बांधवहो जयभीम !
मी जरी बौद्ध असलो तरी दर रविवारी विहारात जाणे प्रकृती व व्यग्रतेमुळे शक्य होत नाही. त्याहूनही महत्वाचे कारण म्हणजे विहारात जाऊन नेहमीच तणाव, समस्या (खासकरून सामाजिक) व व्याकुळतेवर जे उपाय मी शोधण्याचा प्रयत्न करतो, ते मिळत नाही किंवा कुठे उपाय मिळेल याची माहितीही मिळत नाही. त्यामुळे मी विहारात नेहमी न जाता, दोन महिन्यातून एकदा जात असतो. पण इतरांना "तुम्ही विहारात जा", असा सल्ला देऊ शकत नाही, कारण तिथे जाताना पहिल्या प्रथम मला काही प्रगती दिसायला हवी ना! तरी परिस्थितीतील सुधार तपासण्यासाठी दोन महिन्यातून एकदा जाण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी बुद्ध पौर्णिमा, भीम जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन व संविधान दिनानिमित्त मी विहारात अवश्य जातो.
कारण सरळ व सोपी असते, मला विद्वानांकडून समाजाची स्थिती, प्रगतीतील अडचणी/मुद्दे व बुद्ध-भीम विचार समजावेत. पण तिथेही बऱ्याच वेळा (जवळपास ९०% वेळा ) निराशाच हाती येते. ह्या संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०१७ रोजी डोंबिवलीतील कार्यक्रमात गेलो असता असेच झाले . तिथेही दुर्दैवाने नवीन दिशा व मुद्दे हाती ना लागता तोच तोच रटाळपणा जाणवला. कुठे तरी व्यक्त होता यावे व सुधार हेतू लिहीत आहे.
डोंबिवलीतील त्या कार्यक्रमात एका निवृत्त प्राध्यापकांना बोलावण्यात आलेले होते. इथे या आयोजकांची चूक हि झाली कि वक्त्यांना एक निश्चित विषय त्यांनी दिला नव्हता व ना हि पत्रिकेत छापला होता . पण तरीही संविधान दिनानिमित्त, संविधानाच्या दृष्टिकोनातून सामाजिक व राजकीय विश्लेषण करीत सामाजिक समस्या सोडवण्याचा
प्रयत्न करणे किंवा संविधानाच्या बद्दल लोकमत पूजेची भावना न देता उपयोगाची भावना समजावणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. एका अनुभवी व निवृत्त प्राध्यापकाला याचे भान ना राहणे हे तर दुर्दैवीच म्हणावे लागेल . त्यांच्याकडून संविधानाद्वारे सामाजिक प्रगतीची व क्रान्तिमय दिशेची अपेक्षा आयोजकांनी व. श्रोत्यांनी करणे हे चुकीचे म्हणता येणार नाही.
त्या वक्त्याची मराठी भाषेवर पकड, उच्चार व आत्मविश्वास नक्कीच चांगला होता. अनुभवी व निवृत्त प्राध्यापकाला हे गुण असणे अपेक्षित हि असते . पण फक्त हे च गुण दिशा देऊ शकत नाही. एकूणच त्या दिशाहीन प्रबोधनाचे काही अकल्याणकारी व अप्रस्तुत मुद्दे खाली देत आहे . याची
वक्त्यांचा मुद्दा नं १: ..... मी त्या आईचा मुलगा आहे जिने देव पाण्यात बुडविले .... (यावर लोकांच्या टाळ्या पडल्या )
माझे विचार नं १: ठीक आहे . पण इथे अनेकांच्या पूर्वजांनी तसे केले आहे. मग आम्ही सगळे येऊन व्यासपीठावर ग्वाही द्यायची का ?आज इथे आत्मकथनाचा विषय नसून आजच्या देवभोळ्या पिढीला विज्ञानवादी कसे बनवावे हे सांगितले तर समस्या सोडवण्यास मदत झाली असती . लोक काय जुने देव फेकले कि काम झाले असे समजतात, यामुळे टाळ्या वाजवतात . पण विद्वान वक्ता मात्र त्यांना गुदगुल्या न करता समस्या व जबाबदारीचे भान देतो . समस्या सोडवण्यास मदत करतो ,कारण त्याला माहिती असते कि जुने-पुराणे किस्से गिरवून समस्या सोडवता येत नाहीत
वक्त्यांचा मुद्दा नं २:.....मी पुस्तके वाचीत नाही. कारण पुस्तकात जी माहिती असते ती जुनी असते . मी माणसांना भेटून विचार बनवतो ......
