जुलै २०२० चा पावसाच्या महिना होता. जगभरात आणि महानगरी मुंबईतही करोना चा टाळेबंदी-लोकडाऊन असूनही करोनाचा कहर दर दिवशी नवनवी उंची गाठत होता. चांगली बातमी तशी दुर्मिळच होती. पण पर्यावरण स्नेहींना टाळेबंदी मुळे कारखाने बंद असल्याने वातावरणातील चांगला बदल दिसत होता. अशा परिस्थितीत सर्व जगातील सर्व प्रकारचे करोना योद्धे (डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सरकार यंत्रणा, पोलीस दल, सफाई कर्मचारी व नियमांचे पालन करणारी जनता) यांना वंदन, अभिनंदन व धन्यवाद देत, मी दोन जुईच्या कळ्यांची गोष्ट मांडत आहे. मानवी मनाच्या विकासासाठी!!
मला फुलझाडे लावण्याची आवड असल्याने विविध फुलझाडे घरात लावतो. काही महिन्यांपूर्वी जुईचे आणले होते. त्याला हळू हळू छान फुलेही येऊ लागली होती. पण त्या रोपट्याला हळू हळू कीड लागली व टीकाही केल्या कमी होईना. फुले यायची हि कमी झाली, तरी माझे नियमित लक्ष होते. काही दिवसानंतर दोन छान नवीन छोट्या कळ्या आल्या व त्यांच्या फांदीचे टोक उन्हासाठी खिडकीच्या ग्रीलच्या बाहेरही जाऊ लागली, मी साहजिकच आनंदी होतो.
पण पावसाने चांगलाच जोर धरला होता, तशी सरकार कडून अगोदर घोषणाही झाली होती. जरी मला पाऊस खूप आवडतो तरी मला आज काळजी वाटत होती ती, ग्रील बाहेर डोकावणाऱ्या माझ्या नाजुक छोट्या कळ्यांची. दिवसभर चांगल्याच पाऊस पडला, त्या कळ्या जबरदस्त पावसाचे तडाखे खात दिवसभर जीव संभाळून/धरून होत्या . पण रात्री पाऊस जोरदार वाढला, कळ्यांना खूप तडाखे बसत होते व मी ते कोणालाही न सांगता शांतपणे पाहत होतो. मी त्यांना घरात नाही घेतले, कारण मला अपेक्षा होते कि निसर्ग-प्रकृती ने त्या कळयांना "बहुतेक" वादळी पावसापासुन जगण्याचे शिकवले असणार. मला त्या कळ्यांचे धैर्य किती आहे हे हि पाहायचे होते, आणि जोरदार रात्रीच्या पावसात मी अंदाज लावला कि, आज हि बहुतेक त्यांची शेवटची रात्र असणार. ताळेबंदीतील सुधारलेल्या पर्यावरणात पावसाचा तडाखा नेहमीपेक्षा जास्तच होता. मी दिवसभर पावसात राहून थकलेल्या त्या कळयांना अभिनंदन व शुभेच्छांसह शेवटचा निरोपही देऊन निराश होऊन झोपून गेलो.
सकाळी उठलो आणि पहिला कळयांना पाहायला गेलो, हलका पाऊसही पडत होता आणि कळयाही डोलत होत्या. मला खूप आनंद झाला, कारण माझा अंदाज चुकला होता. त्या कळयांना अजूनही धैर्य होते. मी कोणासही काहीच बोललो नाही दुसराही दिवस आणि रात्र तशीच वादळाची होती. साधारणतः तिसऱ्या दिवशी जुईच्या काळ्या फुलल्या, मी तर खुपच खुश होतो. माझा आनंद परिवाराला सांगितला.
नंतरचे दोन दिवस त्या कळ्या सुंदर सुवासिक फुल झाल्या. समाधानाने हसत त्यांनी खूप सुगंध दिला व प्रसन्नता हि दिली. साधारण तिसऱ्या दिवशी, त्यांच्या पाकळ्यांतील गंध आणि सौन्दर्य कमी झाले. आणखीन २-३ दिवसांनी त्यांना धरणीने कुशीत घेतले, कळ्यांचे कठीण जीवन पुर्ण झाले. त्या कल्याणी माझ्या मनात घर केले होते, आणि त्या झाडाकडे पाहताना मला त्या कल्यानेहमी आठवायचा. नवीन १- २ आठवडे काही नवीन कळ्या आल्या, त्यांचीच आठवण घेऊन तेव्हा मात्र वादळी पाऊस नव्हता. पण नंतर मात्र एकही कळी नाही आली. त्या झाडाला खूपच कीड लागली होती, मी अनेक वेळा नवनवीन उपाय योजुनही लाभ नाही झाला. माझ्या मनात अजूनही त्या वादळी पावसातील त्या दोन कळ्यांचा गंध होता. आणि त्या गंधापेक्षा जास्त त्यांचे परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि थोड्याश्या आयुष्यातही त्यांचे हसरे चित्र (ज्याने मला निर्वाणाचा नवा आयाम दाखविला) .
