लोकाभिमुख प्रश्नोत्तराच्याद्वारे नियमित धर्मचर्चेचे आयोजन व नियोजन प्रणाली
सद्धर्म प्रेमी साधक व साधिकांहो नमस्कार. परियत्ती म्हणजे धम्म कथांचे वाचन ध्यानात करताना (पटीपत्ती) तसेच निपुण होण्यासाठी (पटीवेधन) खूप आवश्यक असते असे कल्याणमित्र गोएन्काजींनी अनेको वेळा सांगितलेले आहे. धम्मकथांचं वाचन करताना अनेक कठीण प्रश्न, शंका, व द्विधा मनस्थिती समोर येते. अशा वेळी आवश्यक मार्गदर्शन तत्परतेने व सुयोग्य पद्धतीने न मिळाल्यास निराशा, कंटाळा व अपेक्षाभंग होतो. मग अशा वेळी कुठे जावे व कोणाला प्रश्न विचारावे?
सध्या बुध्दविहारात जाणारे बहुतेक माणसे हि प्रामुख्याने बौद्ध संप्रदायातील असतात. पण आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएन्काजीं, आदरणीय महास्थवीर दलाई लामांद्वारे शुद्ध बुद्धवाणी लोकांपर्यंत पोहोचल्याने नवनवीन माणसे जी बौद्ध नाहीत, ती ही अबौद्धच राहूनही बुध्दवाणी व विपश्यना (प्रॅक्टिकल लाभ) कडे आकर्षित होऊ लागली आहेत. मुळात बुध्दवाणी समस्त मानवकल्याणासाठी असून तिला फक्त एका बौद्ध संप्रदायासाठीच आहे असे मानणे, म्हणजे तिला संकुचित/छोटे करण्यासारखे आहे.
बुद्धवाणी हि पूर्णतः सार्वदेशीक, सार्वकालीन व सार्वजनिक च आहे, ती फक्त बौद्धांसाठीच आहे हा आपला मोठा हीन व जुना भ्रम आहे. त्यामुळे आता बुद्धविहारात नवनवीन संकल्पनांवर आधारित सार्वजनिक उपक्रम (जसे नियमित धर्मचर्चा, विपश्यना ध्यान सत्रे व धम्म प्रश्नोत्तरे नियोजन) ज्याने ज्ञानाची तहान पूर्ण होईल, अशा पद्धतीने राबवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय व्यक्तीला धम्मात ओढा, रस किंवा उत्साह वाढेल, अशांती दूर होईल असे मानणे निव्वळ अंधश्रद्धाच आहे असे मी मानतो. नुसत्या बुद्ध वंदनेने जनतेची जिज्ञासा अपूर्णच राहील, बैचेनी दूर होणार नाही; यामुळे बहुदा एकूणच बुद्धवाणीच्या वैयक्तिक लाभ सदैव अस्पष्टच राहिला आहे.
बुद्धवाणी हि पूर्णतः सार्वदेशीक, सार्वकालीन व सार्वजनिक च आहे, ती फक्त बौद्धांसाठीच आहे हा आपला मोठा हीन व जुना भ्रम आहे. त्यामुळे आता बुद्धविहारात नवनवीन संकल्पनांवर आधारित सार्वजनिक उपक्रम (जसे नियमित धर्मचर्चा, विपश्यना ध्यान सत्रे व धम्म प्रश्नोत्तरे नियोजन) ज्याने ज्ञानाची तहान पूर्ण होईल, अशा पद्धतीने राबवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय व्यक्तीला धम्मात ओढा, रस किंवा उत्साह वाढेल, अशांती दूर होईल असे मानणे निव्वळ अंधश्रद्धाच आहे असे मी मानतो. नुसत्या बुद्ध वंदनेने जनतेची जिज्ञासा अपूर्णच राहील, बैचेनी दूर होणार नाही; यामुळे बहुदा एकूणच बुद्धवाणीच्या वैयक्तिक लाभ सदैव अस्पष्टच राहिला आहे.
ही ज्ञानजिज्ञासा परिपूर्ण न होण्याचे प्रमुख खालील करणे आहेत.
