Saturday, 11 April 2015

संप्रदाय का धर्म, से तालमेल ना खाय।
एक सदा उलझावता, एक सदा सुलझाय॥

- सत्यनारायण गोयंकाजी

अनेक वर्षांच्या कालखंडात आपण अनेक शब्द व अनेक शब्दांचे अर्थ हरवुन बसलो आहोत। आता संप्रदाय व धर्म हे समानार्थी शब्द झाले आहेत. पण त्यात तथागतांनी अत्यंत मोठा फरक सांगितला आहे. संप्रदाय हा काही विशिष्ट लोकांकरिता असतो, त्यांचे कर्मकांडे व परंपरा सांभाळतो. त्या संप्रदायाबाहेरील लोकांवर ह्या संप्रदायाचे बंधन नसते. ऊदा. हिंदु संप्रदाय, बौद्ध संप्रदाय, जैन व इतर संप्रदाय हे एकमेकांवर काही बंधन आणु शकत  नाहीत. प्रत्येकाला मर्यादा आहेत. याचे नियम त्याला व  याला लागु पडत नाहि. अशा प्रकारे संप्रदायाला सीमा असते. 

धर्माचे तसे नसते, धर्माला सीमा नसते. ना काळाची, ना वयाची, ना प्रदेषाची, ना जातीची. धर्म सांगतो, व्यक्ती कोणीही असो मी भेदभाव करीत नाही. मनात वाईट विचार आला कि दंड मिळतोच व मन जितके निर्मळ झाले कि सुख शांती मिळतेच. विचारांचे परिणाम हे कोणीही टाळू शकत नाही.

संप्रदायाचे ठेकेदार आपल्या संप्रदायाच्या मोठेपणा सांगण्यासाठी साधारण  माणसाला खुप मोठ्या कथांमध्ये, स्वर्ग-नरकाच्या  कल्पनांमध्ये, पुनर्जन्माच्या कोड्या मध्ये, कर्म-कांडांमध्ये गोंधळुन ताकतात. व मनुष्याची विवेक बुद्धी नष्ट करतात. 


धर्म तर मनुष्याची सर्वांगीण उन्नती करतो. तो मनुष्याला शारीरिक, मानसिक व वाचिक कर्म करताना आवाहन करतो, कि बाबा सजग राहा, कर्म करताना विचार करा। धर्म सांगतो, कुठलेही कर्म (शारीरिक,मानसिक) करताना मन, शांत, सजग व निर्मळ असणे आवश्यक आहे। तसे नसल्यास तुम्ही मलीन मनाद्वारे दु:खद फळ देणार्या झाडाच्या बीज आपल्या आयुष्यात पेरता, आणि ते कालांतराने दुखद फळ घेवुन येते। आणि निसर्गनियमानुसार प्रत्येक झाडावर अनेक फळे येतात, तसेच सुखाच्या (निरोगी मन) किंवा दुखाच्या(रोगी मन)  झाडावरही त्यानुसारच अनेको फळ येतात। अशा प्रकारे रोगी मनाद्वारे आपण विषारी झाडाची फळे आपणच आपल्या आयुष्यात नकळत पेरत असतो। अशी फळे पिकुन तयार झाल्यावर आपल्या व आपल्या नातेवाईकांना व्याकुळ व दु:खी बनवितात। धर्म सांगतो ही विषारी झाडे मनातील अनियंत्रित भावनांद्वारे (जसे भीती, वासना, क्रोध, पश्चाताप, ईर्षा, निराशा, मत्सर, अहंकार, वैर, लोभ व न्युनगंड ईत्यादी) प्रत्येक नवे झाड म्हणजे अनेक विषारी विचार-विकार आपल्या जीवनात दुखी फळे देत असतात। प्रत्येक विषारी फळ मिळते वेळी आपण आणखीन चिडतो, घाबरतो व हार मानतो। अशा प्रकारे आपण क्रोध व भीती चे नवीन बीज नकळत आपल्या मनाच्या सुपीक जमिनीत पेरतो. अशा प्रकारे विचार-बीज-फळ असे चक्र आयुष्यात नियमीत पणे। म्हणुन चांगले विचार चांगली फळे देतात व वाईट विचार वाईट, धर्माचा न्याय असा सहज, सोपा आणि अचुक असतो.

