्मृती, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृती, वेदनानुस्मृती) ची उजळणी!(अर्थ दुसरा)

भले होवो.
संबोधन धम्मपथी
9773100886
👍🙏

Saturday, 19 June 2021

दान करताना समज व गैरसमज

 प्रश्न १: साधारणतः मनुष्य दान का करतो ?


उत्तर : जेव्हा माणुस दान देतो, तेव्हा वरवर पाहताना असे दिसते पाहा किती परोपकारी व माणुसकीची जाण ठेवणारा माणुस आहे. पण अंतर्मनात स्वतःने पहिले तर कितीतरी वेळा माणसाचा स्वार्थ व भीती असल्याने मनुष्य दाणे देत असतो. आसपासच्या अनपेक्षित व नको असलेल्या खूप दुर्दैवी घटना नकळत घटत असतात. वाईट वाटते, भीती वाटते पण कारण कळत नाही. त्यामुळे मी बैचेन होतो. मी व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) ठीक/सलामत  राहावा यासाठी माझ्या संप्रदायातील पूजापाठ करणारे व वाईट काम न करणारे माणसे असतात. 


त्यांना दान दिले तर माझी पापे कदाचित धुतली जातील व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) सलामत राहतील अशी कल्पना व आशा करतो. एकूणच फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी दान केल्याने ते दान परोपकारी ठरत नाही त्यामुळे त्याचे ते पुण्य मिळत नाही जे परहितबुद्धीने किंवा कल्याणकारी भावनेने मिळते. कारण दान देताना मनात बैचेनी आणि  स्वतःचा व स्वतःच्या संप्रदायाचा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) स्वार्थाची भावना प्रबळ होती. 

प्रश्न २: म्हणजे मनुष्य दान देताना निस्वार्थ भावना असली कि पुण्य मिळते. बरोबर ना?

उत्तर :जरुरी नाही. जसे एका शेतकऱ्याने नापीक जमिनीत खूप मेहनत-मशागत करत बीज पेरली तर त्याला अपेक्षित यश येणार नाही. कारण त्याने जमिनीच्या दर्जावरती अजिबात लक्ष दिलेले नाही किंवा त्याची त्याला पुरेशी माहिती नाही. 


तसेच जर दान स्वीकारणारा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) जर शील पाळणारा सदाचारी नसेन, संयमी, मन विशुद्ध करणारा व लोकांना (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) मदत करणारा नसेल तर अशा अनाडी, आळशी किंवा ढोंगी माणसाला दिलेले दान जरी निस्वार्थ भावनेतुन असले तरी त्याच्या अपेक्षित तेवढा लाभ होत नाही. कारण दान स्वीकारणाऱ्याच्या नैतिक दर्जाबाबत (स्वशुद्धी व सामाजिक जबाबदारीबद्दल) दान देणारा सजग नसतो

प्रश्न ३: मग  बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' असे स्वतःच्या संप्रदायालाच दान करायला का बरे सांगितले असावे?

उत्तर : बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' (धम्मपद २४, ३५४) सांगितले जरूर आहे पण त्या अर्थाचा सध्या अर्थच बदलला आहे. 

पहिली महत्वाची गोष्ट अशी कि बुद्धाने  "तुम्ही एखाद्या शीलवान, कर्तव्यबुद्धी असलेला व इतरांना निस्वार्थपणे मदत करणाऱ्याचा संपूर्ण खात्री  केल्यावर आदर करावा भले तो कुठल्याही जात-संप्रदायाचा असो!" असे सांगितले आहे हे कायम लक्षात ठेवावे कारण बुद्ध वाणी हि सार्वजनिन आहे. सर्वाना लागू पडते व सर्वासाठी मंगलमय आहे. 