१. धम्मप्रवीण व विपश्यनायुक्त ज्ञानी, थोडक्यात, उदाहरणासह व मुद्देसूद उत्तरे देणारा व्यक्ती न मिळणे.
२. विहारात लोकांना हवे असलेल्या विषयाची, धम्म-सुत्ताची/बुद्धवचनावर आधारित प्रश्न विचारायची सुविधा नसणे.
३. एखाद्यावेळेस जरी सुविधा प्रश्न -उत्तराची सुविधा असली तरी, विहारात लोकांना हवे असलेल्या विषयाची, धम्म-सुत्ताची/बुद्धवचनाची किंवा प्रश्नांची समाधानकारक/सुयोग्य उत्तरे न मिळणे.
३. एखाद्यावेळेस जरी सुविधा प्रश्न -उत्तराची सुविधा असली तरी, विहारात लोकांना हवे असलेल्या विषयाची, धम्म-सुत्ताची/बुद्धवचनाची किंवा प्रश्नांची समाधानकारक/सुयोग्य उत्तरे न मिळणे.
बुध्दविहारातील कार्यतत्पर कमिटी कडून अशी प्रमुख आशा आहे कि त्यांनी याची उत्तम, निरंतर, सार्वजनिक व सुनियोजित अशी प्रणाली राबवावी.
विभाग १: प्रश्नउत्तराच्या प्रणालीची व्यवस्था :
१. प्रणालीद्वारे बुद्ध विहार कमिटीने अभ्यासू/जिज्ञासू लोंकाचे सल्ले व प्रश्न दोन्ही विश्वासु पद्धतीने सोडविता आले पाहिजे किंवा समाधान करता आले पाहिजे. अशा प्रकारे समाधान झाले पाहिजे कि त्या व्यक्तीला अधिक ज्ञान ग्रहण करण्याची व धम्मविकासासाठी बुद्ध विहारासोबत जोडून राहण्याची गरज वाटावी .
२. सल्ले व प्रश्न देणाऱ्याच्या नावाची गुप्तता राखून त्याचा विश्वास संपादन करता यावा. कारण, हे तेच लोक आहेत, ज्यांच्या पर्यंत धम्म सुयोग्य पद्धतीने पोहोचवण्याची जबाबदारी बुद्धाने त्यांच्या शिष्यावर(म्हणजे आपल्यावरच) दिलेली आहेत. बुद्धांनी ही ती स्वतः हि पूर्ण केली होती
३. ही प्रणाली निरंतर/नियमीत कार्यरत असावी जेणेकरून सल्ला व प्रश्नांची उकल होऊन पुढची पायरी गाठून, त्यांच्या विश्वास जिंकून, त्यांना धम्मात प्रगत बनवून सुखी बनण्यास मदत व्हावी. मग तदनंतर बहुजन हिताय व बहुजन सुखाय उद्देश्याने, धम्म प्रसाराच्या कामात त्यांना एक्सपर्ट/प्रवीण बनविता यावे.
४. नियमितपणे साधारण दर महिन्यातून एकदा किंवा दर दोन महिन्यातून एकदातरी हे सर्व सल्ले/प्रश्न विहार कमिटीने तज्ज्ञांच्या समोर व धम्म श्रोत्यांच्या ज्ञान वाढीसाठी धर्मचर्चे द्वारे घ्यावे.
५. प्रश्न विचारायचा छोटासा फॉर्म असेल तर खूपच छान होईल. त्याद्वारे, प्रश्न विचारणारचा वय, शिक्षण, व्यवसाय, लिंग, व मुळ प्रश्न विचारता येईल. या माहितीवर व उदाहरणासह दिलेले उत्तर परिपूर्ण व कल्याणकारी ठरेल.
४. नियमितपणे साधारण दर महिन्यातून एकदा किंवा दर दोन महिन्यातून एकदातरी हे सर्व सल्ले/प्रश्न विहार कमिटीने तज्ज्ञांच्या समोर व धम्म श्रोत्यांच्या ज्ञान वाढीसाठी धर्मचर्चे द्वारे घ्यावे.
