Saturday, 16 January 2021

भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक वीरांचे मनोगत व प्रश्न

 माझ्या वारसांनो तुम्हाला काही सांगायचे आहे, काही विचारायचे आहे. शंभराहून अधिकवर्षे गेली बघा बघता बघता. कोरोना काळ चालू आहे आशा आहे की तुम्ही सुरक्षित असाल.

 जास्त वेळ नाही घेत तुमचा नाही, काही सांगायचं होते म्हणून आलोय तुमच्या स्वप्नात. आमच्या नंतर एक महान, कर्तबगार व थोर शुरवीर होऊन गेला आणि तुम्हाला बरेच सांगुनही गेला, बाबासाहेब नावाचा!! तरीही काहीतरी चुकतंय म्हणून आलो मन‌ मोकळ करायला. 

आमच्याकडे त्यावेळी जे होते त्याने, जसे होतो तसे आणि मानवी जीवनाचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही जीव झोकून लढलो. त्याला विजयस्तंभाला तुम्ही आजही वंदन करत असता. चांगले आहे, पण हे अजिबात पुरेसे नाही. नक्कीच‌ नाही.

जरी आम्ही लढलो तरी युद्ध पुकारण्यापूर्वी पहिली सामाजिक परिस्थिती अनेक वर्षे अनुभवली होती. ती सामुदायिक रित्या समजुन योजना आखली होती. हे पहा जर आम्ही आमच्या पूर्वजांचाच इतिहासाच्या घटनांचा आणि जागेचा उत्सव साजरा करीत असतो नुसतीच मानवंदना देत राहिलो असतो; तर ना आम्हाला मानवी हक्क मिळाले असते ना ही आमची पुढची पिढी जगली असती.




 _त्यामुळे तुमची हि एक तारखेची वंदना आम्हाला पुरेशी नाही. आमची इच्छा आहे तुम्ही काही तरी आम्हाला साजेसे बौद्धिक व धोरणी पराक्रम करावेत. आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमचाही पराक्रम सिद्ध करु शकता का?:_ 

⚡बाबासाहेब फक्त एकदाच का गेले भीमा कोरेगाव ला १९२७ साली, ते ही बौद्ध होण्याच्या २९ वर्षांपुर्वी?

⚡प्रगतिशील व दक्ष बौद्ध समाज म्हणुन तुम्ही आता कुठे व‌ कसे पडत आहात हे तुम्ही कसे, कधी व कुणाकडुन‌ शोधता ?

⚡तुम्ही बौद्ध व अस्पृष्य हा फरक कसा करता ? कि १९५६ सालाची धर्मांतर तुम्हाला कबूलच नाही ?


⚡बहुतेक शिकलेली व पैसेवाले बौद्ध आणि अस्पृश्य (जी समाजाची नवी शक्ती स्थाने आहेत) ते समाजापासून दूर का राहतात ? 

⚡तुम्ही विजयदिन साजरा करताना, एक समाज म्हणुन आपल्या समस्या कोणत्या व त्या कशामुळे निर्माण झाल्या याकडे कधी लक्ष देता का ?

⚡आमची लढाई एका विशेष जातीविरुद्ध/संप्रदायाविरुद्ध नसुन जातिव्यवस्थेच्या विरुद्ध आहे हे तुम्ही कसे विसरलात ?

⚡तुम्हाला विजयदिनी आत्मविश्वास व एकता वाढवायची असतो, कि ज्यांना आम्ही हरविले त्यांच्यावर हसायचे असते? अशाने दुश्मन तयार होतील कि दोस्त?

⚡१९५६ नंतर तुम्ही नक्की बौद्ध झालात कि एका संप्रदायाचे सात जन्माचे विरोधक झालात ?

⚡सध्याच्या घडीला समाजाकडे चांगला वैचारिक, सुज्ञ, धोरणी व विविध समाजमान्य नेता नाही(राज्यस्तरावरही नाही व राष्ट्रीय स्तरावरही नाही) याचे कारण काय हे तुम्हाला समजले का ?