संप्रदायवाद्यांना समजत नसल्याने ते विविध कर्मकांडे, पुजा-अर्चा, जप-जाप, अमुक-तमुक वार-दिवस, व्रत-उपवास करीत मन शांत करण्याचा प्रयत्न करतात। पण त्याने मिळणारी शांती अस्थायी, तात्पुरती असते। मग पुन्हा बैचेनी घालवुन शांती मिळण्यासाठी झोपेच्या गोळ्या, काम-भोग, विविध व्यसनेही क्स्रुन शांती मिळवण्याचा प्रयत्न चालुच असतो। पण त्याने शेवटी निराशाच पदरी पडते.

कुठल्याही कालखंडात एखादा व्यक्ती जेव्हा बुद्ध होतो, तेव्हा धर्माद्वारे मनाचा सांगोपांग अभ्यास करत, "दुषित मन- दुषित  विचार- दुषित  फळ" यांचे दुष्टचक्र स्वकष्टाने कायम स्वरुपी तोडुन टाकतो। असे तेव्हाच होते, जेव्हा ध्यानाद्वारे मन कायमस्वरुपी नितांत स्वच्छ होते, शुद्ध होते, बुद्ध होते। असा व्यक्ती ईतरांना स्व:ताला कळालेला धर्म (शील-समाधि=प्रज्ञा) शिकवतो, मन सजग व शांतकरण्यासाठी विपश्यना विद्या शिकवतो। त्यामुळे मनातील नव्या विचारांवर नेहमी पहारा व जुन्याविचारांचा निचरा होत जातो। पण हे काम ज्याचे त्याने करायचे असते, कारण ध्यान एकाने केल्यावर दुसर्याचे दुषित विचार नष्ट होत नाहीत।  उदा जो पाणई पितो , त्याचीच तहान भागते, इतरांची नाही। पण एकाने केल्यावर दुसर्याला प्रेरणा नक्की मिळते.

धर्माची शिकवण अशी स्पष्ट्पणे न गोंधळवता सांगितलेली आहे, ती सुआख्यात आहे, सहज आहे। त्यात लपवण्यासारखे, फिरवुन सांगण्यासारखे काहिच नाही। धर्म सांगतो: बाबारे तु कुठल्याही देवी-देवतेला मानणारा किंवा न मानणारा, आत्म्याला मानणारा किंवा न मानणारा, कर्म-कांड करणारा किंवा न करणारा मनात अकुशल विचार येतात व तुला बैचेन व व्याकुळ बनवतात ना? मग आता शील-सदाचारात, समाधि (मन एकाग्र करणे) व प्रज्ञा (मन निर्मळ करणे) ह्या मार्गावर आलास कि व्याकुळता दुर होते कि नाही हे तपासुन तर बघ (एही पस्सिको)? कारण धर्माचा मार्ग हा तपासुन पाहण्याचा आहे.

संप्रदायात तपासुन पाहण्यावर मनाई किंवा कठीण आहे, कारण शांती हि मृत्य पश्चात असते, व  "दुषित मन- दुषित  विचार- दुषित  फळ" यावर कायम स्वरुपी उत्तर नसल्यामुळे न तपासता येणार्या गोष्टी जसे कर्म-कांडे, आत्मा, पुर्नजन्म व ईतर कल्पनांवरती खुप भर  असतो.

म्हणुन गुरुजींनी संप्रदाय व धर्मामध्ये फरक ओळखुन, धर्माचा लाभ घ्यायला संगितले आहे.

