Wednesday, 26 August 2015

 आदि  मे कल्याण है, मध्य में कल्याण ।
अन्त में  कल्याण  है , प्रगती पथ निर्वाण ।।
- आचार्य सत्य नारायण गोयंका 

मानवी जीवनात माणसाची  निरनिराळी लक्ष जीवनाच्या वेगवेगळ्या टप्यावर  असतात. आणि माणसाचे लक्ष सहसा दूर असतें व त्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात. जो पर्यंत लक्ष भेटत नाही तो पर्यंत सुख-शांती बहुधा मिळत नाही. पण सद्धर्माच्या राजरस्त्याची गोष्ट  वेगळी आहे. कारण मनुष्य जसजसा चालायला लागतो तसातसा सुख शांतीचा स्वानुभव प्रत्येक पदोपदी घेत राहतो. जर धर्म खरा असेल तर त्या क्षणी सुख शांती मिळायला हवी. म्रुत्युनंतर मिळणारी शांतीतर  तपासता येत  नाही, मग ती बाजुला ठेवुया. 

सद्धर्माचा रस्त्यात तर फक्त तीनच गोष्टी करायच्या असतात, फक्त तीनच!!  शील,समाधि  व प्रज्ञा . जसे एखादाप्रवास करताना पहिल्यांदा प्रत्येकाला टीकिट काढावेच लागते व तेव्हाच प्रवासाला सुरुवात करता येते. त्याच प्रमाणे सद्धर्माच्या राजमार्गावर पहिले व सुरुवातीचे पाऊल म्हणजे शील-सदाचाराचा स्वीकार. कुशल काम करणार्या व्यक्ती धम्माच्या राजमार्गावर खुप लवकर प्रगती करतात. अकुशल कर्म करणार्या व्यक्तीस स्वताला शील-सदाचाराचे जीवन स्वीकारावे लागते, पंचशीलाचे काटेकोर पणे  करण्याची प्रतिद्न्याच घ्यावी लागते। पण साधक अशी प्रतिज्ञा   इतरांना दाखविण्यासाठी नाही, तर स्वताला धम्माच्या मार्गावर काही काळ तरी तपासुन व चालून पाहण्यासाठी घेतो. अकुशल कर्म करीत बैचेन झालेले मन, आचार्यांची माफी मागुन पश्चातापातुन काही (काळ का होइना) मुक्त होऊन, निर्दोष व शांत जीवनासाठी  नवी सुरुवात करते.   आता मी पांच शील नव्याने घेवून नवीन प्रयत्न करीत आहे.  नव्या जोमाने व उत्साहाने ध्यान करण्यास किंवा जीवन जगण्यास सुरुवात करते. ह्या नवीन उत्साह व जोम व अकुशल कर्माबाबत क्षमा मिळाल्यावर शांती मिळते. पंचशील पालन करीत असल्याने आता अकुशल कर्मांपासुन मनुष्य दूर गेलेला असतो. आणि त्यामुळे आता मी वाईट कर्मे करीत नाही हे जाणुन मनातील अनामिक भीतीची जागा आनंद घेतो. असे धर्मात सुरुवातीलाच कल्याण साधले जाते. 


पण मनाचा जुना  स्वभाव हा सहजा सहजी बदलत नाही. बैचेन व्हायचा व अकुशल कर्म करायचा जुना स्वभाव आपणास  नेहमी व्याकुळ करतो, खास करून शील पालन करते वेळी. मनात जसे विचारांचे वादळ नेहमीच सुरु असते. आपण काम एक करतो आणी मनात विचार दुसरा सुरु असतो. अशा वेळी साधकाला धर्माचे पूढील  पाउल शिकवितात: समाधि . जसे कधी पाण्यातील माती पाहण्यासाठी पाण्याला शांत होऊ द्यावे लागते, तसेच मनातील विविध अकुशल विचार दूर करण्यासाठी त्याला शांत  खूप गरजेचे असते. कारण आपल्या  मनाचे ओपरेशन आपल्या मनालाच करायचे असते. त्यामुळे मन जे दिशा दाखविल त्या दिशेकडे दुर्लक्ष करून, आपले लक्ष फक्त आपल्या स्वताच्या शुद्ध व नैसर्गिक श्वासकडे ठेवायला सांगितले जाते (आनापान सति   विद्या). नेहमीच विविध दिशेत भटकणार्या मनाला लगाम घालुन स्वताच्या श्वासावर  राहण्याचे शिकविले जाते. त्यामुळे विविध प्रिय-अप्रिय आणि वर्तमान व भुतकाळातील घटनांच्यामागे मागे पळणार्या मनाला शांत राहत वर्तमानकाळात म्हणजेच ह्या क्षणाचा परिपूर्ण विचार करण्यासाठी शिकविले जाते. अशाने श्वासाद्वारे केंद्रित झालेले मन खुप मानसिक शांती देते. अशा प्रकारे धर्माचे दुसरे पाउल सुद्धा खूप कल्याणकारी असते. 