माझे विचार नं १: महाशय तुम्ही नक्की काय सुचवीत आहात हे कळत नाही . जेव्हा एखादा प्राध्यापक व प्रिंसिपल सत्कारमूर्ती बनून स्वतःची सवय सांगतो तेव्हा ती सवय चांगली आहे असे लोकांना वाटते. तसे नसते तर आयोजकांनी तुम्हाला आमच्या समोर कशाला उभे केले असते ? म्हणजे तुम्ही आम्हाला, " पुस्तके वाचू नका, कारण पुस्तकात जी माहिती असते ती जुनी असते" हे सांगता तेव्हा तुम्ही इतरांना ज्ञान घेण्यापासून परावृत्त करता असे मी मानतो . या हे फुले -शाहु -बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते , किंबहुना हे वाकय त्यांच्या विचारांच्या विरोधीच आहे.. बाबासाहेबांनी तर प्राध्यापकाची स्वतंत्र लायब्ररी असावी व अवांतर वाचन करावे असा सल्लाच दिला आहे . असे असल्याने मला तुमचा सल्ला प्रचंड अहितकारी वाटतो. ह्या एकाच मुद्द्यामुळे मी हि समीक्षा लिहीत आहे असे म्हणणें बरोबर होईल .
वक्त्यांचा मुद्दा नं ३:.....माझ्या खिशात संविधानाची प्रत आहे. ........ (यावर लोकांच्या टाळ्या पडल्या )..
माझे विचार नं ३: ठीक आहे . पण त्याने समाजाचा नक्की काय फायदा झाला हे सांगणे अधिक महत्वाचे ..संविधान नक्की काय आहे व ते कसे सर्व जाती-धर्मासाठी महत्वाचे हे श्रोत्यांना आजचे उदाहरणे देऊन ज्ञानी बनविणे महत्वाचे नाही का वाटत ? तुम्ही ते सांगितले नाही म्हणून तुम्ही ते समाजासाठी कसे वापरता हे कळतच नाही. जर हेच नाही सांगितले तर खिशातील संविधानाची गिणती मागासवर्गियांची अंधभक्ती वाढवणारी पुस्तक म्हणून होणार नाही का ?
उदाहरण देऊन सांगायचे म्हणजे एखादा डॉक्टर २४ तास एक पुस्तक सोबत ठेवतो, पण ते वापरून एखाद्याला बरे केले असे कोणालाच दिसले नाही ; मग माणसे त्या डॉक्टर ला विद्वान व कल्याणकारी बोलूच शकत नाहीत.
दुसरा डॉक्टर कोणतेही पुस्तक २४ तास जवळ न ठेवता, एखाद्याचा रोग ओळखतो , त्याचे कारण सांगतो व रोगमुक्त करतो. तसेच मी पुस्तकाचा ( जसे संविधान ) वापर करीत रोगी कसे बरे करतो हे सांगू शकतो, तो डॉक्टर नक्कीच विद्वान व कल्याणकारी आहे असे सांगता येईल . म्हणून केवळ पुस्तक / संविधान जवळ ठेवून कोणी विद्वान व हितकारी ठरत नाहीं.
त्या निवृत्त प्राध्यापकाने हे मांडलेले मुद्दे व ते कसे निरुपयोगी आहेत हे मी मांडले आहे. तसेच त्यांनी समाजसेवक दाभोळकर, कुलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल सांगुन पंतप्रधानांबद्दल विनोदही केला कि
त्यांनी सर्वाम्च्या हातात झाडू दिला. पण समस्या ह्या विनोदाने सोडविल्या जात नाहीत, नाहीतर सर्व कार्यक्रमाला विचारवंता ऐवजी राजू श्रीवास्तव दिसला असता .
हि तर झाली त्यांच्या भाषणावर समीक्षा . पण मग संविधान दीना निमित्त भाषण हे कसे असावे हे हि सांगणे महत्वाचे आहे.
भाषण करताना समोर बसलेल्या माणसांची सरासरी वय , सरासरी हुशारी व सरासरी शिक्षण पाहून मुद्दयांचे गांभीर्य व मुद्दयांची संख्या ठरविणे गरजेचे असते . संविधान दिनानिमित्त अधिकांशी लोक पन्नाशी पार केलेले होते व सरासरी शिक्षण १२ वि पर्यंतच होते. त्यामुळे खालील मुद्दे वेळेचे भान ठेवून बोलणे महत्वाचे होते.
