Sunday, 15 March 2026

बुद्ध विहार समन्वय समिती : दृष्टीकोण, ध्येय आणि तत्वे

 बुद्ध विहार समन्वय समिती : दृष्टीकोण(Vision), ध्येय (Mission) आणि तत्वे (Principle)

 कार्यक्रमाचे यश-अपयशाचे मूल्यांकन करायचे असल्यास, त्या कार्यक्रमाच्या निर्मितीचा दृष्टीकोण आणि तत्वे समजुन घावी लागतात. तसेच दृष्टीकोण आणि तत्वे समजुन घेतल्यावर संस्थापक नसताना सुद्धा नवीन कार्यकारिणी आणि सदस्य त्यानुसार त्यायोजनेची वाटचाल पुढील काळात चालु ठेवु शकतात. त्यामुळेच बुद्ध विहार समन्वय समितीचा दृष्टीकोण आणि तत्वे आयु. अशोकजी सरस्वती बौद्ध यांनी सांगितलेली आहेत. त्यानुसार शब्दांकन करण्याचा प्रयत्न मी ह्या लेखात करीत आहे.

दृष्टीकोण : भारतभरातील सर्व बौद्ध विहारांचा समन्वय साधून शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाच्या माध्यमातून जागृत, प्रगत, सेवाभावी आणि संयमी समाज घडवणे. स्त्रिया व तरुणांच्या सक्रिय सहभागातून वेळ, पैसा व ऊर्जा यांचा प्रभावी विनिमय घडवून धम्ममूल्यांवर आधारित न्याय्य, विवेकी,लोकहितवादी आणि मानवतावादी असा सर्वांगीण प्रगत अशा भारताची निर्मिती करणे.

हा दृष्टीकोण प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी आपल्याला काही तत्व आणि नियमांचा विचार करणे आवश्यक आहे. आता तत्व आणि नियम यातील फरक व त्यांची गरज याबद्दल विचार करूया!



1️⃣ Vision – दूरदृष्टी

अर्थ:
दूरदृष्टी म्हणजे संस्थेला भविष्यात कसा समाज, कशी परिस्थिती किंवा कोणते मोठे उद्दिष्ट साध्य करायचे आहे याचे प्रेरणादायी चित्र.

वैशिष्ट्ये:

  • भविष्यकेंद्रित असते

  • संक्षिप्त व प्रेरणादायी असते

  • संस्थेची दीर्घकालीन दिशा दाखवते

महत्त्व:

  • लोकांना मोठे ध्येय आणि प्रेरणा देते

  • संस्थेच्या सर्व कार्यांना एक दिशा देते


2️⃣ Mission – ध्येय

अर्थ:
ध्येय म्हणजे त्या दूरदृष्टीकडे जाण्यासाठी संस्था सध्या काय काम करते, कोणासाठी काम करते आणि कोणत्या पद्धतीने काम करते याचे स्पष्ट वर्णन.

वैशिष्ट्ये:

  • वर्तमान कार्यावर लक्ष केंद्रित करते

  • संस्थेचे मुख्य उपक्रम आणि सेवा स्पष्ट करते

  • Vision साध्य करण्याचा मार्ग दाखवते

महत्त्व:

  • कार्यक्रम, योजना आणि निर्णयांसाठी मार्गदर्शन करते

  • संस्थेच्या कार्याची स्पष्ट ओळख निर्माण करते


3️⃣ Principles – मार्गदर्शक तत्त्वे

र्थ:
मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे संस्था काम करताना कोणती मूल्ये, नैतिकता आणि पद्धती पाळेल याचे नियमसदृश मार्गदर्शन.

वैशिष्ट्ये:

  • आचारसंहिता आणि मूल्यांवर आधारित

  • निर्णय आणि कृती करताना दिशा देतात

  • संस्थेची संस्कृती आणि कार्यपद्धती ठरवतात

महत्त्व:

  • कामात पारदर्शकता आणि शिस्त राखते

  • सर्व सदस्यांना समान मूल्यांवर काम करण्यास प्रेरित करते


थोडक्यात फरक

घटक        अर्थमुख्य लक्ष
Vision (दूरदृष्टी)           भविष्यात काय साध्य करायचे        दीर्घकालीन उद्दिष्ट
Mission (ध्येय)           ते साध्य करण्यासाठी आपण काय करतो        वर्तमान कार्य
Principles (तत्त्वे)           काम करताना कोणती मूल्ये पाळतो        कार्यपद्धती व नैतिकता

बुद्ध विहार समन्वय समितीचे मिशन तत्त्वे

  1. उद्देशाची स्पष्टता
    समितीचे कार्य बुद्ध धम्माच्या प्रसार, शैक्षणिक उन्नती, सामाजिक जागृती आणि समतावादी व मानवतावादी मूल्यांच्या वृद्धीसाठी समर्पित राहील.

  2. धम्मतत्त्वांशी सुसंगती
    समितीची सर्व कार्यपद्धती करुणा, प्रज्ञा, समता आणि विवेक या धम्ममूल्यांवर आधारित राहील.

  3. समाजसेवेचा दृष्टिकोन
    बौद्ध समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, सामाजिक कल्याण, नैतिक मार्गदर्शन आणि सेवा उपक्रम राबवले जातील.

  4. कार्य व निर्णयांसाठी दिशा
    समितीचे मिशन हे सर्व कार्यक्रम, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांसाठी मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करील.

  5. सर्वसमावेशक सहभाग
    भिक्खू, उपासक-उपासिका, स्त्रिया, तरुण आणि समाजातील विविध घटकांचा सक्रिय व सन्मान्य सहभाग प्रोत्साहित केला जाईल.

  6. कृतीकेंद्रित कार्यपद्धती
    धम्मप्रसार, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि समाजसेवा यांसाठी ठोस आणि परिणामकारक उपक्रम राबवले जातील.

  7. बहुस्तरीय समन्वय व्यवस्था
    शहर, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बुद्ध विहारांमध्ये समन्वय आणि सहकार्याची सुसंघटित रचना उभारली जाईल.

  8. संवाद आणि माहिती विनिमय प्रणाली
    विविध बुद्ध विहार, समित्या आणि कार्यकर्त्यांमध्ये नियमित संवाद, बैठक आणि माहितीच्या आदान-प्रदानासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण केली जाईल.

  9. ज्ञानसंचय व अनुभवसंपदा निर्मिती
    धम्मप्रसार, सामाजिक कार्य, शिक्षण व व्यवस्थापनातील अनुभव, संशोधन आणि उत्तम उपक्रमांचे दस्तावलीकरण करून एक सामायिक ज्ञानभांडार तयार केले जाईल.

  10. विभागीय रचना व प्रतिनिधित्व
    शिक्षण, सामाजिक सेवा, युवक, महिला, सांस्कृतिक कार्य इत्यादी विभाग स्थापन करून प्रत्येक स्तरावर जबाबदार प्रतिनिधी नियुक्त केले जातील.

  11. भिक्खू व बौद्ध विद्वानांची भूमिका
    बौद्ध भिक्खू आणि विद्वान यांनी धम्माचे योग्य मार्गदर्शन, संशोधन, शिक्षण आणि नैतिक नेतृत्व प्रदान करून समितीच्या कार्याला बौद्धिक व आध्यात्मिक आधार द्यावा.

  12. केंद्रीय निधी व्यवस्थापन व प्राधान्याधारित खर्च

    समितीच्या कार्यासाठी आवश्यक आर्थिक संसाधने उभारण्यासाठी एक केंद्रीय निधी समिती स्थापन केली जाईल. ही समिती विविध बुद्ध विहार, दाते व समाजाच्या सहकार्याने निधी संकलित करेल आणि शिक्षण, धम्मप्रसार, सामाजिक सेवा व संघटनात्मक विकास यांसारख्या प्राधान्यक्रमानुसार पारदर्शक, जबाबदार आणि परिणामकारक पद्धतीने त्या निधीचा विनियोग करेल.

    • केंद्रीय स्तरावर निधी संकलन
    • प्राधान्यक्रमानुसार खर्च
    • पारदर्शक व उत्तरदायी आर्थिक व्यवस्थापन
  • १३. सर्वधर्मीय बंधुत्व व सौहार्द : समिती सर्व धर्म व समुदायांशी परस्पर आदर, संवाद आणि सहकार्याच्या भावनेने वागेल. समाजात शांतता, बंधुत्व आणि मानवतेची भावना दृढ करण्यासाठी विविध धार्मिक समुदायांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ह्या लेखात बुद्ध विहार समन्वय समितीच्या दृष्टीकोण(Vision), ध्येय (Mission) आणि तत्वे (Principle), त्याबद्धल सांगितले आहे. पुढील लेखात आपण खालील बाबींचा ऊहापोह करूया :


  1. बुद्ध विहार समन्वय समितीचे संघटनात्मक आरेख (Organizational Chart)

  2. राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-शहर स्तरावरील जबाबदाऱ्या

  3. ५ वर्षांची कार्ययोजना (Strategic Action Plan)


धन्यवाद !!
संबोधन धम्मपथी 

Sunday, 24 August 2025

विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे

 विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे

विहारात जेव्हा श्रोते जमतात तेव्हा त्यांना विहारातून स्वतःच्या  जीवनात परिपुर्णता, सकारात्मकता तसेच स्वतःचे जीवन ध्येयाने, संयमाने, आनंदपूर्वक आणि सजगतेने जगण्याची मार्गदर्शन हवे असते.  श्रोत्यांना उत्साही, प्रामाणिक, चतुर, कर्तबगार, आशावादी, संयमी आणि धाडसी व्यक्तींचा सहवास हवा असतो. 

तसेच नवीन उर्जा मिळवण्याची धडपड असते,  आजच्या घडीला समस्यांचा आढावा व त्यावर उपाय हे नवीन/आधुनिक स्वरूपात सोडवण्यासाठी!! 