⚡समाज म्हणून आपल्याला एक‌ प्रगल्भ नेता हवा आहे कि एक विदुषक ? तुमचे शेजारी व मित्र अशा नेत्यावर व समाजावर कितीही हसले तरी‌ नवीन प्रगल्भ नेत्याची गरजच वाटत नाही का तुम्हाला?




⚡बाबासाहेबांचे विचारांची पायमल्ली करीत विरोधी विचारधारा असणाऱ्या राजकीय पक्षाशी जवळीक करणार्या नेत्याला तुम्ही नेते पदावरून खाली का उतरविले नाही ? कसे उतरायचं हे तरी माहिती आहे का?




⚡एखाद्या नेत्याच्या फक्त २५ वर्षांपूर्वीच्या चांगल्या कामावर त्याला/तिला आज सन्मान का देता? त्यांचे/तिचे सध्याचे निकृष्ट काम, कामचलाऊ धोरण, फसवी/ स्वार्थी वृत्ती का लक्षात घेत नाही? नवा नेता कसा शोधावा हे तरी कळते का?

⚡प्रत्येक नवमुस्लिम/नवख्रिश्चन अस्पृश्याने ती अस्पृश्य आडनावे बदलुन परिपूर्ण धर्मांतर केले हे तुम्हाला का नाही समजले ? नामांतराविषयी तर बाबासाहेबांनी १९३७ साली "मुक्ती कोण पथे" पुस्तिकेतही सांगितलेले होते. 

⚡प्रत्येक नवमुस्लिम/नवख्रिश्चन अस्पृश्याने ती अस्पृश्य आडनावे बदलुन त्यांच्या समाजाची एकता वाढवली हे तुम्हाला का नाही दिसले ? जर आडनावावरुन जात कळते आणि बौद्ध होऊनही भेदाभेद होते (संधींपासुन डावललं जाते) तर तुम्ही तुम्हाला मिळालेली अस्पृष्यता दर्शविणारी नावे धर्मांतरानंतर तुम्ही का बदललेली नाहीत ?

⚡तुमच्या पुढच्या पिढीला तर सोडा आसपासच्या लोकांना बाबासाहेबांचं कर्तृत्व कळेल किंवा बाबासाहेबांचे सर्वांगीण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे कुठले काम तुम्ही करता ? 

⚡वेगवेगळ्या सोसायटीत गेलेल्या बौद्ध माणसाला तुम्ही कुठे व कसे ओळखणार ? बौद्धांची व अस्पृश्यांची आडनावे सारखीच आहेत.अस्पृश्य आडनावे न बदलेल्याने पुढची पिढी बौद्धसंस्कृती टिकवणार नाही याची कल्पना तुम्हाला का नाही आली ?

⚡बौद्ध भिक्षुं ची काळजी‌(जेवण, औषधे व‌ धम्म चर्चा) कोण‌, कधी, कशी व किती‌ घेता? का त्यांना कोणी नेहमी लक्ष व स्नेह देतात का?

⚡गोरगरीब जनतेचा विकास कुठल्या धोरणांमुळे होतो व ती धोरणे कशी टिकवावीत व सुधारावीत हे तुम्हाला माहिती आहे का ?



⚡बाबासाहेबांनंतर तुम्ही एक समाज म्हणून किती शाळा-कॉलेज बांधली आहेत ?

⚡ज्या (समाजाच्या) विकास रोपट्याला रोज पाणी व खत लागते, त्या रोपट्याला फक्त भीम/बुद्ध जयंती उत्सवात सगळा पैसा खर्च करून विकास रोपटे मरून जाते, हे तुम्हाला कधी कळणार ?




⚡तुमच्याकडे शिक्षण असताना आणि पसे देऊन कुठलीही विद्या मिळत असताना तुम्ही अजून ८४,००० बुद्ध उपदेशांपैकी किती उपदेश शिकलात ?

⚡आज अनेक राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक गट आहेत पण ते एकमेकांचेच विरोधक आहेत, याचे कारण कोण शोधणार?