मंगल होवो!
-संबोधन धम्मपथी

Wednesday, 11 February 2015

|| धर्म के दोहे ||
गिर-गिर पड-पड फिर ऊठे, चलते रहे बलवान।
कभी न हत ऊत्साह हो, लक्ष पावे महान।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:

🌼 जीवनात आपल्याला यश  अपेक्षित असणे स्वाभाविक आहे। त्यासाठी मनुष्य प्रयत्नही करतो। प्रयत्न केल्यावर यशासाठी चमत्कारी शक्ती वर भरवसा ठेवतो। का ठेवतो? कारण प्रयत्न केल्यावर ही येणारे अपयश / निंदा / दुख / अपमान हे अत्यंत क्लेष कारक असतात। अनेकोवेळा चांगले प्रयत्न करुनही यश जसे लपाछपीचा खेळ खेळत असते। अपयशाची कारणे काही समजत नाही। आणि मग दुखाला काही सीमाच नसते। काय करावे अशा वेळेस?

🌿निसर्गातनु बर्याच वेळा सद्धर्म कळतो,  रोपट्याची लागवड केल्यावर फळ यायला वेळ लागतो। पण त्या रोपट्याची खुप काळजी घ्यावी लागते, उन वारा व पावसापासुन । एवढे करत असताना सगळी रोपटी फळ देत नाहीत । टिकु न शकलेली रोपट्याला नक्की काय झाले हे लक्ष पुर्व तपासल्यास व त्यानुसार काळजी घेतल्यावर यश वाढत जाते ।

🌼त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांची रोपटी कुठे खुंटली याची तपासणी करावी, तिथे काही धागेदोरे नक्की सापडतात।

🌼एक तर काम करण्याची पद्धतच चुकिची किंवा पद्धत बरोबर पण श्रम अपुरे किंवा समस्या बरोबर न समजलेली किंवा विचार करण्याची पद्धतच चुकीची; असे काही कारण निश्चित असते। शांत व स्थिर मनच असे कारण शोधु शकते।

🌼अशा प्रकारे अपयशाची कारणे शोधत आपण पुन्हा नव्या जोमाने व उत्साही मनाने कामास लागावे ।

🌼 नकारार्थी व उदास विचारांचा संचय ध्यान करत दुर करावा, त्यांना शरण जावु नये। बहुतेक सर्व मोठ्या यशांमागे अपयशाची प्रयत्नांची व कठीण घटनांची प्रचंड मोठी यादी असते।

🌼पण बाहेरच्या माणसाला ईतरांचे यश दिसते, यशामागील प्रचंड उत्साही, जिद्दी व खंबीर मन दिसत नाही । हे समजुन उमजुन आपणही कर्माबाबत सजग (उदास विचारांना दुर करीत व गुणी विचारांना जवळ करत) व उत्साही राहुन जीवन जगावे व महान लक्ष मिळवावे।

🌼 तसेच इतरांना योग्य प्रेरणा द्यावी । हेही गुणांचे / स्वभावाचे / धर्माचेच  वाटप (धम्मदान)आहे।

भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी 🙏

Wednesday, 28 January 2015

धर्म के दोहे

क्षण-क्षण क्षण-क्षण बीतता, जीवन बीता जाय।
इस क्षण का उपयोग करे, बीता क्षण नही आय।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
साधारण मनुष्य स्वतः च्या बर्याच कर्तव्यांना पूर्ण करण्याची टाळा टाळ करतो ।
इतकी टाळा टाळ कि स्वतःच्या मनाची बैचेनी/अस्वस्थता ओळखायचं व दुर करायला  ही त्याच्या कडे वेळ नसतो।

