Sunday, 15 September 2019


प्रश्न: ब्रम्हलोकातून म्हणजे कोठुन?🤔🤔🤔

उत्तर:चांगला प्रश्न आहे . 

🌞ब्रह्मलोकाबद्दल माहिती घेण्याअगोदर पहिल्यांदा नियमकता व कर्म-परिणाम समजून घेऊया. तेव्हा ब्रह्मलोकाबद्दल माहिती देणे-घेणे सोपे जाईल.  बुद्ध वाणी (त्रिपिटकानुसार) नुसार, हा संपूर्ण संसार पाच नियामतांनी (सिस्टिम ने ) पुर्ण चालला आहे. कारण ईश्वर नाही, तो जर असता तर अन्याय, शोषण, गुन्हेगारी व अकाली मृत्यू , हे बाह्य संकटे व भीती, दोर्मनुष्यता (नफरत) , राग (जुना शब्द, त्याचा समानार्थी म्हणजे 'आसक्ती'), धुंदी,जीवनात बेहोशी, बेजाबदारी, खोटारडेपणा असे मानवी अवगुण/आंतरिक संकटे  आलीच नसती.  नाही का?

असो, महाकारुणिक तथागतांनी सर्वोच्च ज्ञान प्राप्त करून, शरीर-मनाच्या व बाह्य जगातील जवळपास सर्व मानवकल्याणाच्या गोष्टी शोधून काढल्या. त्यांनी सृष्टीतील पाच नियमता हि शोधून काढल्या. त्या खालील प्रमाणे :

१: ऋतु नियामता: हे सांगते कि, कसे सगळे ऋतू विशेष काळानंतरच व ठराविक महिन्यांचेच असतात. त्याचे विशेष परिणाम परिसरावर व प्राण्यावर होतात. अशा प्रश्नांची  ऊत्तरे कर्म नियमात स्पष्ट होतात.

२. धम्म नियामता:  हे सांगते कि, कसे विशेष व्यक्तीचा स्वभाव व त्यातील बदल, पुर्नजन्माचे नियम , निसर्गाचे ईतर नियम, शील-समाधि-प्रज्ञेचे नियम, निर्वाणाचे प्रक्रिया व टप्पे , चांगुलपणाचे फायदे व परिणाम, मनुष्य/राजा/संन्यासी/भिक्षु/पती-पत्नी/माता-पिता यांची यांची कर्तव्ये,  धम्म नियामतेत  स्पष्ट होते. 

३. कर्म नियामता: हे सांगते कि, किती प्रकारचे कर्म असतात, त्यांचे परिणाम कसे व केव्हा येतात, मन-वाचा-शरीराद्वारे कसे कर्म बनते, व  मागच्या अनेक जन्माचे कर्म ह्या जन्मात कसे परिणाम देते, साधारण बुद्धिमत्तेच्या पालकांकडे अत्यंत बुद्धिमान मुलं कशी जन्माला येतात, अकाली मृत्यु /शारीरिक-मानसिक अपंगता/गरिबी/ संपन्नता-विपन्नता/ पूर्ण-अपूर्ण नाती / आसपासचे वातावरण अशा प्रश्नांची  ऊत्तरे कर्म नियामतेत स्पष्ट होतात.

४. चित्त नियामता: चित्त-मन कसे काम करते, त्याचे किती विभाग आहेत, अंतर्मन व मन यातील संबंध व देवाणघेवाण, मनाचे विविध वेळेला विविध पण तात्पुरते स्वभाव कसे बनतात, मन किती प्रकारचे असते, येणाऱ्या घटनांचे पूर्वसंकेत, दुसऱ्याच्या मनातील पूर्ण बोध सिद्धी, दुरबोधी(भविष्यबोधी), मागील जन्माचे ज्ञान, सध्या इतर ठिकाणी काय चालू आहे याचे ज्ञान याचे स्पष्टीकरण होते. 

५. बीज नियामता: कसे विशेष काळातच झाड/माणूस/प्राण्याला विशेष प्रकारे फळ/फुल  येते, विशेष वेळेतच कसे पिकते, जसे पेरतो तसेच कसे येते? कसे त्या  एकच आंब्याच्या किती विशेष बियाणे कसे सगळी तीच विशेष लक्षणे घेऊन येते? कशी विविध फुल/फळ झाडे आसपासच्या माती,सूर्य, पर्यावरण,बीज, पाणी, ऊर्जा व कीटकांमुळे परिणाम भोगून जन्माला येतात  असे  बीज  नियमात स्पष्ट होते.  