⚡अनेक गटांचे कारण नक्की समाजाच्या अहंकारात आहे कि दुश्मनांची विषारी चाल आहे, एवढे तरी तुम्हाला ठाऊक आहे का ?

⚡बाबासाहेबांच्या संविधानात आतापर्यंत साधारणतः १२० च्या हुन अधिक बदल झाले आहेत. ते का व कोणते हे तुमच्या सध्याच्या कुठल्या नेत्याने तुम्हाला सांगितले आहे? सुशिक्षित असून तुम्हाला ते का माहिती नाही ?  विघातक बदल थांबवायचे कसे माहिती आहे का?

⚡ बाबासाहेबांचे विचार तुमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या विचारवंतांना तुम्ही नियमित मानधन देता कि, टीव्ही च्या केबलवाल्याला ? तुमच्या पिढीला कोण वाचवणार हे तुम्हाला का समजत नाही ?


⚡मानवी हक्कांसाठी बाबासाहेबांनी वेळेनुसार नवनवीन लढाई लढत राहिले कि बुध्द -फुले-कबीरांच्या उत्सवात व वर्गणीत गाफील राहिले?

⚡बाबासाहेबांनी भिमाकोरेगाव चे महत्व बौद्ध झाल्यावर कधी व कुठे सांगितले हे सांगू शकाल का ?


⚡विपश्यनेला विरोध करणाऱ्यांना समाजाची कीड (दारू) , धुंदी व व्यक्तिमत्वाची अनेक व्यसने दूर करुन सुसंस्कारी समाजाचे निर्माण कसे करावे असा प्रश्न विचारला का ?

⚡तुम्हाला आणि तुमच्या पुढची पिढीला बौद्ध म्हणून ओळख/लौकिक आवडेल कि अस्पृश्य म्हणून ?

⚡तेव्हाची लढाई मैदानात व्हायची आताच्या ऑनलाईन युगात लढाई कुठे व कशी होते हे तुम्हाला माहिती आहे का ?

हे तीस प्रश्न दर महिन्याच्या तीसही दिवस तुमच्या मनात ठेऊन उत्तर शोधल्याशिवाय उसंत घेऊ नका.

🔊लक्षात घ्या " *इमाय धम्मानु-धम्म पटीपत्तिया बुद्धं पुजेमी"* म्हणजे बुद्ध पुजा/वंदना मी त्यांच्या धम्मानुसार वागुन (आचरणात आणुन) पूर्ण करीत आहे, नुसत्या फुले-अगरबत्त्यांने नाही. 

त्याचप्रमाणे दरवर्षी आम्हाला औपचारिक वंदन करण्यापेक्षा, ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे व त्या नुसार योजना आखून प्रगती करणे (आचरणात आणुन)हि तुमची खरी विजयस्तंभाला मानवंदना(खरा पराक्रम) ठरेल. ते तसे सोपे नाही, "बौद्धिक" पराक्रम सोपा नाही. नेहमी दक्षता व समजुतदारपणा दाखवावा लागतो.


तोच खरा पराक्रम ठरेल आणि तीच खरी वंदना‌ ठरेल. तेव्हाच तुमची पुढची पिढी तुम्हाला या "बौद्धिक" पराक्रमाबद्दल धन्यवाद/वंदन/अभिनंदन करीन .

 नाहीतर काही वर्षांनी समाज म्हणून आपण नक्की कोण हे विचारावे लागेल ?


आजच्या युगाला साजेसा असा पराक्रम करणार्यांना वारसांना भेटायला कोणाला आवडणार नाही . 
तुम्हाला जर एखादे महान काम जमत नसेल तर, नेहमीची छोटीशी कौटुंबिक व सामाजिक कामे महानतेने (कौशल्य, दक्षता,विनम्रता व सद्भावना  ...... म्हणजे एकुणच निर्मळ मनाने) करा. तुम्हाला देशाची व मानवतेची सेवा करण्यास यश लाभो हि सदिच्छा. 




No comments:

Post a Comment