हे लक्षात ठेवून महामानवांच्या जीवनसंदेशांना आजच्या समस्या सोडवण्यासाठी, नवीन प्रकारची धोरणे समजण्यासाठी व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ती माणसे विहारांमध्ये आलेली असतात. या आशेला खुप महत्व आहे; कारण माणुस आठवडाभर काम करून परिवाराला सोडुन रविवारच्या दिवशी तिथे सामाजिक (किंवा वैयक्तिक) जबाबदारीच्या भावनेतुन आलेला असतो.  त्याच्यामुळे अशा नाजुक व कठीण स्थितीत त्यांना नवचेतना व नवउर्जा देण्याचे; पवित्र पण अत्यंत महत्त्वाचे काम हे विहारातील आयोजक आणि वक्त्यांच्या खांद्यांवरती असते

दुर्दैवाने अनेक वर्षांपासुन या कामाला पुरेसं यश मिळत नसल्याने तसेच त्याच-त्याच चुका/अपराध आयोजन व वक्ते नेहमीच करीत आल्याने, मी तुम्हाला माझ्या अनुभव आणि ज्ञानाच्या द्वारे काही मार्गदर्शक तत्वे आयोजक आणि वक्त्यांसाठी देत आहे. कृपा करून त्यावर तुम्ही विचार मंथन करावे हि विनंती!



ह्या लेखाचे दोन भाग आहेत :

  • भाग १:  आयोजकांना विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे
  • भाग २: प्रवचन/मार्गदर्शन करताना वक्त्यासाठी मार्गदर्शक तत्वे

 भाग १: आयोजकांना विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे :

१. विहारातील कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांपैकी एका जबाबदार, निष्णात व प्रामाणिक व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवडावे

२. पालीतील वंदनाबहुतेकांना समजत नसल्याने, पालीतील वंदना जास्तीत जास्त ५-१० मिनिटेच घ्यावी

३.  पुढील वंदना मराठी/हिंदीतून घ्यावी. अशाने लोकांना बुद्ध वाणी समजून नवउर्जा व नवचेतना मिळेल. 

४. लोकांना एकाग्रता व खंबीरता मिळवण्यासाठी,  पुढे १०-३० मिनिटे आनापान साधनासत्र   जरूर घ्यावे. 

५. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा, विशिष्ट विषय, वक्त्याचे नाव व ओळख अशी माहिती घोषित करावी. अशाने श्रोते त्यांच्या आवडत्या व्यक्तीस किंवा विषयाला अनुसरून त्यादिवशी वेळ काढून विहारात येतील.

६.नियोजित रूपरेषा शिस्तीत व सद्भावनेसह ठरवलेल्या वेळेनुसारच घ्यावी. आयोजकांनी अधिक माणसे येण्याची वाट पाहून, वेळेत आलेल्या माणसांच्या वेळेचा दुरुपयोग करू नये किंवा त्यांचा अप्रत्यक्ष अपमानही करू नये

नोंद: काही माणसे जाणीवपूर्वक उशिरा येतात कारण त्यांना पालीतील वंदना किंवा आनापान साधनेला बसायचे नसते. त्यांना प्रवचन किंवा मनातील प्रश्न विचारायचे असतात. म्हणून कार्यक्रम उशिरा सुरू केला तर अशी माणसं प्रवचनालाही येण्याचे टाळतात. तसेच वेळेत आलेली माणसे कार्यक्रम ३०-६० मिनिटे उशिरा सुरु केल्याने विहारातच येण्याचे  टाळतात. अशाने वंदना/प्रवचन आवडणारी किंवा  ना आवडणारी; कुठलीच माणसं विहारातच येत नाही.  

७. नियोजित अध्यक्ष्यांनी अभ्यासू व विचारवंत वक्त्याची निवड करावी.  अध्यक्षांनी जर वक्ता हितकर/उपयोगी व  पूर्व-नियोजित विषय करत नसून दिशाहीन व्यर्थ बडबड करत असेल; तर त्याला  ५-१० मिनिटात सन्मानपूर्वक थांबवावे किंवा इशारा द्व्यावा. अशाने श्रोत्यांना विहारातील कार्यक्रमाच्या दर्जाची खात्री होते व ते एका फालतु प्रवचनाच्या विहारात येण्याचे थांबवत नाहीत.

८. आयोजकांनी असे विषय निवडावे जेणेकरून श्रोत्यांचे पुढे पैकी दिलेल्या कुठलेही एखाद्या तरी विषयाचे (जसे वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, बौद्धिक, नैतिक, शैक्षणिक, धार्मिक किंवा अध्यात्मिक)  ज्ञान वाढेल किंवा समस्या सोडविण्यास मदत होईल. जो वक्ता आजच्या समस्या सोडवण्यासाठी, योग्य दिशा, मूलभूत कारणे,  स्पष्टीकरण किंवा मार्गदर्शन करीत नाही असा वक्ता निरुपयोगी/अपरिपक्व ठरवुन  करून त्याला योग्यमार्गदर्शन करावे. 

९. विहारातील सुज्ञ, प्रगल्भ व जबाबदार लोकांनी अभ्यासू, मुद्देसूद मांडणी करणाऱ्या, संदर्भासह बोलणाऱ्या, आवाजात नम्रता असणाऱ्या व छान शब्दप्रभुत्व असणाऱ्या वक्त्यांचा शोध घेऊन; त्यांची महिन्याला ठराविक दिवशी (नियोजित उपयोगी विषयाच्या) प्रवचनासाठी ऍडव्हान्स बुकिंग करावी.

१०.कार्यकारी मंडळातील अध्यक्ष/सेक्रेटरीने त्यांच्या दर भाषणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने श्रोत्यांना दान देण्याचे आवाहन करू नये. अशाने श्रोत्यांच्या मनातील अशांती वाढते. त्यापेक्षा कमीत कमी पैशात जनतेत अधिकाधिक नवचेतना व जगण्याची जिद्द कशी तयार होईल अशा प्रकारचं दर्जेदार प्रबोधन कसे होईल हे पहावे!!

११. मंत्रिमंडळातील कमिटीद्वारे समाजावर आर्थिक ताण किंवा कर्जाचा बोजा वाढत असल्यास अशा मंडळींना/कमिटीला उचित समज/मार्गदर्शन द्यावे. हे चालुच राहिल्यास उठाव करुन अशा मनमानी-निस्तेज-अपयशी कमिटी जनतेच्या हितासाठी तात्काळ बरखास्त करावी.अशा कमिटीला पैसे देण्याचे थांबवून समाजातील बेफिकिरी, व्यवहारातील अपारदर्शिता,  बेजबाबदारी आणि भ्रष्टाचाराला बळ देऊ नये

नोंद : आपल्या मुलुंड (पुर्व) मध्ये साधारण साडेतीन लाख रुपयांचा कर्ज/परतफेडीची स्थिती एका बौद्ध मंडळावर आलेली आहे. त्यावरून बोध न घेता, तेच मंडळ नियमितपणे खर्च करीत असुन, रविवारी ती माणसे जनतेकडुन आणखी पैसे मागत आहेत. ही अध्यात्माच्या नावावर आर्थिक अवनती आहे. 

१२. कार्यकारी कमिटीच्या कामावर करडी नजर ठेवण्यासाठी बाबासाहेब प्रणित संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्ष व न्यायालयाप्रमाणेच; साधारण कार्यकारी कमिटीच्या समोर आवर्जून एक विरोधीपक्ष कमिटी आणि (निष्पक्ष व्यक्तींची) न्यायाधीश म्हणुन नेमणूक करावी! हीच खरी संविधानाची जनमानसात अंमलबजावणी होईल!! 

१३. कार्यकारी कमिटीने  वक्त्यांची प्रवचनाची रेटिंग व श्रोत्यांचा अनामिक प्रतिसाद घेऊन पुढील वेळेस त्या व्यक्तीला प्रवचनासाठी बोलवावे. 

१४. बुद्ध विहारातील कमिटीने "तरुण-वर्ग आणि स्त्री-वर्गाची धम्मात रुची वाढवणे",  ही आपली एक मोठी जबाबदारी समजावी.  अनुषंगाने त्यांनी सुज्ञ, विचारवंत आणि प्रगल्भ उपासक/उपसिकांना ह्या कामासाठी संशोधन करण्यासाठी आग्रहपुर्वक आवाहन करावे. 

भाग २: प्रवचन/मार्गदर्शन करताना वक्त्यासाठी मार्गदर्शक तत्वे

१. वक्त्याने दिलेल्या वेळेच्या पाच ते दहा मिनिटे अगोदर बुद्ध विहारात यावे. 

२. वक्त्याने नेहमीच पूर्वनियोजित विषयाला अनुसरून प्रवचन करावे

३. आपण प्रवचन देण्याचे कारण स्वतःचा अभ्यास व मेहनतीचे (अहंकारारूपी) प्रदर्शन नसून बहुजनांचे हित व बहुजनांचे सुख हाच मुख्य उद्देश्य आहे हे नेहमी ध्यानात ठेवावे. 

४. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी नियोजित विषयाला न्याय द्यावा व श्रोत्यांची ज्ञानाची भूक भागवावी. 

५. प्रवचनानंतर प्रश्न-उत्तराच्या सत्रा सठी पाच ते दहा मिनिटे वेळ श्रोत्यांना जरूर द्यावा. 

६. प्रवचनाचे मुद्दे मुख्य उद्देश खालील प्रमाणे असावेत:

  • श्रोत्यांतील सद्गुणांची वाढ व्हावी. 
  • श्रोत्यांतील दिवसभरात ती कामांमधील दक्षता( माईंड फुलनेस) व एकाग्रता वाढवावी.
  • दोन जाती धर्मातील सलोखा कसा वाढेल याच्याबद्दल मार्गदर्शन करावे. 
  • प्रवचनातील प्रत्येक मुद्दा श्रोत्यांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना उपयोगी व लाभदायक असेल हे पाहावे. 
  • प्रवचन हे केवळ ऐतिहासिक घटनांचा पाढा नसून सध्याच्या जीवनातील उपयोगात असले उपयोगी असले पाहिजेत. आजचे कुठला तरी प्रश्न सुटला पाहिजे. 
  • मी काय वाचले हे सांगण्यापेक्षा, जे वाचले त्याची श्रोत्यांना गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. 

