प्रश्न: ब्रम्हलोकातून म्हणजे कोठुन?


उत्तर:चांगला प्रश्न आहे .
असो, महाकारुणिक तथागतांनी सर्वोच्च ज्ञान प्राप्त करून, शरीर-मनाच्या व बाह्य जगातील जवळपास सर्व मानवकल्याणाच्या गोष्टी शोधून काढल्या. त्यांनी सृष्टीतील पाच नियमता हि शोधून काढल्या. त्या खालील प्रमाणे :
१: ऋतु नियामता: हे सांगते कि, कसे सगळे ऋतू विशेष काळानंतरच व ठराविक महिन्यांचेच असतात. त्याचे विशेष परिणाम परिसरावर व प्राण्यावर होतात. अशा प्रश्नांची ऊत्तरे कर्म नियमात स्पष्ट होतात.
२. धम्म नियामता:
हे सांगते कि, कसे विशेष व्यक्तीचा स्वभाव व त्यातील बदल, पुर्नजन्माचे नियम , निसर्गाचे ईतर नियम, शील-समाधि-प्रज्ञेचे नियम, निर्वाणाचे प्रक्रिया व टप्पे , चांगुलपणाचे फायदे व परिणाम, मनुष्य/राजा/संन्यासी/भिक्षु/पती-पत्नी/माता-पिता यांची यांची कर्तव्ये, धम्म नियामतेत स्पष्ट होते.
३. कर्म नियामता:
हे सांगते कि, किती प्रकारचे कर्म असतात, त्यांचे परिणाम कसे व केव्हा येतात, मन-वाचा-शरीराद्वारे कसे कर्म बनते, व मागच्या अनेक जन्माचे कर्म ह्या जन्मात कसे परिणाम देते, साधारण बुद्धिमत्तेच्या पालकांकडे अत्यंत बुद्धिमान मुलं कशी जन्माला येतात, अकाली मृत्यु /शारीरिक-मानसिक अपंगता/गरिबी/ संपन्नता-विपन्नता/ पूर्ण-अपूर्ण नाती / आसपासचे वातावरण अशा प्रश्नांची ऊत्तरे कर्म नियामतेत स्पष्ट होतात.
४. चित्त नियामता: चित्त-मन कसे काम करते, त्याचे किती विभाग आहेत, अंतर्मन व मन यातील संबंध व देवाणघेवाण, मनाचे विविध वेळेला विविध पण तात्पुरते स्वभाव कसे बनतात, मन किती प्रकारचे असते, येणाऱ्या घटनांचे पूर्वसंकेत, दुसऱ्याच्या मनातील पूर्ण बोध सिद्धी, दुरबोधी(भविष्यबोधी), मागील जन्माचे ज्ञान, सध्या इतर ठिकाणी काय चालू आहे याचे ज्ञान याचे स्पष्टीकरण होते.
५. बीज नियामता: कसे विशेष काळातच झाड/माणूस/प्राण्याला विशेष प्रकारे फळ/फुल येते, विशेष वेळेतच कसे पिकते, जसे पेरतो तसेच कसे येते? कसे त्या
एकच आंब्याच्या किती विशेष बियाणे कसे सगळी तीच विशेष लक्षणे घेऊन येते? कशी विविध फुल/फळ झाडे आसपासच्या माती,सूर्य, पर्यावरण,बीज, पाणी, ऊर्जा व कीटकांमुळे परिणाम भोगून जन्माला येतात
असे बीज नियमात स्पष्ट होते.
वरील सांगितल्याप्रमाणे, कर्म व चित्त नियामते नुसार। मनुष्य मृत्युच्यावेळी विशेष व प्रबळ ऊर्जेचा कर्म-संस्कार/बंधन त्याची पुढील जन्माची अधोगति किंवा उर्ध्वगति /प्रगती निश्चित होते।
बुद्ध वाणी (त्रिपिटकानुसार) नुसार, एकुण ३१ प्रकारचे विविध जगत /लोक/विश्व आहेत। त्यातील फक्त मनुष्य जगतच आपण पाहु शकतो। इतर ३० लोक साधारण मनुष्य पाहू शकत नाही. ते पहाण्यासाठी अरिहंत (श्रावक बुद्ध / प्रत्येक बुद्ध /सम्यक संबुद्ध या तीनप्रकारांपैकी एक बनावे लागते).