५. प्रश्न विचारायचा छोटासा फॉर्म असेल तर खूपच छान होईल. त्याद्वारे, प्रश्न विचारणारचा वय, शिक्षण, व्यवसाय, लिंग, व मुळ प्रश्न विचारता येईल. या माहितीवर व उदाहरणासह दिलेले उत्तर परिपूर्ण व कल्याणकारी ठरेल.
![]() |
सर्वांसमक्ष प्रश्न-सल्ला पेटी असावी |
विभाग २: सल्ला-धम्मप्रश्न स्वीकारण्याची प्रणालीची पद्धत :
१. जसे टाळा लावून समोरच ठेवलेली दानपेटी असते, तशीच वेगळी टाळा लावून समोरच ठेवलेली सल्ला व प्रश्न पेटी असायला हवी.
२. प्रश्नाचे उत्तर किती दिवसाच्या आत, कोणत्या धम्मतज्ञाकडून (भंतेजी /उपासकाचे नाव ), व लेखी कि तोंडी स्वरूपात हवी, स्वतःचे नाव प्रकाशित किंवा गुप्त असावे ते बुद्ध विहार कमिटीला कळविता आले पाहिजे.
३. कल्याणकारी व हितकारी सल्ला व प्रश्नाला कौतुक किंवा छोटेसे बक्षीसही देता यावे.
४. ज्या प्रश्नाने लोक कल्याण होत नाही असे प्रश्न सर्व कमिटीच्या संमतीने रद्द करता यावे, पण त्याचे कारण उपस्थित जनतेला कळवावे.
५. प्रत्येक सत्राला एक विषय मर्यादा असते, हे सत्र बुद्ध वाणीचे असल्याने त्यात नौकरी-व्यवसाय, वैयक्तिक मार्गदर्शन, राजकीय-सामाजिक घडामोडीवर आधारीत विषय धम्माचरणाच्या अनुषंगाने आले तरी त्यावरील चर्चेस प्रमाणापेक्षा अधिक वेळ देऊ नये. वैयक्तिक विकासावर लक्ष असावे, विवादामध्ये नाही.
६. धम्म प्रश्न विचारणाऱ्याला स्वतःचे नाव गुप्त ठेवण्याची सोय व प्रत्येक प्रश्न विचाराधीन असल्याची खात्री आयोजन कमिटीमार्फत करून घेता येण्याची तजवीज/सोय असावी .
विभाग ३: सल्ला-प्रश्नाला उत्तर देण्यासाठी धम्मतज्ञाची/कल्याणमित्राची निवडीची पद्धत :
१. धम्म तज्ज्ञाकडे देश-परदेशातील विविध भिक्षु व उपासकांच्या धम्म संशोधनाचे/पुस्तकाचे ज्ञान असावे .
२. तो विपश्यना साधक असून वेळोवेळी साधना करत असावा व त्याच्या वागण्या-बोलण्यातून कल्याणमित्रतेची खात्री करता यावी .
३. तो कल्याणमित्रांचे (जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर , सत्यनारायण गोएन्काजी, महास्थवीर दलाई लामा, महास्थवीर भिक्षु नारद ) प्रश्नोत्तरांच्या सत्राचे उत्तम अभ्यासक असावा. तसेच यापूर्वी इतरांना धम्म विषयक सल्ला-प्रश्नउत्तरे देण्याचा अनुभवही असल्यास उत्तम
४. कल्याणमित्रास प्रश्नाचे स्वरूप, प्रश्न विचारणाऱ्यांचा उद्देश, त्याची बुद्धिमत्ता, त्याची शिक्षण-व्यावसायिकता याच्या आधारे मुद्देसुद पण (आजच्या युगातल्या व सोप्या ) उदाहरणाद्वारे उत्तरे देता यायला हवे.
५.विविध प्रकारच्या प्रश्नाला स्वतः बुद्धांच्याच पद्धतीने विविध प्रकारांद्वारे [१. फक्त एका वाक्यात, २. विनम्रतेने प्रतिप्रश्न विचारून, ३, विस्तारित स्पष्टीकरणाद्वारे ४. (उद्धट/अज्ञ लोकांना) उत्तर न देता शांत राहून ] देण्यात तरबेज असावा.