७. श्रोत्यांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास, त्यांचे हावभाव आणि त्यांचा आर्थिक स्थर, त्यांची बोलीभाषा  या आधारे विषयाला अनुसरून सोप्या उदाहरणांची निवड करून विषय समजावून सांगावा. 

८. इतरांनी स्वतःचे  प्रवचन थांबवण्याऐवजी; श्रोत्यांचे इशारे आलेले झोप कंटाळा यावरून प्रवचन स्वतःच आवरते घ्यावे/संपवावे.

९. अध्यक्षांनी प्रवचन थांबवण्याचा इशारा केल्यास वाईट न वाटता प्रवचन थांबवावे किंवा अध्यक्षांकडे जास्तीत जास्त ५ मिनिटे मागावीत. 

१०. प्रवचन करताना एखादा दुसरा स्वतःपेक्षा श्रेष्ठ, अभ्यासू व विचारवंत वक्ता विहारात आल्यास स्व-विवेक जागवत, विनम्रतेने त्या वक्त्यास अध्यक्षांच्या अनुमतीने आमंत्रण प्रवचनासाठी आमंत्रण द्यावे. जास्तीत जास्त लोकांच्या हितासुखासाठी त्यांना श्रेष्ठ वक्त्याचे प्रवचन मिळणे खुप आवश्यक आहे. 

१०. प्रवचनानंतर श्रोत्यांकडून त्यांच्या अनामिक प्रतिक्रिया जरूर घ्याव्यात. अशाने स्वतःतील सुधारणेसाठी दिशा स्पष्ट होईल.

११. प्रवचन करताना श्रोत्यांनी हे लक्षात घ्यावे की सर्वोत्कृष्ट प्रवचन हे ते असेल जिथे ब्राह्मण-क्षत्रिय-वाणी- शूद्राति-शूद्र तसेच मुस्लिम किंवा ख्रिश्चन सुद्धा प्रवचनाला ऐकायला येतील; तेव्हा त्यासर्वांची बुद्ध बाबासाहेबांबद्दल श्रद्धा वाढली पाहिजे.  असा दर्जेदार प्रवचन देण्याचा प्रयत्न करावा, तेवढी सिद्धी प्राप्त करण्यासाठी जमल्यास दर दिवशी  सद्धर्म वाचन, तज्ञांशी चर्चा, उच्चाराचा सराव, विपश्यना सत्र आणि सध्या लोकांची मानसिक अवस्था/जीवनशैली यांचा सर्वावांगिण अभ्यास करावा. 

१२. अत्यंत महत्वाच्या दिवशीच्या प्रवचनाच्या तयारीसाठी, एक महिन्यापुर्वी त्या नियोजित वक्त्याकडुन, भाषणाची लेखी प्रत मागवुन घ्यावी. त्यावर सुज्ञ विचारवंतांना अभ्यास करून भाषणाची आजची उपयुक्तता आणि सत्यता तपासावी. काही सुचवायचे असल्यास तात्काळ सुचवावे. त्यानंतरच त्या वक्त्याला ते भाषण करण्याची परवानगी द्यावी. नाहीतर महत्वच्या दिवशी सर्वात जास्त फालतु भाषण देण्याची आपल्या वक्त्यांना व आयोजकांना घाणेरडी सवय आहे. 

मला आशा आहे, अशा प्रकारच्या स्पष्ट, सुचक, कल्याणकारी व समयोचीत मुद्द्यांशी तुम्ही सहमत व्हाल. आणि आपल्या जवळच्या विहारात महामानवाने अपेक्षित असलेली अनेक कल्याणकारी प्रवचने आणि योजना जनतेस (कमीत कमी पैसे मागत) जनतेला भीम-बुद्धाच्या उपकारांची जाण ठेवीत वास्तवात आणाल. धम्म सर्वाना बळ देवो!


आपला ऋणी,
संबोधन धम्मपथी ( ९७७३१००८८६)
कॉम्पुटर इंजिनियर, त्रिपिटक वाचक, धम्मसेवक
मुंबई, महाराष्ट्र

ईतर संबंधीत लेख : अजाण बौद्ध वक्ते व आयोजक   ।   तिसरा बुद्ध विहार अधिवेशन   ।  सामाजिक सलोखा व बंधुत्व राखुन प्रबोधन


Tuesday, 12 August 2025

अजाण बौद्ध वक्ते व आयोजक (संविधान दिन २०१७, डोंबिवली)

 बांधवहो जयभीम !
 
मी जरी बौद्ध असलो तरी दर रविवारी विहारात जाणे प्रकृती व व्यग्रतेमुळे शक्य होत नाही. त्याहूनही महत्वाचे कारण म्हणजे विहारात जाऊन नेहमीच तणाव, समस्या (खासकरून सामाजिक)  व व्याकुळतेवर जे उपाय मी  शोधण्याचा प्रयत्न करतो, ते मिळत नाही किंवा कुठे उपाय  मिळेल याची माहितीही मिळत नाही. त्यामुळे मी विहारात नेहमी न जाता, दोन महिन्यातून एकदा जात असतो. पण इतरांना "तुम्ही विहारात जा",  असा  सल्ला देऊ शकत नाही, कारण तिथे जाताना पहिल्या प्रथम मला काही प्रगती दिसायला हवी ना! तरी परिस्थितीतील  सुधार तपासण्यासाठी दोन महिन्यातून एकदा जाण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी बुद्ध पौर्णिमा, भीम जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन व संविधान दिनानिमित्त मी विहारात  अवश्य जातो. 

कारण सरळ व सोपी असते, मला विद्वानांकडून समाजाची स्थिती, प्रगतीतील अडचणी/मुद्दे व बुद्ध-भीम विचार समजावेत. पण तिथेही बऱ्याच वेळा (जवळपास ९०% वेळा ) निराशाच हाती येते. ह्या संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०१७ रोजी डोंबिवलीतील कार्यक्रमात गेलो असता असेच झाले . तिथेही दुर्दैवाने नवीन दिशा व मुद्दे हाती ना लागता तोच तोच रटाळपणा  जाणवला. कुठे  तरी व्यक्त होता यावे व सुधार हेतू लिहीत आहे. 

डोंबिवलीतील त्या कार्यक्रमात एका निवृत्त प्राध्यापकांना बोलावण्यात  आलेले होते.  इथे या आयोजकांची चूक हि झाली कि वक्त्यांना एक निश्चित  विषय त्यांनी  दिला नव्हता व ना हि पत्रिकेत छापला होता . पण तरीही संविधान दिनानिमित्त, संविधानाच्या दृष्टिकोनातून सामाजिक व राजकीय विश्लेषण करीत सामाजिक समस्या सोडवण्याचा 
प्रयत्न करणे किंवा संविधानाच्या बद्दल लोकमत पूजेची भावना न देता उपयोगाची भावना समजावणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. एका अनुभवी व निवृत्त प्राध्यापकाला याचे भान ना राहणे हे तर दुर्दैवीच म्हणावे लागेल . त्यांच्याकडून संविधानाद्वारे सामाजिक प्रगतीची व क्रान्तिमय दिशेची अपेक्षा आयोजकांनी व.  श्रोत्यांनी करणे हे चुकीचे म्हणता  येणार  नाही. 

त्या  वक्त्याची  मराठी भाषेवर पकड, उच्चार व आत्मविश्वास नक्कीच चांगला होता. अनुभवी व निवृत्त प्राध्यापकाला हे  गुण  असणे अपेक्षित हि  असते . पण  फक्त हे च  गुण  दिशा देऊ शकत नाही. एकूणच त्या दिशाहीन प्रबोधनाचे काही अकल्याणकारी व अप्रस्तुत मुद्दे खाली देत  आहे . याची 

वक्त्यांचा मुद्दा नं १: ..... मी त्या आईचा मुलगा आहे जिने देव पाण्यात बुडविले .... (यावर  लोकांच्या टाळ्या  पडल्या )
माझे विचार नं  १: ठीक आहे . पण इथे अनेकांच्या पूर्वजांनी तसे केले आहे. मग आम्ही सगळे येऊन व्यासपीठावर  ग्वाही द्यायची का ?आज  इथे आत्मकथनाचा विषय नसून आजच्या देवभोळ्या पिढीला विज्ञानवादी कसे बनवावे हे सांगितले तर समस्या सोडवण्यास मदत झाली असती . लोक काय जुने देव फेकले कि काम झाले असे समजतात, यामुळे टाळ्या  वाजवतात . पण विद्वान वक्ता  मात्र त्यांना गुदगुल्या न करता समस्या व जबाबदारीचे भान देतो . समस्या सोडवण्यास मदत  करतो ,कारण  त्याला माहिती  असते कि  जुने-पुराणे किस्से गिरवून समस्या सोडवता येत नाहीत 

वक्त्यांचा मुद्दा नं २:.....मी पुस्तके वाचीत  नाही. कारण पुस्तकात जी माहिती असते ती जुनी  असते . मी माणसांना भेटून विचार बनवतो ...... 
माझे विचार नं  १: महाशय तुम्ही  नक्की  काय सुचवीत  आहात हे कळत नाही . जेव्हा एखादा प्राध्यापक व प्रिंसिपल सत्कारमूर्ती बनून  स्वतःची सवय सांगतो तेव्हा ती  सवय चांगली आहे असे लोकांना वाटते. तसे नसते तर आयोजकांनी  तुम्हाला आमच्या समोर कशाला उभे केले  असते ? म्हणजे तुम्ही आम्हाला, " पुस्तके वाचू नका, कारण पुस्तकात जी माहिती असते ती जुनी  असते" हे सांगता तेव्हा तुम्ही इतरांना ज्ञान घेण्यापासून परावृत्त करता  असे मी मानतो . या हे फुले -शाहु -बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते , किंबहुना हे वाकय त्यांच्या विचारांच्या विरोधीच आहे.. बाबासाहेबांनी तर प्राध्यापकाची स्वतंत्र  लायब्ररी  असावी  व अवांतर  वाचन करावे असा सल्लाच दिला आहे . असे असल्याने मला तुमचा सल्ला प्रचंड अहितकारी वाटतो. ह्या एकाच  मुद्द्यामुळे मी हि समीक्षा लिहीत आहे असे म्हणणें बरोबर होईल . 