🌞वरील सांगितल्याप्रमाणे, कर्म व चित्त नियामते नुसार। मनुष्य मृत्युच्यावेळी विशेष व प्रबळ ऊर्जेचा कर्म-संस्कार/बंधन त्याची पुढील जन्माची अधोगति किंवा उर्ध्वगति /प्रगती निश्चित होते। 

🌞बुद्ध वाणी (त्रिपिटकानुसार) नुसार, एकुण ३१ प्रकारचे विविध जगत /लोक/विश्व आहेत।  त्यातील फक्त मनुष्य जगतच आपण पाहु शकतो। इतर ३० लोक साधारण मनुष्य पाहू शकत नाही. ते पहाण्यासाठी अरिहंत (श्रावक बुद्ध / प्रत्येक बुद्ध /सम्यक संबुद्ध या तीनप्रकारांपैकी एक बनावे लागते). 


🌞कर्मानुसार जो पर्यंत निर्वाण मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ३१ पैकी कोणत्याही एका जगात/विश्वात/लोकात पुन्हा पुन्हा  जन्म घ्यावा लागतो (पहिले आर्य सत्य: जगात दुःख आहे. ) । कधी ह्या  जगात तर कधी त्या जगात..... हा नियम प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत म्हणुन  बुद्धवाणीत प्रसिद्ध आहे। 

🌞४ अरुप लोक,  १६ रुप  लोक,  ११ काम लोक।असे  एकुण ३१ जग/विश्व/लोक आहेत। 

🌞१६+११=२७ मध्ये एक मनुष्य लोक आहे। बाकीचे २६ देवलोक/ब्रह्म लोक आहेत। पण ते अमर नसतात। आयुष्य काही लाख वर्षे असते। पण त्यांना अल्प ज्ञानामुळे वाटते कि मी अमर / जीवनमुक्त झालो। 

🌞 संबोधी प्राप्त सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा  असे ठरविले, कि धम्म हा अत्यंत वेगळा, फक्त ज्ञानी लोकांना समजणारा व सद्याच्या समाजाच्या मान्यतेनुसार भिन्न असल्याने मी धम्म  शिकविणार नाही; त्या वेळेस ह्या २६ लोकांतून एक देव 'बकब्रह्मा' त्यांना भेटण्यास आला, वाट्याने तथागतांना  केली कि , "आज पृथ्वीतलावर अनेक पुण्यवान माणसांनी जन्म घेतला असून, ते धम्म ग्रहण करण्यास पात्र आहेत. तरी तथागतांनी धम्म वाटण्यास सुरुवात करावी" अशी विनंती केली. त्यानंतर तथागतांनी बोधीदृष्टीने जगाकडे पाहत खात्री केली व धम्म वाटण्यास सुरुवात केली. तसेच अनेको मध्यरात्री अनेको देव तथागतांकडे धम्म शिकण्यास यायचे.

वरील दोन्ही किस्से, पूज्य बाबासाहेबांच्या 'बुद्ध व त्यांचा धम्म' या पवित्र ग्रंथात आलेले आहेत.


🌞 तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करणे सगळ्यांना जमत नाही.  सगळेच देव निर्वाणाच्या प्रक्रियेत नसल्याने,  हि देव जन्म घेतलेले प्राणी सुद्धा मनुष्यासारखे (काही लाख) वर्षे जगून पुन्हा कर्मानुसार ३१ लोकांपैकी कोणा एकात पुनर्जन्म निश्चितच घ्यावा लागतो। जरुरी नाही  त्यांना मनुष्य जन्मच मिळेल.

सम्यक बोधी प्राप्त झाल्यानंतर स्वतः भगवंतांनी मी अनेक वेळा विविध प्राण्यांचे जन्म घेतले होते, याचा दाखल तिपिटकातील 'उदान' ह्या ग्रंथात मिळतो. 