६. त्याचे प्रश्न विचारणाऱ्याकडे पूर्ण लक्ष असावे, प्रश्न समजून, प्रश्नाच्या मागचा उद्देश्य समजून, प्रश्नाच्या उत्तरासाठी लागणारा कालावधी समजून-उमजून उत्तर देण्याचे कौशल्य असावे .
७.कल्याणमित्रास जर उत्तर येत नसेल तर ते विनम्रतेने कबुल करून, उत्तरासाठी वेळ मागुन उत्तर मिळविण्यासाठी संशोधन करण्यास तो तयार असावा. उलटपक्षी वाईट वाटून घेणारा /नाराज होणारा कल्याणमित्र नको, कारण सगळ्याच ८४,००० बुद्ध वचनांचे ज्ञान इथे बहुतेकांना नाही.
८.कल्याणमित्रास अंगुत्तर निकाय / दीघ निकाय सारख्या ग्रंथातील विविध सुत्तांचा/कथांचा सुयोग्य अभ्यास करण्याचा उत्तम अनुभव असायला हवा.
९.कल्याणमित्राचे मराठी व हिंदी भाषेवर छान प्रभुत्त्व असावे
१०. त्याचे व्यक्तिमत्व कुशल, दाढी-मिशा-केस सुयोग्य हवे, बोलण्यात माफक, कपडे नीटनेटके व इस्त्री केलेले, स्वभाव विनम्र, मोबाईल फोन चा प्रमाणात/काटकसरीत वापर असायला हवा.
११. स्वतःचे मत लादण्यापेक्षा दुसऱ्याच्या मेंदूला चालना देऊन प्रवृत्त करण्यावर त्याचा अधिक भर असावा . कला विकसित असायला हवी.
१२. कार्यक्रमाच्या ठराविक वेळेत थांबण्याची तयारी व संयम असावा.
१३. ज्या विषयाने दोन व्यक्तित, दोन जातीत किंवा दोन संप्रदायात (जसे हिंदू, बौद्ध मुस्लिम इत्यादी ) ताण व द्वेष-दुर्भावाना वाढेल असे प्रश्न, उत्तरे व विषय घेऊ नयेत.
१४. कुठल्या विषयाला लोककल्याणाच्या/लोकहिताच्या किती महत्व व वेळ द्यावा याची बुद्धिमत्ता असायला हवी.
१५. पाली भाषेचे ज्ञान असले कि छान पण, भाषेचे ज्ञान असले कि व्यक्ती हुशार, चतुर व धम्मनिपुण असेलच हे अजिबात गरजेचे नाही. उदा. मराठी भाषा येत असलेला असलेला प्रत्येक व्यक्ती बुद्धिमानच असेलच असे गरजेचे नाही
विभाग ४: लोकांकडून मिळालेल्या सल्ला-प्रश्नांची निवड प्रक्रिया :
१. हा प्रश्न बहुजन हिताय व बहुजन सुखाय दृष्टिकोनातून आवश्यक आहे.
२. ह्या प्रश्नाने दोन व्यक्तित, दोन जातीत किंवा दोन संप्रदायात ताण व द्वेष-दुर्भावाना वाढणार नाही.
३. जो प्रश्न जास्तीत जास्त लोकांना लाभदायक आहे व कल्याणकारी आहे असा प्रश्न अगोदर घ्यावा.
४. जो प्रश्नाचा उद्देश्य विनम्रतेने ज्ञान मिळवणे हा नसून, निव्वळ दुसऱ्याचे ज्ञान तपासणे हा आहे असा प्रश्न घेऊच नये.
५. जो प्रश्न धम्म आचरणाच्या (जीवनात अंगिकारण्याच्या) दृष्टीने लाभदायक आहे असा प्रश्न अगोदर घ्यावा.
६. बैचेनी, अनैतिक संबंध, आत्महत्या किंवा भीती अशा प्रश्नांना योग्य धम्मातज्ञ व योग्य वेळ व जास्त महत्व द्व्यावे.
७. पुर्नजन्म बाबत प्रश्न जे सिद्ध करणे अशक्य आहेत, अशाना कमी महत्व किंवा जास्त तयारीनिशी दुसरे विशेष सत्र घ्यावे.
