Saturday, 13 June 2015


जब तक अंतर जगत में, जगत रहे विकार।
भव रोगी व्याकुल रहे, लिये दु:खों का भार।।
- आचार्य सत्य नारायण गोयन्का
💐।। धर्म के दोहे।।💐

स्पष्टीकरण:
साधारण मनुष्य हे समजतो कि जोपर्यंत मी (शरीराने ) कोणाला छळत नाही, जीव हत्या करीत नाही, लबाडी- चोरी व्यभिचार करीत नाही तर मी एक गुणी न संयमी व्यक्ती झालो आहे। आणि त्यातही जेव्हा मी चुगली, खोटेपणा, वाढवुन सांगणे, सत्य अर्धवट किंवा फिरवुन सांगणे हे ही करीत नाही तेव्हा तर मी अधिकच गुणी व संयमी झालो आहे असा भ्रम तयार करतो। तसेच अशा भ्रमात स्वताला ईतरांपेक्षा मोठा समजु लागतो। आणि नकळत सज्जन बनण्याच्या प्रयत्नात अहंकारी बनतो व असे समजतो कि आता अध्यात्मात / धर्मात  शिकण्यासाठी काही शिल्लक नाही। पण हा दिखावा किंवा भ्रम अंर्तमनातील व्याकुळता व बैचेनी वाढवत असतो। जसे डोक्यावर कर्जाचे बोजे वाढते, तसे बैचेनीचे व्याज तर दर अकुशल विचारासोबत वाढत जाते। आणि विचार हे काही ठरवुन किंवा नियमाप्रमाणे येत नाही। विचार तर मनातच येतात आणि स्वता मनाचीच शांती बिघडवतात। मनुष्याने जरी शारीरिक व वाचिक कर्मांवर नियंत्रण मिळवले कि लोक एखाद वेळेस चांगले म्हणतील ही, पण अर्तंमनातील ज्वालामुखीचे व्याज/कर्ज तर वाढतच असते। त्यामळे शांती ही कोसो दुर असते।
असे का होते? जाणुन घ्या असे का होते। आपल्या मनात खोलवर कुठेतरी, आपण पाहिलेली प्रत्येक घटना,कल्पना, रंग, माणुस/स्त्री, देव याबद्दल काही प्रिय-अप्रिय भाव ह चांगल्या-वाईट आठवणींच्या  स्वरुपात घट्ट बसुन असतात। अशी मनातली प्रिय स्त्री/पुरुष समोर आला कि आवडती गोष्ट आल्याप्रमाणे मनाला गुदगुल्या (सुखद संवेदना) होउ लागतात व मनात कामवासनांच्या (मला अमुक पाहिजे किंवा मला मिळाल्यावर अमुक सुख मिळेल अशी आसक्ती) विचारांचे वादळ सुरु होते।जसे 'तो/ती म्हणजे माझे पहिले प्रेम आहे' किंवा 'त्याच्या शिवाय जगणे अशक्य' हे ही एक प्रकारचे वादळच आहे।  तसेच नावडती स्त्री/पुरुष/घटना समोर आल्यावर तीव्र स्वरुपात बैचेनी/क्रोध उफाळुन येतो। हा मनातील आठवणींचा/विचारांचा भार व्यक्ती शरीर व वाणीने जरी संयमी राहिला तरी मनाच्या जगात भोगत राहतो। आपल्या मनाचे नहमीचेे/सततचे विचार ह्या आपल्या सवयी बनतात, मनातील सवयी कालांतराने शरीर व वाचेद्वारे बाह्यजगात प्रकटतात।  आणि हा आपला स्वभाव बनतो। हया बनण्याच्या क्रियेला भव (भवतु सब्ब मंगल मधला 'भव') म्हणतात। आणि ह्या भवातुनच 'मी', 'माझा  स्वभाव', 'माझी जात', 'माझा मुलगा', 'माझा देव' असा 'मी' चा संसार बनतो।
मग आणखीन मोठा भ्रम कि आता काहीमाझा स्वभाव बदलणार नाही। कारण जीत्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हा मोठा गैरसमज आपणच बनविला। जोपर्यंत विपश्यने द्वारे मनातील अकुशल विचारांची जागा स्थायी कुशल विचार घेत नाहीत तोपर्यंत मनुष्य जीवन अनेको गैरसमज, भ्रम व अनियंत्रित अकुशल/अशुद्ध विचारांच्या वादळात वाया जाते। अनेक जन्माप्रमाणे हा जन्म ही वाया जावु नये याची शहाण्या माणसाने खबरदारी घ्यावी।

स्पष्टीकरण: संबोधन धम्मपथी

No comments:

Post a Comment