वक्त्यांचा मुद्दा नं ३:.....माझ्या खिशात संविधानाची प्रत आहे. ........ (यावर  लोकांच्या टाळ्या  पडल्या ).. 
माझे विचार नं  ३: ठीक आहे . पण त्याने समाजाचा नक्की काय फायदा  झाला  हे सांगणे अधिक महत्वाचे ..संविधान नक्की काय  आहे व ते कसे सर्व जाती-धर्मासाठी महत्वाचे हे श्रोत्यांना आजचे उदाहरणे देऊन ज्ञानी बनविणे महत्वाचे नाही का  वाटत ? तुम्ही  ते सांगितले नाही म्हणून तुम्ही ते समाजासाठी कसे वापरता हे कळतच नाही. जर हेच नाही सांगितले तर खिशातील संविधानाची गिणती मागासवर्गियांची अंधभक्ती वाढवणारी पुस्तक म्हणून होणार नाही का ? 
उदाहरण देऊन सांगायचे म्हणजे एखादा डॉक्टर २४ तास एक पुस्तक सोबत ठेवतो, पण ते वापरून एखाद्याला बरे केले असे कोणालाच दिसले नाही ; मग माणसे त्या डॉक्टर ला विद्वान व कल्याणकारी बोलूच शकत नाहीत. 

दुसरा डॉक्टर कोणतेही पुस्तक २४ तास जवळ न  ठेवता, एखाद्याचा रोग ओळखतो , त्याचे कारण सांगतो व रोगमुक्त करतो. तसेच मी पुस्तकाचा ( जसे संविधान )  वापर करीत रोगी कसे बरे करतो हे सांगू शकतो, तो डॉक्टर  नक्कीच विद्वान व कल्याणकारी आहे असे सांगता येईल . म्हणून केवळ पुस्तक / संविधान जवळ ठेवून कोणी विद्वान व हितकारी ठरत नाहीं. 

त्या निवृत्त प्राध्यापकाने हे मांडलेले मुद्दे व ते कसे निरुपयोगी आहेत हे मी मांडले आहे. तसेच त्यांनी समाजसेवक दाभोळकर, कुलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल सांगुन पंतप्रधानांबद्दल  विनोदही केला  कि 
त्यांनी सर्वाम्च्या हातात झाडू  दिला. पण समस्या ह्या विनोदाने सोडविल्या जात नाहीत, नाहीतर सर्व कार्यक्रमाला विचारवंता ऐवजी  राजू श्रीवास्तव दिसला असता . 




हि तर झाली त्यांच्या भाषणावर समीक्षा . पण मग संविधान दीना निमित्त भाषण हे कसे असावे हे हि सांगणे महत्वाचे आहे. 

भाषण करताना समोर बसलेल्या माणसांची सरासरी वय , सरासरी  हुशारी व सरासरी  शिक्षण पाहून मुद्दयांचे गांभीर्य व मुद्दयांची संख्या ठरविणे गरजेचे असते . संविधान दिनानिमित्त अधिकांशी लोक पन्नाशी पार केलेले होते व सरासरी शिक्षण १२ वि पर्यंतच होते. त्यामुळे खालील मुद्दे वेळेचे भान ठेवून बोलणे महत्वाचे होते. 
१. संविधानातील आता पर्यंत झालेले बदल व त्यांची वर्गवारी/रुपरेषा. 
२. संविधानातील बदलासाठीची आवश्यक प्रक्रिया 
३. गेल्या २-३ वर्षांत तीन हितकारी व अहितकारी बदल व त्याचे परिणाम 

वेळेसआयोजकां साठी सल्ला : 
१. येणार वक्ता फक्त प्राध्यापक किंवा मोठ्या हुद्द्यावर आहे म्हणून त्यावर तात्काळ विश्वास ठेवू नये. 
२. त्याने आता पर्यंत किती योगदान दिले त्यावरून त्याचे नियोजित विषयाचे ज्ञान ठरवू नये . 
३. १-२ आठवडयांपूर्वी त्याचे भाषण लेखी स्वरूपात मागवून घ्यावे व त्या नंतर त्याची सिद्धता ठरवावी 
४. एखादा वक्ता पैसेच घेत नाही म्हणून तो नक्कीच चांगली दिशा देईन, हा भ्रम आहे. 
५. प्रश्नोत्तराचा वेळ व जेवणाची वेळ सांभाळावी 
६. वक्त्याला विषय व त्या तुन अपेक्षित ज्ञानाची कल्पना लेखी स्वरूपात द्यावी 
७. लोकां कडून प्रबोधन झाल्यावर अभिप्राय जरूर घ्यावेत व वक्त्याला कळवावेत
प्रस्नउत्तरे 

उदाहरणासाठी संविधानातील बदला बद्दलचे काही मुद्दे मांडीत आहे:

१. इंटरनेट सूरक्षा कायदा : याची तरतूद करणे स्वाभाविक होते व ती टेक्नॉलॉजी बाबासाहेबांच्या काळातही नव्हती. 
२. न्यायाधीशामचे निवृत्ती वयात दोन वयात दोन वर्षे वाढविणे : हा बदल का आवश्यक होता ? यात का काही सरकार व न्यायाधिषांचे काही साटंलोटं आहे ? सरकारी बॅकलॉग ना भरण्याची सरकारची धूर्त खेळी आहे ? याचा समाजाला व देशाला कसा व कुठला फायदा होईल?
३. एससी/एसटी  जातीच्या यादीतुन काही जातिंना वगळले व काही नवीन जातींना टाकले :  कुठल्या आधारावर जुन्या जातींना काढले व कुठल्या आधारावर नवीन जातींना काढले. का हि प्रक्रिया न्यायी व सत्याच्या आधारावर होती कि द्वेष/खोटेपणावर ? का ह्या प्रक्रियेत बाबासाहेबांच्या विचारांना धुडकावण्यात आले का? 

संविधानातील बदला बद्दलची प्रक्रिया :
माझ्या मर्यादित माहिती नुसार संविधानात बदल करण्यासाठी विधेयक लोकांची मत /सल्ला मागण्यासाठी वर्तमानपत्रात एक महिन्यापूर्वी टाकण्यात येतो . व पत्र किंवा इ-मेल द्वारे मत /सल्ला मागवण्यात येतो. 

तुम्ही अशा वेळेस अनुचित किंवा हितकारी विधेयक समोर येण्यापूर्वीयावर  (किंवा आल्यावर)  काय  करावे: 
१. अशा वेळेस  तुमच्या कडे ह्या विषया साठी विद्वानांची यादी असायला हवी.
२. त्या यादीतून लोकांची निवड  करून त्यांच्याकडून सर्व बाबिंचा विचार करीत बरे - वाईट  मुददयांचा अहवाल लिहावा
३. तो अहवाल वर्तमान पेपर , मासिकात पैसे देऊन छापावा 
४. इतर बुद्ध विहारांत तो वाटावा व विचार विमर्श करून समाजास सचेत ठेवावे 
५. मग अंतिम  मुदतीच्या आत सरकारला योग्य स्थळी पाठवावा 


असे कुठलेच मुद्दे त्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात न दिसल्याने पूर्ण निराशा पदरी पडली. असे इतर ठिकाणी होऊ नये व त्या वक्त्याने (व आयोजकांनी ) योग्य दखल घ्यावी म्हणून हा स्वानुभव लिहीत आहे. 


आपला ऋणी ,
सम्बोधन धम्मपथी (९७७३१००८८६)
कॉम्पुटर इंजीनियर, आयटी क्षेत्र में २२ साल का अनुभव,
सर्टिफाइड आयएसटीक्युबी मैनेजर, Certified SCRUM Master,
त्रिपिटक वाचक, धम्मसेवक,
मुंबई, महाराष्ट्र



  

Saturday, 7 June 2025

धम्म चर्चा : असमानता तथा अल्पायु-दीर्घायु का कारण


(मुल लेखक : भिक्षु नारद महाथेरो, कोलंबो श्रीलंका, यह अंग्रेजी किताब यहाँ उपलब्ध है|  ) 

मानवता के बीच मौजूद इस अकल्पनीय, स्पष्ट असमानता से हैरान होकर, सत्य की तलाश में शुभ नामक एक युवा सच्चा साधक बुद्ध के पास गया और उनसे इस बारे में प्रश्न किया।

"हे भगवा, क्या कारण है कि हम मनुष्यों में अल्पायु (अप्पयुका) और दीर्घायु (दीघायुका), रोगी (बव्हाबाधा) और स्वस्थ (अप्पबाधा), कुरूप (दुब्बाणा) और सुन्दर (वण्णावंता), शक्तिहीन (अप्पेसक्का) और शक्तिशाली (महेसक्का), दरिद्र (अप्पभोगा) और धनी (महाभोगा), निम्न कुल (नीचकुलिना) और उच्च कुल (उचकुलिना), अज्ञानी (दुप्पन्ना) और बुद्धिमान (पञ्णावंता) पाते हैं? " १ 



बुद्ध का उत्तर था:

१. "सभी जीवित प्राणियों के कर्म (कर्म) उनके अपने होते हैं, उनकी विरासत, उनका जन्मजात कारण, उनका सगा-संबंधी, उनका आश्रय। यह कर्म ही है जो प्राणियों को निम्न और उच्च अवस्थाओं में विभेदित करता है।" 

फिर उन्होंने कारण और प्रभाव के नियम के अनुसार ऐसे अंतरों के कारणों की व्याख्या की। 


