पती-पत्नीतील नात्यातील घटस्फोट एक महत्वाची पण अंतिम पायरी म्हणून पहिली जाते. तशी ती आहे सुद्धा. एकमेकांची जबाबदारी घेतलेली जोडपी एकमेकांपासून कायम स्वरूपी विभक्त होतात. विभक्त होताना बहुतेक वेळा नात्यातील अपयशाला, समाजातील अपमानाला व मुलांच्या अंधारमय भविष्याला एकमेकांनाच जबाबदार ठरवतात. सर्व चूक तिची/त्याचीच आहे, मी मात्र चुकलो/चुकले नाही अशीच घोषणा दोन्ही पक्ष आत्मविश्वासाने किंवा अतिआत्मविश्वासाने करीत असतात.आणि त्याच्या/तिच्या पासून झालेली मुले हि मला नकोत अशीही अपप्रवृत्ती जोर धरते.
आपल्या प्रिय मुलगा/मुलगी/ भाऊ/बहिणीच्या कुटुंबाची वाताहत होताना नातेवाईकांना हि बघवत नाही. लहान मुलांची काळजी वाटते. पण दोंघांमधील कुणाचे किती चुकले ? व कोणी कशी माघार घावी ? कोणाला काय समज द्यावी याची थोडीसेही यश तिच्या/त्याच्या सासरच्या किंवा माहेरच्या लोकांना मिळत नाही. बऱ्याच वेळा तो आणि त्याच्या घराचे तिच्या घरच्यांचा तसेच ती व तिच्या घराचे त्याच्या घरच्यांचा अपमानही करतात. कारण कळत-नकळत त्याच्या घरच्यांनी तिला (पुरुष प्रधानसंस्कृती चे समर्थक) किंवा तिच्या घरच्यांनी त्याला (आमची मुलगी काही कमी नाही असे मिरवणारे समर्थक) छळलेले असते. त्यात माझ्या जोडीदाराने मला साथ दिली नाही असा समज होतो. मूळ मुद्दा हा कि हा समज किती टक्के खरा व किती टक्के खोटा हे मोजायला अकाऊंटंट किंवा सी.ए. बाजारात मिळत नाही . तो हिशोब आपल्यालाच करावा लागतो. वास्तविक हा अनेक वर्षांचा हिशोब सरळ-सोपा नसून तो करताना प्रामाणिक व गंभीर आत्मपरीक्षण गरजेचे असते.
खालील प्रश्नावली हि घटस्फोट इच्छुक व्यक्तींसाठी मी बनवलेली आहे. सरळ-सोपी वाटावी म्हणून पुरुष उमेदवारासाठी देत आहे. वास्तविक ती नवरा-बायको दोघांनीही वाचून निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.
१. का मी एक पती म्हणून सुरुवाती पासून जोडीदाराच्या इच्छा-आकांक्षांना नेहमी जास्तीतजास्त सन्मानाने पहिले व जास्तीतजास्त पूर्ण केले ?
२. जेवढा सन्मान, स्नेह व काळजी तिने माझा व माझ्या घरच्यांचा केला, का मीही तेवढाच तिचा व तिच्या घरच्यांचा केला ?
३. मी तिला एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून वैयक्तिक विकास करण्याची संधी दिली ?
४. का माझ्या घरच्यांनी तिचे व माझे प्रेमाचे नाते दृढ व्हावे यासाठी प्रयत्न केले?
५. का मी पैशाबाबत /व्यवहारात पारदर्शकतेने तिच्याशि बोलायचो व तिला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचो ?
६. का मी तिला माझ्याशी दर दिवसात बोलायला पुरेसा वेळ दिला?
७. जेव्हा मी ती माझ्याशी काही संवाद साधायची तेव्हा मी तिचे व्यवस्थित ऐकून तिच्या समस्या समाधानपूर्वक व वेळेच्या आत सोडवायचो?
८. का मी तिच्याकडे मला मुल म्हणून मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे, असा हट्ट केला ?
९. का मी नैतिक
दृष्ट्या
पूर्ण सज्जन होतो?
१०. का मी तिला ह्या ना त्या कारणाने घराबाहेर नेहमीच्या जबाबदाऱ्या (दर महिन्यातून एकदातरी ) टाळून बाहेर फिरायला न्यायचो?
११. का मी ती गर्भवती असताना तिची पुरेशी काळजी घेतली ?
१२. का मी मुलांची देखभाल व्यवस्थित केली ?
१३. जेवढा वेळ, विश्वास व स्नेह मी इतर नात्याला दिला, तेवढा मी तिला दिला का ?
१४. का आजारपणात मी तिची शारीरिक व मानसिक काळजी घेतली?
१५. का तिची दागिन्यांची किंवा बाहेर फिरायची हौस मी समाधानकारक पूर्ण केली ?
१६. तिच्याशी वाद झाल्यावर जेव्हा मला उमगले कि चूक माझीच होती , का मी तिची प्रामाणिकपणे क्षमा मागितली ?
१७. तिच्याशी वाद झाल्यावर जेव्हा तिला तिची चूक उमगली व तिने माफी मागितल्यावर का मी तिला न्यायानुसार माफ केले?