पण तरी सुद्धा ही शांती कायमची नसते. कारण ध्यान करून उठले कि इतरांशी वागताना जुना क्रोधी, अहंकारी, लोभी व पश्चाताप करणारा स्वभाव कायम असतो. अशा स्वभावाची मुळे अंर्तमानात खोल खूप खोल रुजलेली असतात. त्यामूळे ती दूर करण्यासाठी साधकाला प्रज्ञा शिकविली जाते. प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, शरीर व मनाच्या क्रियाप्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान. तेव्हाच साधक  मुळ स्वभावाला सामोरे जातो. काय आहे माझा स्वभाव? साधकाला हे कळू लागते कि, कुठले ही अकुशल कर्म करण्यापुर्वी मला मनात  लोभ,वासना, ईर्ष्या व मत्सर किंवा क्रोध उत्पन्न करावाच लागतो, त्याशिवाय अकुशल कर्म वाणी किंवा शरीराद्वारे होत नाही. आणि ते अकुशल कर्म केल्यावर इतरांना माझ्यापासून त्रास तर  नंतर होतो, पहिल्यांदा मलाच जबरदस्त त्रास होतो. मी अत्यंत व्याकुळ व धडधडत  असतो. असे जाणल्यावर नवीन दुष्कर्म होत नाही, व जुन्या दुष्कर्माची सवय/आठवण उफाळुन आली कि मी शरीर व मनाच्या संवेदनांकडे सजगतेने व साक्षीभावाने (तटस्थपणे) व समता ठेवून (ना लोभ जागविता व ना द्वेष/क्रोध जागविता) पाहत जुन्या अकुशल आठवणींचा शरीर व मनावरचा दुष्परिणाम दूर करतो. आता अविचारांच्या आगीला नवीन जळण मिळत नाही, व जुने दुष्कर्मे साक्षी भावाने पाहत दूर होतात. हा शरीर व मनाचा खेळ दर सेकंदाला सुरु होतो व संपतो. हे उत्पन्न व नष्ट  होण्याचे ज्ञान साधकाला विपश्याने द्वारे  स्वकष्टानेच मिळते. अशा प्रकारे जुने संस्कार जे व्याकुळ बनवितात दूर झाल्याने महान व मंगल शांती मिळते. म्हणुन धर्माचे हे अंतिम पाउल ही खुप कल्याणकारी आहे याची प्रचिती साधकाला येते. कष्ट मात्र त्यालाच घ्यावे लागतात, इतर कोणी माझ्या मनाची सफाई करेल हे केवळ अशक्य आहे. 

अशा प्रकारे धर्माचे  पाउल (शील-सदाचार ), मधले पाउल (समाधि - कुशल मनाची एकाग्रता) व अंतिम पाऊल प्रज्ञा हे तिन्ही महत्वाचे व कल्याणाकडे नेणारी पाऊले आहेत. हाच तर खरा प्रगतीचा एकमेव राजपथ/राजमार्ग आहे. साधकाने ही पाऊले वाचुन व ऐकूनच समाधान न मानता स्वतः तपासून पहावी, कि खरच असे होते का? तेव्हाच तर विश्वास होईल व त्यानंतर गंभीर रीत्या साधना केल्यावर आपण खरे तर मुक्तीपथ/प्रगतीपथ  निर्वाण (कायम स्वरुपी निर्दोष जीवनाचे सुख) आपणास मिळु शकेल. 

स्पष्टीकरण : संबोधन धम्मपथी 

Saturday, 4 July 2015

शुद्ध धर्म ऐसा जगे, होवे चित्त विशुद्ध| 
बौद्ध बने या न बने, मानव बने प्रबुद्ध||
-सत्य नारायण गोयंका 

भगवंतांनी धम्म हा काही विशेष मानवी समुहासाठी बनविलेला नाही। जर  फक्त विशेष मानवी समुहासाठी असता तर तथागत महाकारुणिक कसे म्हणविले गेले असते? निसर्ग नियम तर सगळ्यांना समान लागु होतात. पण धम्माच्या ह्या वैश्विक उपयोगामुळे बौद्ध संप्रदायात किंवा एखाद्या बौद्ध व्यक्तीत स्वतः बौद्ध असल्याचा अहंकार अलगद व नकळत उत्पन्न होऊ शकतो. हा अहंकार कि आमचा भगवानसर्वात श्रेष्ठ व इतरांचे  हलके किंवा कनिष्ठ . जसे एखादे भव्य ग्रंथालय असावे त्यातील मोठे मोठे ग्रंथ पाहुन तेथील ग्रंथापल चकित व गर्विष्ठ व्हावा कि मी जिथे काम करतो, ते ग्रंथालय सर्वात मोठे व मी सर्वात मोठा ग्रंथपाल व  सर्वात मोठा . पण त्याने एकही ग्रंथ न वाचावा. पण इतर ग्रंथालयांना व त्यांच्या ग्रंथपालांना हीन लेखावे. तर आयुष्यभर त्याची अवस्था  उपयुक्त गोड तळ्याकाठी बसून त्याच्या पाण्याची स्तुती करीत जीवन घालवावे पण एकदाही पाणी चाखुन न प्यावे अशा दुर्दैवी माणसासारखी होइल. 

बुद्ध हे एक शिक्षक होते, पण म्हणुन फक्त काही बौद्ध झाल्यानेच निर्वाण मिळत नाही. मग कशाने निर्वाण मिळु शकेल?

आणि जर का निर्वाण उपयोगी असेल तर का त्याने एकच  माणुस सुखी होतो का? नाही!! ज्यास धम्मात प्रगती केल्यामुळे थोडी बहुत क्षांती मिळु लागली अशी व्यक्ती इतरांशी आनंदाने, न्यायाने,  विचार्पुर्वक व उत्साहपूर्वक वागते. त्यामुळे आपोआप आसपासच्या व्यक्तींना  होतोच. पण हे गुण नुसत्या बौद्ध झाल्यावर मिळत नसतात. 