२. यदि कोई व्यक्ति जीवन को नष्ट करता है, शिकारी है, अपने हाथ खून से रंगता है, हत्या और घाव करने में लगा रहता है, और जीवों के प्रति दया नहीं रखता है, तो वह अपनी हत्या के परिणामस्वरूप, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो अल्पायु होगा। 

यदि कोई व्यक्ति हत्या से बचता है, डंडा और हथियार का त्याग करता है, और सभी जीवों के प्रति दयालु और करुणामय है, तो वह, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो अपनी अ-हत्या के परिणामस्वरूप, दीर्घायु होगा। 

३. यदि कोई व्यक्ति मुक्का, डंडा, तलवार से दूसरों को नुकसान पहुंचाने की आदत रखता है, तो वह अपनी इस बुराई के परिणामस्वरूप मनुष्यों के बीच जन्म लेने पर अनेक रोगों से ग्रस्त होगा

यदि कोई व्यक्ति दूसरों को नुकसान पहुँचाने की आदत में नहीं है, तो वह अपनी हानिरहितता के परिणामस्वरूप, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो अच्छा स्वास्थ्य प्राप्त करेगा। 


४. यदि कोई व्यक्ति क्रोधी और अशांत है, किसी छोटी सी बात से चिढ़ जाता है, क्रोध, द्वेष और आक्रोश को बाहर निकालता है, तो वह अपनी चिड़चिड़ेपन के परिणामस्वरूप, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो कुरूप हो जाएगा।

 यदि कोई व्यक्ति क्रोधी और अशांत नहीं है, गाली-गलौज से भी चिढ़ता नहीं है, क्रोध, द्वेष और आक्रोश को बाहर नहीं निकालता है, तो वह अपनी मिलनसारिता के परिणामस्वरूप, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो सुंदर हो जाएगा। 


५. यदि कोई व्यक्ति ईर्ष्यालु है, दूसरों के लाभों से ईर्ष्या करता है, दूसरों के प्रति सम्मान और आदर का भाव रखता है, अपने हृदय में ईर्ष्या रखता है, तो वह अपनी ईर्ष्या के परिणामस्वरूप, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो शक्तिहीन हो जाएगा। 

यदि कोई व्यक्ति ईर्ष्या नहीं करता, दूसरों के लाभ से ईर्ष्या नहीं करता, दूसरों के प्रति आदर और सम्मान का भाव नहीं रखता, अपने हृदय में ईर्ष्या नहीं रखता, तो ईर्ष्या के अभाव के कारण वह मनुष्य जाति में जन्म लेने पर शक्तिशाली होगा।


६. यदि कोई व्यक्ति दान के लिए कुछ नहीं देता है, तो वह अपने लालच के परिणामस्वरूप, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो वह गरीब होगा। यदि कोई व्यक्ति दान देने पर तुला हुआ है, तो वह अपनी उदारता के परिणामस्वरूप, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो वह अमीर होगा। 


७. यदि कोई व्यक्ति जिद्दी है, अभिमानी है, सम्मान के योग्य लोगों का सम्मान नहीं करता है, तो वह अपने अहंकार और असम्मान के परिणामस्वरूप, जब मनुष्यों के बीच पैदा होगा, तो वह नीच होगा।

यदि कोई व्यक्ति हठी नहीं है, अभिमानी नहीं है, सम्मान के योग्य लोगों का सम्मान करता है, तो वह अपनी विनम्रता और आदर के कारण, जब मनुष्यों में जन्म लेगा, तो उच्च कुल का होगा। 


८. यदि कोई व्यक्ति विद्वान और गुणी लोगों के पास नहीं जाता है और यह नहीं पूछता है कि क्या अच्छा है और क्या बुरा है, क्या सही है और क्या गलत है, क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए, क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए, क्या उसके कल्याण के लिए है और क्या उसके विनाश के लिए है, तो वह अपनी गैर-जिज्ञासा भावना के कारण, जब मनुष्यों में जन्म लेगा, तो अज्ञानी होगा।

यदि कोई व्यक्ति विद्वान और गुणी लोगों के पास जाता है और पूर्वोक्त तरीके से पूछताछ करता है, तो वह अपनी जिज्ञासु भावना के कारण, जब मनुष्यों में जन्म लेगा, तो बुद्धिमान होगा।


निश्चित रूप से, हम वंशानुगत विशेषताओं के साथ पैदा होते हैं। साथ ही हमारे पास कुछ जन्मजात क्षमताएँ होती हैं, जिनका विज्ञान पर्याप्त रूप से हिसाब नहीं लगा सकता। हम अपने माता-पिता के ऋणी हैं, जो इस तथाकथित प्राणी के नाभिक का निर्माण करने वाले स्थूल शुक्राणु और अंडाणु के लिए हैं। वे तब तक निष्क्रिय रहते हैं, जब तक कि भ्रूण के उत्पादन के लिए आवश्यक कर्माधारित ऊर्जा द्वारा इस संभावित जीवाणु-संबंधी यौगिक को सक्रिय नहीं किया जाता। इसलिए कर्म इस प्राणी का अपरिहार्य संकल्पनात्मक कारण है। 

पिछले जन्मों के दौरान विरासत में मिली संचित कर्म प्रवृत्तियाँ (संखार-संस्कार), कभी-कभी शारीरिक और मानसिक विशेषताओं के निर्माण में वंशानुगत माता-पिता की कोशिकाओं और जीनों की तुलना में कहीं अधिक महत्वपूर्ण भूमिका निभाती हैं।  (उदाहरण : जैसे शेक्सपियर के माता पिता दोनों अशिक्षित थे | )

संदर्भ :

१. मानव की सत्ता अपने आप के (पुराने और नए) कर्म  है ,मनुष्य अपने (पुराने और नए) कर्म का वारिस है,वह अपने (पुराने और नए) कर्म की ही उपज है , कर्म मनुष्य सबसे योग्य बंधु है ,अपने कर्म के अनुसार ही मनुष्य सोचता है, कर्म के अनुसारही मानव सत्ता का विभाजन हीन या उच्च  कुलीन इत्यादी भिन्न परिस्थितियों में होता है ।

(कुल्लाकम्माविभंग सुत्त [मज्झिम  निकाय 135]) ऐतिहासिक सम्मानित राजा मिलिंद के समान प्रश्न पर नागसेन का उत्तर | वॉरेन, Buddhism in Translation, p. 214. , पृष्ठ भी देखें। 214

२. लक्खण सुत्त (दीघ निकाय - 30)


धन्यवाद !

संबोधन धम्मपथी

(भाषानुवादक)

Thursday, 29 May 2025

धम्मदृष्टी कार्यशाळेची रुपरेषा

 धम्मदृष्टी कार्यशाळेची  रुपरेषा : ०८ जुन २०२५ 

वेळ :सकाळी  ९ ते दुपारी ३ । स्थळ : श्रावस्ती बुद्धविहार, मुलुंड पश्चिम 

१. ९:०० - ९:१५ : रेजिस्ट्रेशन 

२. ९:१५ - ९:३० : आनापान  ध्यान शिबिर 

३. १०:०० - ११:०० : धम्माची वैशिष्ट्ये आणि जीवनाचा उद्देश्य 

४. ११:० - ११:३० : वरील विषया वर धम्म चर्चा  

५. ११:३० - १२:३० : नशीब, देव की कर्म सिद्धांत 

६ . १२:३० : - १:०० : वरील विषया वर धम्म चर्चा 

७ . १:० : - १:४५ : जेवणाची वेळ 

८. १:४५  - २:३० : आवश्यकता पडल्यास धम्म चर्चा 

९. २:३०  - ३:०० : कार्यक्रमाची सांगता


नोंद:

  1. मोबाईल सायलेंट वर ठेवावा लागेल 
  2. फोन वर बोलायचे असल्यास बाहेर जावे लागेल. 
  3. नोंदणी फी १०० रुपये, विहाराला दान दिले जाईल. 
  4. फक्त १५ सदस्यांना प्रवेश आहे. 

Saturday, 3 May 2025

अभिप्राय: बौद्ध विहारों का तिसरा राष्ट्रीय अधिवेशन (औरंगाबाद)

 अभिप्राय :   बौद्ध  विहारों का तिसरा राष्ट्रीय अधिवेशन (औरंगाबाद / छत्रपती संभाजीनगर , २६-२७ एप्रिल २०२५ )


सप्रेम जयभीम !

अपने अच्छे मित्रों के कारण बहुत बार अच्छे कार्यक्रम, अच्छे विचार और महाअनुभवी व्यक्तियों से परिचय होता है | कुछ ऐसा ही हुआ; जो मेरे पुराने मित्र सदानंद जाधव के द्वारा की महाअनुभाव आदरणीय अशोक सरस्वती बौद्ध जी और उनके मंगलमय संकल्प (भारतीय बौद्ध विहारोंका समन्वय) से व्यक्तिगत रूप से परिचय हुआ | 

मैं अशोक जी के मंगलमय संकल्प और उनके सहकारी यों का बहुत आभारी हुं| उनकी इस सुदूरदृष्टि एवं प्रकल्प को मेरी और से बहुत बहुत शुभकामनाएं | इसी अवसर पर मैंने कुछ उचित धनराशी भी सहयोग हेतु दी है|  उनके इस मंगलमय स्वप्न को शीघ्रतम और परिपूर्णता के साथ पूरा करने हेतु, मैं यह अपना कर्तव्य ही समझता हूं और इसीलिए  इस कार्यक्रम का अभिप्राय लिखने बैठा हुँ | आशा है कि इससे समाज को सहायता मिलेगी | 

