सच्चकाची पुण्य वितरणाची कथा
ही कथा बुद्ध व सच्चकाची असून तिची सुरुवात ही सच्चकाने बुद्धाला वादविवादात पराभूत व अपमानित करण्याची दवंडी पिटत केली होती. त्या वेळी बुद्धाने मनाच्या कर्माचे महत्व, शारीरिक कर्माच्या महत्वापेक्षा जास्त आहे हे स्वानुभवाने समजावून सांगत सच्चकला अनित्यबोध व कर्मसिद्धांत समजावून सांगितला . सच्चकाने संपूर्ण घामाघूम होत त्याचा पराभव स्वीकार केला, तसेच बुद्धाच्या अगणित गुणांचा हि जयघोष केला. हि कथा जयमंगल अट्ठगाथेत आली आहे.
ह्या कथेच्या शेवटी, सच्चक परिव्राजक (संन्याशी ) याने आदरासहित बुद्ध-प्रमुख संघाला दुसऱ्या दिवशी भोजनदानाला बोलावले. संन्याशी असल्यामुळे त्याची एवढी तयारी व सामग्रीही नव्हती. तरीही श्रद्धेने त्यांना बोलावले पण नंतर, ५०० लिच्छवींना (त्यावेळेचे तिथले स्थानिक नागरिक) विनंती केली कि, उद्या बुद्ध-प्रमुख संघाला भोजनदान आहे त्यामुळे तुम्ही योग्य ते समजून -उमजून कार्य करावे!! त्या लिच्छवीं नी योग्य दान केले. भोजनानंतर सच्चकाने बुद्धांना विनंती केली कि भोजनदानाचे पुण्य दायकांना ( लिच्छवींना ) मिळावे. त्यावर भगवान म्हणाले कि, "निर्वाणप्राप्त (म्हणजे वीतरा
हि कथा पूर्णपणे इथे हिंदीत दिलेली आहे: https://suttacentral.net/
प्रश्न : सच्चकाने बुद्धांकडे दायकांसाठी पुण्यवितरणाची विनं ती केल्यावर भगवंतांनी पुण्याचे विभाजन दोन प्रकारे का केले ?
संबोधन धम्मपथींचे उत्तर:
असे नक्की भगवंतांनी का केले असे सांगणे कठीण आहे कारण असे पुण्याचे विभाजनाची कथा वाचनात आलेली नाही. तसेच असे पुण्य विभाजनाचे स्पष्टीकरण हि वाचनात किंवा ह्या कथेत आलेले नाही. पण बुद्धाच्या तत्वज्ञानातून व कर्मसिद्धांताच्या आधारे उत्तर देत आहे. तर्काद्वारे तपासून घ्यावे.
ह्या कथेचे वैशिष्टयं म्हणजे पुण्यवितरणाचे विभाजन भगवंतांनी सांगितले आहे. सच्चकाचे भ्रम दूर झाल्यावर त्याला भगवंतांना संघासहित भोजनदान व गौरव द्यायची प्रबळ इच्छा झाली. पण स्वतः संन्याशी असल्याने मोठ्या भिक्षुसंघासाठी आवश्यक सामान नव्हते. पण तरीही मागेपुढे न पाहता त्याने भगवंतांना भिक्षु संघासहित भोजनदानासाठी येण्याची विनंती केली. भगवंतांनी मौन राहून स्वीकृती दिल्यावर, त्याने उपस्थित लिच्छवींना विनम्र आवाहन केले कि, उद्या बुद्ध-प्रमुख संघ भोजनदानासाठी येत आहे, तरी आपण सर्वांनी असे काही करावे कि ते ह्या परिस्थितीला योग्य आहे. वैशाली नगरीचे स्थानिक (लिच्छवी) तर अगोदर पासून त्रिरत्नांबद्दल श्रद्धावान होते. सच्चकाच्या आवाहन व योजने प्रमाणे त्यांची पहाटेच ५०० स्वयंपाक सहकारी व योग्य व्यवस्था केली.
भोजनानंतर सच्चकाने कृतज्ञ राहत, लिच्छवींचे उपकार समजून भगवंतांना विनंती केली भोजनदानाचे पुण्य दायकांना ( लिच्छवींना) मिळावे. त्याने स्वतः साठी काहीही मागितले नाही. तो वास्तविक समाधानी झाला होता. माझ्या मते दोन कारणांमुळे सच्चकाने स्वतःसाठी काही मागितले नसावे. पहिले कारण कि त्याला त्याच्या आयुष्यात (बुद्धांपुर्वी) शारीरिक कर्माला मानसिक कर्मां पेक्षा जास्त महत्व द्यायची शिकावण मिळाली होती. आणि त्याला वाटले कि हे भोजनदानाचे पुण्य शक्य झाले ते लिच्छवींनी केलेल्या दानामुळे, जे होते प्रामुख्याने शारीरिक (व द्वितीय मानसिक) कर्म. बुद्ध प्रमुख संघाला श्रद्धा व गौरव पूर्वक बोलावण्याची संकल्
दुसरे कारण असे, कि प्रामाणिकपणामुळे खऱ्या दायकांचे/दानकर्त्यांचे नाव तथागतांना सांगून त्यांनाच भोजनदानाचे पुण्य मिळावे एवढा मनाचा मोठेपणा त्याने अध्यात्मिक आनंद (प्रमुदित/बोध) त्याने तथागतासोबतच्या पहिल्या भेटीतच कमविला.