नंतर कळत-नकळत तीन महिन्यानंतर माझ्या स्वतःच्या मनालाही खूप कीड लागली. मी खूप उदास झालो, आसपासची आर्थिक व सामाजिक परिस्थिती, कामगार-मजुरांचे हाल, खाजगी-सरकारी बंद होणाऱ्या नोकऱ्यांची बातमी; मी वास्तविक खूप व्यथित झालो. जणु काही उदासीन घटनांची मालिकाच समोर आली. माझा परीने मी काही समाजाच्या घटकांना व सरकारला जरी अर्थसाहाय्य केले आणि जमेल तसे(अनियमित) ध्यान करत मंगल मैत्री हि दिली, तरी माझे मन खूप विषान्न व बैचेन झाले होते. वाटत होते कि मि भारताचा सुशिक्षित-सुस्थापित नागरिक म्हणून खूप कमी पडत आहे.
मला एकुण भारतीय समाजाच्या विविध गरीब, दुर्लक्षित असहाय्य्य, असुक्षित व असंघटित वर्गाच्या भवितव्याने अस्वस्थ झालो. कुठेही काही अशी बातमी दिसत नव्हती कि ज्याने हा वर्ग स्वावलंबी बनेल किंवा त्यांची येणारी पिढीला किमान शिक्षण-आरोग्य-नोकरीच्या सेवा कशी मिळेल हे काही कळत नव्हतं. काही लोकां-मित्रांकडे मी बोलूनही दाखवले, पण ना उपाय मिळाला ना धैर्य ना आशा!! तिघांपैकी काहीतरी एक तरी मिळायला हवे होते.
तेव्हा आदरणीय मेत्ताधम्मो भंतेजींशी बोलताना मला स्वतःला आठवण आली ती ह्या जुलै महिन्यातील दोन कळ्यांची!! मी त्यां कळ्यांची सगळी परिस्थिती आठवली. त्यातून मला धैर्य व आशा हि मिळाली जी ह्या समाजाच्या विविध गरीब, दुर्लक्षित असहाय्य्य, असुक्षित व असंघटित वर्गालाच नाही तर कुठल्याही दुःखी -उदास मनाला प्रेरणा देईल; जशी मला मिळाली.
काही कळालेली तत्वे आणि कळ्यांचे वास्तव (मानवाच्या समस्येवरील उपायांसाठी) मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे :
१. आता संकट जीवघेणे आहे आणि अपेक्षित काम होणार नाही असे जेव्हा वाटते, तेव्हा तसे होईलच असे जरुरीचे नाही.त्या दोन जुईच्या कोमल कळ्यांनी वादळी पावसात मनाला नियंत्रित/प्रशांत करीत धैर्याचे व धाडसाचे दर्शन घडविले होते. ( क्षांती पारमिता ).
२. जेव्हा असे वाटते कि, "हे मला शक्य होणार नाही, मीही कधी हि केलेले नाही. मला जमणारच नाही!", तेव्हा अपयशाशिवाय मला काही मिळुच शकत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना कसलाच अनुभव नसतानाही वादळी पाऊस सहन केला होता, निसर्गाला/रोपट्याला अपेक्षित यश संपादन केले होते. ( अधिष्ठान पारमिता ).
३. आपल्यातील ताकत ही तेवढीच असते जेवढी आपण ती आपल्या सत्कर्म व धैर्याद्वारे कमावतो. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांनी आपल्या प्रगतीसाठी स्वतःची क्षमता वाढवत(वीर्य पारमिता ) उन्हात राहून टाकत कमविली होती. तसेच रोपट्याचा उंच शेंड्याला जरी पोचले तरी, मातीतुन क्षार मिळवण्याचे कष्ट करणारी मुळे व स्वतःचे वजन पेलणाऱ्या स्वतःच्या पुर्वजांचे आभार व संलग्नता (नाते ) सोडले नाही (उपेक्षा पारमिता ). जरी त्या कळ्या खूप उंचीवर पोहोचल्या तरी, आपले समाजबांधव (पाने, खोड व कधीही न दिसणारी मुळे) यांना आपल्या मिळकतीचा वाट (निष्क्रमण: बाहेर पडत उन्हात राहुन सूर्याकडून मिळालेली शक्ती) अखंडींतपणे पोहोचवली(मैत्री व दान पारमिता ).