१८. का ती एक बायको म्हणून सरासरी बायकांपेक्षा जास्त प्रामाणिक,
जास्त समजुतदार ,
जास्त सुशिक्षित ,
जास्त त्यागी ,
जास्त प्रेमळ,
जास्त कर्तबगार ,
जास्त आत्मविश्वासू, स्वयंभू
व
जास्त स्नेहपूर्ण होती ?
१९. तिच्याशी वाद झाल्यावर का मी तिच्याशी लैंगिक व शारीरिक त्रास दिला ?
२०. का मी तिला मारहाण केली?
२१. मारहाण केल्यावर का तिने माझी तक्रार पोलिसांकडे ना करता मला २-३ वेळा तरी माफ केले ?
२२. का तिच्याविरुद्ध मी कधी खोटे किंवा बेछूट आरोप केले?
२३. का आम्हा दोघांतील भांडणे सोडवायला आलेल्यांना मी, नेहमी सन्मान दिला व माझ्यातील गुणदोष तपासले?
२४. जर तिचे चुकले असल्यास मी इतरांना तिच्याशी बोलून मार्ग काढण्यासाठी उपाय केले ?
२५. आमच्या दोघांच्या भांडणात मी नेहमी माझ्या मुलांच्या भवितव्याची जास्त पर्वा केली ?
२६. का मी माझ्या स्वभावात नेहेमी सुधारणा व्हावी असा माझा व्यक्तिमत्व विकास कला ?
२७ . वेगळे झाल्यावरही मी स्वतः किंवा इतरांकडून तिची माहिती मिळावीत तिची सुरक्षितता व तब्येतीची विचारपूस केली ?
२८ . मी शीघ्रकोपी नसल्याने माझे नातेवाईक माझे गुणदोष माझ्याशी मोकळेपणाने बोलतात ?
२९ . मी सर्व बाजूने पती म्हणून योग्य आहे व होतो , अशी खात्री माझ्या नातेवाईकांनी मला अनेकवेळा दिली आहे ?
३० . आम्ही दोघे मॅरेज कौन्सेलर कडे जावे व पुन्हा एकत्र यावी, का असा मी अनेकवेळा प्रयत्न केला?
३१ . का मी माझ्या मुलांची जबाबदारी कधी झटकली नाही व त्यांना जरी वेगळे असलो तरीही स्नेह व प्रेम दिले ?
३२ . का माझ्या कुटुंबापुढे माझा मानापमान मी नेहमी बाजूला ठेवला ?
३३ . का तिच्या घराच्या-ऑफिसच्या नात्यांचा मी नेहमी सन्मानच केला ?
३४ . का तिच्यावर मी जेवढे आरोप केले त्यांना आधार व पुरावे होते व ते सर्व मान्य झाले?
३५ . का मी तिच्यावर केलेल्या आरोपांवर, तिची बाजू सर्वां समोर मांडण्यास मी तिला पुरेसा वेळ व संधी दिली ?
३६ . का मी तिच्यावर केलेले आरोप व पुरावे तिच्या-माझ्या सर्व नातेवाईकांनी कबुल /सर्वमान्य केले ?
असेच सर्व प्रश्न स्त्रीनेही स्वतःला विचारावे व तिच्या कुटुंबानेही. ह्याच प्रश्नांची तुमच्याबद्दल उत्तरे तुमच्या जवळच्या नातेवाईकांनीही समाधानकारक दिली तर तुम्ही व्यवस्थित वागलात, नाहीतर तुम्ही दोषारोपातून मुक्त नाही.
व जेव्हा सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील तेव्हा समजावे कि मी माझ्या पतीची /पत्नीची जबाबदारीची परिपूर्ण रित्या पार पडली.
अन्यथा कर्म नियमात नुसार ह्याच जन्मात व पुढील जन्मात अपुरे किंवा असमाधानकारक कौटुंबिक सुख मिळेल. विभक्त झाल्यावर किंवा घटस्फोट घेतल्यावर मनात कुठल्याही प्रकारचे किल्मिष, पश्चाताप किंवा खेद राहणार नाही ?
नाहीतर एखाद्याने असा निर्णय का घ्यावा ज्यासाठी मी स्वतः व माझे नातेवाईक हि मलाच आयुष्यभर दोष किंवा निंदानालस्ती करीत राहतील?
विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी म्हणतात ;
१) परोपकारही पुण्य है, पर पीडन ही पाप ।
पुण्य करें तो सुख जगे , पाप करे भवताप ।।
२) जीतनं बुरा ना कर साके , दुष्मन-बैरी कोय|
अधिक बुरा निज मन करे, जब मन मैला होय ।।
३) जितना भला ना कर सके , माँ-बाप सब कोय ।
अधिक भला निज मन करे, जब ये उजला होय ।।
हे ३६ प्रश्न दोघातील ३६ चा आकडा दुर करण्यास मदत करोत!!
सर्वांचे खूप मंगल हो, खूप कल्याण होवो.
संबोधन धम्मपथी
९७७३१००८८६
No comments:
Post a Comment