☸️ सध्याचा 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' प्रचलित चुकीचा अर्थ:

फक्त एका बौद्ध संप्रदायाचा प्रचार-प्रसारासाठी बौद्ध माणसांनाच(भिक्षु -भिक्षुणी, उपासक-उपासिका) दान‌ करत जा. त्यासाठी केलेली इतर वस्तुंचे दान‌( मुर्ती/पैसा/चीवर/भोजन/औषधे), अशा भौतिक वस्तुंचे दान बौद्ध संप्रदायातील लोंकासाठीच केलेले असते,ते जगातील इतर सर्व दाना‌पेक्षा‌ श्रेष्ठ आहे. ह्या दानाचा बुद्ध वाणी लोकांना सांगण्याशी स्पष्ट संबंध कोणाला ठेवण्याची गरजच‌ वाटत नाही.

हा समज व धोरण चुकीचे व सर्वस्वी अयोग्य आहे!! कारण दान करणारा हा दान स्वीकारणाऱ्या(भिक्षु-भिक्षुणीं-तज्ञ उपासक व तज्ञ उपसिकांकडुन) कडुन माझ्या, माझ्या परिवाराच्या किंवा सर्व  समाजाच्या मन विशुद्धीला आवश्यक असणाऱ्या बुद्धवाणीसाठी कुठल्याच प्रकारची योजना, परोपकाराची अपेक्षा ठेवताना दिसत नाही. 

तशी स्पष्ट अपेक्षा कोणाला ठेवण्याची गरजच‌ बरे वाटत नाही यांचे उत्तर वर प्रश्न #१ मध्ये दिलेलं आहे.

असे दान अंधश्रद्धा बनते कारण त्याने कोणाचे‌ व कुठल्या समाजाचे भले असे होईल असे दानकर्त्याला व दान स्वीकारणाराला सांगता यत नाही. 


तसेच दान स्वीकारणाराची पात्रता एवढीच कि तो बौद्ध संप्रदायाचा आहे!!! हि बुद्धाला अपेक्षित सार्वजनिनता व महाकारुणिकता दिसतच नाही.   


तो किती‌ शीलवान, विशुद्ध मनाचा, परहितबुद्धि जपणारा(धुतांगधारी)  व‌ अधिकृत बुद्धवाणी वाचुन ती सुयोग्य पद्धतीने मानव जातीला  (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) देण्याचं कर्तव्ये करणारा असावा‌ अशी‌ कुठलीच अपेक्षा नसते. त्यामुळे बुद्धाच्या शिकवणुकीबाबत इथे गैरसमज झाल्याने सार्वजनिक बुद्धवाणीला इथे एका बौद्ध समाजापुरते ठेवण्याची मोठी चूक झाली आहे.  

☸️ प्रचलितचुकीच्या अर्थामुळे उद्भवलेली मोठी समस्या :

तुम्ही दान स्विकारुन खालील गोष्टी प्रामुख्याने कराव्यात असे दान देणारा सांगताना दिसत नाही :

१. त्रिपिटकात बुद्धाने केलेले मार्गदर्शन (कुटुंबाला, नेत्याला, कामगारांना, मालकाला, नोकरांना, पती -पत्नींना, मुलांना) वाचुन आम्हास शिकवावे. (म्हणजे परियत्ती)

२.  विपश्यना: ध्यान साधना विधी  समाजाला शिकवण्यासाठी स्वतः विपश्यना साधनेत प्रवीण/एक्सपर्ट होऊन. सद्गुण जीवनात आणण्यासाठी समाजाला जागे करावे. (म्हणजे पटीपत्ती )

जर दान कर्त्याने अशी अपेक्षाच नाहो ठेवली तर दान स्वीकारणारा सुस्तावतो, आळसावतो व जीवनाला बुद्धाने सांगितलेला उद्देश्य नसल्याने (अधिकाधीक लोंकाच्या हित व सुखासाठी दिवस रात्र मेहनत करा - बहुजन हिताय बहुजन सुखाय ) खालील गोष्टी वाया घालवतो :

१. दान देणाऱ्याचा पैसे वाया जातात (कारण पैसे घेऊन कल्याणकारी काम करत  नाही) आणि त्यामुळे त्याला पुण्यही मिळत नाही.  

