Wednesday, 30 June 2021

धम्मचर्चा : स्मृती-अनुस्मृती आणि धम्म-अनुधम्म यात काही फरक आहे की एकच आहेत

  उत्तर: 

अनु म्हणजे मुख्य विषयाचे उप-विषय, उपविभाग किंवा कप्पे  !!  




 उदाहरण : ईमाय धम्मा-नुधम्म(धम्म-अनुधम्म) पटिपत्तिया बुद्धं पुजेमि!!

 धम्म‌ आणि अनुधम्म:
 धम्म‌: शील, समाधि, प्रज्ञा
 अनुधम्म : ३६ बोधिपक्षिय उप-धम्म


 स्मृतीचे दोन अर्थ आहेत.
१. उजळणी/आठवण/memory
२. जागरुकता... awareness/mindfullness  

स्मृती म्हणजे एखाद्या विषयाची उजळणी/आठवण किंवा जागरुकता... awareness !

अनुस्मृती म्हणजे एखाद्या 
(विषयाच्या) स्मृतीच्या(इथे सजगता- सर्व उप-विषयांची विषयाची उजळणी/आठवण किंवा त्या उप-विषयांची जागरुकता... awareness!!!


धम्म अनुस्मृती म्हणजे, धम्माच्या sub-topic ची उजळणी!(अर्थ पहिला)

बुद्धानुस्मृती म्हणजे, बुद्धाच्या sub-topic ची उजळणी!(अर्थ पहिला)

नुसती "अनुस्मृती" (अर्थ दुसरा) म्हणजे स्मृती(विपश्यनेसाठी लागणारी स्मृती व संप्रज्ञान मधील *स्मृती* ) ‌च्या sub-topic (कायानुस्मृती, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृती, वेदनानुस्मृती) ची उजळणी!(अर्थ दुसरा)

भले होवो.
संबोधन धम्मपथी
9773100886
👍🙏

Saturday, 19 June 2021

दान करताना समज व गैरसमज

 प्रश्न १: साधारणतः मनुष्य दान का करतो ?


उत्तर : जेव्हा माणुस दान देतो, तेव्हा वरवर पाहताना असे दिसते पाहा किती परोपकारी व माणुसकीची जाण ठेवणारा माणुस आहे. पण अंतर्मनात स्वतःने पहिले तर कितीतरी वेळा माणसाचा स्वार्थ व भीती असल्याने मनुष्य दाणे देत असतो. आसपासच्या अनपेक्षित व नको असलेल्या खूप दुर्दैवी घटना नकळत घटत असतात. वाईट वाटते, भीती वाटते पण कारण कळत नाही. त्यामुळे मी बैचेन होतो. मी व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) ठीक/सलामत  राहावा यासाठी माझ्या संप्रदायातील पूजापाठ करणारे व वाईट काम न करणारे माणसे असतात. 


त्यांना दान दिले तर माझी पापे कदाचित धुतली जातील व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) सलामत राहतील अशी कल्पना व आशा करतो. एकूणच फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी दान केल्याने ते दान परोपकारी ठरत नाही त्यामुळे त्याचे ते पुण्य मिळत नाही जे परहितबुद्धीने किंवा कल्याणकारी भावनेने मिळते. कारण दान देताना मनात बैचेनी आणि  स्वतःचा व स्वतःच्या संप्रदायाचा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) स्वार्थाची भावना प्रबळ होती. 

प्रश्न २: म्हणजे मनुष्य दान देताना निस्वार्थ भावना असली कि पुण्य मिळते. बरोबर ना?

उत्तर :जरुरी नाही. जसे एका शेतकऱ्याने नापीक जमिनीत खूप मेहनत-मशागत करत बीज पेरली तर त्याला अपेक्षित यश येणार नाही. कारण त्याने जमिनीच्या दर्जावरती अजिबात लक्ष दिलेले नाही किंवा त्याची त्याला पुरेशी माहिती नाही. 


तसेच जर दान स्वीकारणारा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) जर शील पाळणारा सदाचारी नसेन, संयमी, मन विशुद्ध करणारा व लोकांना (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) मदत करणारा नसेल तर अशा अनाडी, आळशी किंवा ढोंगी माणसाला दिलेले दान जरी निस्वार्थ भावनेतुन असले तरी त्याच्या अपेक्षित तेवढा लाभ होत नाही. कारण दान स्वीकारणाऱ्याच्या नैतिक दर्जाबाबत (स्वशुद्धी व सामाजिक जबाबदारीबद्दल) दान देणारा सजग नसतो

प्रश्न ३: मग  बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' असे स्वतःच्या संप्रदायालाच दान करायला का बरे सांगितले असावे?

उत्तर : बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' (धम्मपद २४, ३५४) सांगितले जरूर आहे पण त्या अर्थाचा सध्या अर्थच बदलला आहे. 

पहिली महत्वाची गोष्ट अशी कि बुद्धाने  "तुम्ही एखाद्या शीलवान, कर्तव्यबुद्धी असलेला व इतरांना निस्वार्थपणे मदत करणाऱ्याचा संपूर्ण खात्री  केल्यावर आदर करावा भले तो कुठल्याही जात-संप्रदायाचा असो!" असे सांगितले आहे हे कायम लक्षात ठेवावे कारण बुद्ध वाणी हि सार्वजनिन आहे. सर्वाना लागू पडते व सर्वासाठी मंगलमय आहे. 