८. जर प्रश्न विचारणाऱ्याला स्वतःबद्दल गुप्तता बाळगायची असल्यास पूर्ण आदरासह ती गुप्त प्रश्न सोडविता यावा.
९. प्रश्न निवडण्याची प्रक्रिया म्हणजे प्रश्न का नाही घेतला तेही स्पष्ट करावे.
९. प्रश्न निवडण्याची प्रक्रिया म्हणजे प्रश्न का नाही घेतला तेही स्पष्ट करावे.
![]() |
आदरासह विचार विमर्श करणारे असावेत |
विभाग ५. व्यासपीठावर सल्ला-प्रश्नाला उत्तर देण्यासाठी धम्मतज्ञाची/कल्याणमित्राची नियम :
१. दुसऱ्या धम्मतज्ञाला उत्तर देण्याची संधी मिळाल्यास, जोपर्यत मतप्रदर्शनाची विनंती येत नाही तोपर्यंत स्वतः मध्ये बोलू नये. अगोदर नियोजित दुसऱ्या तज्ञाचे विचारप्रदर्शन पूर्ण व्हावे, मग नियंत्रकाला विचारून मत मांडावे.
२. दुसऱ्याच्या मताचा आदर करावा, कारण एखादे संदर्भ/मुद्दा/दृष्टीकोण/विचारप्रणाली एकूण ८४,००० बुद्ध वचनांपैकी तसेच आपल्यापेक्षा योग्य किंवा आपल्यासाठी नवीन नक्कीच असू शकते .
३. आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या धम्मतज्ञाला उत्तराचा संदर्भ विनम्रतेने विचारून घ्यावा.
४. स्वतःचे उत्तर ३-४ मिनिटात आटोपशीर ठेवावे व उत्तर मद्देसुद असावे.
५. उत्तरासाठी दिलेला वेळ संपण्याची बेल वाजली, कि तिला मान देऊन निष्कर्ष सांगत शांत बसायला हवे.
६. मोबाईल बंद किंवा प्रशांत स्थितीत असणे बंधनकारक आहे, कार्यक्रमाच्या वेळेत फोन घेण्यास मनाई आहे; भन्तेजींना ही पूर्ण मनाई आहे. एकूणच फोनचा आवाज व व्यत्ययही नको आहे.
७. इतर संप्रदाय (हिंदु, मुस्लिम व अन्य ) व जाती-प्रजाती बद्दल नावे/दुषणे ठेवणे , ईर्ष्या-मत्सर बाळगुन बोलणे नको आहे.
८. भंतेजीना आवश्यक तेवढा आदर नक्की द्यावा पण प्रत्येक वेळेस भंतेजी म्हणतील तीच पूर्वदिशा अशी अंधश्रद्धा बाळगून जनतेचे विचार स्वातंत्र्य धोक्यात आणू नये.
९. एखाद्याचा मुद्दा परिपूर्ण योग्य वाटला तर साधू-साधू -साधू बोलावे अन्यथा शांत बसावे.
१०. एखाद्याचा मुद्दा न पटल्यास/अयोग्य वाटल्यास तिथेच सर्वांसमोर खोदून काढू नये, सबुरीने घ्यावे व कार्यक्रमानंतर त्या व्यक्तीस ग्रंथांचे संदर्भ किंवा तर्कशुद्धता पटवून सांगण्याचा विनम्र प्रयत्न करावा.
नोंद : हा नियम बुद्धांनीच दिला आहे.
व तसेच विषय गंभीर असल्यास आयोजकांना त्याची लेखी/तोंडी योग्य माहिती जनकल्याण्यासाठी द्यावी; स्वतःचे मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नाही.
११. उत्तर दिल्यावर समाधान झाले का , याचीही खात्री करावी. झाले नसल्यास पुन्हा प्रयत्न करावा किंवा दुसऱ्या तज्ज्ञाला उतररसाठी विनंती करावी
नोंद : हा नियम बुद्धांनीच दिला आहे.
व तसेच विषय गंभीर असल्यास आयोजकांना त्याची लेखी/तोंडी योग्य माहिती जनकल्याण्यासाठी द्यावी; स्वतःचे मोठेपणा सिद्ध करण्यासाठी नाही.