मृत्यू समयी ही व्याकुळता व बैचेनी उफाळून वर येते, पण तेव्हा वेळ गेलेली असते ।

आई-वडिलांची सेवा, बायको-मुलांना यथोचित निस्वार्थ स्नेह-प्रेम, ज्यांना दुखावले त्यांची माफी मागायची, कुलपुरूषाचे(ऊदा: बाबासाहेब) ऋण फेडणे, क्रोध/ वासना / ईर्षा / भीती / आळस पश्चातापातुन मुक्ती अशा अनेक

बैचेनीची उकल / सुटका झालेली नसते । एक- एक करत तास, दिवस, महिने, वर्षे निघून जातात ।

 ह्या जन्मदिवशी मी जास्त मनोविकार/पापकर्मे कमविली कि जास्त मनोविकार/पापकर्मांपासून मुक्त झालो याचा

हिशोब साधारण माणसाला करता येत नाही । कारण आपण अजुन अंतर्मनाच्या स्वच्छते बद्दल अज्ञानी असतो। अंतर्मनात ह्या व अनेक जन्माची बैचेनी साठली आहे। ती फक्त मनुष्य जन्मात विपश्यना मिळाली कि काढता येते ।

ती काढण्यासाठी आचार्य प्रवृत्त करत आहेत, कारण वर्षामागून वर्षे जात आहेत। पण किती वर्षे बाकी आहेत आपल्याला माहित नाहीत 😥 । न जाणे पून्हा कधी मनुष्य जन्म मिळो न मिळो।

म्हणून साधना करीत विकारमुक्त होत जन्म व वेळ सार्थकी लावावा। गेलेला वेळ परत येत नाही ।

भवतु सब्ब मंगलं।

-संबोधन  धम्मपथी

Wednesday, 21 January 2015

�� धर्म के दोहे: ��

धरम हमारा ईश्वर, धरम हमारा नाथ।
सदा सुरक्षित रहे हम, धरम हमारे साथ।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
�� साधारण मनुष्याचे मन आठ लोकधर्मां मुळे सदैव बैचेन/व्याकुळ/अस्वस्थ असते । जशी एखादी नौका वादळी वारा व अंधारामुळे हेलकावे खात असते । अशा वेळेस तिला मजबुत आसरा(जसे बेट/द्वीप) हवा असतो । पण आसपासचे लोकही कमीजास्त प्रमाणात व्याकुळ असतात।

��मग भगवान म्हणतात ईतर ठिकाणी शोधण्यापेक्षा मनुष्याने मनुष्याने सद्धर्माचाच शरण/आसरा घ्यावा । सद्धर्मात(शील+समाधि+प्रज्ञा) स्थिर मन आपले मार्गदर्शक बनेल ।

��अत्त दीप(द्वीप) भव।

��आठ लोकधधर्म : सुख-दुख/ निंदा-स्तुति/मान-अपमान/यश-अपयश

भवतु सब्ब मंगलं।

-संबोधन धम्मपथी

Monday, 19 January 2015

🌸 धर्म के दोहे 🌸

पके कर्म की चित्त पर, जब उदीर्णा होय ।
नये कर्म बांधे नही, स्वतः निर्जरा होय।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
🏮बुद्ध शिकवणी नुसार कर्माचे परिणाम ह्या च जन्मात मिळाल्या शिवाय राहत नाही। पिकलेल्या/तयार कर्माचा परिणाम जेव्हा मन+शरीरावर होतो तेव्हा साधारण रोगाच्या लक्षणा (जसा ताप / सर्दी /खोकला)  सारखा  सहज ओळखण्या एवढा सोपा नसतो। जर ओळखता / समजताच नाही आला तर दुर कसा करणार? साधारण मनुष्य हे समजत नसल्याने बैचेनीत अजुन दुख देणारी कर्मे करीत राहतो, दुःख भोगीत असतो ।

🏮आचार्य म्हणतात  मनाच्या पडद्यावर जेव्हा अशा पिकलेल्या कर्माचा परिणाम  (चित्तात विचार व  शरीरावर  सुक्ष्म संवेदनांच्या) आधाराने होत असतो। ह्या संवेदनांमुळेच वाईट वस्तु प्रिय (जसे परस्त्री-बाटली) वाटते व चांगल्या गोष्टी अप्रिय (जसे कर्तव्य - सद्गूण). हीच आहे प्रतीत्य समुत्पादाची तोडता येणारी कडी।

