माझ्या एका सजग मित्र सदाभाऊंनी मला युट्युबवरील एका भन्तेजींचा व्हिडीओ पाठवुन अनेकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी मत प्रकट करण्यास सांगितले. तो दुर्दैवी व्हिडीओ पाहून तात्काळ हा लेख लिहायला घेतला आहे !
भन्तेजींनी काय सांगितले : ह्या व्हिडियों कथित महास्थवीर विविधआत्महत्येद्वरे मनुष्याला प्रेतयोनी मिळते. मृत्यूपश्चात तो व्यक्ती तिथे बैचेन होतो, आणि मग त्याच्या जिवंत नातेवाईकांना वेगवेगळ्या प्रकारे छळतो. त्यातुन बाहेर पडण्यासाठी बुद्धांनी उपासक उपसिकांना भिक्षु ला ७ बाय १२ चे निवास स्थान व विविध मागण्या पुरविल्या तर अशा प्रेतांपासुन सुटका होते. त्यामुळे भिक्षुना दान नियमित करीत जावे. तसेच हीच अधिकृत बुध्दवाणी आहे हे समजावण्यासाठी विविध शब्दप्रयोग (भव-अस्रव/सत्यक्रिया) केला आहे व शेवटी गोएन्काजींची मंगल मैत्री ही दिली आहे.
माझे विचार खालीलप्रमाणे :
सर्वात अगोदर बुद्धप्रणित सेवाभावी, ध्यानरत, आचारणशील व विद्वान भिक्षु संघाला (भिक्षु , भिक्षुणी, उपासक, उपासिका) मी त्रिवार नमन करतो! त्यांच्याबद्दल आदर व कृतज्ञता ठेवुन हा लेख लिहीत आहे.
पहिला मुद्दा : बाबासाहेबांचे विचार
पुज्य बाबासाहेब आंबेडकरांनी 'बुद्ध व त्यांचा धम्म" ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्रिपिटकातील बुद्ध वाणी ओळखण्यासाठी दोन कसोट्या सांगितल्या आहेत. पहिली कसोटी : बुद्धाने अशी कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही ज्याने मानवाचे कल्याण होत नाही. दुसरी कसोटी: जी गोष्ट बुद्धी संगत किंवा तर्क संगत नाही, ज्याने कार्यकारण भाव दिसत नाही तो गोष्ठ बुद्धाने सांगितलेली नाही !!
भंतेंजींच्या मुद्द्यांत ह्या दोन पैकी एकही कसोटी त पास होत नाही. याचे स्पष्टीकरण पुढे देत आहे.
दुसरा मुद्दा : बुद्धांनी सांगितलेले पुनर्जन्माचे विज्ञान
ह्या दुर्दैवी व्हिडीओतील भंतेंजींनी सांगितल्याप्रमाणे जर खरंच भुतं असती आणि भुतांना जर इतरांना खरंच त्रास द्यायची शक्ती असती, तर त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या भुतांनी इतर अन्यायी लोकांना दिवस रात्र सतावले असते !! त्यामुळे पापी व अबोध राजकारणी, प्रशासन अधिकारी, भ्रष्ट वकील/पोलीस, किंवा विरोधी पक्ष हे सुधरले नसते का? बरे सतावायचेच झालेच तर आपल्याच नातेवाईकांना का सतावतील ? जर त्यांची बौद्ध भिक्षुंवर विश्वासच नसेल तर, हे भतेंजी बोलतात त्याप्रमाणे भिक्षूंना अन्न -वस्त्र व निवारा दिल्यावर त्यांना समाधान व मुक्ती कशी मिळेल ?
हा सगळं अवैज्ञानिक व अतार्किक धम्माचा अपप्रचार फक्त आणि फक्त भिक्षूंना दान मिळण्यासाठी आहे , हे सुस्पष्ट आहे. ८४,००० बुद्धाची उपदेश वाचुन विपश्यना लोकांना समजावण्याचे काम काही भिक्षु करू लागले आहेत. ते अशा प्रकारचा धम्माचा अपप्रचार करीत नाहीत, कारण मेहनती व ज्ञानी भिक्षूंची काळजी उपासक आपोआप घेताना दिसतात.
एखाद्याला दानाचे महत्व सांगण्यासाठी त्रिरत्नचा गैरवापर झालेला दिसतो.
त्रिपिटकातील जेवढे ग्रंथ मी वाचलेलं आहेत, त्यानुसार आत्महत्येने मनुष्य प्रेतयोनीत जातो हे बुद्धांनी शिकवलेले नाही, ना हे त्रिपिटकात आहे, ना हे विपश्यना आचार्य गोयंकाजींनी सांगितलेले आहे.