११. उत्तर दिल्यावर समाधान झाले का , याचीही खात्री करावी. झाले नसल्यास पुन्हा प्रयत्न करावा किंवा दुसऱ्या तज्ज्ञाला उतररसाठी विनंती करावी
इथे फक्त खालील प्रकारची पात्रे आहेत.
१. धम्मतज्ञ/कल्याणमित्र: जास्तीत जास्त फक्त १-३ धम्मतज्ञ/कल्याणमित्र हवे. भिक्क्षुच असावे असा अट्टाहास नाही. ध्यानप्रवीण, अभ्यासु, विनम्र व मुद्देसूद मांडणी करणारा असावा.
२. निवेदक: एक प्रश्न व्यक्ती धम्मतज्ञ/कल्याणमित्रांना प्रश्नावलीतून प्रश्न देणारा. प्रश्नाचे मूळ उत्तर न मिळाल्यास प्रश्न विविध प्रकारे विचारणारा चतुर व्यक्ती.
३. नियंत्रक : प्रश्नासाठी वेळेची मर्यादा देणारा, विषय भरकटल्यास संदेश देणारा, एकूण प्रश्नांची संख्या ठरवणारा बुद्धिमान, खंबीर, सूचक पण विनम्र व्यक्ती असावा.
४. धम्म श्रोतागण : हि अशी मंडळी आहेत ज्यांना विविध प्रश्न, विषयावर धम्म ज्ञान व परामर्श हवा आहे. विवाद/झगडा करण्याचा उद्देश्य नसणारी हवीत. हि सर्वात महत्वाची मंडळी असून, जर याना मानपूर्वक नाही वागविले तर तुम्ही धम्म दान देणार कुणाला? व नंतर तुमच्या धम्म कार्यक्रमाला येणारच कोण व का ?
५. धम्मसेवक: काही धम्मसेवक जे नवीन येणारे प्रश्न पोहोचवतील व लोकांचे व्यवस्थापन करतील. हे ही खूप महत्वाची व्यक्ती आहे. हे जर नसतील तर लोकांचे विनम्र व्यवस्थापन कोण करणार? धम्माद्वारे इतर लोक आनंदी व विनम्र होऊ शकतात हे आपल्या स्वभावात उतरलेल्या धम्म प्रगतीद्वारेच कळेल.
६. नोंद ठेवणारा : एखाद्या महत्वाच्या व नेहमी येणाऱ्या प्रश्नावर धम्म तज्ज्ञाकडून जे उत्तर आले, ते लिहून घेऊन मोठया धम्म तज्ञाकडून (जसे विपश्यना विशोधन विन्यास किंवा त्यांचे विपश्यना आचार्य ) पत्रव्यवहाराद्वारे खात्री करून घेणारा.
विभाग ७:
१. प्रत्येक प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर श्रोत्यांची फीडबॅक /प्रतिक्रिया फॉर्म भरून घ्यावेत जसे
नोंद :
१. वेगळ्या अध्यक्षाची गरज मुळात नाही, कारण नियंत्रक आहे.
२. पाली-हिंदी /मराठी डिक्शनरी सोबत असले कि खूप लाभ होईल.
आशा आहे कि हे मार्गदर्शन लोकाभिमुख प्रश्नोत्तराच्याद्वारे नियमित धर्मचर्चेचे आयोजन व नियोजन प्रणाली विकसित करण्यासाठी उपयोगी होईल.धर्मचर्चेला उचित उत्साह व व्यवस्थापन मिळेल अशी अशा बाळगुन सध्दर्माच्या प्रगती प्रथात काही शंका राहणार नाही ह्या आशेसह लेख पूर्ण करीत आहे.
ह्या लेखावर काही प्रश्न, सुधारणा व सल्ला असल्यास जरूर कळवावे
ह्या लेखावर काही प्रश्न, सुधारणा व सल्ला असल्यास जरूर कळवावे
सर्वांचे मंगल होवो, कल्याण होवो.
संबोधन धम्मपथी
मोबाइल: ९७७३१००८८६