दानाबद्दलचे काही गैरसमज दूर झाले कि खूप फायदा होतो.
☸️ धम्मदानच सर्वश्रेष्ठ दान का असते? :
एखाद्या ला पैसा द्या,पण मग काही दिवसांनी परत गरज लागेल. पैसा कायम कुठे टिकतो? एखाद्या ला जेवण द्या, काही तासांनी परत भुक लागेल. भुक कायम कुठे मिटते?एखाद्या ला रक्त/अवयव दान द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? तसेच एखाद्या ला औषध द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? ह्या दानाचा परिणाम कायम नसतो.
☸️ गरज पुन्हा लागतेच!! म्हणुन ही सर्व प्रकारचे दान साधारण दान झालीत. त्यांना कोणालाच हलके/कमी लेखत नाही, तुम्हीही लेखु नका. पण त्यांची मर्यादाही ओळखा!!
पण प्रकृती/निसर्ग नियम दान लक्षात ठेवते.जे पेराल ते कालांतराने उगवते. भरभरून निसर्गाचा प्रतिसाद मिळतो.
☸️ जसे एक आंब्याची कोण लावलीतर हा निसर्ग/प्रकृती/कुदरत का कानुन त्या कर्माचं व त्यासारखेच मोठं मोठं फळ देतो. अनेक फळ व फळातुन पुन्हा मोठी झाडं येतात.
☸️ तसेच एखाद्याने अन्नदान दिले, तर निसर्ग त्यांच्या कर्माची फळं देतो...ह्या जन्मात किंवा पुढील जन्मात एकुण (ह्या जन्माचे व मागील जन्मी च्या कर्मफळानुसार) तसेच काळानुरुप व दर्जानुरूप (जसे केळ्याचे फळ दर महिन्याला येते, पण आंब्याचे फळ उन्हाळ्यातच येते) तसे फळ मिळते.
तो उपाशी पोटी झोपत नाही, खुप संपन्नता लाभते. तसेच औषधाचे , कपड्याचे, पैशाचे व इतर मदतीचे दान निसर्ग/धम्म अनेक पटीने देतो.
☸️ पण ह्या कुठल्याच दानाने जो लाभार्थी असतो त्याच्या मनाची विशुद्धी व निर्मळता साध्य होत नाही. दुर्गुण दुर होऊन मंगल शांती मिळत नाही. जसे आपल्याला दिसते कि अनेक पैसेवाले माणसे बैचेन व अशांत असतात. पैशाचा होत नाही , कारण लोभ कमी होण्यासाठी, धर्म (धम्म : निसर्गाचे नियम ) व धर्मवान (सद्गुणी -सदाचारी-शुद्ध -संत) लोंकाची संगत व मार्गदर्शनही नाही. तु(मचे कर्म पैशाचे दान देण्याचे होते, तर पैसे मिळाला. धर्म(सुख-शांती) मिळवुन जर ती दान केली असती तर सुख-शांती मिळाली असती.
धरम ना हिंदु बौद्ध है, सिख ना मुस्लिम जैन ।
धरम चित्त की शुद्धता, धरम शांती सुख चैन ।।
☸️ पण जर जो कोणी करुण चित्ताने व निस्वार्थ भावनेने धम्माचे ( बुद्धवाणी: जी विशुद्ध मन व कर्म निर्दोष बनवुन एकुणच जीवन निर्दोष बनवते ) दान देतो किंवा धम्माचे दान मिळेल यासाठी मदत करतो, त्याला ह्या व पुढील अनेक जन्मातही निसर्ग/प्रकृती अनेक पटीने जास्त धम्मदान (बुद्ध वाणी जी सद्गुण व सुखशांती वाढवते) मिळवुन देते. अनेक धम्मविहारी व धम्मप्रवीण कल्याणमित्र मार्गदर्शक व मित्र भेटतात. ज्यामुळे निर्वाण/मोक्ष मिळुन लाखो-करोडो वेळा पुन्हा पुन्हा जन्म-मृत्युच्या फेर्यातुन मुक्त (भवमुक्त) होतो.
☸️ पुन्हा जर जन्मच नाही तर भुख, आजार, दुःख, प्रिय व्यक्तीचा वियोग किंवा अप्रि व्यक्तीचा संयोग, दारिद्रय, दुर्भावना व मृत्यु पासुन कायमची सुटका होते. मग ज्यामुळे सर्व प्रकारच्या दु:खातुन कायमची सुटका होते, ते दान अर्थातच महान व सर्वोत्तम आहे ना?
☸️ संधी नुसार (कालिक) दान व संधी नसताना (अकालिक) दान: विवेकशील व्यक्ती हे चांगलं जाणते कि संधी असल्यावर (कालिक) दिलेले दान खुप कल्याणकारी असते. जसे महापुर, महारोग, अग्निकांड, जागतिक साथ, बेरोजगारी, निवारा अशी संकटकालीन संधी मिळाल्यास केलेले संधीयुक्त /कालिक दान(जेवण, औषधं, पैसा, कपडे, सुव्यवस्थेची तजवीज) हे संधी नुसार(कालिक) दान फलदायी असते.
☸️पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते संधी नसताना ही केलेलं असं सार्वकालिक दान!! जे करताना मनुष्य वाईट वेळ जरी नसली तरीही स्वताची सामाजिक जबाबदारी समजुन क्षमतेनुसार दान करीत जातो. आणि तेही धम्मदान (कर्म व जीवन निर्दोष बनवणारी बुद्ध वाणी चे दान) ज्याने इतरांचे दुःख दुर होऊन, सुखशांती व सद्गुण वाढतील.
☸️असे जात-संप्रदाय न पाहता केलेलं धम्मदान हे सदा-सर्वदा सर्वहितकारी दान असतं. कारण एकदा का मनुष्याचे मन निर्मळ, शोकविरहित व खंबीर झाले कि तो स्वताची रक्षा स्व:ताच करू शकतो. स्वतः सुखी राहतो व स्वतःची जबाबदारी ओळखुन वेळेनुसार समाजकार्यही करतो.
म्हणुन भगवान बुद्ध म्हणतात कि, सब्ब दानं धम्मदानं जिनाती !!
भले होवो!!
- संबोधन धम्मपथी.
९७७३१००८८६
*साभार* : विपश्यना विशोधन विन्यास वरील आचार्य गोयंकाजींचे हिंदी लेख.
*नोंद:* जर लेखात काही चुक आढळल्यास भाषांतर मी केल्याने चुकीची जबाबदारी माझी आहे, आचार्यांची नाही.
No comments:
Post a Comment