२. स्वतःचे जीवन निरर्थक किंवा थोतांड बनते

३. बुद्धाच्या महान धम्माची व संघाची अवनती (वाट लावतो)

☸️ 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' चा खरा अर्थ:

धम्म (बुद्धवाणी-म्हणजे शील समाधि प्रज्ञेला अनुसरुन असलेले ३७ बोधिपक्षिय धर्माविषयी निस्वार्थ व परहितबुद्धीने  बुद्धी ने केलेले लेखन/मार्गदर्शन/सेवा/शंकेचे निरसन/ध्यान शिबीराचे आयोजन) दान (मग ते कोणत्याही जाती-संप्रदाय-देशाच्या माणसाच्या विशुद्धीसाठी (मनाला निर्मळ बनवण्यासाठी) असो. हे‌ कुठल्याही प्रकारच्या दानात सर्व‌श्रेष्ठ दान‌ असते.


रण सहस्त्र योद्धा लडे, जीते युद्ध हजार ।

पर जो जीते स्वयं को, वही शुर सरदार ।।


क्षण-क्षण क्षण-क्षण बी ता, जीवन बीता जाय ।

इस क्षण का उपयोग करे बीता क्षण नहीं आय।।  


अशा प्रकारे स्वतःच्या जीवनाचा व इतरांनी दिलेल्या दानाचा सर्व समाजाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करीत असतो. 

भले‌ होवो!!

- संबोधन धम्मपथी.

९७७३१००८८६

Sunday, 25 April 2021

सब्ब दानं धम्मदानं जिनाती

दानाबद्दलचे काही  गैरसमज दूर झाले कि खूप  फायदा होतो. 

☸️ धम्मदानच‌ सर्व‌श्रेष्ठ दान‌ का असते? :

एखाद्या ला पैसा द्या,‌पण मग काही दिवसांनी परत गरज लागेल. पैसा कायम कुठे टिकतो? एखाद्या ला जेवण द्या, काही तासांनी परत भुक लागेल. भुक कायम कुठे मिटते?एखाद्या ला रक्त/अवयव दान द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? तसेच एखाद्या ला औषध द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? ह्या दानाचा परिणाम कायम नसतो. 



☸️ गरज पुन्हा लागतेच!! म्हणुन ही सर्व प्रकारचे दान साधारण दान झालीत. त्यांना‌ कोणालाच‌ हलके/कमी लेखत‌ नाही, तुम्हीही लेखु नका. पण त्यांची मर्यादाही ओळखा!!


पण प्रकृती/निसर्ग नियम दान लक्षात ठेवते.‌जे‌ पेराल ते कालांतराने उगवते. भरभरून निसर्गाचा प्रतिसाद मिळतो.


☸️ जसे एक आंब्याची कोण लावली‌तर हा निसर्ग/प्रकृती/कुदरत का कानुन त्या कर्माचं व त्यासारखेच मोठं मोठं फळ देतो. अनेक फळ व फळातुन पुन्हा मोठी झाडं येतात. 


☸️ तसेच एखाद्याने अन्नदान दिले, तर‌ निसर्ग त्यांच्या कर्माची फळं देतो...ह्या जन्मात किंवा पुढील जन्मात एकुण (ह्या जन्माचे व मागील जन्मी च्या कर्मफळानुसार) तसेच काळानुरुप व दर्जानुरूप   (जसे केळ्याचे फळ दर महिन्याला येते, पण आंब्याचे फळ उन्हाळ्यातच येते) तसे फळ मिळते.


 तो उपाशी पोटी झोपत नाही, खुप संपन्नता लाभते. तसेच औषधाचे , कपड्याचे, पैशाचे व इतर मदतीचे दान निसर्ग/धम्म अनेक पटीने देतो.