🌞अरहंत(बुद्धपद प्राप्त/तीनप्रकारांपैकी एक बुद्ध)  माणसे हे लोक देवलोक भ्रमण करत असतात। त्यां देवांना बुद्ध मार्गदर्शन करीत असतात। म्हणुन बुद्धवंदने मध्ये बुद्ध गुणांना स्मरताना 'लोकोत्तर' (सर्व लोक पार केलेला असा निर्वाणप्राप्त )शब्द येतो । निर्वाण मिळाल्याने ज्यांचा पुर्नजन्म कधीच होत नाही, असे जीवनमुक्त, अरिहंत !!

🌞पण जे देव, देवलोकात राहुन किंवा मनुष्य मनुष्यलोकात राहून धम्मप्रगती करीत नाही,  त्यांना काही लाख वर्षांनी साधारण मनुष्य, पक्षी, सरीसृप, जलचर किंवा प्रेतयोनी त्यांच्याच दुष्कर्ममानुसार  किंवा धुंदीत(प्रमाद)अधिकांश आयुष्य घालवल्यानंतर  पुर्नजन्म  घ्यावाच लागतो।

🌞असे देवांचे दिव्यलोकातुन/ब्रह्मलोकातुन व मनुष्य लोकांचे मनुष्यलोकातुन पतन /बाहेर पडणे होते। 😒

🌞म्हणुन मनुष्य जीवन अमोल व दुर्लभ मानतात।  कारण तिथे संवेदना द्वारे (विपश्यनेने)  निर्वाण शक्य आहे। 



🌞धर्मदोहे:
💐 मानव जीवन रतनसा,  किया व्यर्थ बरबाद। 
चर्चा कर ली धरम की,  चाख न पाया स्वाद।। 

💐शील-समाधि-ध्यान की, बही त्रिवेणी धार। 
डुबकी मारे सो तरे, हो भव सागर( दुखद पुर्नजन्म) पार।। 

आशा आहे प्रश्ना चे समाधान झाल असेल। 

मंगल हो।

🌞 संदर्भ :
1.The manuals of Dhammakaya,  VRI PUBLICATIONS 
2.The teachings of the Buddha, Author Mahasthavir Narada, Taiwan

संबोधन धम्मपथी
९७७३१००८८६

Saturday, 7 September 2019

पती-पत्नीतील दुराव्याची/घटस्फोटाची जबाबदारी व आत्मपरीक्षण


पती-पत्नीतील नात्यातील घटस्फोट एक महत्वाची पण अंतिम पायरी म्हणून पहिली जाते. तशी ती आहे सुद्धा. एकमेकांची जबाबदारी घेतलेली जोडपी एकमेकांपासून कायम स्वरूपी विभक्त होतात. विभक्त होताना बहुतेक वेळा नात्यातील अपयशाला, समाजातील अपमानाला व मुलांच्या अंधारमय भविष्याला  एकमेकांनाच जबाबदार ठरवतात. सर्व चूक तिची/त्याचीच आहे, मी मात्र चुकलो/चुकले नाही अशीच घोषणा दोन्ही पक्ष आत्मविश्वासाने किंवा अतिआत्मविश्वासाने करीत असतात.आणि त्याच्या/तिच्या पासून झालेली मुले हि मला नकोत अशीही अपप्रवृत्ती जोर धरते. 

आपल्या प्रिय मुलगा/मुलगी/ भाऊ/बहिणीच्या कुटुंबाची वाताहत होताना नातेवाईकांना हि बघवत नाही. लहान मुलांची काळजी वाटते. पण दोंघांमधील कुणाचे किती चुकले ? व कोणी कशी माघार घावी ? कोणाला काय समज द्यावी याची थोडीसेही यश तिच्या/त्याच्या सासरच्या किंवा माहेरच्या लोकांना मिळत नाही. बऱ्याच वेळा तो आणि त्याच्या घराचे तिच्या घरच्यांचा तसेच ती व तिच्या घराचे त्याच्या घरच्यांचा अपमानही करतात. कारण कळत-नकळत त्याच्या घरच्यांनी तिला (पुरुष प्रधानसंस्कृती चे समर्थक) किंवा तिच्या घरच्यांनी त्याला (आमची मुलगी काही कमी नाही असे मिरवणारे समर्थक) छळलेले असते. त्यात माझ्या जोडीदाराने मला साथ दिली नाही असा समज होतो. मूळ मुद्दा हा कि हा समज किती टक्के खरा व किती टक्के खोटा हे मोजायला अकाऊंटंट किंवा सी.ए. बाजारात मिळत नाही . तो हिशोब आपल्यालाच करावा लागतो. वास्तविक हा अनेक वर्षांचा हिशोब सरळ-सोपा नसून तो करताना प्रामाणिक व गंभीर आत्मपरीक्षण गरजेचे असते. 