 प्रत्येक माणुस (प्रत्येक बौद्धही) प्रत्येक घटनेला, स्वभावा प्रमाणे: अमके मला आवडते व तमुक आवडत नाही, असे म्हणत प्रिय-अप्रिय गोष्टींच्या जंजाळात अडकलेला असतो. त्यामुळे भीती, वासना, चिंता व ईर्ष्या ह्या चित्तमळांना बळी पडून  दुष्कर्म करीत जातो. ह्या गोष्टीतून वाचण्यासाठी तो,पूजा- अर्चा,व्रतवैकल्य व उपास-तापास ही करतो. का कारण कि माझे दैवत बुद्ध किंवा  राम किंवा महावीर व इतर कोणी ऐतिहासिक पुरुष यांनी माझे गुन्हे/ माफ करावेत व मला हवी असलेली शांती द्यावे, सुख द्यावे. त्यासाठी अध्यात्माची पुस्तके ही वाचतो, जप-जाप करतो, असे करून काहीकाळ शांती  नक्की मिळते . पण २-३ तास झाल्यावर पुन्हा जुना स्वभाव : त्याने असे केले व त्याने तसे नाही केले; अशा प्रकारे क्रोध व अशांती पुन्हा आपल्यावर ताबा मिळवते. इतर देवताच काय पण बौद्ध लोकांचेही बुद्धाबाबत असेच होते. कारण ते अशांती चे बीज कसे व कोण पेरते? ते रोपट्याचे वृक्ष कसे बनते? त्याची विषारी फळे कशी  देतात? व ह्या वृक्षांना कसे उखाडून फेकावे याबद्दल बुद्धाने जे शिकविले त्यापासून बौद्ध ही अनभिज्ञ  असतात. म्हणुन फक्त बौद्ध बनून सुख-क्षांती मिळत नाही. 

मग कसे मिळेल निर्वाण? बुद्ध हे खुप विनम्र महापुरुष  होते. त्यांनी निर्वाण मिळण्यासाठी माझी पुजा-अर्चा, पुतळे-चित्र, जप-जाप यांची कधीही गरज सांगितली नाही. उलट असे करून  तुम्ही निर्वाणापासुन दूर जात आहात असेच सांगितले. मनुष्य जीवनात जे काही आपण भोगतो ते कर्माचेच परिणाम आहेत. कर्म  मानसिक,शारीरिक व वाचिक असतात. मनात क्रोध आल्याशिवाय शिवी देणे अशक्य असते, तसेच मनात वासना आल्याशिवाय अनैतिक/विवाहबाह्य संबंधही अशक्य असतात. त्यामुळे मनाच्या सवयींच्या आहारी न जाता मनालाच चांगल्या सवयी लावणे हेच निर्वाणाकडे जाण्याचा एकमेव रस्ता (अष्टांगिक मार्ग) आहे. म्हणुन शील-सदाचाराने वागत, मन एकाग्र करून (समाधि), मन व शरीराचे प्रत्येक क्षण बदलते स्वरूप स्वानुभातुन जाणणे (प्रज्ञा) हा तीन अंगी धर्म शिकून घ्या, विपश्यना विद्या शिकून त्यात पारंगत व्हा. त्यासाठी विशेष कर्मकांड व संप्रदाय बदलण्याची गरज नाही. कारण हिंदु, बौद्ध व इतर संप्रदायातील माणसे ही मनाचे गुलाम झाली आहेत. 

आणि  त्यातही त्रिपिटकाचा अभ्यासकांनुसार बुद्धाने कोणालाही बौद्ध बनविलेले नाही, त्यांनीतर व्यक्तिला धार्मिक, धर्माचारी व धर्मस्थ बनविले. म्हणुन त्या वेळी जो माणुस भगवंतांला शरण गेला त्याने त्याची संस्कृती सोडलेली नाही. 

त्यामुळे असे दिसून येते कि, बुद्धाने हेच सांगितले कि बौद्ध बना अथवा नका बनू, पण सद्गुणी, प्रज्ञावान माणुस बनणे हे तुमच्यासाठी व तुमच्या प्रियजनांसाठी कल्याणकारी आहे. कारण ग्रंथ न वाचुन अहंकार जागवणारा (पण ग्रंथांची  घेणारा) ग्रंथपाल कधीही ज्ञानी बनत नाही. 