४. नशिबाला न जुमानता आसपासच्या वाईट/विपरीत परिस्थितीतही तुम्ही दिव्य काम करू शकता. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांनी हे दाखुवुन दिले कि जरी बहुतेक झाडाला जरी कीड लागली असली तरी, तुम्ही स्वतःला स्व-शुद्धी प्रक्रियेनुसार निरोगी ठेवून अशक्य असे काम करू शकता ( शील पारमिता ).
५. परिस्थिती समोर हार मानण्यापुर्वी जो जो क्षण येईल, त्या त्या क्षणाला विचारपूर्वक व अनित्यबोध जागवत आहे तेवढे जीवन सुखी करू शकता. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना याची कल्पना नव्हती कि पाऊस त्यांना जगू देईल कि नाही, त्यांना फुलात येईल कि नाही, अजून किती वेळ कठीण काळ आहे कि नाही. त्यांनी याचे उदाहरण दिले कि, कुठलीही परिस्थिती कायम राहत नाही, बदलत असते. पाऊसही नेहमी(दर क्षणाला) पडणार नाही. त्यांनी हे शिकले कि दर ५-१० सेकंदानंतरच पावसाच्या थेंबाचा तडाखा बसतो, तेवढ्यात मी आणखीन संयम व धैर्य कमविन. अनित्यबोध परिस्थितीद्वारे प्रत्येक क्षणी सजग राहत समजुन घेईल( प्रज्ञा पारमिता तसेच आतापी - स्मृतिमान-संप्रज्ञानी हा बुद्धांचा निर्वाणप्राप्तीचा फॉर्मुला!!).
६. जर माझ्या कुटुंबाला/समाजाला कीड लागलेली असताना, मी माझ्याद्वारे माझ्या रोपट्याची/समाजाची उपयोगिता जसे सुवास/प्रसन्नता/चारित्र्य दाखवु शकलो तरच माझे रोपट्याचे/समाजाच्या प्रति कर्तव्य/ऋण फेडु शकेन. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना याची कल्पना होती कि, जर रोपट्याला कीड लागली व त्याला आता पूर्वीसारखी फुले येत नाही तर अशा रोपट्याचे जीवन संकटात येते. त्यामुळे त्याने रोपट्याची गुणवत्ता/उपयोगिता सिद्ध करण्यासाठी व आपल्या इतर समाजबांधवांवरील(पाने, खोड व कधीही न दिसणारी मुळे) संकट टाळण्यासाठी वादळाशी दोन हात करत रोपट्याची गुणवत्ता/उपयोगिता सिद्ध करीत जमेल तेवढे करून दाखविले. रोपट्याची गुणवत्ता खरी ठरविली ( प्रज्ञा, दान, करुणा, वीर्य, अधिष्ठान, सत्य, निष्क्रमण पारमिता )
७. जरी आज यश दिसले व सुबत्ता, सौन्दर्य व यौवन असले, तरी आपल्या यशातील वाटेकरी इतर समाजबांधव (पाने, खोड व कधीही न दिसणारी मुळे) यांना विसरून अभिमानाने आंधळे होऊ नये. कारण जसा पाऊस अनित्य होता, तसे सोंदर्य-यौवनही अनित्य/नश्वर/क्षणभंगुर आहे. विनम्रता व समाधानाच आनंद चेहऱ्यावर नेहमी ठेवावा. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य २-३ दिवसांचे मर्यादित होते. पण विनम्रता, कृतज्ञता, निरागसता (एकूणच मनाची शुद्धता) व समाधानाच्या आनंदाचा गोडवा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आपोआप(प्रकृतीद्वारे) राहिला . फुल बनल्यावर तिसऱ्या दिवशी कोमलता, सौदर्य व सुवासिकता हळू -हळू सोडून गेली. पण ना हिरमोड झाला, ना वैषम्य आले आणि ना वैफल्यग्रस्तपणा आला. मातीच्या कुशीत झोपताना, खूप सुख-खूप समाधान-खूप सफलता मिळाली. ती मृत्यु च्या वेळी त्यालाच मिळते ज्याला निर्वाण प्राप्त होते.