खालील प्रश्नावली हि घटस्फोट इच्छुक व्यक्तींसाठी मी बनवलेली आहे. सरळ-सोपी वाटावी म्हणून पुरुष उमेदवारासाठी देत आहे. वास्तविक ती  नवरा-बायको दोघांनीही वाचून निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. 
१. का मी एक पती म्हणून सुरुवाती पासून  जोडीदाराच्या इच्छा-आकांक्षांना नेहमी जास्तीतजास्त सन्मानाने पहिले व जास्तीतजास्त पूर्ण केले  ?
२. जेवढा सन्मान, स्नेह व काळजी तिने माझा व माझ्या घरच्यांचा केला, का मीही  तेवढाच तिचा व तिच्या घरच्यांचा केला ?
३. मी तिला एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून वैयक्तिक विकास करण्याची संधी दिली ?
४. का माझ्या घरच्यांनी तिचे व माझे प्रेमाचे नाते दृढ व्हावे यासाठी प्रयत्न केले?
५. का मी पैशाबाबत /व्यवहारात पारदर्शकतेने तिच्याशि बोलायचो व तिला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचो ?
६. का मी तिला माझ्याशी दर दिवसात बोलायला पुरेसा वेळ दिला?
७. जेव्हा मी ती माझ्याशी काही संवाद साधायची तेव्हा मी तिचे व्यवस्थित ऐकून तिच्या समस्या समाधानपूर्वक व वेळेच्या आत सोडवायचो?
८. का मी तिच्याकडे मला मुल म्हणून मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे, असा हट्ट केला ?
९. का मी नैतिक दृष्ट्या पूर्ण सज्जन  होतो?
१०. का मी तिला ह्या ना त्या कारणाने घराबाहेर नेहमीच्या जबाबदाऱ्या (दर महिन्यातून एकदातरी  ) टाळून बाहेर फिरायला न्यायचो?
११. का मी ती गर्भवती असताना तिची पुरेशी काळजी घेतली ?
१२. का मी मुलांची देखभाल व्यवस्थित केली ?
१३. जेवढा वेळ, विश्वास व स्नेह मी इतर नात्याला दिला, तेवढा मी तिला दिला का ?
१४. का आजारपणात मी तिची शारीरिक व मानसिक काळजी घेतली?
१५. का तिची दागिन्यांची किंवा बाहेर फिरायची हौस मी समाधानकारक पूर्ण केली ?
१६. तिच्याशी वाद झाल्यावर जेव्हा मला उमगले कि चूक माझीच होती , का मी तिची प्रामाणिकपणे क्षमा मागितली ?
१७. तिच्याशी वाद झाल्यावर जेव्हा तिला तिची चूक उमगली व तिने माफी मागितल्यावर का मी तिला न्यायानुसार माफ केले?
१८. का ती एक बायको म्हणून सरासरी बायकांपेक्षा जास्त प्रामाणिक,  जास्त   समजुतदार ,  जास्त सुशिक्षित ,  जास्त त्यागी ,  जास्त प्रेमळ,  जास्त  कर्तबगार ,  जास्त आत्मविश्वासू, स्वयंभू  व  जास्त स्नेहपूर्ण होती ?
१९. तिच्याशी वाद झाल्यावर का मी तिच्याशी लैंगिक व शारीरिक त्रास दिला ?
२०. का मी तिला मारहाण केली?
२१. मारहाण केल्यावर का तिने माझी तक्रार पोलिसांकडे ना करता मला २-३ वेळा तरी माफ केले ?
२२. का तिच्याविरुद्ध मी कधी खोटे किंवा बेछूट आरोप केले?
२३. का आम्हा  दोघांतील भांडणे  सोडवायला आलेल्यांना मी, नेहमी सन्मान दिला व माझ्यातील गुणदोष तपासले?
२४. जर तिचे चुकले असल्यास मी इतरांना तिच्याशी बोलून मार्ग काढण्यासाठी उपाय केले ?
२५. आमच्या दोघांच्या भांडणात मी नेहमी माझ्या मुलांच्या भवितव्याची जास्त पर्वा केली ?
२६. का मी माझ्या स्वभावात नेहेमी सुधारणा व्हावी असा माझा व्यक्तिमत्व विकास कला ?
२७ . वेगळे झाल्यावरही मी स्वतः किंवा इतरांकडून तिची माहिती मिळावीत तिची सुरक्षितता व तब्येतीची विचारपूस केली ?
२८ . मी शीघ्रकोपी नसल्याने माझे नातेवाईक माझे गुणदोष माझ्याशी मोकळेपणाने बोलतात ?
२९ . मी सर्व बाजूने पती म्हणून योग्य आहे व होतो  , अशी खात्री माझ्या नातेवाईकांनी मला अनेकवेळा दिली आहे ?
३० . आम्ही दोघे मॅरेज कौन्सेलर कडे जावे व पुन्हा एकत्र यावी, का असा मी अनेकवेळा प्रयत्न केला?
३१ . का मी माझ्या मुलांची जबाबदारी कधी झटकली नाही व  त्यांना जरी वेगळे असलो तरीही स्नेह व प्रेम दिले ?
३२ . का माझ्या कुटुंबापुढे माझा मानापमान मी नेहमी बाजूला ठेवला  ?
३३ . का तिच्या घराच्या-ऑफिसच्या नात्यांचा मी नेहमी सन्मानच केला ?
३४ . का तिच्यावर मी जेवढे आरोप केले त्यांना आधार व पुरावे होते व ते सर्व मान्य झाले?
३५ . का मी तिच्यावर केलेल्या आरोपांवर, तिची बाजू सर्वां समोर मांडण्यास मी तिला पुरेसा वेळ व संधी दिली ?
३६ . का मी तिच्यावर केलेले आरोप व पुरावे तिच्या-माझ्या सर्व नातेवाईकांनी कबुल /सर्वमान्य केले ?