-संबोधन धम्मपथी 

















Friday, 19 June 2015

भले न मन मैला करे, तन के सारे रोग। 
पर तन रोगी हो उठे, जब मन जागे रोग॥

- आचार्य सत्य नारायण गोयंका 


स्पष्टीकरण:

व्यक्ती कितीही निरोगी असली किंवा वाटली तरी शारीरिक रोगांचा सामना करावा लागतो. नेहमीच निरोगी व मजबूत वाटणारे शरीर कमकुवत व रोगी होऊन बसते. अपेक्षित हालचाली व कामे करता येत नाहीत मग वाईट वाटुन चीडचीड ( मनाची व्याकुळता) जाणवते. पण मनुष्य लवकर हार मानीत नसतो; अमुक खाल्या-पिल्याने मला आजार झाला आहे असा शोध चालु होऊन डाक्टरांच्या सल्याने उपचार सुरु चालु होतात. आज ना उद्या मी बरा होणारसा विश्वास व आशा  वाटू लागते. कारण मन सांगत असते, कि अजून मला खुप जग बघायचे आहे व खुप काही करून दाखवायचे आहे. अशा अपेक्षा शरीरातल्या रोगाला शरीरातून जाण्यासाठी धक्के मारीत असतात. शारीरिक रोगाला दूर करण्यासाठी सकारात्मक, उत्साहवर्धक व महत्वाकांक्षी विचार सैनिकासारखे लढू लागतात.इथे मन प्रगत जरी नसले तरी लोभी मात्र असते.  अशा प्रकारे "शारिरीक" रोगावर मात करण्यासाठी "मन" (…क़ारण मनातुनच वाईट तसेच सकारात्मक, प्रेरणादायी, उत्साहवर्धक व महत्वाकांक्षी  विचार जन्म घेतात.) मदत करते. आणि शारिरीक रोगांमुळे होणारी चीडचीड ही मनावर तितकासा भयानक परिणाम करीत नाही. म्हणजे एकुणच शरीराकडून येणारे रोग/विकार मनावर हे कमी हानिकारक असतात. 

एक उदाहरण घेवू: एखादी व्यक्ती नजरचुकी मुळे पडते तेव्हा जर न ओशाळता/वैतागता शांत मनाने पाहिले तर असे दिसते कि: आपण पडलो आहोत पाचव्या पायरीवर पण घसरण्याचे किंवा पडण्याचे कारण तर पहिल्याच पायरीवर होते. पाचव्या पायरीवर तर फ्क्त सध्याची पडण्याची प्रक्रिया पुर्ण झाली; वास्तवात पडायची सुरुवात तर पहिल्या पायरीवरच असताना घसरल्यामुळेच झाली होती. अशा प्रकारचे नियमीत आत्मपरीक्षण आपल्याला सांत्वन व पुन्हा न पडण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. 

आता आपण पाहिले कि शरीर रोगी असताना मनामध्ये असलेल्या सकारात्मक उर्जेमुळे, मनावर नकारात्मक परिणाम होत नाही. पण जेव्हा मन रोगी होते तेव्हा शरीरावर नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात होते. सभोवतालच्या जगाचे वागणे-बोलणे (आठ लोकधर्म: सुख-दुख, मान-अपमान, यश-अपयश, निंदा-स्तुती/कौतुक ) आपण नेहमीच अनुभवीत असतो. त्यात आणखिन भर म्हणजे आपल्या मनातूनही आपण आपलया मनातील काल्पनिक जगातील वागणे-बोलणे आठ लोकधर्मे ("त्याने असे केले किंवा नाही केले तर? माझा अपमान केला आहे." असे वाटणे ) अशा प्रकारे आपल्या मनातील घटना व बाह्य जगातील घटना आपल्या मनाला नाराज (अपेक्षाभंग झाल्यावर) न प्रसन्न (अपेक्षापुर्ती झाल्यावर) करीत असतात. पण मनोजगात  नाराज घटनांची रेख ही प्रसन्न घटनांच्या रेखेपेक्षा खुप गहरी व क्लेषकारक असते. आणि त्यात नाराजीच्या घटना प्रसन्नतेच्या घटनांपेक्षा वारंवार घटत असतात. 

पण मनाला जेव्हा वारंवार नाराजी/अपेक्षाभंगांना सामोरे जावे लागते, तेव्हा श्वास फुलणे, हृदयाची स्पंदने वाढणे, बद्धकोश्ठता, विनाकारण थकवा, पाचन ठीक न होणे, तसेच बैचेनी मुळे झोप न येणे असे अनेको रोग वाढत जातात. हे रोग जास्त काळ राहिले कि, शरीराला इतर भयानक रोगही जडतात, हे विपश्यना ध्यानात पारंगत असणारर्या लाखो साधकांच्या स्वानुभावातुन तसेच सध्याचा मेडिकल संशोधनातूनही अनेकोवेळा सिद्ध झाले आहे. शरीरावर होणारा हा परिणाम हा खुप घटक व बहुधा कायम स्वरुपी असतो. अशा नाराज मनामुळे जीवनाच्या प्रवासात आपण पाचव्या पायरीवर पडतो (पहिले आर्य सत्य: जगात दुःख आहे) पण ध्यान करून पाहिले असता असे दिसते कि, मी पडलो आहे खरा, पण पडण्याचे कारण आठ लोकधर्मांच्या बाबतीत अविद्येमुळे मनावर झालेला परीणामक आहे. मन जागरुक, मेहनती व प्रगत नसल्यामुळे त्या  पहिल्या पायरीलाच पडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती (दुसरे आर्य सत्य: दुःखाला कारण आहे.) मन एकदा का जागरुक, मेहनती व प्रगत झाले कि कारण नष्ट करता येते (तिसरे आर्य सत्य: दुःख निरोध शक्य आहे) . आणि मन सजग, मेहनती व प्रगत बनण्याचा आर्य(महान)मार्ग विपश्यनेद्वारेच प्राप्त होतो/आचरिता येतो (चौथे आर्य सत्य: दुःख मुक्तीचा मार्ग).