८. जरी जीवन संपले तरी, सद्गुणी, मेहेनती, परोपकारी जीवन अनेकांना सध्दर्माची व उंच्चतम गुणवत्तेची(मानवी मूल्यांची) प्रेरणा देते. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य संपले व ४-५ दिवसानंतर नवीन एकही कळी आलेली नाही. पण त्या दोन मुलींनी/कळ्यांनी मला आजही प्रेरणा दिली(करोना नंतरच्या आर्थिक/सामाजिक स्थितीशी झुंजण्याची व त्या सुवासिक जुईच्या रोपंटच्या गुणवत्तेची हमी/खात्री दिली( करुणा पारमिता . ती खात्री/विश्वास एवढा आहे, कि आज ४ महिन्यानंतरही एकहि कळी आलेली नसतानाही मी त्या झाडाला वाऱ्यावर सोडले नाही. नेहमी काळजी घेत आहे. ही आशा व विश्वास आहे, कि त्या दोन नाजूक जुईच्या कळ्यांसारखी झुंजार, लढाऊ, परिवाराशी संलग्न राहून काळजी घेणारी, सद्गुणी, चारित्र्यवान व सुंदर फुले येतील. भले आज नाही तर उद्या अवश्य येतील. कारण ते रोपटे अजून जीवंत आहे, त्याची हिरवी पाने, निब्बर/(जे दिसायला सुंदर नाही) खोड व जमिनीखालील मुळे (जी फुलांसारखी सुंदर नाहीत) अजून मेहनत करीत आहेत, व आशावादी आहेत. एक दिवस प्रकृती/निसर्ग साथ देईन. ती किंवा त्याच्यासारखी धैर्यवान, सुवासिक अशी गुणवत्ता असलेली फुले येतील.
८. जमेल तेवढे, जमेल तसे आणि जमेल तेव्हा धैर्यपुर्वक, निस्वार्थ आणि सुयोग्य कामे करीत राहा. कोण जाणे तुमचे आशावादी, निर्दोष आणि निरोगी जीवन इतरांना जगण्याची नवी दिशा देईन. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य संपले जे आशावादी, निर्दोष आणि निरोगी जीवन होते. त्या जीवनाने इतर कळ्यांना नवी उमेद दिली. मलाही शिकविले कि , कण्हत /कुढत/नाराज होत जगण्यापेक्षा काय करता येईल तेवढे पहा आणि करा. आपण वादळ किंवा पाऊस रोखु शकत नाही, पण आपल्याकडे असणारी सुविद्या, जिद्द, आशावाद आणि निर्दोष जीवन जगुन जीवनात
त्या दोन नाजूक पण "कल्याणी" कळ्यांनी मला प्रचुर प्रेरणा व आशा दिली. त्या दोन कळ्यांची जीवनकहाणी पाहता आसपासची आर्थिक व सामाजिक परिस्थिती, कामगार-मजुरांचे हाल, खाजगी-सरकारी बंद होणाऱ्या नोकऱ्यांची बातमी अशा अनेक समस्यांवर सध्दर्माच्या मार्गदर्शनाने ( दहा पारमिता किंवा एकूण ३७ बोधिपक्षीय धर्म ) गोरगरीब-शोषित-(पुढारी नसल्याने ) अनाथ समाजघटक पुन्हा आशा व धैर्य वाढवीत त्यांचे व त्यांच्या पुढील पिढीचे जीवन सुखी-शांतीपूर्ण-समाधानी करू शकतील.
अनेक वादळे-संकटे-कीड येवोत, जोपर्यंत अशी फुले/कळ्या छोट्याश्या जीवनातही सहजता व सफलता दाखवतील, ते बळ देतील इतर कळ्यांना (सुस्थापित वर्ग ) समाजबांधवांना ( (पाने, खोड व कधीही न दिसणारी मुळे म्हणजे अप्रगत/विस्थापित सामाजिक वर्ग ) !! ) विजय होवो त्या धैर्याचा, संयमाचा, समाजाच्या प्रति कृतज्ञतेचा, परहितबुद्धीचा व आंतरिक शुद्धीचा !! हाच आहे आशेचा किरण, कठीण दिवसात.
भले होवो त्या कळ्यांचे व त्याच्या स्वहीतबुद्धीचे तसेच परहितबुद्धीचे !!
संबोधन धम्मपथी
मोबाईल: ९७७३१००८८६