मृत्यू नंतरची गती समजण्यासाठी मनुष्याला प्रतिसंधी विज्ञानाची माहिती असावी लागते. प्रतीत्यसमुत्पाद (तृष्णा आधारित जन्ममृत्यूचा कार्यकारण भाव) समजावताना तिथे विज्ञान हा शब्द आला आहे ते विज्ञान हे प्रतिसंधी विज्ञान आहे. हे प्रतिसंधी विज्ञान पाच स्कंधातील विज्ञानापेक्षा वेगळे आहे.
प्रतिसंधी विज्ञानामुळेच प्रत्येकाला जीवनाच्या अंतिम क्षणी, त्याच्याच जीवनातील एक सर्वात गंभीर संस्कार उफाळुन वर येतो. संस्कार म्हणजे पाली भाषेतील संखार! ह्या मनुष्य जन्मातील एक विशेष गंभीर संस्कार (सर्वोच्च कुशल किंवा अंकुशल कर्माचा अनुभव/प्रभाव) त्या मृत मनुष्याचा नवीन जन्म (३१ लोकातील जन्म, ज्यातील प्रेत लोक एक आहे.) निश्चित करतो.
फक्त आत्महत्येनेच नाही तर, मृत्यू च्या शेवटच्या क्षणी वेळी त्याची मानसिक बेचैनी किंवा मानसिक शांती त्यांची दुर्गती व सद्गती ठरवते.
खालील उदाहरणांनी हा पूर्ण आत्महत्या व प्रेतयोनीतील जन्मासंबंधातील संबंध हा अकल्याणकारी भाकडकथा आहे हे स्पष्ट होते:
उदाहरण १: एखाद्याने आत्महत्या केली पण, त्यापूर्वी त्याने खुप मंगल कर्म केली असतील तर त्या कर्माच्याच आधारे त्याला मनुष्य, देवलोकात किंवा ब्रह्मालोकात जन्म मिळतो. जसे कि एखाद्याने गोड व शुद्ध पाण्याने भरलेल्या ट्रक मध्ये एक चिमुटभर मीठ टाकले असता, त्या ट्रकातील पाणी खारे होत नाही.
उदाहरण २: एखाद्याने आत्महत्या केली पण ती इतरांच्या कल्याणाकरिता किंवा इतरांचा जीव वाचविण्याकरिता तर, अशावेळेस त्या मनुष्याचे मन
क्षांती पारमितेने भरलेले असते. त्या व्यक्तीचा अंतिम क्षण परम शांतीने व त्यागभावनेने ओतप्रोत असतो . जसे खाली दाखविलेल्या चित्रात व्हिएतनाम मधील भिक्षु क्वांग डुक यांनी ११ जुन १९६३ आत्मदहन केले , तिथल्या राजकीय अमानुषतेने दररोज जीवघेणा त्रास सहन करणाऱ्या बौद्ध भिक्षु व उपासकांचा जीव वाचण्यासाठी! दररोज निदर्शने करुनही अन्याय कमी ना झाल्याने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मिळावी म्हणुन सर्वात शेवटचा उपाय हाच होता!!
तिसरा मुद्दा : आत्महत्या करणाऱ्याची भिक्षुंवर श्रद्धा नसल्यास काय होईल
हे भंतेजी म्हणतात कि अशा भुतांना प्रसन्न करण्यासाठी आम्हा भिक्षूंना विविध दान नियमित करावे. त्याने पुणण्याने हि असंतोषी भुते खुश होतील. पण मग अशा भुतांची भन्तेजींवर श्रद्धा नसल्यास, भंतेजीना दान दिल्यावर ते कसे खुश होतील ? ते नाराजच होतील ना? बरे अशी भुते भन्तेजींनाच दिसतात आणि ती भुते खुश झाल्यावर भन्तेजींनाच कळते, म्हणजे छापा पण माझाच आणि काटा पण माझाच !
चौथा मुद्दा : सत्यक्रियेचा अर्थ
भगवंतांनी महामंगल सुत्तात ३८ मंगल कर्मे सांगितली आहेत. त्यातील दहाव्या अंतऱ्यात ओळीत खालीलप्रमाणे आहे :
तपोच ब्रह्मचरीयंचं, अरीय सच्चानं दस्सनं ।
निब्बानं सच्च किरियाचं, येतं मंगल मुत्तम ।।
इथे भगवंतांनी सत्यक्रिया करणे हे एक मंगल सांगितले आहे !!
भन्तेजींनी काय सांगितले : दुर्दैवाने ह्या व्हिडियों कथित महास्थवीर विविधआत्महत्येद्वरे मनुष्याला प्रेतयोनी मिळाल्यावर, भिक्षुंना नियमित दान दिल्यावर त्या भटकणाऱ्या भुतांना पुन्हा मनुष्य जीवन मिळते आणि भगवंताचं धम्म हि मिळतो. ह्या स्वार्थाच्या हेतुने केलेल्या दानालाच कथित महास्थवीर 'सत्यक्रिया' म्हणतात.