त्यामुळे जीवनाच्या प्रवासात आपण मन व शरीर दोन्ही जरी महत्वाचे असले तरी मन हे प्रमुख आहे, प्रधान आहे, अध्यक्ष आहे. त्यामेळे मोक्ष /निर्वाण (कायम निर्दोष जीवन) साठी शरीराला उपवास, व्रत, राख लावणे, अर्धनग्न किंवा नागडे फिरणे, अंगारे-धुपारे, कर्म-कांडांत  अडकवून (शरीराला अतिमहत्व देवून) समस्या सुटलेल्या नाहीत. कारण महत्वाचा व गंभीर परीणाम मनाचा शरीरावर होतो। शरीराच्या रोगांचा मनावर तितकासा परिणाम होत नाही. 

-संबोधन धम्मपथी 

























Saturday, 13 June 2015

धम्मिको बौद्धिक स्पर्धा : 2015

साप्ताहिक निळा प्रहार द्वारे "धम्मिको बौद्धिक स्पर्धा" आयोजित करण्यात येत आहे। विषय: "धर्म प्रसार व धर्म प्रचार यात फरक कोणता? आणि प्रभाव कोणाचा जास्त असतो धर्म प्रसाराचा कि धर्म प्रचाराचा? उदाहरणे देवुन स्पष्ट करणे आवश्यक आहे।"
पहिल्या प्रथम जाणुन घ्या धर्म म्हणजे काय? बौद्ध, हिंदु, मुस्लिम  व ईतर हे तर संप्रदाय आहेत। धर्म ह्या शब्दाला प्राचीन भारतात स्वभाव, निसर्ग व गुणधर्म म्हणायचे। धर्माचे तीनच प्रमुख अंग आहेत: शील (सदाचारी व नैतिक जीवन), समाधि ( कुशल मनाची एकाग्रता) व प्रज्ञा (शरीर व मनाच्या सवयींचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याच्या अभ्यासाने प्रत्येक मनुष्याला मोक्ष/निर्वाण मिळु शकते। जसे सिद्धार्थाला मिळाला ।) ही बौद्धिक स्पर्धा ह्याच शुद्ध धर्माच्या अर्थावर अवलंबुन आहे हे कृपया ध्यानात ठेवावे।
आता शुद्ध धर्माची गरज नक्की काय व कोणाला हे ही तथागतांनी सांगितले आहे। ते म्हणतात: गृहस्था तु अमुक देव-देवतेला पुजणारा असलास, ईश्वर एक किंवा अनेक आहेत असे मानणारा असलास, आत्मा व परमात्मा एकच किंवा अनेक मानणारा असलास, ईश्वर मानणारा किंवा न मानणारा असलास तरी तुझ्या कळत-नकळत तुझ्याच मनात ईर्षा, भीती, वासना, बैचेनी, क्रोध, कुशंका, अयोग्य अविश्वास, असंयम, असहनशीलता व व्याकुळता हे अकुशल मनोविकार जागतात ना? आणि हे च विकार मग मनातुनच वाणी न शरीरावर बाहेर पडतात। ईच्छा असुनही अकुशल कर्मांवर तुमचे नियंत्रण राहत नाही।  आम्ही त्याच चंचल मनाचे डॉक्टर आहोत। तुला ज्याला पुजायचे आहे त्याचे तु पुजा-अर्चा चालु ठेव। कायम सुख किंवा दुखमुक्ती हवी असल्यास मात्र आम्ही तुला मनाला शांत व निर्दोष बनण्यास शिकवु। पण ह्या मार्गावर तुलाच चालायचे आहे। जसे व्यायाम शाळेत गेल्यावर शिक्षक तर आपल्याला फक्त शिकवतात सुर्यनमस्कार तर आपल्यालाच मारावे लागतात। धर्माचीही गोष्ट तशीच आहे।
याचा दुसरा अर्थ असा कि बुद्धाची शिकवण/धम्म हा काही फक्त बौद्धांपुरता मर्यादीत नसुन भुत,वर्तमान व भविष्याकाळातील सर्व मानवासाठी आहे। त्यामुळ बौद्धांसह इतर संप्रदायातील लोकापर्यंतही धर्म पोचायला हवा। तर मग ईतर संप्रदायांची कर्मकांडे व संस्कृतीला नावे ठेवुन कल्याणकारी बुद्धवाणीचा बौद्धजन स्वताच अपमान करतात व तिला सीमा लावतात। ह्या  बौद्धिक स्पर्धेत मात्र असे चालणार नाही। बुद्धविचार यशस्वी रीत्या कसा पोहोचेल ते पाहायचे आहे: धर्म प्रसार व धर्म प्रचाराच्या माध्यमातुन।
काही जण असेही सुचवतील कि दर रविवारी विहारात जावे, पौर्णिमा व इतर सण साजरे करावेत। पण प्रश्न  असा आहे कि हा  धर्म प्रसार आहे का धर्म प्रचारआहे। दोन्हीही असणे शक्य नाही कारण फक्त तसे केल्याने का मन पुर्णता शांत, सजग व निर्मळ होत नाही असा माझ्यासह अनेकांचा अनुभव आहे। त्यामुळे अशी उदाहरणे देताना धर्म प्रसार व धर्म प्रचाराच्या दृष्टीनेच परिपुर्ण विचार करावा।
समजा कुणी विचारले कि शिकवणे म्हणजे काय तर असे सांगावे कि: एखादी गोष्ट/ज्ञान/माहिती आपण लेखाने/वाणीने/स्वत: आचरणात आणुन/प्रसंगानुरुप(जसे बुद्धांनी किसा गौतमीला सांगितले)  समोरच्या माणसाचे वय/स्थिती/बुद्धिमत्ता पाहुन सोप्या पद्धतीत समजावुन सांगणे याला शिकवणे म्हणतात। अशा पद्धतीने धर्म प्रसार व धर्म प्रचाराची दोन्हींची व्याख्या द्यावी। तसेच बुद्धाच्या शिकवणीचा किस्सा किंवा  स्वताच्या जीवनातील एखादा शिकवणीचा किस्सा उदाहरण स्वरुपात देवुन शिकवण ह्या शब्दाचा अर्थ समजावता येईल। त्याच प्रमाणे धर्म प्रसार व धर्म प्रचारा यांचा अर्थ ह्या धम्मिको बौद्धिक स्पर्धेत तुमचे उत्तर साधारण २०० शब्दांत द्यावे ही विनंती।
आपल्या धर्म प्रसार व धर्म प्रचारात आपण कमी पडतो आहोत। जर धर्म प्रसार व धर्म प्रचाराचा बुद्ध व बाबासाहेबांना काय अर्थ सांगायचा होता हे परिपुर्ण रीत्या समजणे व समाजात धर्म प्रसार व धर्म प्रचाराबाबत तर्कसंगत व युक्तिसंगत अशी उपयुक्त माहिती देणे हे ह्या स्पर्धेचे मंगल उद्देश्य आहे। त्यामुळे सर्वांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी यथायोग्य सहकार्य करावे, विचार मांडावेत व ईतरांनाही प्रोत्साहित करावे ही नम्र विनंती।

