Friday, 19 June 2015

भले न मन मैला करे, तन के सारे रोग। 
पर तन रोगी हो उठे, जब मन जागे रोग॥

- आचार्य सत्य नारायण गोयंका 


स्पष्टीकरण:

व्यक्ती कितीही निरोगी असली किंवा वाटली तरी शारीरिक रोगांचा सामना करावा लागतो. नेहमीच निरोगी व मजबूत वाटणारे शरीर कमकुवत व रोगी होऊन बसते. अपेक्षित हालचाली व कामे करता येत नाहीत मग वाईट वाटुन चीडचीड ( मनाची व्याकुळता) जाणवते. पण मनुष्य लवकर हार मानीत नसतो; अमुक खाल्या-पिल्याने मला आजार झाला आहे असा शोध चालु होऊन डाक्टरांच्या सल्याने उपचार सुरु चालु होतात. आज ना उद्या मी बरा होणारसा विश्वास व आशा  वाटू लागते. कारण मन सांगत असते, कि अजून मला खुप जग बघायचे आहे व खुप काही करून दाखवायचे आहे. अशा अपेक्षा शरीरातल्या रोगाला शरीरातून जाण्यासाठी धक्के मारीत असतात. शारीरिक रोगाला दूर करण्यासाठी सकारात्मक, उत्साहवर्धक व महत्वाकांक्षी विचार सैनिकासारखे लढू लागतात.इथे मन प्रगत जरी नसले तरी लोभी मात्र असते.  अशा प्रकारे "शारिरीक" रोगावर मात करण्यासाठी "मन" (…क़ारण मनातुनच वाईट तसेच सकारात्मक, प्रेरणादायी, उत्साहवर्धक व महत्वाकांक्षी  विचार जन्म घेतात.) मदत करते. आणि शारिरीक रोगांमुळे होणारी चीडचीड ही मनावर तितकासा भयानक परिणाम करीत नाही. म्हणजे एकुणच शरीराकडून येणारे रोग/विकार मनावर हे कमी हानिकारक असतात. 

एक उदाहरण घेवू: एखादी व्यक्ती नजरचुकी मुळे पडते तेव्हा जर न ओशाळता/वैतागता शांत मनाने पाहिले तर असे दिसते कि: आपण पडलो आहोत पाचव्या पायरीवर पण घसरण्याचे किंवा पडण्याचे कारण तर पहिल्याच पायरीवर होते. पाचव्या पायरीवर तर फ्क्त सध्याची पडण्याची प्रक्रिया पुर्ण झाली; वास्तवात पडायची सुरुवात तर पहिल्या पायरीवरच असताना घसरल्यामुळेच झाली होती. अशा प्रकारचे नियमीत आत्मपरीक्षण आपल्याला सांत्वन व पुन्हा न पडण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. 

आता आपण पाहिले कि शरीर रोगी असताना मनामध्ये असलेल्या सकारात्मक उर्जेमुळे, मनावर नकारात्मक परिणाम होत नाही. पण जेव्हा मन रोगी होते तेव्हा शरीरावर नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात होते. सभोवतालच्या जगाचे वागणे-बोलणे (आठ लोकधर्म: सुख-दुख, मान-अपमान, यश-अपयश, निंदा-स्तुती/कौतुक ) आपण नेहमीच अनुभवीत असतो. त्यात आणखिन भर म्हणजे आपल्या मनातूनही आपण आपलया मनातील काल्पनिक जगातील वागणे-बोलणे आठ लोकधर्मे ("त्याने असे केले किंवा नाही केले तर? माझा अपमान केला आहे." असे वाटणे ) अशा प्रकारे आपल्या मनातील घटना व बाह्य जगातील घटना आपल्या मनाला नाराज (अपेक्षाभंग झाल्यावर) न प्रसन्न (अपेक्षापुर्ती झाल्यावर) करीत असतात. पण मनोजगात  नाराज घटनांची रेख ही प्रसन्न घटनांच्या रेखेपेक्षा खुप गहरी व क्लेषकारक असते. आणि त्यात नाराजीच्या घटना प्रसन्नतेच्या घटनांपेक्षा वारंवार घटत असतात. 

पण मनाला जेव्हा वारंवार नाराजी/अपेक्षाभंगांना सामोरे जावे लागते, तेव्हा श्वास फुलणे, हृदयाची स्पंदने वाढणे, बद्धकोश्ठता, विनाकारण थकवा, पाचन ठीक न होणे, तसेच बैचेनी मुळे झोप न येणे असे अनेको रोग वाढत जातात. हे रोग जास्त काळ राहिले कि, शरीराला इतर भयानक रोगही जडतात, हे विपश्यना ध्यानात पारंगत असणारर्या लाखो साधकांच्या स्वानुभावातुन तसेच सध्याचा मेडिकल संशोधनातूनही अनेकोवेळा सिद्ध झाले आहे. शरीरावर होणारा हा परिणाम हा खुप घटक व बहुधा कायम स्वरुपी असतो. अशा नाराज मनामुळे जीवनाच्या प्रवासात आपण पाचव्या पायरीवर पडतो (पहिले आर्य सत्य: जगात दुःख आहे) पण ध्यान करून पाहिले असता असे दिसते कि, मी पडलो आहे खरा, पण पडण्याचे कारण आठ लोकधर्मांच्या बाबतीत अविद्येमुळे मनावर झालेला परीणामक आहे. मन जागरुक, मेहनती व प्रगत नसल्यामुळे त्या  पहिल्या पायरीलाच पडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती (दुसरे आर्य सत्य: दुःखाला कारण आहे.) मन एकदा का जागरुक, मेहनती व प्रगत झाले कि कारण नष्ट करता येते (तिसरे आर्य सत्य: दुःख निरोध शक्य आहे) . आणि मन सजग, मेहनती व प्रगत बनण्याचा आर्य(महान)मार्ग विपश्यनेद्वारेच प्राप्त होतो/आचरिता येतो (चौथे आर्य सत्य: दुःख मुक्तीचा मार्ग).

त्यामुळे जीवनाच्या प्रवासात आपण मन व शरीर दोन्ही जरी महत्वाचे असले तरी मन हे प्रमुख आहे, प्रधान आहे, अध्यक्ष आहे. त्यामेळे मोक्ष /निर्वाण (कायम निर्दोष जीवन) साठी शरीराला उपवास, व्रत, राख लावणे, अर्धनग्न किंवा नागडे फिरणे, अंगारे-धुपारे, कर्म-कांडांत  अडकवून (शरीराला अतिमहत्व देवून) समस्या सुटलेल्या नाहीत. कारण महत्वाचा व गंभीर परीणाम मनाचा शरीरावर होतो। शरीराच्या रोगांचा मनावर तितकासा परिणाम होत नाही. 

-संबोधन धम्मपथी 

























No comments:

Post a Comment