१. पांच प्रसन्नकारी बातें जो मुझे अच्छी लगी:
१. अशोक जी की भूमिका (बौद्ध विहारोंका समन्वय ओर समस्या निवारण ) उनकी दूर दृष्टि, उनका नियोजन
२. कार्यक्रम के स्थल का चुनाव; जिससे कि कार्यक्रम ठीक से पुरा हो | 
३. उपस्थित श्रोतागणों के पंजीकरण और आय-कार्ड वितरण जिससे लोकसंपर्क एवं समन्वय सधे |  
४. सृजनशील व्यक्तियों से संपर्क: जिन्होंने मोबाइल एप्लीकेशन और वेबसाइट के निर्माण किया |  
५. स्वयंसेवकों का सेवाभाव  

२. पांच अप्रसन्नकारी बातें जो मुझे अच्छी नहीं लगी:
१. लगभग ८०-९० % प्रवक्ता और सत्र अध्यक्षों ने ऐसी कोई बातें नहीं कही  जिसे अशोक जी के बुद्धा विहार समन्वय भुमिका राष्ट्रीय स्तर पर कार्यान्वित या फिर किसी प्राथमिक समस्या क निवारण हो | उसको कार्यांवित करने के लिए श्रोताओं को विशेष रुप से सक्षम या क्रियाशील बना सके | उनका धैर्य, साहस, सूझ--बुझ  और सेवाभाव बढ़े। 
२. इस अधिवेशन के दोनों ही दिन, में हर दिन ९० मिनट की परित्राण पाठ पाली में हो रहा था| जो भाषा ९९% प्रतिशत लोगों को समझ में नहीं आती, तो अनुमान लगाइए कितना सारा समय व्यर्थ गया। श्रोताओं के उत्साह और आशा को जो क्षति पहुंची वो भी अलग बात है | 
३. मान्यवरों की स्वागतप्रथा  के कार्यक्रम में बहुत सारा समय निकल गया, पर श्रोताओं का क्या लाभ हुआ नहीं समझ पाया |  अशोक जी ने मना करने के बावजूद भी सुत्रसंचालक ने  न मानकर औपचारिकता पुरी की थी  | 
४. बौद्ध भिक्षुओं ने भी में उचित मार्गदर्शन नहीं किया जिससे विहारों के समन्वय की उद्देश्यपुर्ती हो | प्रमुख बौद्ध भिक्षु कहा ने भिक्षु-उपासकोंको के बारे में कहा कि अपने ही होंठ और अपनेही दांत है | परंतु सारा समय उपासक की कमियां/गलतियां बताने पर ही था| भिक्षुओंके के व्यवहार/आचरण के बारे में कुछ भी नहीं कहा! तो दांतों के लिए अलग व्यवहार हुआ और होटों के लिया अलग व्यवहार साबित हुआ |  उन्होंने युवाओं को ताने भी मारे  (भगवान बुद्ध ने कभी ताने मारे थे, ऐसा अब तक त्रिपिटक में नहीं पढ़ा है)  |  दूसरे भंते जी ने हेतुपुर्वक विनोद का वातावरण बनाया, पर उनका ध्यान उपासकों के जेब पे ही था | उनको अपना प्रकल्प गर्भ मंगल विधी उद्देश्य की विशेष मंजिल इमारत की ज्यादा जरुरत लगी, न की विहारोंके समन्वय की ! उनको बोलने की लिए १० मिनिट का समय दिया गया था, और उन्होंने  अपने उद्देश्य के लिए ४०-५० मिनिट का समय ले लिया | यह धम्म संगत और प्रसंगोचित नहीं लगा, न ही शील का पालन हुआ | न ही ये बातें विहारों के समन्वय बे बारे में कुछ मार्गदर्शन कराती है |   भिक्षुओंको तथागत ने तो अनात्म ( भिक्षु की किसी पर भी मलकियत/मैं मेरे ही भावना नहीं हों) भाव, अनित्य और दुःख के साथ सिखाया है | 





३. कुछ महत्वपुर्ण अनुत्तरीत प्रश्न :

१. किसी भी वक्ता का चुनाव करने से पहले क्या आयोजको ने :
    १.अ : क्या उनके लिखित भाषण का प्रथम मूल्यांकन बहुश्रुतोंद्वारा किया था, जिससे उनकी नियोजित विषय पर अनुसंधान (रिसर्च) और उपायों का आकलन हो ?
    १.ब:  क्या उनके अन्य लेखों और सेवाभाव को परखा था (क्योंकि ताने मारनेवाला सेवाभावी कैसे हो सकता है?) ?
    १.क : क्या वक्ता के मानवी गुणों का आकलन जैसे की  लोकसंपर्क, विनम्रता, भाषा प्रभुत्व, नवीनतम प्रणाली/तकनीक (PPT, RCA) , श्रोताओं के मनोवैज्ञानिक स्थिति, ध्यान आकर्षित करने की कला) को महत्त्व दिया गया था? 
    १. ड : क्या अनेक वक्ताओँ में से उनका मुल्यांकन, समग्र दृष्टिकोण  आधार मान कर ही चयन (filtering) हुआ था?

    १.इ : क्या वक्ताओं के दिशाहीन मार्गदर्शन का कारण, वक्ताओंका चयन करते समय उनके लेख -आचार-विचारों से भी अधिक महत्व उनके उपाधियों को  (डॉक्टर/प्राध्यापक/थेरो/महाथेरो/अध्यक्ष/सेक्रेटरी/संस्थापक)  दिया गया था ?
२.  क्या कभी बौध्दों के कार्यक्रम में स्त्रियां और नवयुवक नहीं आएंगे ? क्या हमेशा ९९  % बूढ़े लोग ही आएंगे? क्या बौद्ध विहार समन्वय समिती इसकी जाँच/कारणमीमांसा का बीडा उठाएगी?
३. क्या श्रोताओं को एक दूसरों के साथ जुड़ने के लिए तथा नियोजित विषय पर पर उनके मतों को समझने के लिए क्या वर्कशॉप/चर्चासत्र जैसे कार्यक्रम पर विमर्श हुआ था? जिससे श्रोताओं को अपने विचार रखने का कोई अवसर मिले | एक दूजे के साथ संपर्क का कि राह सुनियोजित हो?
४. क्या कारण हो सकता है कि, बौध्दों के कार्यक्रम में युवा वर्ग बिल्कुल आना पसंद नहीं करते?  "बाबा तेरा सपना अधूरा, गुटका खाकर करेंगे पूरा" जैसे मान्यवर भिक्षु के तानोंसे निराश/संतप्त हो जाते हैं ?और वह ऐसे कार्यक्रम में आना छोड़ देते हैं? ऐसे दुर्व्यवहार की जिम्मेदारी अपनेही 'दांत लेंगे या अपनेही होंठ' ? 
५. क्या उपस्थित मान्यवरो के स्वागतप्रथा के औपचारिकता के बिना क्या वें मार्गदर्शन नहीं कर सकते? छोड़ कर चले जाते है ?
६. क्या भिक्षु के 11:00 बजे भोजन देना और उपासक को 2:00 बजे तक भूखा रखना; क्या यह न्यायसंगत-मानवतासंगत-धम्मसंगत है ? या अनुशासनहीनता या फिर असमानता का द्योतक है ?
७. अधिवेशन में चीवरदान के समय  भिक्षुओं ने को घुटनोंपर क्यों बिठाया गया था  ? (पुर्वाश्रमीके राजकुमार रहा चुके) तथागत ने ऐसा दुर्व्यवहार वेश्या आम्रपाली, पिता के खुनी अजातशत्रु  और आतंकी डाकु अंगुलीमाल के साथ भी नहीं   किया नहीं किया था | तथागत ने कभी ऐसा दुर्व्यवहार किसी अन्य के साथ किया, और न ही अपने शिष्योंको सिखाया | अब तक तिपिटक का अध्ययन यही सूचित करता है | युगपुरुष बोधिसत्व बाबासाहब ने दान स्वीकार करते समय स्वयं झुके थे  (सन्दर्भ )
तो क्या वे उपस्थित भिक्षु बुद्ध और बोधिसत्व से ऊपर थे ? या फिर अधिवेशन में दानकर्ता अजातशत्रु/अंगुलिमाल/आम्रपाली से भी अधिक दुर्बोध/अभागे थे ? इसका उत्तर  भिक्षुओंको  त्रिपिटक के आधार पर ही देना होगा ! आदरभाव अनुभव पर आधारित होना चाहिए |  हेतुपुर्वक तुच्छ समझना या हीन दिखाना  गहरे अहंभाव का द्योतक लगता है | बुद्धवाणी के अनुसार सन्मान पुर्वक आचरण अपेक्षित है, तभी तो २६०० साल पहले बुद्धवाणी से समता प्रस्थापित हुयी थी  | जरा सोचिये क्या ये अस्वस्थ रूढ़िवादिता धम्मसंगत है ?

८. ९० मिनट की पाली गाथा के बजाय अशोक बौद्धजी द्वारा ली गयी  ५-१० मिनिट की  हिंदी गाथा प्रभावशाली क्यों लगी ?