☸️ पण ह्या कुठल्याच दानाने जो‌ लाभार्थी असतो त्याच्या मनाची विशुद्धी व निर्मळता साध्य होत‌ नाही. दुर्गुण दुर होऊन मंगल शांती मिळत नाही. जसे आपल्याला दिसते कि अनेक पैसेवाले माणसे बैचेन व अशांत असतात. पैशाचा  होत नाही , कारण लोभ कमी होण्यासाठी, धर्म (धम्म : निसर्गाचे नियम ) व धर्मवान (सद्गुणी -सदाचारी-शुद्ध -संत) लोंकाची संगत व मार्गदर्शनही नाही. तु(मचे कर्म पैशाचे दान देण्याचे होते, तर पैसे मिळाला. धर्म(सुख-शांती) मिळवुन जर ती दान केली असती तर सुख-शांती मिळाली असती. 

धरम ना हिंदु बौद्ध है, सिख ना मुस्लिम जैन ।

धरम चित्त की  शुद्धता, धरम शांती सुख चैन ।।


☸️ पण जर जो कोणी करुण चित्ताने व निस्वार्थ भावनेने धम्माचे ( बुद्धवाणी: जी विशुद्ध मन व  कर्म निर्दोष बनवुन एकुणच  जीवन निर्दोष बनवते ) दान देतो किंवा धम्माचे दान मिळेल यासाठी मदत करतो, त्याला ह्या व पुढील अनेक जन्मातही निसर्ग/प्रकृती अनेक पटीने जास्त धम्मदान (बुद्ध वाणी जी सद्गुण व सुखशांती वाढवते) मिळवुन देते. अनेक धम्मविहारी व धम्मप्रवीण कल्याणमित्र मार्गदर्शक व मित्र भेटतात. ज्यामुळे निर्वाण/मोक्ष मिळुन लाखो-करोडो वेळा पुन्हा पुन्हा जन्म-मृत्युच्या फेर्यातुन मुक्त (भवमुक्त) होतो. 


☸️ पुन्हा जर जन्मच नाही तर भुख, आजार, दुःख, प्रिय व्यक्तीचा वियोग किंवा अप्रि व्यक्तीचा संयोग, दारिद्रय, दुर्भावना व मृत्यु पासुन कायमची सुटका होते. मग ज्यामुळे सर्व प्रकारच्या दु:खातुन कायमची सुटका होते, ते दान अर्थातच महान व सर्वोत्तम आहे ना?


☸️ संधी नुसार (कालिक) दान व संधी नसताना (अकालिक‌) दान: विवेकशील व्यक्ती हे चांगलं जाणते कि संधी असल्यावर (कालिक) दिलेले‌ दान खुप कल्याणकारी असते. जसे महापुर, महारोग, अग्निकांड, जागतिक साथ, बेरोजगारी, निवारा अशी संकटकालीन संधी मिळाल्यास केलेले संधीयुक्त /कालिक दान(जेवण, औषधं, पैसा, कपडे, सुव्यवस्थेची‌ तजवीज) हे संधी नुसार(कालिक) दान फलदायी असते.


☸️पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते संधी नसताना ही केलेलं असं सार्वकालिक दान!! जे करताना मनुष्य वाईट वेळ जरी नसली तरीही स्वताची‌ सामाजिक जबाबदारी समजुन क्षमतेनुसार दान करीत जातो. आणि तेही धम्मदान (कर्म व जीवन निर्दोष बनवणारी बुद्ध वाणी चे दान)  ज्याने इतरांचे दुःख दुर होऊन, सुखशांती व सद्गुण वाढतील.


☸️असे जात-संप्रदाय न पाहता केलेलं धम्मदान  हे सदा-सर्वदा सर्वहितकारी दान असतं. कारण एकदा का मनुष्याचे मन निर्मळ, शोकविरहित व खंबीर झाले कि तो स्वताची रक्षा स्व:ताच करू शकतो. स्वतः सुखी राहतो व स्वतःची जबाबदारी ओळखुन वेळेनुसार समाजकार्यही करतो. 


म्हणुन भगवान बुद्ध म्हणतात कि, सब्ब दानं धम्मदानं जिनाती !!

भले‌ होवो!!

- संबोधन धम्मपथी.

९७७३१००८८६

 *साभार* : विपश्यना विशोधन विन्यास वरील आचार्य गोयंकाजींचे‌ हिंदी लेख.