सत्यक्रियेचा खरा अर्थ असा कि मी भिक्षुं / ज्येष्ठ धम्म बंधु कडून पंचशीलाची दीक्षा घेतल्यावर शील-सदाचाराचे , समाधीचे किंवा प्रज्ञेचे पूर्ण पालन केले आहे. ह्या कल्याणकारी सत्याने माझे किंवा इतरांचे अमुक एखादे अडलेले मंगल काम पुर्ण होवो! अशा प्रकारे स्वतःच्या धम्माचा स्वतःच्या किंवा इतरांच्या मंगलकामासाठी खर्च/वापर करणे!!!
सत्यक्रियेचे पहिले उदाहरण : जेव्हा खुनी डाकु अंगुलीमाल भिक्षु बनला आणि सध्दर्मात प्रगत झाला त्यावेळेस त्याचे मन नेहमी करुणा व सेवाभावाने पुर्ण भरुन असायचे । एकदा त्याला रस्त्यात एक गर्भिणी अवस्थेत वाईट व दुर्दैवी अवस्थेत दिसली. त्याला काय करावे ते ना कळल्याने त्याने बुद्धाकडे जाऊन मदत मागितली. बुद्ध म्हणाले, "तिच्या समोर जाऊन असे बोल, 'मी जन्मल्यापासुन एकाही प्राण्याची हत्या केलेली नाही!! ह्या सत्याने तुझे कल्याण होवो!" बिचारा भिक्षु अंगुलीमाल घाबरला कारण त्याने ९९९ लोकांची स्वतःनेच हत्या केली होती. मग तथागताने सांगितले कि, 'सध्दर्मात आल्यापासुन तुझा नवीन जन्म झाला आहे. त्यात तू कोणाचीही हत्या केलेली नाही. म्हणुन जा व मी सांगितले आहे तसे त्या गर्भिणीला सांग!!' भिक्षु अंगुलीमाल गेला व त्याने तसे केले ! तो त्या अनोळखी गर्भिणीसमोर सत्य बोलला, तिच्या वेदना जादू केल्याप्रमाणे तात्काळ थांबल्या!! तिची प्रसुती सुखरूप झाली!! ती व तिचे बाळ निरोगी होते! इतरांच्या कल्याणासाठी सत्य सांगून मंगल क्रिया केली! याला म्हणतात "सत्यक्रिया"!! अंगुलीमाल सुत्ताला गर्भरक्षण सुत्त सुद्धा म्हणतात. (संदर्भ : अंगुलीमाल सुत्त, मज्झिम निकाय ८६ )
सत्यक्रियेचे दुसरे उदाहरण : जेव्हा विपश्यना आचार्य सत्यनारायण गोएन्काजींनी भारत सरकार कडे परदेशात विपश्यना शिकविण्यासाठी पारपत्र (पासपोर्ट ) साठी अर्ज केला तेव्हा ते मुळचे ब्रह्मदेशाचे असल्याने त्यांना खुप अडचणी येत होत्या. शिबीराची वेळ जवळ येत होती आणि परदेशात सर्व तयारीही झाली होती. तरीही काही केल्या काही गंभीर नियमांमुळे आणि त्यांचा भाऊ आनंदमार्ग ची साधना शिकवीत असल्याने पारपत्र मिळत नव्हते. तेव्हा गोएन्काजींनी धम्माला आवाहन केले कि, "नवीन जन्मात (विपश्यना शिकल्यापासून) मी शुद्ध धर्माचा (शील, समाधी, प्रज्ञा) चा नियमाची अभ्यास व बुद्ध वाणीचे पालन करीत जीवन जगलो आहे. आणि परदेशी धर्मसेवा-लोकसेवेचे वृत्तीतुनच बुध्दवाणी द्यायला जात आहे. ह्या सत्यवचनाने, परदेशी विपश्यना साधकांचे व अनेकांचे कल्याण होवो! आमच्या प्रयत्नांनी त्यांना विपश्यना साधनेचा लाभ मिळो !" इतरांच्या कल्याणासाठीच, त्यांना बुध्दवाणी मिळण्यासाठीच गोएन्काजींनी सत्य सांगून मंगल क्रिया केली! याला म्हणतात "सत्यक्रिया"!! (संदर्भ : विपश्यना पत्रिका, विपश्यना विशोधन विन्यास )
जो हितकारी सत्य सांगत नाही बोलत नाही, तो सत्यक्रिया करूच शकत नाही!
मी भिक्षुं संघाचे, बाबासाहेबांचे आणि गोएन्काजींचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला तथागतांचा मंगल धम्म दिला!! तसेच प्रिय धम्ममित्र सदाभाऊ जाधवांचे आभार मानतो ज्यांनी प्रश्न विचारुन धर्म सेवेची चांगली संधी दिली!
खूप खूप धन्यवाद !
आशा आहे कि ह्या लेखाने खूप सारे अकुशल विचार किंवा धारणा दूर होतील!
सर्वांचे मंगल होवो!
संबोधन धम्मपथी
मोबाइल : ९७७३१००८८६ (व्हाटसप )
No comments:
Post a Comment