Saturday, 4 July 2015

शुद्ध धर्म ऐसा जगे, होवे चित्त विशुद्ध| 
बौद्ध बने या न बने, मानव बने प्रबुद्ध||
-सत्य नारायण गोयंका 

भगवंतांनी धम्म हा काही विशेष मानवी समुहासाठी बनविलेला नाही। जर  फक्त विशेष मानवी समुहासाठी असता तर तथागत महाकारुणिक कसे म्हणविले गेले असते? निसर्ग नियम तर सगळ्यांना समान लागु होतात. पण धम्माच्या ह्या वैश्विक उपयोगामुळे बौद्ध संप्रदायात किंवा एखाद्या बौद्ध व्यक्तीत स्वतः बौद्ध असल्याचा अहंकार अलगद व नकळत उत्पन्न होऊ शकतो. हा अहंकार कि आमचा भगवानसर्वात श्रेष्ठ व इतरांचे  हलके किंवा कनिष्ठ . जसे एखादे भव्य ग्रंथालय असावे त्यातील मोठे मोठे ग्रंथ पाहुन तेथील ग्रंथापल चकित व गर्विष्ठ व्हावा कि मी जिथे काम करतो, ते ग्रंथालय सर्वात मोठे व मी सर्वात मोठा ग्रंथपाल व  सर्वात मोठा . पण त्याने एकही ग्रंथ न वाचावा. पण इतर ग्रंथालयांना व त्यांच्या ग्रंथपालांना हीन लेखावे. तर आयुष्यभर त्याची अवस्था  उपयुक्त गोड तळ्याकाठी बसून त्याच्या पाण्याची स्तुती करीत जीवन घालवावे पण एकदाही पाणी चाखुन न प्यावे अशा दुर्दैवी माणसासारखी होइल. 

बुद्ध हे एक शिक्षक होते, पण म्हणुन फक्त काही बौद्ध झाल्यानेच निर्वाण मिळत नाही. मग कशाने निर्वाण मिळु शकेल?

आणि जर का निर्वाण उपयोगी असेल तर का त्याने एकच  माणुस सुखी होतो का? नाही!! ज्यास धम्मात प्रगती केल्यामुळे थोडी बहुत क्षांती मिळु लागली अशी व्यक्ती इतरांशी आनंदाने, न्यायाने,  विचार्पुर्वक व उत्साहपूर्वक वागते. त्यामुळे आपोआप आसपासच्या व्यक्तींना  होतोच. पण हे गुण नुसत्या बौद्ध झाल्यावर मिळत नसतात. 

 प्रत्येक माणुस (प्रत्येक बौद्धही) प्रत्येक घटनेला, स्वभावा प्रमाणे: अमके मला आवडते व तमुक आवडत नाही, असे म्हणत प्रिय-अप्रिय गोष्टींच्या जंजाळात अडकलेला असतो. त्यामुळे भीती, वासना, चिंता व ईर्ष्या ह्या चित्तमळांना बळी पडून  दुष्कर्म करीत जातो. ह्या गोष्टीतून वाचण्यासाठी तो,पूजा- अर्चा,व्रतवैकल्य व उपास-तापास ही करतो. का कारण कि माझे दैवत बुद्ध किंवा  राम किंवा महावीर व इतर कोणी ऐतिहासिक पुरुष यांनी माझे गुन्हे/ माफ करावेत व मला हवी असलेली शांती द्यावे, सुख द्यावे. त्यासाठी अध्यात्माची पुस्तके ही वाचतो, जप-जाप करतो, असे करून काहीकाळ शांती  नक्की मिळते . पण २-३ तास झाल्यावर पुन्हा जुना स्वभाव : त्याने असे केले व त्याने तसे नाही केले; अशा प्रकारे क्रोध व अशांती पुन्हा आपल्यावर ताबा मिळवते. इतर देवताच काय पण बौद्ध लोकांचेही बुद्धाबाबत असेच होते. कारण ते अशांती चे बीज कसे व कोण पेरते? ते रोपट्याचे वृक्ष कसे बनते? त्याची विषारी फळे कशी  देतात? व ह्या वृक्षांना कसे उखाडून फेकावे याबद्दल बुद्धाने जे शिकविले त्यापासून बौद्ध ही अनभिज्ञ  असतात. म्हणुन फक्त बौद्ध बनून सुख-क्षांती मिळत नाही. 

मग कसे मिळेल निर्वाण? बुद्ध हे खुप विनम्र महापुरुष  होते. त्यांनी निर्वाण मिळण्यासाठी माझी पुजा-अर्चा, पुतळे-चित्र, जप-जाप यांची कधीही गरज सांगितली नाही. उलट असे करून  तुम्ही निर्वाणापासुन दूर जात आहात असेच सांगितले. मनुष्य जीवनात जे काही आपण भोगतो ते कर्माचेच परिणाम आहेत. कर्म  मानसिक,शारीरिक व वाचिक असतात. मनात क्रोध आल्याशिवाय शिवी देणे अशक्य असते, तसेच मनात वासना आल्याशिवाय अनैतिक/विवाहबाह्य संबंधही अशक्य असतात. त्यामुळे मनाच्या सवयींच्या आहारी न जाता मनालाच चांगल्या सवयी लावणे हेच निर्वाणाकडे जाण्याचा एकमेव रस्ता (अष्टांगिक मार्ग) आहे. म्हणुन शील-सदाचाराने वागत, मन एकाग्र करून (समाधि), मन व शरीराचे प्रत्येक क्षण बदलते स्वरूप स्वानुभातुन जाणणे (प्रज्ञा) हा तीन अंगी धर्म शिकून घ्या, विपश्यना विद्या शिकून त्यात पारंगत व्हा. त्यासाठी विशेष कर्मकांड व संप्रदाय बदलण्याची गरज नाही. कारण हिंदु, बौद्ध व इतर संप्रदायातील माणसे ही मनाचे गुलाम झाली आहेत. 

आणि  त्यातही त्रिपिटकाचा अभ्यासकांनुसार बुद्धाने कोणालाही बौद्ध बनविलेले नाही, त्यांनीतर व्यक्तिला धार्मिक, धर्माचारी व धर्मस्थ बनविले. म्हणुन त्या वेळी जो माणुस भगवंतांला शरण गेला त्याने त्याची संस्कृती सोडलेली नाही. 

त्यामुळे असे दिसून येते कि, बुद्धाने हेच सांगितले कि बौद्ध बना अथवा नका बनू, पण सद्गुणी, प्रज्ञावान माणुस बनणे हे तुमच्यासाठी व तुमच्या प्रियजनांसाठी कल्याणकारी आहे. कारण ग्रंथ न वाचुन अहंकार जागवणारा (पण ग्रंथांची  घेणारा) ग्रंथपाल कधीही ज्ञानी बनत नाही. 

-संबोधन धम्मपथी 

















No comments:

Post a Comment