४. इस अधिवेशन को विविध दृष्टिकोन से मूल्यांकन करके रेटिंग :
१. क्या आपको कार्यक्रम की भूमिका सही लगी ? ० में से १०  गुण 
२. क्या आपको कार्यक्रम के उद्देश्य पूर्ति के लिए समस्याओं और उनके समाधान के ऊपर उचित मार्गदर्शन मिला? १० में से ३ गुण 
३. क्या आपको धम्म-विद्वान और व्यवस्थापन (Management) - विद्वानों से संपर्क हुआ?  क्या उनसे कुछ मार्गदर्शन मिला? १० में से २ गुण 
४. क्या आपको बुद्ध विहारों मे स्त्रियों और युवकों को आकर्षित करने के उपाय मिले१० में से १ गुण 
५. क्या आपको धम्म के प्रचार और प्रसार के लिए नया ऊर्जा, नव चेतना और संयम प्राप्त करने के लिए उचित कल्पकता मिली?  १० में से २ गुण 
६. क्या एक क्या एक श्रोता के तौर पर आपका अभिप्राय या आपके विचारों को किसने जांचना चाहा आपकी प्रतिक्रिया किसने मांगी (जैसे की Google Forms) ? १० में से ० गुण 
७. क्या भोजन का समय और दर्जा सही था?  १० में से ६   गुण 
८. क्या आपके साथ आए हुए साथी या मित्र-परिचित प्रसन्न हुए? १० में से २ गुण 
९. विविध आयु / विविध शैक्षणिक स्तर / लिंग / विविध आर्थिक स्तर/ विविध बौद्धिक स्तर के लोगों से किस तरह से बातें रखी जाए, क्या आपको  किसी मनोवैज्ञानिक या मनोचिकित्सक से कोई मार्गदर्शन मिला? १० में से १ गुण 



५.  मेरे सुझाव : 

  • तथागत ने लोकभाषा में गाथाएं कही थी | तो आज की भाषा में बुद्ध वंदना लेनी चाहिए जिसे लोक समझकर जीवन में कार्यान्वित कर सके | जिसका समय ५-१० मिनिट का हो | 
  • राष्ट्रिय स्तर के अधिवेशन के वक्ताओं का चयन शिफारस से न होकर उनकी प्रतिभा, समयसुचकता, भाषणों के मुद्दों के विश्लेषण की कुशलता, नवीनतम अनुसंधान और ज्ञान के मूल्यांकन पर हो | और वक्तों की ऐसी विशेष परख और विशेषण के लिए  वर्षभर के मूल्यांकन की मेहनत हो | 
  • अनुशासनहीन मान्यवर, भिक्षु, संचालक, निवेदक, अध्यक्ष को भी  को बेल बजाकर निलंबित करने का अधिकार अशोक जी/ या अधिवेषण के अध्यक्ष को अवश्य हो | 
  • युवा वर्ग को सम्मिलित करने के लिए, वर्षभर विविध संस्थाओं के युवा वर्ग से जुड़ने का प्रयास हो |  युवा वर्ग के विचारप्रणाली की समर्थता/परिपक्वता, उनकी अपेक्षा,  उनकी समस्या और उनकी तकनीक का अध्ययन होने के बाद ही स्थानिक या राष्ट्रीय अधिवेशन की स्वरुप निश्चित हो | 
  • भिक्षु-उपासक के बारे में पक्षपाती / पैसा मांगने वाले  / ताने मारकर बोलने वाले /असेवाभावी  वाले भिक्षु/उपासकों (शील की  गाथा कहकर उपासकों  की जेब पर नजर रखने वाले भिक्षुओं ) का चयन न हो | नहीं तो यह बुद्ध के विनय के प्रतिकुल नीति होगी | 
  • श्रोताओं के मनोविज्ञान को जानकर उनके सक्रिय सहभाग के लिए वर्कशॉप / चर्चासत्र और प्रश्न उत्तर के सत्र का आयोजन हो

धन्यवाद !!

यदि मेरे कुछ विचार आपके सामने रखते हुए अगर मैं आपका कहीं मन दुखाया हो तो मैं आपसे क्षमा प्रार्थी  हूं | कार्यक्रम के दौरान, इस विषय में मैंने कुछ अन्य श्रोतओंसे भी बातचीत की  थी| उन सभी ने मेरे ऊपर के मतों को ठुकरा नहीं सके | उन में से कोई वकील, प्रोफेसर, डॉक्टर, ग्रॅज्युएट  और १२ पास लोग थे | 

हो सकता है, की  मेरे यह  सुझाव मनुष्यबल या फिर द्रव्यबल(पैसा) कारण संभव न हो| पर यह सुधारित नियोजन तो  बुद्धिबल का द्योतक है, ये मेरा दॄढ विश्वास है| मेरा उद्देश्य तो यही है कि अधिकाधिक नवयुवक और स्त्रियों का यहां पर सम्मेलन में सहभागी हों | जिससे आर्थिक और पारमार्थिक रूप से समाज का विकास हो | माननीय अशोकजी की भूमिका और देश के सारे बुद्ध विहार का समन्वय शीघ्र और परिपुर्ण तरह से हो | इसलिए अपने मनोगत और अपना अभिप्राय आपसे स्पष्ट रूपसे समीक्षा सहित साझा कर रहा हूं|  जय भीम, नमो बुद्धाय | 


आपका ऋणी ,
सम्बोधन धम्मपथी (९७७३१००८८६)
कॉम्पुटर इंजीनियर, आयटी क्षेत्र में २२ साल का अनुभव,
सर्टिफाइड आयएसटीक्युबी मैनेजर, Certified SCRUM Master,
त्रिपिटक वाचक, धम्मसेवक,
मुंबई, महाराष्ट्र 


Friday, 2 February 2024

तिरोकुंड सुत्त : (चार) भिंतीपलीकडील अदृश्य उपाशी सावल्या

 तिरोकुंड सुत्त  : (चार) भिंतीपलीकडील अदृश्य उपाशी सावल्या 

ह्या लेखात मी तिरोकुंड सुत्त आणि त्यावरील स्पष्टीकरण देत आहे. 

बुद्धाने हितकारी/श्रद्धा  आणि अहितकारी/अंधश्रद्धा  गोष्ट कशी ओळखायला शिकविले ?

हे सुत्त  त्रिपिटकातील खुद्दकनिकायात प्रेतवत्थु (प्रेतवस्तु )  विभागातील आहे. ह्या विभागात भगवंतांनी अकुशल कर्म करुन प्रेतयोनीत गेलेल्या लोकांची व्यथा व दुर्दैवी स्थिती समजावली आहे. अर्थात, यावर अनेकांचा विश्वास बसणे कठीण आहे. तरी पंचतंत्रासारख्या मनोरंजक कथांतुन जसे आपण बोध / सद्गुण  घेतो आणि आपले भले करतो तसे आपण आपले भले साधावे. स्वतः बुद्धांनी कालाम सुत्तात स्पष्टपणे सांगितले आहे कि, "मी सांगतो म्हणुन किंवा ग्रंथांत लिहिले आहे म्हणुन मानु नका. जर सर्व समाजाचे भले होत असेल आणि विद्वानांनी स्वीकारले असेल किंवा तुम्ही स्वतः तपासले असेल तरच ते माना ! नाहीतर एक कथा म्हणुन  एका  आणि सोडून द्या.

आणखीन सांगायचे म्हणजे कॉम्पुटर बनवायचे ज्ञान ५० वर्षांपूर्वी एखाद्याला सांगितले तर अशी वस्तु बनू शकते, यावर कोणी श्रद्धा/विश्वास ठेवला नसता! आज ती वस्तु बघितल्यावरच श्रद्धा/विश्वास बसतो. तरीही वाचकाने कालामसुत्तच लक्षात ठेवावे !!

प्रेतवस्तुची विभागाची ओळख : तुमचे काही  मृत पूर्वज आणि प्रिय मृत नातेवाईक मृत्यूनंतर प्रेतयोनीत जन्मुन खूप दुर्दैवी आयुष्य जगण्याची शक्यता आहे. मृत्यूनंतर प्रेतयोनीत अशीच माणसे जातात ज्यांनी घोर अकुशल कर्म केलेली आहेत. (कर्म सिद्धांतानुसार) तिथे ते स्वतःला घोर शिक्षेच्या संकटांपासून व उपाशी रहाण्यापासून वाचवु शकत नाही. म्हणुन बुद्ध समजावतात, तुम्ही मृत पुर्वज/नातलगांबद्दल (तुमच्यासाठी त्यांनी केलेल्या कामाबद्दल) विनम्र राहुन आणि कृतज्ञता बाळगुन, त्यांची भल्यासाठी आणि तुम्हाला जास्त काळ साथ देईल असे पुण्य/मंगल करण्यासाठी दान देत राहिले पाहिजे.

(तिरोकुंड सुत्त सुरु झाले) 

 तिरोकुंड सुत्त:  त्या भिंतीपलीकडील अदृश्य उपाशी सावल्या

(तिरोकुंड म्हणजे घराबाहेरील)

घराच्या बाहेर किंवा चौकात ते  अदृश्य ( मृत पावलेले पुर्वज/नातेवाईक  ) उभे आहेत! दाराच्या चौकटीत ते उभे आहेत, ते त्यांच्या जुन्या घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. पण स्वतःला आणि कुटुंबाला जेव्हा भरपूर अन्न-पाणी मिळते, तेव्हा कोणीही त्यांना (स्वतःच्या पूर्वजांना) लक्षात ठेवुन धन्यवाद देत नाही. असे  प्रत्येक मनुष्याच्याचे कर्म/स्वभाव (दोष) आहे.

तरी अशा प्रकारे ज्यांना स्वतःच्या मृत पुर्वज/नातेवाईकांबद्दल सहानुभूती वाटते, ते इतरांना वेळेवर योग्य अन्न-पाणी किंवा विविध प्रकारे वेळेवर दान  कृतज्ञतेने देतात. दान देताना असा विचार असतो, कि, "आज आम्हाला आमच्या मृत पुर्वज/नातेवाईकांच्या कष्टामुळे सुख समाधान मिळते आहे. (हे सुंदर छान वस्तूचे दान देताना) आम्ही कृतज्ञतेने  अशी कामना करतो कि, ह्या दानाच्या पुण्याने मृत पुर्वज/नातेवाईक जिथे असोत, तिथे त्यांनाही  योग्य अन्न-पाणी किंवा विविध प्रकारे मदत मिळो. आमचे मृत पुर्वज/नातेवाईक सुखी होवोत!"


आज संयोगाने जे मृत पुर्वज/नातेवाईक इथे अदृश्यरित्या जमले असतील त्यांना विनंती कि, "आम्ही इतरांना दिलेल्या (छान आणि भरपूर अन्न-पाणी किंवा इतर विविध ) दानाबद्दल  तुम्ही (मृत पुर्वज/नातेवाईक) आम्हाला प्रेमाने-कौतुकाने आशीर्वाद द्यावे !! तुम्ही आम्हाला असा आशीर्वाद द्व्यावा कि , "आम्हाला  (मेलेल्या नातेवाईकांना ) विविध गोष्टी सन्मानपूर्वक दान करणाऱ्या ह्या जिवंत नातेवाईकांना सुख-शांती व दीर्घायुष्य लाभोज्यांच्यामुळे आम्हाला [ही भेट] मिळाली आहे. आमचा (मृत्युनंतरही) सन्मान झाला आहे. अशा प्रकारे दान करणाऱ्याचे नेहमी खुप मंगल होते! तसे तुम्हा सर्वांचेही होवो!"