- संबोधन धम्मपथी

आग से आग कैसे बुझेगी भाई, बैर से बैरागी कैसे मिटेगा भाई,
सीधी साधी बात क्यो तेरे समझती में ना आयी।।




जेव्हा एखाद्या गरीब/परावलंबी/लाचार समाजाच्या मुख्य वर्तमान पत्र त्या समाजापेक्षा मोठ्या/बलवान/श्रीमंत समाजाच्या श्रद्धा स्थळांना/देवतांची/कर्मकांडांची नेहमीच बेआबृ/ अपमान करतो त्यामुळे त्या गरीब समाजातील व्याकुळ तरूणांमध्ये व बलवान समाजातील व्याकुळ तरूणांमध्ये वादावादी होऊन गोष्ट अत्याचार व हत्येपर्यंत जाते ।

हया प्रकारच्या हत्येमागे आपल्या वृत्त पत्रांचा व वक्त्यांच्या अडाणीपणा आहे। आपले बांधव गरीब / कमजोर / कामगार असतानाही नेहमीच हिंदू देवी- देवतांची निंदा करतात. सुरक्षिततेच्या भीतीने  मग आपलेच बलवान बांधव मुग गिळून बसतात । कमजोर अजुन कमजोर होतो।

मग बलवान समाजाचा पुर्ण राग निघतो गरीब कमजोर मागासवर्गीयां वर।

निष्कर्ष:
 निंदा करू नये। ना बलवानाची ना कमजोराची।

जो आपल्या आई वडिलांचा आदर करतो तो दुसर् या च्या आई वडिलांचा ही मान राखतो। हा सद्गुण आहे।

वैराने वैरच वाढते, आपल्या वृत्तपत्रांना व वक्त्यांना जो पर्यंत नाही समजत तोपर्यंत अत्याचार कमी कसे होणार?

- संबोधन धम्मपथी


जब तक अंतर जगत में, जगत रहे विकार।
भव रोगी व्याकुल रहे, लिये दु:खों का भार।।
- आचार्य सत्य नारायण गोयन्का
💐।। धर्म के दोहे।।💐