१. संविधानातील आता पर्यंत झालेले बदल व त्यांची वर्गवारी/रुपरेषा.
२. संविधानातील बदलासाठीची आवश्यक प्रक्रिया
३. गेल्या २-३ वर्षांत तीन हितकारी व अहितकारी बदल व त्याचे परिणाम
वेळेसआयोजकां साठी सल्ला :
१. येणार वक्ता फक्त प्राध्यापक किंवा मोठ्या हुद्द्यावर आहे म्हणून त्यावर तात्काळ विश्वास ठेवू नये.
२. त्याने आता पर्यंत किती योगदान दिले त्यावरून त्याचे नियोजित विषयाचे ज्ञान ठरवू नये .
३. १-२ आठवडयांपूर्वी त्याचे भाषण लेखी स्वरूपात मागवून घ्यावे व त्या नंतर त्याची सिद्धता ठरवावी
४. एखादा वक्ता पैसेच घेत नाही म्हणून तो नक्कीच चांगली दिशा देईन, हा भ्रम आहे.
५. प्रश्नोत्तराचा वेळ व जेवणाची वेळ सांभाळावी
६. वक्त्याला विषय व त्या तुन अपेक्षित ज्ञानाची कल्पना लेखी स्वरूपात द्यावी
७. लोकां कडून प्रबोधन झाल्यावर अभिप्राय जरूर घ्यावेत व वक्त्याला कळवावेत
प्रस्नउत्तरे
उदाहरणासाठी संविधानातील बदला बद्दलचे काही मुद्दे मांडीत आहे:
१. इंटरनेट सूरक्षा कायदा : याची तरतूद करणे स्वाभाविक होते व ती टेक्नॉलॉजी बाबासाहेबांच्या काळातही नव्हती.
२. न्यायाधीशामचे निवृत्ती वयात दोन वयात दोन वर्षे वाढविणे : हा बदल का आवश्यक होता ? यात का काही सरकार व न्यायाधिषांचे काही साटंलोटं आहे ? सरकारी बॅकलॉग ना भरण्याची सरकारची धूर्त खेळी आहे ? याचा समाजाला व देशाला कसा व कुठला फायदा होईल?
३. एससी/एसटी जातीच्या यादीतुन काही जातिंना वगळले व काही नवीन जातींना टाकले : कुठल्या आधारावर जुन्या जातींना काढले व कुठल्या आधारावर नवीन जातींना काढले. का हि प्रक्रिया न्यायी व सत्याच्या आधारावर होती कि द्वेष/खोटेपणावर ? का ह्या प्रक्रियेत बाबासाहेबांच्या विचारांना धुडकावण्यात आले का?
संविधानातील बदला बद्दलची प्रक्रिया :
माझ्या मर्यादित माहिती नुसार संविधानात बदल करण्यासाठी विधेयक लोकांची मत /सल्ला मागण्यासाठी वर्तमानपत्रात एक महिन्यापूर्वी टाकण्यात येतो . व पत्र किंवा इ-मेल द्वारे मत /सल्ला मागवण्यात येतो.
तुम्ही अशा वेळेस अनुचित किंवा हितकारी विधेयक समोर येण्यापूर्वीयावर (किंवा आल्यावर) काय करावे:
१. अशा वेळेस तुमच्या कडे ह्या विषया साठी विद्वानांची यादी असायला हवी.
२. त्या यादीतून लोकांची निवड करून त्यांच्याकडून सर्व बाबिंचा विचार करीत बरे - वाईट मुददयांचा अहवाल लिहावा
३. तो अहवाल वर्तमान पेपर , मासिकात पैसे देऊन छापावा
४. इतर बुद्ध विहारांत तो वाटावा व विचार विमर्श करून समाजास सचेत ठेवावे
५. मग अंतिम मुदतीच्या आत सरकारला योग्य स्थळी पाठवावा
असे कुठलेच मुद्दे त्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात न दिसल्याने पूर्ण निराशा पदरी पडली. असे इतर ठिकाणी होऊ नये व त्या वक्त्याने (व आयोजकांनी ) योग्य दखल घ्यावी म्हणून हा स्वानुभव लिहीत आहे.
आपला ऋणी ,
सम्बोधन धम्मपथी (९७७३१००८८६)
कॉम्पुटर इंजीनियर, आयटी क्षेत्र में २२ साल का अनुभव,
सर्टिफाइड आयएसटीक्युबी मैनेजर, Certified SCRUM Master,
त्रिपिटक वाचक, धम्मसेवक,
मुंबई, महाराष्ट्र
No comments:
Post a Comment