🏮आणि प्रत्येक संवेदना (सुखद, दुःखद, असुखद-अदुःखद) ही एखाद्या परिणाम तयार झालेल्या कर्माच्या रुपाने बाहेर पडते, यालाच उदीरणा (  अंतर्मनातुन विचार बाह्य मनात डोकावणे ) म्हणतात।

🏮ह्या संवेदनांचा समतेने सामना केल्यावरच दुःखद / सुखद कर्मांचे परिणाम नष्ट करता येतात । शील तर समाधि (म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता) वाढवण्यास मदत करते। पण समाधि ने समता वाढत नाही प्रज्ञेने वाढते।

🏮 'समता' म्हणजे ( संवेदनांना महत्व न देणे / संवेदनांना भीक न घालणे)। समता ठेवली कि नवे कर्म संस्कार बनायचे थांबतात।

🏮प्रज्ञाच खरोखर संवेदनांचा जन्माबाबत जागृती व संवेदनांचा दुष्प्रभाव नष्ट (निर्जरा) करु शकते।

🏮ज्या ज्या वेळी मन विचलित होते तेव्हा समाधि उपयोगी असते। पण जेव्हा मन क्रोध / वासना / भयाने ग्रासते तेव्हा संवेदनांच्या उत्पाद-व्ययाकडे (निर्माण - अस्त) बारकाईने लक्ष द्यावे । अशांत मन शांत होत कर्मांचे दुष्परिणाम नष्ट होतील । याला निर्जरा म्हणतात।असे करीत राहिल्यास मागचे सर्व न पिकलेले कर्म संस्कार टप्या टप्याने मनाच्या पडद्यावर येत नष्ट होतात। व्यक्ति निर्मळ होते।

भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी 🙏

Friday, 16 January 2015

🌸धर्म के दोहे 🌸
पग पग बढता ही रहे, प्रबल रहे पुरुषार्थ ।
धरम पंथ दोनों सधे, स्वार्थ और परमार्थ।।
- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
सहसा चांगले कर्म करीत राहण्याचा मनुष्याचा प्रयत्न असतो। पण परिस्थिती समोर मनुष्य कच खातो।😫
चांगले वागायची आशावादी सुरुवात करताना, प्रयत्नांना  अमुक एका वेळे नंतर यश येईल अशी अपेक्षा असते। पण यश / सुख काही यायची चिन्ह दिसत नाही ।स्वतःच्या स्वप्नांना, इज्जतीला, सुखांना जपण्याच्या प्रयत्नात चांगली कामे करायचे थांबवुन, वाईट कर्मे करायला सुरुवात करतो।
अशा निराशेच्या वेळी पुर्वी केलेल्या सत्कर्मावर / प्रयत्नांवर पाणी सोडले जाते।
😔का होते असे?
🌞एखादी गृहिणी सकाळ, दुपार व संध्याकाळी घराला झाडु मारुन स्वच्छ करते। तसेच या दरम्यान काहीही  कारणाने घर अस्वच्छ तेव्हाही गरजे नुसार स्वच्छता करते।
एवढी काळजी घेत असताना ही हळुच नकळत प्रत्येक क्षणाला घाण - धुळ घरात येत असते। दारे - खिडक्या नेहमी बंद नाही ठेवु शकत। आणि जरी कधी बंद ठेवली तर आतली (न निघालेली) जुनी घाण व घरातील कामे नवीन घाणेची निर्मिती करतात। त्यामुळे नियमित सफाई गरजेचीच असते।
🌞त्याच प्रमाणे आपल्या शरीर रुपी घराच्या दारे - खिडक्या (नाक , जीभ, त्वचा, कान व डोळे) नेहमी निराशा / भीती / तंद्री / बैचेनी / वासना व पश्चात्तापाची घाण घरात (शरीरात + मनात) घेत असतात । मनुष्य जरी कोमात गेला (सर्व दारे खिडक्या "5 ज्ञानेंद्रिये" बंद) तरी मनातील न काढलेली जुनी घाण (कर्म संस्कार) ही नवीन घाण बनवीत असते।
मग आशा, जिद्द व एकुणच पुरुषार्थ कमी पडतो। सद्धर्म धारण करताना कळते कि अविचार / मानसिक कचरा कसा, कुठे, कधी व किती आला व किती अगोदर तपासुन होता।
🌞धर्म विपश्यनेद्वारे कचरा बाहेर काढायला व नवा कचरा न बनवायला शिकवतो। त्यामुळे आध्यात्मिक (स्वार्थ) व सांसारीक (परमार्थ) प्रगती होते।पण तसे न झाल्यास धर्म (शील + समाधि+ प्रज्ञा) न रुजल्याचे स्पष्ट होते ।
🌞अशा प्रकारे प्रत्येक पावलो-पावली धर्म आशा व पुरुषार्थ वाढवण्यात खुप मदत करतो।

भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी 🙏

Thursday, 15 January 2015

धर्म के दोहे

शील समाधी ध्यान कि, बही त्रिवेणी धार।
डुबकी मारे सो तिरे, हो भवसागर पार।।

- कल्याणमित्र सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:

ऐकदा एका गृहस्थाने शास्त्यांना ( बुद्धांना ) ऐक प्रश्न विचारला:
शील जास्त महत्वाचे कि प्रज्ञा?
पहिले प्रथम कोण महत्वाचे?

🌞तथागत म्हणतात:
शील हे प्रथम प्राथमिक अंग आहे। ते समाधी ला बलवान / निर्मळ बनवते। समाधी ही प्रज्ञेला बलवान / निर्मळ बनवते। प्रज्ञा ही निर्वाणा साठी उपयोगी आहे। जसे तीन पायांचे आसन।💺

गृहस्थ: एखादे उदाहरण देवून स्पष्ट करावे । 🙏

🌞तथागत म्हणतात: जेव्हा एखाद्या चे दोन्ही हात घाणीने खराब झालेले असतात । तेव्हा तो व्यक्ती सुरुवातीला एक हात (शील) साफ करते. नंतर त्या पहिल्या धुतलेल्या हातानेच दुसरा हात (प्रज्ञा) साफ करते ।
आता दोन्ही हात साफ झाल्यावर तो दोन्ही हात एकमेकांवर रगडून खुप व्यवस्थित पणे एक हात दुसर्या हाताचे व दुसरा हात पहिल्या हाताचे कानेकोपरे अगदी स्वच्छ / निर्मळ करतात। हे दोन्ही हात एकमेकांचे पुरक ठरतात।

अगदी याच प्रमाणे हे गृहस्था, सुरुवाताचे माफक  शील प्रज्ञेला स्वच्छ बनवते। समाधि इथेही एकाग्रते च्या स्वरुपात असते।
 प्रज्ञा मिळाली कि शील आणखीन सहज व मनापासून होते। शील आणखीन पुष्ट झाले कि (समाधि, व समाधि मुळे ) प्रज्ञा  आणखीन स्वच्छ, खोल व गंभीर बनत जाते ।

त्यामुळे 🌷शील - समाधि - प्रज्ञा 🌷 हे धर्माचे परिपूर्ण व परिशुद्ध अंगे एकमेकांना बल देतात व मदतच करतात । त्यामुळे त्यांच्या संगमा शिवाय धर्म व निर्वाण शक्य नाही।

तो गृहस्था प्रसन्न झाला। 😊


भवतु सब्ब मंगलं।

- संबोधन धम्मपथी