तथागतांना अनेक ऋद्धी अर्जित केल्या होत्या. त्यातील एक छोटीसी ऋद्धी म्हणजे परिचित्त ज्ञान; म्हणजे दुसऱ्याच्या मनाची स्थिती/विचार ओळखणे. त्यांनी सच्चकाच्यामनाची स्थिती अगोदरच ओळखली होती.
कर्मांचे वर्गीकरण :
तथागतांच्या कर्म सिद्धांतानुसार इथे भोजनदानासाठी मुख्यतः दोन कर्मे केलेली आहेत:
१. बुद्ध प्रमुख संघाला श्रद्धा व गौरव पूर्वक बोलावण्याची संकल्पना-योजना (प्रमुख मानसिक कर्म) सच्चकाने मांडली व लिच्छवींना दानासाठी विनम्र आवाहन केले.
२. लिच्छवींना विनम्र आवाहनाला प्रतिसाद देत (सच्चकाच्या आवाहनानंतर दान देण्याचा विचार करून) उचित दान केले
त्यामुळे पहिले कर्म हे आद्य कर्म असून ते प्रमुख मानसिक आहे, तसेच दुसरे कर्म हे आद्य नसून लिच्छवींद्वारे किती तत्परतेने केले गेले हे तथागतच ओळखू शकतात. पण एवढे मात्र नक्की आहे कि, जर पहिलेच कर्म नसते झाले तर दुसरे कर्म कसे झाले असते? त्यामुळे पहिले कर्म (निर्मळ मानसिक कर्म ) हे दुसऱ्या (निर्मळ मानसिक व शारीरिक) कर्माच्या तुलनेत अधिक बलवान आहे, प्रबळ आहे.
हे हि महत्वाचे कि इथे दोन्ही गटांचे (सच्चक व लिच्छवींचे) मन निर्मळ होते, जर ते निर्मळ नसते तर पुण्य त्या संवेगाने मिळाले नसते. दान/कर्म करताना मनाची निर्मळता व दान/कर्माचा परिणाम ठरवतो कि कर्म कुशल झाले कि अकुशल!!
संघातील भिक्षूंचे निर्वाणमार्गातील प्रगतीनुसार वर्गीकरण :
संघात प्रत्येक भिक्षूं ची अवस्था सारखी नसते. निर्मळतेच्या/ चित्त विशुद्धीच्या वेगवेगळ्या आठ पातळीचे भिक्षु असतात. त्या अवस्था खालील प्रमाणे आहेत . पहिली अवस्था तुलनेने कमी फलदायी तर आठवी तुलनेने सर्वात जास्त मंगलमय व जास्त फलदायी आहे:
१. स्रोतापन्न अवस्था (बुद्ध होण्यासाठीची पहिली पायरी) प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे
२. स्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेले
३. सकदागामी (बुद्ध होण्यासाठीची दुसरी पायरी) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे आणि स्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेले
४. सकदागामी (व स्रोतापन्न) अवस्था प्राप्त केलेले
५. अनागामी (बुद्ध होण्यासाठीची तिसरी/शेवटची पायरी) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे आणि सकदागामी अवस्था प्राप्त केलेले
६. अनागामी (व सकदागामी) अवस्था प्राप्त केलेले
७. अरहंत/बुद्धत्व (निर्वाणीक/अं तिम/सर्वोच्च ) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे
८. अरहंत/बुद्धत्व ( निर्वाणीक/अंतिम/सर्वोच्च) अवस्था प्राप्त केलेले
सम्यक संबुद्ध संशोधित(शोधलेली) विपश्यना साधना करीत, मनुष्य ह्या निर्मळतेच्या उच्चतम अवस्था प्राप्त करत अरहंत/बुद्ध बनतो. पुढच्या अवस्थेतील मनुष्याला दिलेल्या दानाचे पुण्य मागच्या अवस्थेतील मनुष्याला दिलेल्या दानाच्या पुण्यापेक्षा अधिक मोठे असते.
सच्चकाने सम्यक संबुद्ध प्रमुख संघाला भोजन दानासाठी बोलावून (निष्कपट व सकल ) आद्यकर्म केले व त्याद्वारे तो प्रमुख संयोजक झाला. त्यामुळे सर्वाधिक महापुण्याचा प्रमुख दावेदार झाला.
सच्चकाच्या ह्या ऐतिहासिक सत्य कथेत, संयोजनेद्वारे आद्य कर्म सच्चकाने केल्यामुळे व तथागत मानसिक कर्माला शारीरिक कर्माचे बीज मानतात त्यामुळे तथागत सच्चकाला म्हणाले कि, "निर्वाणप्राप्त (म्हणजे वीतरा
ह्या विशेष सत्यकथेत तथागतांनी सच्चकाला मानसिक कर्माचे महत्व तसेच निर्मळ मनाच्या अवस्थेतील मनुष्याला (भिक्षु/भिक्षुणी/सा
ह्या कथेनुसार हुशार मनुष्याने योग्य (निर्मळ व लोककल्याणमार्गी) मनुष्याला वेळोवेळी उचित दान करीत मंगल साधावे, ही आज बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी सदिच्छा !!
मंगल हो!
संबोधन धम्मपथी
No comments:
Post a Comment