 *नोंद:* जर लेखात काही चुक आढळल्यास भाषांतर मी केल्याने चुकीची जबाबदारी माझी आहे, आचार्यांची नाही.

Saturday, 16 January 2021

भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक वीरांचे मनोगत व प्रश्न

 माझ्या वारसांनो तुम्हाला काही सांगायचे आहे, काही विचारायचे आहे. शंभराहून अधिकवर्षे गेली बघा बघता बघता. कोरोना काळ चालू आहे आशा आहे की तुम्ही सुरक्षित असाल.

 जास्त वेळ नाही घेत तुमचा नाही, काही सांगायचं होते म्हणून आलोय तुमच्या स्वप्नात. आमच्या नंतर एक महान, कर्तबगार व थोर शुरवीर होऊन गेला आणि तुम्हाला बरेच सांगुनही गेला, बाबासाहेब नावाचा!! तरीही काहीतरी चुकतंय म्हणून आलो मन‌ मोकळ करायला. 

आमच्याकडे त्यावेळी जे होते त्याने, जसे होतो तसे आणि मानवी जीवनाचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही जीव झोकून लढलो. त्याला विजयस्तंभाला तुम्ही आजही वंदन करत असता. चांगले आहे, पण हे अजिबात पुरेसे नाही. नक्कीच‌ नाही.

जरी आम्ही लढलो तरी युद्ध पुकारण्यापूर्वी पहिली सामाजिक परिस्थिती अनेक वर्षे अनुभवली होती. ती सामुदायिक रित्या समजुन योजना आखली होती. हे पहा जर आम्ही आमच्या पूर्वजांचाच इतिहासाच्या घटनांचा आणि जागेचा उत्सव साजरा करीत असतो नुसतीच मानवंदना देत राहिलो असतो; तर ना आम्हाला मानवी हक्क मिळाले असते ना ही आमची पुढची पिढी जगली असती.




 _त्यामुळे तुमची हि एक तारखेची वंदना आम्हाला पुरेशी नाही. आमची इच्छा आहे तुम्ही काही तरी आम्हाला साजेसे बौद्धिक व धोरणी पराक्रम करावेत. आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमचाही पराक्रम सिद्ध करु शकता का?:_ 

⚡बाबासाहेब फक्त एकदाच का गेले भीमा कोरेगाव ला १९२७ साली, ते ही बौद्ध होण्याच्या २९ वर्षांपुर्वी?

⚡प्रगतिशील व दक्ष बौद्ध समाज म्हणुन तुम्ही आता कुठे व‌ कसे पडत आहात हे तुम्ही कसे, कधी व कुणाकडुन‌ शोधता ?

⚡तुम्ही बौद्ध व अस्पृष्य हा फरक कसा करता ? कि १९५६ सालाची धर्मांतर तुम्हाला कबूलच नाही ?


⚡बहुतेक शिकलेली व पैसेवाले बौद्ध आणि अस्पृश्य (जी समाजाची नवी शक्ती स्थाने आहेत) ते समाजापासून दूर का राहतात ? 

⚡तुम्ही विजयदिन साजरा करताना, एक समाज म्हणुन आपल्या समस्या कोणत्या व त्या कशामुळे निर्माण झाल्या याकडे कधी लक्ष देता का ?

⚡आमची लढाई एका विशेष जातीविरुद्ध/संप्रदायाविरुद्ध नसुन जातिव्यवस्थेच्या विरुद्ध आहे हे तुम्ही कसे विसरलात ?

⚡तुम्हाला विजयदिनी आत्मविश्वास व एकता वाढवायची असतो, कि ज्यांना आम्ही हरविले त्यांच्यावर हसायचे असते? अशाने दुश्मन तयार होतील कि दोस्त?

⚡१९५६ नंतर तुम्ही नक्की बौद्ध झालात कि एका संप्रदायाचे सात जन्माचे विरोधक झालात ?

⚡सध्याच्या घडीला समाजाकडे चांगला वैचारिक, सुज्ञ, धोरणी व विविध समाजमान्य नेता नाही(राज्यस्तरावरही नाही व राष्ट्रीय स्तरावरही नाही) याचे कारण काय हे तुम्हाला समजले का ?