स्पष्टीकरण:
साधारण मनुष्य हे समजतो कि जोपर्यंत मी (शरीराने ) कोणाला छळत नाही, जीव हत्या करीत नाही, लबाडी- चोरी व्यभिचार करीत नाही तर मी एक गुणी न संयमी व्यक्ती झालो आहे। आणि त्यातही जेव्हा मी चुगली, खोटेपणा, वाढवुन सांगणे, सत्य अर्धवट किंवा फिरवुन सांगणे हे ही करीत नाही तेव्हा तर मी अधिकच गुणी व संयमी झालो आहे असा भ्रम तयार करतो। तसेच अशा भ्रमात स्वताला ईतरांपेक्षा मोठा समजु लागतो। आणि नकळत सज्जन बनण्याच्या प्रयत्नात अहंकारी बनतो व असे समजतो कि आता अध्यात्मात / धर्मात  शिकण्यासाठी काही शिल्लक नाही। पण हा दिखावा किंवा भ्रम अंर्तमनातील व्याकुळता व बैचेनी वाढवत असतो। जसे डोक्यावर कर्जाचे बोजे वाढते, तसे बैचेनीचे व्याज तर दर अकुशल विचारासोबत वाढत जाते। आणि विचार हे काही ठरवुन किंवा नियमाप्रमाणे येत नाही। विचार तर मनातच येतात आणि स्वता मनाचीच शांती बिघडवतात। मनुष्याने जरी शारीरिक व वाचिक कर्मांवर नियंत्रण मिळवले कि लोक एखाद वेळेस चांगले म्हणतील ही, पण अर्तंमनातील ज्वालामुखीचे व्याज/कर्ज तर वाढतच असते। त्यामळे शांती ही कोसो दुर असते।
असे का होते? जाणुन घ्या असे का होते। आपल्या मनात खोलवर कुठेतरी, आपण पाहिलेली प्रत्येक घटना,कल्पना, रंग, माणुस/स्त्री, देव याबद्दल काही प्रिय-अप्रिय भाव ह चांगल्या-वाईट आठवणींच्या  स्वरुपात घट्ट बसुन असतात। अशी मनातली प्रिय स्त्री/पुरुष समोर आला कि आवडती गोष्ट आल्याप्रमाणे मनाला गुदगुल्या (सुखद संवेदना) होउ लागतात व मनात कामवासनांच्या (मला अमुक पाहिजे किंवा मला मिळाल्यावर अमुक सुख मिळेल अशी आसक्ती) विचारांचे वादळ सुरु होते।जसे 'तो/ती म्हणजे माझे पहिले प्रेम आहे' किंवा 'त्याच्या शिवाय जगणे अशक्य' हे ही एक प्रकारचे वादळच आहे।  तसेच नावडती स्त्री/पुरुष/घटना समोर आल्यावर तीव्र स्वरुपात बैचेनी/क्रोध उफाळुन येतो। हा मनातील आठवणींचा/विचारांचा भार व्यक्ती शरीर व वाणीने जरी संयमी राहिला तरी मनाच्या जगात भोगत राहतो। आपल्या मनाचे नहमीचेे/सततचे विचार ह्या आपल्या सवयी बनतात, मनातील सवयी कालांतराने शरीर व वाचेद्वारे बाह्यजगात प्रकटतात।  आणि हा आपला स्वभाव बनतो। हया बनण्याच्या क्रियेला भव (भवतु सब्ब मंगल मधला 'भव') म्हणतात। आणि ह्या भवातुनच 'मी', 'माझा  स्वभाव', 'माझी जात', 'माझा मुलगा', 'माझा देव' असा 'मी' चा संसार बनतो।
मग आणखीन मोठा भ्रम कि आता काहीमाझा स्वभाव बदलणार नाही। कारण जीत्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हा मोठा गैरसमज आपणच बनविला। जोपर्यंत विपश्यने द्वारे मनातील अकुशल विचारांची जागा स्थायी कुशल विचार घेत नाहीत तोपर्यंत मनुष्य जीवन अनेको गैरसमज, भ्रम व अनियंत्रित अकुशल/अशुद्ध विचारांच्या वादळात वाया जाते। अनेक जन्माप्रमाणे हा जन्म ही वाया जावु नये याची शहाण्या माणसाने खबरदारी घ्यावी।

स्पष्टीकरण: संबोधन धम्मपथी

Saturday, 11 April 2015

संप्रदाय का धर्म, से तालमेल ना खाय।
एक सदा उलझावता, एक सदा सुलझाय॥

- सत्यनारायण गोयंकाजी

अनेक वर्षांच्या कालखंडात आपण अनेक शब्द व अनेक शब्दांचे अर्थ हरवुन बसलो आहोत। आता संप्रदाय व धर्म हे समानार्थी शब्द झाले आहेत. पण त्यात तथागतांनी अत्यंत मोठा फरक सांगितला आहे. संप्रदाय हा काही विशिष्ट लोकांकरिता असतो, त्यांचे कर्मकांडे व परंपरा सांभाळतो. त्या संप्रदायाबाहेरील लोकांवर ह्या संप्रदायाचे बंधन नसते. ऊदा. हिंदु संप्रदाय, बौद्ध संप्रदाय, जैन व इतर संप्रदाय हे एकमेकांवर काही बंधन आणु शकत  नाहीत. प्रत्येकाला मर्यादा आहेत. याचे नियम त्याला व  याला लागु पडत नाहि. अशा प्रकारे संप्रदायाला सीमा असते. 

धर्माचे तसे नसते, धर्माला सीमा नसते. ना काळाची, ना वयाची, ना प्रदेषाची, ना जातीची. धर्म सांगतो, व्यक्ती कोणीही असो मी भेदभाव करीत नाही. मनात वाईट विचार आला कि दंड मिळतोच व मन जितके निर्मळ झाले कि सुख शांती मिळतेच. विचारांचे परिणाम हे कोणीही टाळू शकत नाही.

संप्रदायाचे ठेकेदार आपल्या संप्रदायाच्या मोठेपणा सांगण्यासाठी साधारण  माणसाला खुप मोठ्या कथांमध्ये, स्वर्ग-नरकाच्या  कल्पनांमध्ये, पुनर्जन्माच्या कोड्या मध्ये, कर्म-कांडांमध्ये गोंधळुन ताकतात. व मनुष्याची विवेक बुद्धी नष्ट करतात. 