कर्मानुसार जो पर्यंत निर्वाण मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ३१ पैकी कोणत्याही एका जगात/विश्वात/लोकात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो (पहिले आर्य सत्य: जगात दुःख आहे. ) । कधी ह्या जगात तर कधी त्या जगात..... हा नियम प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत म्हणुन बुद्धवाणीत प्रसिद्ध आहे।
४ अरुप लोक, १६ रुप लोक, ११ काम लोक।असे एकुण ३१ जग/विश्व/लोक आहेत।
१६+११=२७ मध्ये एक मनुष्य लोक आहे। बाकीचे २६ देवलोक/ब्रह्म लोक आहेत। पण ते अमर नसतात। आयुष्य काही लाख वर्षे असते। पण त्यांना अल्प ज्ञानामुळे वाटते कि मी अमर / जीवनमुक्त झालो।
वरील दोन्ही किस्से, पूज्य बाबासाहेबांच्या 'बुद्ध व त्यांचा धम्म' या पवित्र ग्रंथात आलेले आहेत.
तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करणे सगळ्यांना जमत नाही. सगळेच देव निर्वाणाच्या प्रक्रियेत नसल्याने, हि देव जन्म घेतलेले प्राणी सुद्धा मनुष्यासारखे (काही लाख) वर्षे जगून पुन्हा कर्मानुसार ३१ लोकांपैकी कोणा एकात पुनर्जन्म निश्चितच घ्यावा लागतो। जरुरी नाही त्यांना मनुष्य जन्मच मिळेल.
सम्यक बोधी प्राप्त झाल्यानंतर स्वतः भगवंतांनी मी अनेक वेळा विविध प्राण्यांचे जन्म घेतले होते, याचा दाखल तिपिटकातील 'उदान' ह्या ग्रंथात मिळतो.अरहंत(बुद्धपद प्राप्त/तीनप्रकारांपैकी एक बुद्ध) माणसे हे लोक देवलोक भ्रमण करत असतात। त्यां देवांना बुद्ध मार्गदर्शन करीत असतात। म्हणुन बुद्धवंदने मध्ये बुद्ध गुणांना स्मरताना 'लोकोत्तर' (सर्व लोक पार केलेला असा निर्वाणप्राप्त )शब्द येतो । निर्वाण मिळाल्याने ज्यांचा पुर्नजन्म कधीच होत नाही, असे जीवनमुक्त, अरिहंत !!
पण जे देव, देवलोकात राहुन किंवा मनुष्य मनुष्यलोकात राहून धम्मप्रगती करीत नाही, त्यांना काही लाख वर्षांनी साधारण मनुष्य, पक्षी, सरीसृप, जलचर किंवा प्रेतयोनी त्यांच्याच दुष्कर्ममानुसार किंवा धुंदीत(प्रमाद)अधिकांश आयुष्य घालवल्यानंतर पुर्नजन्म घ्यावाच लागतो।
असे देवांचे दिव्यलोकातुन/ब्रह्मलोकातुन व मनुष्य लोकांचे मनुष्यलोकातुन पतन /बाहेर पडणे होते।
म्हणुन मनुष्य जीवन अमोल व दुर्लभ मानतात। कारण तिथे संवेदना द्वारे (विपश्यनेने) निर्वाण शक्य आहे।
धर्मदोहे:
मानव जीवन रतनसा, किया व्यर्थ बरबाद।
चर्चा कर ली धरम की, चाख न पाया स्वाद।।शील-समाधि-ध्यान की, बही त्रिवेणी धार।
डुबकी मारे सो तरे, हो भव सागर( दुखद पुर्नजन्म) पार।।आशा आहे प्रश्ना चे समाधान झाल असेल।मंगल हो।संदर्भ :
1.The manuals of Dhammakaya, VRI PUBLICATIONS2.The teachings of the Buddha, Author Mahasthavir Narada, Taiwan
संबोधन धम्मपथी९७७३१००८८६
No comments:
Post a Comment