⚡समाज म्हणून आपल्याला एक‌ प्रगल्भ नेता हवा आहे कि एक विदुषक ? तुमचे शेजारी व मित्र अशा नेत्यावर व समाजावर कितीही हसले तरी‌ नवीन प्रगल्भ नेत्याची गरजच वाटत नाही का तुम्हाला?




⚡बाबासाहेबांचे विचारांची पायमल्ली करीत विरोधी विचारधारा असणाऱ्या राजकीय पक्षाशी जवळीक करणार्या नेत्याला तुम्ही नेते पदावरून खाली का उतरविले नाही ? कसे उतरायचं हे तरी माहिती आहे का?




⚡एखाद्या नेत्याच्या फक्त २५ वर्षांपूर्वीच्या चांगल्या कामावर त्याला/तिला आज सन्मान का देता? त्यांचे/तिचे सध्याचे निकृष्ट काम, कामचलाऊ धोरण, फसवी/ स्वार्थी वृत्ती का लक्षात घेत नाही? नवा नेता कसा शोधावा हे तरी कळते का?

⚡प्रत्येक नवमुस्लिम/नवख्रिश्चन अस्पृश्याने ती अस्पृश्य आडनावे बदलुन परिपूर्ण धर्मांतर केले हे तुम्हाला का नाही समजले ? नामांतराविषयी तर बाबासाहेबांनी १९३७ साली "मुक्ती कोण पथे" पुस्तिकेतही सांगितलेले होते. 

⚡प्रत्येक नवमुस्लिम/नवख्रिश्चन अस्पृश्याने ती अस्पृश्य आडनावे बदलुन त्यांच्या समाजाची एकता वाढवली हे तुम्हाला का नाही दिसले ? जर आडनावावरुन जात कळते आणि बौद्ध होऊनही भेदाभेद होते (संधींपासुन डावललं जाते) तर तुम्ही तुम्हाला मिळालेली अस्पृष्यता दर्शविणारी नावे धर्मांतरानंतर तुम्ही का बदललेली नाहीत ?

⚡तुमच्या पुढच्या पिढीला तर सोडा आसपासच्या लोकांना बाबासाहेबांचं कर्तृत्व कळेल किंवा बाबासाहेबांचे सर्वांगीण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे कुठले काम तुम्ही करता ? 

⚡वेगवेगळ्या सोसायटीत गेलेल्या बौद्ध माणसाला तुम्ही कुठे व कसे ओळखणार ? बौद्धांची व अस्पृश्यांची आडनावे सारखीच आहेत.अस्पृश्य आडनावे न बदलेल्याने पुढची पिढी बौद्धसंस्कृती टिकवणार नाही याची कल्पना तुम्हाला का नाही आली ?

⚡बौद्ध भिक्षुं ची काळजी‌(जेवण, औषधे व‌ धम्म चर्चा) कोण‌, कधी, कशी व किती‌ घेता? का त्यांना कोणी नेहमी लक्ष व स्नेह देतात का?

⚡गोरगरीब जनतेचा विकास कुठल्या धोरणांमुळे होतो व ती धोरणे कशी टिकवावीत व सुधारावीत हे तुम्हाला माहिती आहे का ?



⚡बाबासाहेबांनंतर तुम्ही एक समाज म्हणून किती शाळा-कॉलेज बांधली आहेत ?

⚡ज्या (समाजाच्या) विकास रोपट्याला रोज पाणी व खत लागते, त्या रोपट्याला फक्त भीम/बुद्ध जयंती उत्सवात सगळा पैसा खर्च करून विकास रोपटे मरून जाते, हे तुम्हाला कधी कळणार ?




⚡तुमच्याकडे शिक्षण असताना आणि पसे देऊन कुठलीही विद्या मिळत असताना तुम्ही अजून ८४,००० बुद्ध उपदेशांपैकी किती उपदेश शिकलात ?