धर्म तर मनुष्याची सर्वांगीण उन्नती करतो. तो मनुष्याला शारीरिक, मानसिक व वाचिक कर्म करताना आवाहन करतो, कि बाबा सजग राहा, कर्म करताना विचार करा। धर्म सांगतो, कुठलेही कर्म (शारीरिक,मानसिक) करताना मन, शांत, सजग व निर्मळ असणे आवश्यक आहे। तसे नसल्यास तुम्ही मलीन मनाद्वारे दु:खद फळ देणार्या झाडाच्या बीज आपल्या आयुष्यात पेरता, आणि ते कालांतराने दुखद फळ घेवुन येते। आणि निसर्गनियमानुसार प्रत्येक झाडावर अनेक फळे येतात, तसेच सुखाच्या (निरोगी मन) किंवा दुखाच्या(रोगी मन)  झाडावरही त्यानुसारच अनेको फळ येतात। अशा प्रकारे रोगी मनाद्वारे आपण विषारी झाडाची फळे आपणच आपल्या आयुष्यात नकळत पेरत असतो। अशी फळे पिकुन तयार झाल्यावर आपल्या व आपल्या नातेवाईकांना व्याकुळ व दु:खी बनवितात। धर्म सांगतो ही विषारी झाडे मनातील अनियंत्रित भावनांद्वारे (जसे भीती, वासना, क्रोध, पश्चाताप, ईर्षा, निराशा, मत्सर, अहंकार, वैर, लोभ व न्युनगंड ईत्यादी) प्रत्येक नवे झाड म्हणजे अनेक विषारी विचार-विकार आपल्या जीवनात दुखी फळे देत असतात। प्रत्येक विषारी फळ मिळते वेळी आपण आणखीन चिडतो, घाबरतो व हार मानतो। अशा प्रकारे आपण क्रोध व भीती चे नवीन बीज नकळत आपल्या मनाच्या सुपीक जमिनीत पेरतो. अशा प्रकारे विचार-बीज-फळ असे चक्र आयुष्यात नियमीत पणे। म्हणुन चांगले विचार चांगली फळे देतात व वाईट विचार वाईट, धर्माचा न्याय असा सहज, सोपा आणि अचुक असतो.

संप्रदायवाद्यांना समजत नसल्याने ते विविध कर्मकांडे, पुजा-अर्चा, जप-जाप, अमुक-तमुक वार-दिवस, व्रत-उपवास करीत मन शांत करण्याचा प्रयत्न करतात। पण त्याने मिळणारी शांती अस्थायी, तात्पुरती असते। मग पुन्हा बैचेनी घालवुन शांती मिळण्यासाठी झोपेच्या गोळ्या, काम-भोग, विविध व्यसनेही क्स्रुन शांती मिळवण्याचा प्रयत्न चालुच असतो। पण त्याने शेवटी निराशाच पदरी पडते.

कुठल्याही कालखंडात एखादा व्यक्ती जेव्हा बुद्ध होतो, तेव्हा धर्माद्वारे मनाचा सांगोपांग अभ्यास करत, "दुषित मन- दुषित  विचार- दुषित  फळ" यांचे दुष्टचक्र स्वकष्टाने कायम स्वरुपी तोडुन टाकतो। असे तेव्हाच होते, जेव्हा ध्यानाद्वारे मन कायमस्वरुपी नितांत स्वच्छ होते, शुद्ध होते, बुद्ध होते। असा व्यक्ती ईतरांना स्व:ताला कळालेला धर्म (शील-समाधि=प्रज्ञा) शिकवतो, मन सजग व शांतकरण्यासाठी विपश्यना विद्या शिकवतो। त्यामुळे मनातील नव्या विचारांवर नेहमी पहारा व जुन्याविचारांचा निचरा होत जातो। पण हे काम ज्याचे त्याने करायचे असते, कारण ध्यान एकाने केल्यावर दुसर्याचे दुषित विचार नष्ट होत नाहीत।  उदा जो पाणई पितो , त्याचीच तहान भागते, इतरांची नाही। पण एकाने केल्यावर दुसर्याला प्रेरणा नक्की मिळते.

धर्माची शिकवण अशी स्पष्ट्पणे न गोंधळवता सांगितलेली आहे, ती सुआख्यात आहे, सहज आहे। त्यात लपवण्यासारखे, फिरवुन सांगण्यासारखे काहिच नाही। धर्म सांगतो: बाबारे तु कुठल्याही देवी-देवतेला मानणारा किंवा न मानणारा, आत्म्याला मानणारा किंवा न मानणारा, कर्म-कांड करणारा किंवा न करणारा मनात अकुशल विचार येतात व तुला बैचेन व व्याकुळ बनवतात ना? मग आता शील-सदाचारात, समाधि (मन एकाग्र करणे) व प्रज्ञा (मन निर्मळ करणे) ह्या मार्गावर आलास कि व्याकुळता दुर होते कि नाही हे तपासुन तर बघ (एही पस्सिको)? कारण धर्माचा मार्ग हा तपासुन पाहण्याचा आहे.

संप्रदायात तपासुन पाहण्यावर मनाई किंवा कठीण आहे, कारण शांती हि मृत्य पश्चात असते, व  "दुषित मन- दुषित  विचार- दुषित  फळ" यावर कायम स्वरुपी उत्तर नसल्यामुळे न तपासता येणार्या गोष्टी जसे कर्म-कांडे, आत्मा, पुर्नजन्म व ईतर कल्पनांवरती खुप भर  असतो.

म्हणुन गुरुजींनी संप्रदाय व धर्मामध्ये फरक ओळखुन, धर्माचा लाभ घ्यायला संगितले आहे.

मंगल होवो!
-संबोधन धम्मपथी