असेच सर्व प्रश्न स्त्रीनेही स्वतःला विचारावे व तिच्या कुटुंबानेही. ह्याच प्रश्नांची तुमच्याबद्दल उत्तरे तुमच्या जवळच्या नातेवाईकांनीही समाधानकारक दिली तर तुम्ही व्यवस्थित वागलात, नाहीतर तुम्ही दोषारोपातून मुक्त नाही.

 व जेव्हा सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील तेव्हा समजावे कि मी माझ्या पतीची  /पत्नीची जबाबदारीची परिपूर्ण रित्या पार पडली. 

अन्यथा कर्म नियमात नुसार ह्याच जन्मात व पुढील जन्मात अपुरे किंवा असमाधानकारक कौटुंबिक सुख मिळेल. विभक्त झाल्यावर किंवा घटस्फोट घेतल्यावर मनात कुठल्याही प्रकारचे किल्मिष, पश्चाताप किंवा खेद राहणार नाही ? 

नाहीतर एखाद्याने असा निर्णय का घ्यावा ज्यासाठी मी स्वतः व माझे नातेवाईक हि मलाच आयुष्यभर दोष किंवा निंदानालस्ती करीत राहतील?



विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी म्हणतात ;
१) परोपकारही पुण्य है, पर पीडन ही पाप ।
पुण्य करें तो सुख जगे , पाप करे भवताप ।।

२) जीतनं बुरा ना कर साके , दुष्मन-बैरी कोय| 
अधिक बुरा निज मन करे, जब मन मैला होय ।।

३) जितना भला ना कर सके , माँ-बाप सब कोय ।
अधिक भला निज मन करे, जब ये उजला होय ।।
 
हे ३६ प्रश्न दोघातील ३६ चा आकडा दुर करण्यास मदत करोत!!
सर्वांचे खूप मंगल हो, खूप कल्याण होवो. 

संबोधन धम्मपथी 
९७७३१००८८६