⚡आज अनेक राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक गट आहेत पण ते एकमेकांचेच विरोधक आहेत, याचे कारण कोण शोधणार?

⚡अनेक गटांचे कारण नक्की समाजाच्या अहंकारात आहे कि दुश्मनांची विषारी चाल आहे, एवढे तरी तुम्हाला ठाऊक आहे का ?

⚡बाबासाहेबांच्या संविधानात आतापर्यंत साधारणतः १२० च्या हुन अधिक बदल झाले आहेत. ते का व कोणते हे तुमच्या सध्याच्या कुठल्या नेत्याने तुम्हाला सांगितले आहे? सुशिक्षित असून तुम्हाला ते का माहिती नाही ?  विघातक बदल थांबवायचे कसे माहिती आहे का?

⚡ बाबासाहेबांचे विचार तुमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या विचारवंतांना तुम्ही नियमित मानधन देता कि, टीव्ही च्या केबलवाल्याला ? तुमच्या पिढीला कोण वाचवणार हे तुम्हाला का समजत नाही ?


⚡मानवी हक्कांसाठी बाबासाहेबांनी वेळेनुसार नवनवीन लढाई लढत राहिले कि बुध्द -फुले-कबीरांच्या उत्सवात व वर्गणीत गाफील राहिले?

⚡बाबासाहेबांनी भिमाकोरेगाव चे महत्व बौद्ध झाल्यावर कधी व कुठे सांगितले हे सांगू शकाल का ?


⚡विपश्यनेला विरोध करणाऱ्यांना समाजाची कीड (दारू) , धुंदी व व्यक्तिमत्वाची अनेक व्यसने दूर करुन सुसंस्कारी समाजाचे निर्माण कसे करावे असा प्रश्न विचारला का ?

⚡तुम्हाला आणि तुमच्या पुढची पिढीला बौद्ध म्हणून ओळख/लौकिक आवडेल कि अस्पृश्य म्हणून ?

⚡तेव्हाची लढाई मैदानात व्हायची आताच्या ऑनलाईन युगात लढाई कुठे व कशी होते हे तुम्हाला माहिती आहे का ?

हे तीस प्रश्न दर महिन्याच्या तीसही दिवस तुमच्या मनात ठेऊन उत्तर शोधल्याशिवाय उसंत घेऊ नका.

🔊लक्षात घ्या " *इमाय धम्मानु-धम्म पटीपत्तिया बुद्धं पुजेमी"* म्हणजे बुद्ध पुजा/वंदना मी त्यांच्या धम्मानुसार वागुन (आचरणात आणुन) पूर्ण करीत आहे, नुसत्या फुले-अगरबत्त्यांने नाही. 

त्याचप्रमाणे दरवर्षी आम्हाला औपचारिक वंदन करण्यापेक्षा, ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे व त्या नुसार योजना आखून प्रगती करणे (आचरणात आणुन)हि तुमची खरी विजयस्तंभाला मानवंदना(खरा पराक्रम) ठरेल. ते तसे सोपे नाही, "बौद्धिक" पराक्रम सोपा नाही. नेहमी दक्षता व समजुतदारपणा दाखवावा लागतो.


तोच खरा पराक्रम ठरेल आणि तीच खरी वंदना‌ ठरेल. तेव्हाच तुमची पुढची पिढी तुम्हाला या "बौद्धिक" पराक्रमाबद्दल धन्यवाद/वंदन/अभिनंदन करीन .

 नाहीतर काही वर्षांनी समाज म्हणून आपण नक्की कोण हे विचारावे लागेल ?


आजच्या युगाला साजेसा असा पराक्रम करणार्यांना वारसांना भेटायला कोणाला आवडणार नाही . 
तुम्हाला जर एखादे महान काम जमत नसेल तर, नेहमीची छोटीशी कौटुंबिक व सामाजिक कामे महानतेने (कौशल्य, दक्षता,विनम्रता व सद्भावना  ...... म्हणजे एकुणच निर्मळ मनाने) करा. तुम्हाला देशाची व मानवतेची सेवा करण्यास यश लाभो हि सदिच्छा.