Saturday, 13 June 2015

धम्मिको बौद्धिक स्पर्धा : 2015

साप्ताहिक निळा प्रहार द्वारे "धम्मिको बौद्धिक स्पर्धा" आयोजित करण्यात येत आहे। विषय: "धर्म प्रसार व धर्म प्रचार यात फरक कोणता? आणि प्रभाव कोणाचा जास्त असतो धर्म प्रसाराचा कि धर्म प्रचाराचा? उदाहरणे देवुन स्पष्ट करणे आवश्यक आहे।"
पहिल्या प्रथम जाणुन घ्या धर्म म्हणजे काय? बौद्ध, हिंदु, मुस्लिम  व ईतर हे तर संप्रदाय आहेत। धर्म ह्या शब्दाला प्राचीन भारतात स्वभाव, निसर्ग व गुणधर्म म्हणायचे। धर्माचे तीनच प्रमुख अंग आहेत: शील (सदाचारी व नैतिक जीवन), समाधि ( कुशल मनाची एकाग्रता) व प्रज्ञा (शरीर व मनाच्या सवयींचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याच्या अभ्यासाने प्रत्येक मनुष्याला मोक्ष/निर्वाण मिळु शकते। जसे सिद्धार्थाला मिळाला ।) ही बौद्धिक स्पर्धा ह्याच शुद्ध धर्माच्या अर्थावर अवलंबुन आहे हे कृपया ध्यानात ठेवावे।
आता शुद्ध धर्माची गरज नक्की काय व कोणाला हे ही तथागतांनी सांगितले आहे। ते म्हणतात: गृहस्था तु अमुक देव-देवतेला पुजणारा असलास, ईश्वर एक किंवा अनेक आहेत असे मानणारा असलास, आत्मा व परमात्मा एकच किंवा अनेक मानणारा असलास, ईश्वर मानणारा किंवा न मानणारा असलास तरी तुझ्या कळत-नकळत तुझ्याच मनात ईर्षा, भीती, वासना, बैचेनी, क्रोध, कुशंका, अयोग्य अविश्वास, असंयम, असहनशीलता व व्याकुळता हे अकुशल मनोविकार जागतात ना? आणि हे च विकार मग मनातुनच वाणी न शरीरावर बाहेर पडतात। ईच्छा असुनही अकुशल कर्मांवर तुमचे नियंत्रण राहत नाही।  आम्ही त्याच चंचल मनाचे डॉक्टर आहोत। तुला ज्याला पुजायचे आहे त्याचे तु पुजा-अर्चा चालु ठेव। कायम सुख किंवा दुखमुक्ती हवी असल्यास मात्र आम्ही तुला मनाला शांत व निर्दोष बनण्यास शिकवु। पण ह्या मार्गावर तुलाच चालायचे आहे। जसे व्यायाम शाळेत गेल्यावर शिक्षक तर आपल्याला फक्त शिकवतात सुर्यनमस्कार तर आपल्यालाच मारावे लागतात। धर्माचीही गोष्ट तशीच आहे।
याचा दुसरा अर्थ असा कि बुद्धाची शिकवण/धम्म हा काही फक्त बौद्धांपुरता मर्यादीत नसुन भुत,वर्तमान व भविष्याकाळातील सर्व मानवासाठी आहे। त्यामुळ बौद्धांसह इतर संप्रदायातील लोकापर्यंतही धर्म पोचायला हवा। तर मग ईतर संप्रदायांची कर्मकांडे व संस्कृतीला नावे ठेवुन कल्याणकारी बुद्धवाणीचा बौद्धजन स्वताच अपमान करतात व तिला सीमा लावतात। ह्या  बौद्धिक स्पर्धेत मात्र असे चालणार नाही। बुद्धविचार यशस्वी रीत्या कसा पोहोचेल ते पाहायचे आहे: धर्म प्रसार व धर्म प्रचाराच्या माध्यमातुन।
काही जण असेही सुचवतील कि दर रविवारी विहारात जावे, पौर्णिमा व इतर सण साजरे करावेत। पण प्रश्न  असा आहे कि हा  धर्म प्रसार आहे का धर्म प्रचारआहे। दोन्हीही असणे शक्य नाही कारण फक्त तसे केल्याने का मन पुर्णता शांत, सजग व निर्मळ होत नाही असा माझ्यासह अनेकांचा अनुभव आहे। त्यामुळे अशी उदाहरणे देताना धर्म प्रसार व धर्म प्रचाराच्या दृष्टीनेच परिपुर्ण विचार करावा।
समजा कुणी विचारले कि शिकवणे म्हणजे काय तर असे सांगावे कि: एखादी गोष्ट/ज्ञान/माहिती आपण लेखाने/वाणीने/स्वत: आचरणात आणुन/प्रसंगानुरुप(जसे बुद्धांनी किसा गौतमीला सांगितले)  समोरच्या माणसाचे वय/स्थिती/बुद्धिमत्ता पाहुन सोप्या पद्धतीत समजावुन सांगणे याला शिकवणे म्हणतात। अशा पद्धतीने धर्म प्रसार व धर्म प्रचाराची दोन्हींची व्याख्या द्यावी। तसेच बुद्धाच्या शिकवणीचा किस्सा किंवा  स्वताच्या जीवनातील एखादा शिकवणीचा किस्सा उदाहरण स्वरुपात देवुन शिकवण ह्या शब्दाचा अर्थ समजावता येईल। त्याच प्रमाणे धर्म प्रसार व धर्म प्रचारा यांचा अर्थ ह्या धम्मिको बौद्धिक स्पर्धेत तुमचे उत्तर साधारण २०० शब्दांत द्यावे ही विनंती।
आपल्या धर्म प्रसार व धर्म प्रचारात आपण कमी पडतो आहोत। जर धर्म प्रसार व धर्म प्रचाराचा बुद्ध व बाबासाहेबांना काय अर्थ सांगायचा होता हे परिपुर्ण रीत्या समजणे व समाजात धर्म प्रसार व धर्म प्रचाराबाबत तर्कसंगत व युक्तिसंगत अशी उपयुक्त माहिती देणे हे ह्या स्पर्धेचे मंगल उद्देश्य आहे। त्यामुळे सर्वांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी यथायोग्य सहकार्य करावे, विचार मांडावेत व ईतरांनाही प्रोत्साहित करावे ही नम्र विनंती।

- संबोधन धम्मपथी

No comments:

Post a Comment