हे लक्षात घ्यावे कि, जिवंत असताना केलेल्या अकुशल कर्मामुळे मृत्युनंतर प्रेतयोनी मिळते. ह्या प्रेतयोनीत शेती नसते, गाया-गुरे  नसतात, कुठलाही व्यवसाय नसतो, पैशाचेही व्यवहार नसतात! जे काही दान त्यांचे जिवंत नातेवाईक (इतर गोर-गरीब-गरजु लोकांना) देतात, तेच दान मृत पुर्वज/नातेवाईकांना प्रेतयोनीत मिळते. ते नाही मिळाले कि, हे अदृश्य प्रेतप्राणी खुप व्याकुळ-अशांत-बैचेन होतात. 

जसे पावसाळ्यात डोंगरांवर पडलेले पाणी, झिरपत-झिरपत कळावे बनुन  दरीतुन खालच्या गावांना मिळते, त्याच प्रकारे इथे जिवंत माणसांना केलेली मदत त्या प्रेतयोनीतील मृत पुर्वज/नातेवाईकांना मिळते. 

त्याचप्रमाणे पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या जेव्हा समुद्राला मिळुन विशाल बनवतात त्याच प्रकारे,  इथे जिवंत माणसांना केलेली मदत त्या प्रेतयोनीतील मृत पुर्वज/नातेवाईकांना मिळते. 

"भूतकाळात ते माझे  मृत पुर्वज/नातेवाईक, सोबती, मित्रांनी मला दिले, माझ्या वतीने काम केले होते." असे मृत पुर्वज/नातेवाईकांनी केलेल्या उपकारांची जाण ठेऊन कृतज्ञ मनाने आदरपुर्वक दान करतात. अशा प्रकारे त्यांच्या पूर्वजांच्या चांगल्या कामाला चांगल्या कामानेच प्रतिसाद देतात. 


जीवंत माणसे कितीही रडली, दुःख किंवा शोक  केला तरी, कुठल्याच प्रकारे मृतांना फायदा होत नाही. 

पण जेव्हा मृत पुर्वज/नातेवाईकांनी केलेल्या उपकारांची जाण ठेऊन,कृतज्ञ मनाने आदरपुर्वक बुद्धाच्या संघाला दान करतात तेव्हा मृतांना तात्काळ फायदा होतो आणि तो दीर्घकाळ त्यांना सोबत असतो. 

(तिरोकुंड सुत्त समाप्त ) 



स्पष्टीकरण तिरोकुड्ड सुताचे  :

खुप स्वाभाविक आहे कि  असे सुत्त वाचुन विज्ञानाची कास न सोडणाऱ्या बुध्दवाणी बद्दल असंतोष किंवा भीती किंवा दोन्ही वाढतील. म्हणुन अशा प्रकारचे सुत्त खुप विद्वान माणसाने फक्त अशा लोकानांच सांगावे ज्यांनी कालामसुत्त चांगले समजले आहे. ज्यांना कथेतील न पटलेल्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ सद्गुणांवर लक्ष ठेवुन सद्गुण वाढवणाऱ्यांवर भर असतो. विज्ञान एखादी गोष्ट तेव्हाच स्वीकारते, जेव्हा आपण ती सिद्ध करु शकतो. त्यामुळे आपण प्रेतयोनी सिद्ध ना करता आल्याने, ती जरा बाजूला ठेवुन फक्त सद्गुण घेण्याचा प्रयत्न करूया. 

आजच नाही तर असे बुद्ध काळातही अनेकदा झाले आहे कि, तरुण माणसे आपल्या म्हाताऱ्या आई-बापाला वाऱ्यावर सोडुन देतात. त्यांनी आमच्यासाठी काहीच नाही केले असे बोलतात. आपले पुर्वज कठीण परिस्थितीत कसे जगले, कसे लढले आणि आम्हाला चांगल्या गोष्टींचा वारसा जातं करुन ठेवला, हेही विसरुन जातात. 

पण विद्वान माणसाला हे नेहमी माहिती असते, कि एखाद्या उंच फांदीची उंची, त्या फांदीच्या खाली असणाऱ्या अनेक जुन्या फांदीमुळेच आहे. अगदी त्याचप्रमाणे माझे आजचे सुख हे केवळ माझ्याच नव्हे तर, माझ्या अनेक पिढीच्या मेहनतीमुळे आणि जिद्दी मुळेच आहेत. आई-वडील, काका-काकी/मावशी, मामा-मामी  आणि त्या सगळ्यांचे आई-वडील, यांच्या उपकार्याच्या छायेत माझे सुख भोगीत आहेत. जर पती-पत्नी, भाऊ-बहीण जिवंत नसतील तर त्यांच्या प्रेम-चांगुलपणाने माझे जीवन बहरले आहे. हे जिवंत असोत कि मृत असोत, मी त्यांचा खुप खूप ऋणी आहे. हा विनम्रता, खरेपणा आणि कृतज्ञता हे सद्गुण असलेलाच माणूस हे कबुल करील. 

आणखीन लक्ष दिले तर माझे शिक्षक, शेजारी, अन्न पिकवणारे शेतकरी, पोलीस-सैनिक दल, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक/राजकीय  पुढारी, रिक्षा वाले, ट्रेन-बस बाले, वर्तमानपत्रे-पुस्तक लिहिणारे, मासेमार -मच्छिमार, व्यापारी, डॉक्टर-वार्डबॉय, प्रोफेसर,  न्यायपालिका संघ, अध्यात्मिक संन्यासी, संडास-गटार सफाई कर्मचारी आणि असे असंख्य माणसे हे सर्व कोणत्याही जाती-धर्माचे असु शकतात! ते आज जिवंत असतील किंवा नसतील मी नक्कीच त्यांचा ऋणी आहे आणि राहीन. हा विनम्रता, खरेपणा आणि कृतज्ञता हे सद्गुण असलेलाच माणूस हे कबुल करील.

आता मी हे उपकार कसे फेडु ? हे जिवंत असले तरी अदृश्य आहेत, आणि मृत असले तरी अदृश्य आहेत!! त्यांना माझ्या आनंदात-सुखात कसा सहभागी करू? तर मित्रा ये... हे तिरोकुड्ड सूत्र वाच!!  आणि  नंतर सन्मानपूर्वक, निर्मळ मानाने आणि कृतज्ञतेने उत्तम दान कर! ते इतरांना बुद्धाने सांगितल्या प्रमाणे मिळेल!

आता प्रश्न हा कि बुद्धाच्या संघालाच दान केल्याने ते लवकर आणि जास्त काळ कसे टिकेल ?

लक्षात घ्या सुत्तात संघ हा शब्द आहे, त्यात भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका चौघे हि येतात !

एखाद्याला दुसऱ्याला पैसे पाठवायचे असल्यास माणूस एकदम विकसित बैंक बघतो जी ऑनलाईन व्यवहार १-२ सेकंदात करते. मोठं व्याज पाहिजे असेल तर अशी मेहनती विकसित बैंक बघतो जी विचार पूर्वक चांगल्या ठिकाणी, चांगल्या मार्गाने खुप मेहनत करुन गुंतवलेले पैसे वाढवुन देते! बरोबर ना ?

भगवंताचा संघ ( भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका) हे अशीच विकसित बैंक आहे. ते स्वतःला दिवस रात्र चांगल्याकामात (सत्य, न्याय, सन्मार्ग, निरंतर व निस्वार्थ लोकसेवा)  गुंतवतात. विचारपूर्वक चांगल्या ठिकाणी, चांगल्या मार्गाने, खुप मेहनत करुन मन शुद्ध करतात, सदाचारी बनतात, विपश्यना ध्यान करीत मनाचा खूप उज्ज्वल विकास साधतात. ते कोणतीही जात-धर्म ना पाहता निस्वार्थ आणि सेवाभावी वृत्तीने लोककल्याण करीतच  ते विकसित गुणवान मानव होतात.  जसे पैशाचे काम एका सजग, उच्च शिक्षित, प्रामाणिक, मेहनती आणि सद्गुणात रमणाऱ्या माणसालाच मिळते, त्याच प्रमाणे भगवंताचा संघ ( भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका) हे अशीच विकसित बैंक आहे जी सदासर्वदा मेहनती व कल्याणकारीच कामे करते. त्यामुळे संघाच्या ह्या चारही खांबांचा उचित आदर आणि सत्कार व्हावा .  कां हि कल्याणकारी कामे करताना शील, सत्य, अखंड मैत्रीआणि सहनशीलता ह्या पारमिता पूर्ण केल्यानेच तो माणुस संघाचा भाग बनतो, भले मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो!! एखादे कर्मकांड केल्याने, विशिष्ट कपडे घातल्याने, विशेष भाषा बोलल्याने किंवा विशेष केस रचना केल्याने नाही!! (संदर्भ : धम्मपद, भिक्षु वर्ग )



नोट : तिरोकुड्ड चा अनुवाद मी खालील इंग्लिश वेबसाईट चा आधार घेऊन केला आहे. ह्या वेबसाईट च्या सौजन्याबद्दल आणि मेहनती बद्दल खुप  खुप धन्यवाद।।

https://www.accesstoinsight.org/tipitaka/kn/pv/pv.1.05.than.html

खूप खूप धन्यवाद !

आशा आहे कि ह्या लेखाने खूप सारे अकुशल विचार किंवा धारणा दूर होतील!


सर्वांचे मंगल होवो!

संबोधन धम्मपथी 

मोबाइल : ९७७३१००८८६ (व्हाटसप )