☸️ सध्याचा 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' प्रचलित चुकीचा अर्थ:

फक्त एका बौद्ध संप्रदायाचा प्रचार-प्रसारासाठी बौद्ध माणसांनाच(भिक्षु -भिक्षुणी, उपासक-उपासिका) दान‌ करत जा. त्यासाठी केलेली इतर वस्तुंचे दान‌( मुर्ती/पैसा/चीवर/भोजन/औषधे), अशा भौतिक वस्तुंचे दान बौद्ध संप्रदायातील लोंकासाठीच केलेले असते,ते जगातील इतर सर्व दाना‌पेक्षा‌ श्रेष्ठ आहे. ह्या दानाचा बुद्ध वाणी लोकांना सांगण्याशी स्पष्ट संबंध कोणाला ठेवण्याची गरजच‌ वाटत नाही.

हा समज व धोरण चुकीचे व सर्वस्वी अयोग्य आहे!! कारण दान करणारा हा दान स्वीकारणाऱ्या(भिक्षु-भिक्षुणीं-तज्ञ उपासक व तज्ञ उपसिकांकडुन) कडुन माझ्या, माझ्या परिवाराच्या किंवा सर्व  समाजाच्या मन विशुद्धीला आवश्यक असणाऱ्या बुद्धवाणीसाठी कुठल्याच प्रकारची योजना, परोपकाराची अपेक्षा ठेवताना दिसत नाही. 

तशी स्पष्ट अपेक्षा कोणाला ठेवण्याची गरजच‌ बरे वाटत नाही यांचे उत्तर वर प्रश्न #१ मध्ये दिलेलं आहे.

असे दान अंधश्रद्धा बनते कारण त्याने कोणाचे‌ व कुठल्या समाजाचे भले असे होईल असे दानकर्त्याला व दान स्वीकारणाराला सांगता यत नाही. 


तसेच दान स्वीकारणाराची पात्रता एवढीच कि तो बौद्ध संप्रदायाचा आहे!!! हि बुद्धाला अपेक्षित सार्वजनिनता व महाकारुणिकता दिसतच नाही.   


तो किती‌ शीलवान, विशुद्ध मनाचा, परहितबुद्धि जपणारा(धुतांगधारी)  व‌ अधिकृत बुद्धवाणी वाचुन ती सुयोग्य पद्धतीने मानव जातीला  (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) देण्याचं कर्तव्ये करणारा असावा‌ अशी‌ कुठलीच अपेक्षा नसते. त्यामुळे बुद्धाच्या शिकवणुकीबाबत इथे गैरसमज झाल्याने सार्वजनिक बुद्धवाणीला इथे एका बौद्ध समाजापुरते ठेवण्याची मोठी चूक झाली आहे.  

☸️ प्रचलितचुकीच्या अर्थामुळे उद्भवलेली मोठी समस्या :

तुम्ही दान स्विकारुन खालील गोष्टी प्रामुख्याने कराव्यात असे दान देणारा सांगताना दिसत नाही :

१. त्रिपिटकात बुद्धाने केलेले मार्गदर्शन (कुटुंबाला, नेत्याला, कामगारांना, मालकाला, नोकरांना, पती -पत्नींना, मुलांना) वाचुन आम्हास शिकवावे. (म्हणजे परियत्ती)

२.  विपश्यना: ध्यान साधना विधी  समाजाला शिकवण्यासाठी स्वतः विपश्यना साधनेत प्रवीण/एक्सपर्ट होऊन. सद्गुण जीवनात आणण्यासाठी समाजाला जागे करावे. (म्हणजे पटीपत्ती )

जर दान कर्त्याने अशी अपेक्षाच नाहो ठेवली तर दान स्वीकारणारा सुस्तावतो, आळसावतो व जीवनाला बुद्धाने सांगितलेला उद्देश्य नसल्याने (अधिकाधीक लोंकाच्या हित व सुखासाठी दिवस रात्र मेहनत करा - बहुजन हिताय बहुजन सुखाय ) खालील गोष्टी वाया घालवतो :

१. दान देणाऱ्याचा पैसे वाया जातात (कारण पैसे घेऊन कल्याणकारी काम करत  नाही) आणि त्यामुळे त्याला पुण्यही मिळत नाही.  

२. स्वतःचे जीवन निरर्थक किंवा थोतांड बनते

३. बुद्धाच्या महान धम्माची व संघाची अवनती (वाट लावतो)

☸️ 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' चा खरा अर्थ:

धम्म (बुद्धवाणी-म्हणजे शील समाधि प्रज्ञेला अनुसरुन असलेले ३७ बोधिपक्षिय धर्माविषयी निस्वार्थ व परहितबुद्धीने  बुद्धी ने केलेले लेखन/मार्गदर्शन/सेवा/शंकेचे निरसन/ध्यान शिबीराचे आयोजन) दान (मग ते कोणत्याही जाती-संप्रदाय-देशाच्या माणसाच्या विशुद्धीसाठी (मनाला निर्मळ बनवण्यासाठी) असो. हे‌ कुठल्याही प्रकारच्या दानात सर्व‌श्रेष्ठ दान‌ असते.


रण सहस्त्र योद्धा लडे, जीते युद्ध हजार ।

पर जो जीते स्वयं को, वही शुर सरदार ।।


क्षण-क्षण क्षण-क्षण बी ता, जीवन बीता जाय ।

इस क्षण का उपयोग करे बीता क्षण नहीं आय।।  


अशा प्रकारे स्वतःच्या जीवनाचा व इतरांनी दिलेल्या दानाचा सर्व समाजाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करीत असतो. 

भले‌ होवो!!

- संबोधन धम्मपथी.

९७७३१००८८६