|| धर्म के दोहे ||
गिर-गिर पड-पड फिर ऊठे, चलते रहे बलवान।
कभी न हत ऊत्साह हो, लक्ष पावे महान।।
- सत्य नारायण गोयंकाजी
स्पष्टीकरण:

जीवनात आपल्याला यश अपेक्षित असणे स्वाभाविक आहे। त्यासाठी मनुष्य प्रयत्नही करतो। प्रयत्न केल्यावर यशासाठी चमत्कारी शक्ती वर भरवसा ठेवतो। का ठेवतो? कारण प्रयत्न केल्यावर ही येणारे अपयश / निंदा / दुख / अपमान हे अत्यंत क्लेष कारक असतात। अनेकोवेळा चांगले प्रयत्न करुनही यश जसे लपाछपीचा खेळ खेळत असते। अपयशाची कारणे काही समजत नाही। आणि मग दुखाला काही सीमाच नसते। काय करावे अशा वेळेस?

निसर्गातनु बर्याच वेळा सद्धर्म कळतो, रोपट्याची लागवड केल्यावर फळ यायला वेळ लागतो। पण त्या रोपट्याची खुप काळजी घ्यावी लागते, उन वारा व पावसापासुन । एवढे करत असताना सगळी रोपटी फळ देत नाहीत । टिकु न शकलेली रोपट्याला नक्की काय झाले हे लक्ष पुर्व तपासल्यास व त्यानुसार काळजी घेतल्यावर यश वाढत जाते ।

त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांची रोपटी कुठे खुंटली याची तपासणी करावी, तिथे काही धागेदोरे नक्की सापडतात।

एक तर काम करण्याची पद्धतच चुकिची किंवा पद्धत बरोबर पण श्रम अपुरे किंवा समस्या बरोबर न समजलेली किंवा विचार करण्याची पद्धतच चुकीची; असे काही कारण निश्चित असते। शांत व स्थिर मनच असे कारण शोधु शकते।

अशा प्रकारे अपयशाची कारणे शोधत आपण पुन्हा नव्या जोमाने व उत्साही मनाने कामास लागावे ।

नकारार्थी व उदास विचारांचा संचय ध्यान करत दुर करावा, त्यांना शरण जावु नये। बहुतेक सर्व मोठ्या यशांमागे अपयशाची प्रयत्नांची व कठीण घटनांची प्रचंड मोठी यादी असते।

पण बाहेरच्या माणसाला ईतरांचे यश दिसते, यशामागील प्रचंड उत्साही, जिद्दी व खंबीर मन दिसत नाही । हे समजुन उमजुन आपणही कर्माबाबत सजग (उदास विचारांना दुर करीत व गुणी विचारांना जवळ करत) व उत्साही राहुन जीवन जगावे व महान लक्ष मिळवावे।

तसेच इतरांना योग्य प्रेरणा द्यावी । हेही गुणांचे / स्वभावाचे / धर्माचेच वाटप (
धम्मदान)आहे।
भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी

No comments:
Post a Comment