महाश्रावक अग्र धुतांगधारी (नितांत परिशुद्धी साठी सन्याशाचे व निर्वाणाचे तंतोतंत व कडक नियम पाळणारे) महाकाश्यप
धुतांग : आपल्या प्रतिपक्षातील/दुष्मनातील सर्वाना धुणे/आघात करणे तसेच प्रतिपत्ति चे अंग असल्याने धुत + अंग = धुतांग
महाकाश्यपांना का स्मरावे :
१. एकमेव भिक्षु ज्यांचे चीवर तथागतांनी घेतले व त्याला आपले चीवर दिले
२. भगवंतानी ज्यांना ध्यान-अभिज्ञा साठी स्वतःच्या क्षमतेचे घोषित केले
३. ज्यांनी दूरदर्शिता ठेवत पहिली संगायन भरावयाची ठरविली, व सद्धम्म आपल्यापर्यंत सुरक्षित ठेवण्याची पद्धत (संगायन) राबविली
४. ज्यांच्या आल्यानंतरच भगवंताची चिता आपोआप पेटली
५. सर्व विनयपिटकातील नियमांचे तंतोतंत आणि गंभीरतेने पालन करणारे
६. भोजनदानाचे निमंत्रण कधीही न स्वीकारणारे (फक्त भिक्षे साठी याचना करत जगणारे)
७. जंगलात, डोंगरदरीत व स्मशानात राहणारे
८. अशा सात व्यक्तींपैकी एक ज्यांच्यासाठी भगवंतांनी ३-३. किलोमीटर ची तुरित चारिका (त्वरित ऋद्धी वापरून दर्शन दिले )
९. असा एकमेव भिक्षु ज्याने कुष्ठरोग्याने दान देताना सडलेले बोट भिक्षापात्रात पडले तर ते, दिलेले दान सन्मानाने स्वीकारावे अशा नियमाचे तंतोतंत पालन करत खाल्ले
(फोटो फक्त मेहनतीची कल्पना यावीम्हणून आहे )
जे भिक्षु खालील नियमांचे नियमित पालन करतात ते धुतांगधारी (परिशुद्ध स्थिती ) बनतात (संदर्भ: विशुद्धीमग्ग ४४३)
१. फाटक्या कपड्यांचे चीवरओढतात.
२. फक्त तिचं चीवर धारण करतात
३. फक्त भिक्षान्नच घेतात, (घरी जेवायला जात नाही )
४. एका घरातून दुसऱ्याघराकडे भिक्षा घेतात. कोणत्याही घराला वगळत नाही.
५. दिवसातून एकदाच जेवतात
६. जेवढे जेवण भिक्षापात्रात येते तेवढेच जेवतात, पुन्हा घेत नाहीत किंवा मागत हि नाही.
७. एकदा का भिजणं झाले कि पुन्हा भोजन घेत नाही
८. निर्मनुष्य जंगलात (एकांतवासात) राहतात .
९. झाडाखाली राहतात, एखाद्या झोपडी किंवा विहारात नाही.
१०. मोकळ्या आकाशाखाली राहतात.
११. श्मशानात राहतात
१२. जे जसे भेटेल त्या विना तक्रार करता समाधानाने जागी राहतात.
१३. शय्येला त्यागून फक्त बसून राहतात.
हे सर्व सद्गुण व त्याग कशासाठी आहेत ?
हे आहेत अल्प ईच्छा, संतुष्ठी ठेवत तसेच जे काही दान मिळाले ते देणाऱ्याबाबत कृतज्ञतेची भावना ठेवत माणूस परमसुख व अंतिम सत्यपर्यंत पोहोचू शकतो हे त्यावेळच्या व भविष्यातील संघाला (भिक्षु-भिक्षुणी व उपासक-उपासिका) यांच्यापर्यंत बुद्धाचे नियम व शिक्षा पोहोचवावी यासाठी महाकाश्यप खुप सतर्क व प्रयत्नशील होते.
निर्वाणासाठी महत्वाचे मार्गदर्शन (थोडक्यात):
१. भिक्षु ने (साधकाने) एकांतवासी असावे. नाहीतर मन भटकण्यासाठी चारी बाजूने आलंबने मिळतील. मग एकाग्रता, समाधी दुर्लभ होईल, नंतर खूप दुःख होईल.
२. संग्रह करण्याची प्रवृत्ती दुःख, व्याकुळता आणि विकारांचे संवर्धन करील. भोग-विकासाच्या ठिकाणी (मॉल्स, सिनेमा, नाटकगृहे, हॉटेलं, बाजारहाट) हि जाऊ नका. परम सुख निर्वाणाला असे करणे बाधक होईल.
३. स्वतःचा सत्कार-पूजन करवून घेण्याच्या वृत्तीपासून दूर राहा. ते केल्याने मी-माझे असा प्रपंच वाढत जातो.
४. चीवर, जेवण व निवासाबाबत कुठलीही निवड किंवा ईच्छा दाखवू नका.
५.सर्व प्रकारच्या वाद्य-संगीताच्या आकर्षणापासुन अलिप्त राहत स्वतःला सम्यक विपश्यनेत प्रतिष्ठापित करा.
६.भिक्षु(साधक) सदा अडोल(सुखू-दुःख, यश-अपयश, फायदा-तोटा, निंदा-स्तुती ने न विचलित होता) मनाने समतावान व प्रज्ञावान आणून राहावे.
७. काही प्रश्न अव्याकृत आहेत व ते तसेच ठेवावे. कारण ते परमार्थासाठी नाहीत, ब्रह्मचर्या(सद्धर्म धारण)साठी नाहीत, निर्वेदासाठी नाहीत, विरागासाठी नाहीत, निराधासाठी नाहीत, शांतीसाठी नाहीत, ज्ञानासाठी नाहीत, संबोधीसाठी नाहीत, आणि निर्वाणासाठी हि नाहीत. (अव्याकृत प्रश्न जसे: का जीव मृत्यु नंतर राहतो का? व्याकृत प्रश्न जसे : दुःख म्हणजे काय, ते कसे होते व कसे दूर करावे?)
महाकाश्यपांचा शेवटच्या जन्मातील इतर महत्वाच्या घटना :
१. महातीर्थ गाव (मगध राष्ट्र ) कपिल नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्म
२. ८७ करोड संपत्ती, १४ गावे , यंत्र लावलेले ६० तलाव, ६०० किमी पसरलेल्या व्यापाराचा मालक
३. लग्नासाठी अजिबात तयार नाही
४. काल्पनिक पद्धतीने पण असंभव अशी सुंदर स्रीची सोन्याची मुर्ती बनवून, जर अशी स्त्री मिळाली तरच विवाह
५. भद्दा कपिलानी अशी स्री भेटली व मर्जी नसताना लग्न करावे लागले
६. प्रासंगिक पुण्य स्मृती झाली व पती पत्नी ने गृहत्याग केला
७. भगवंतानी चिवरचे आदान-प्रदान केले.
८. चोर बनलेल्या शिष्याला जुने कर्मस्थान देऊन धैर्य दिले. तिथेच त्या शिष्याला अर्हतपद मिळाले.
९. सारीपुत्तांना दोन वेळा प्रश्नांना उत्तर दिले.
संदर्भ: महाकस्सप, भगवान बुद्ध के महाश्रावक (विपश्यना विशोधन विन्यास)
No comments:
Post a Comment