Saturday, 7 July 2018

बौद्ध भिक्क्षु कडून घेण्यात येणारा परित्राण पाठ व घेतला जाणारा पैसा :

बौद्ध भिक्क्षु कडून घेण्यात येणार परित्राण पाठ व घेतला जाणारा पैसा :

काहींनी बौद्ध भिक्षु व त्यांनी केलेली परित्राण-पाठ पूजेवरती आक्षेप घेतला आहे असे दिसले. व त्यास कर्मकांड व पैसे उकळण्याचे साधन हि म्हटलेले आहे. ह्या लेखकाने पैसे घेताना भिक्क्षुचे फोटो हि शेअर केले आहेत. त्यावर प्रश्न आला म्हणून माही माहिती देतो आहे. 

न पटल्यास जरूर कळवावे . 
 
परित्राण पाठाला बौद्ध साहित्यात काही संदर्भ आहे का?
हो आहे. परित्राण पाठ हा त्रिपिटकातील एकूण २९ (काहींच्या मते २४) गाथांचा संच आहे. (संदर्भ : नं १)  ह्या गाथा अधिकांश भगवान बुद्धांनी म्हटलेल्या आहेत. ह्या गाथा अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, खुद्धकनिकाय  व जातक कथा ह्या महत्वाच्या त्रिपिटकातील ग्रंथातून घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याला ऐतिहासिक व (त्रिपिटक )साहित्यिक आधार नक्कीच आहे. 
तसेच ह्या सर्व गाथा विविध ऐतिहासिक घटनेद्वारे आपल्याला त्रिरत्नांमधील  उच्चतम मनुष्य सद्गुणांचे दर्शन घडवितात. ह्या गुणांद्वारे अनेक महाकठीण परिस्थिती कसे सामोरे जावे हे आठवण करून देतात. हि सारी कल्याणाकरी जीवन जगण्याचे उत्तम मार्गच आहेत. 

ह्या पाली भाषेत काहीच समजत नाही, यावर काय करता येईल?
ह्या २९ गाथेमागे एक किंवा अनेक बुद्धकालीन कथा आहेत. त्यांचा अभ्यास प्रत्येकाला (प्रत्येक भिखूला किंवा प्रत्येक उपासकाला)असणे लगभग मुश्किल आहे.  आणि एखादा व्यक्ती असा भेटला तरी ह्या धावत्या युगात एवढा वेळ उपासक देत नाही ब बहुधा वेळही नसतो . त्यामुळे फक्त गाथेचे पठण होऊन विधी पूर्ण केला जातो. त्यामुळे त्रिरत्नांचे सद्गुण श्रोत्यांपर्यंत पोहोचत नाही, व परित्राण पाठाचे मुळ उद्देश्य असफल होतो. वास्तविक भ. बुद्धांनी लोकांना सहज समजेल अशी भाषा वापरायला सांगितली होती. त्यावेळी पाली भाषा होती, आज उपासकाच्या भाषेमध्ये प्रत्येक गाथा भिक्षूंनी समजावून सांगितली तर खूप खूप कल्याण होईल. 

तो पर्यंत, अभ्यासू व जबाबदार उपासकाने/उपासिकेने स्वतः अभ्यास करावे व क्षमतेप्रमाणे आसपासच्या लोंकांचे प्रबोधन करावे.  

का परित्राण पाठ इतर धर्मियांप्रमाणे अंधविश्वास वाढवणारा धार्मिक विधी आहे? त्यांची कॉपी किंवा अनुकरण केले आहे?

नाही. नक्की कोणी कोणाचे अनुकरण किंवा कॉपी केले आहे हा मोठा संशोधनाचा विषय आहे. 

परंतु परित्राण पाठ हे मात्र कर्मकांड नक्कीच नाही. भगवंतांनी त्रिपिटकात कर्माद्वारे मनुष्याचे मृत्यूनंतर विविध ३४ विविध लोक (विविध जग) मध्ये पाठवणी होते. हि पाठवणी कर्म नियामता (कर्म-परिणाम डिपार्टमेंट) द्वारे होते. पण हे तुम्ही आम्ही कसे तपासू शकतो? खरेच नाही तपासू शकत, जोपर्यंत कमीतकमी आपण निर्वाण अवस्थेतील पहिले स्टेशन (स्रोतापन्न अवस्था ) मिळवीत नाही. यावर कोणाचा विश्वास सहज बसणार नाही  हे जरि मानले. तरी ते सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

उदाहरण नं १: आजही, आफ्रिकेच्या एका जंगलात तुम्ही मोबाईल वरील व्हिडियो कॉल  मोबाईल ना नेता समजावयाला जाल तर ती आदिवासी जमत तुम्हा-आम्हाला वेड्यात गिनती करेल. कारण  अशी  मोबाईल वमोबाईलवरील व्हिडियो कॉल  असण्यांची शक्यता त्यांनी कधी हि पाहिलेलीच नाही. त्यामुळे (पहिला व्यक्ती) मोबाईल व मोबाईलवरील व्हिडियो कॉल  असण्यांची शक्यता  समाजवणाराही खरे बोलतो (कारण ते त्याच्यासष्ठी प्रत्यक्ष अनुभवलेले सत्य आहे ), जंगलातील इतर लोकांनी (दुसरा प्रकारातील व्यक्ती)  मोबाईल पाहिलेला नाही, आणि तेही त्यांच्यासाठी सत्य आहे  (कारण ते त्याच्या साठी अनुभवातील सत्य आहे, व मोबाईल हि त्यांना कल्पना वाटते )   तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती हि आहेत, ज्यांना पहिला प्रकारातील  व्यक्तीच्या अनेक वर्षाच्या शील- सदाचार, दीर्घकालीन सद्गुण, संयम  व  बुद्धिमत्ता  यावर पूर्ण खात्री आहे. म्हणून तिसऱ्या प्रकारची व्यक्ती पहिल्या प्रकारच्या व्यक्तीच्या बोलणे जरी काल्पनिक वाटले तरी ते झिडकारून देत नाही व त्यावर पूर्ण विश्वास हि ठेवीत नाही. 

उदाहरण नं २:  दुसऱ्या उदाहरणाने सांगतो. जर कोणी आपल्याला विचारले कि आकाशाचा रंग कोणता , तर आपण बोलू कि निळा आहे. पण जर कोणी सांगितले कि आकाशाला रंगच नाही, ते रंगहीन आहे. तर आपण त्याला वेडा ठरवू. पण ज्या व्यक्तीने पृथ्वीपासून दूर जाऊन आकाश पहिले तर, असे दिसेल कि वास्तविक आकाश रंगहीन आहे, कारण ती एक भव्य पोकळी आहे. पृथ्वीपासून दिसणारा निळा रंग हा पृथ्वीतील निळ्या पाण्यातुन परावर्तित झालेली सूर्यकिरणे आहेत. ज्यांच्यामुळे पृथ्वीवरील वायुकण निळ्या रंगात रंगले आहेत. हे आहे वास्तवातील विज्ञान, जे आपल्याला माहितीच नाही . पण जोपर्यंत आपल्याला योग्य ज्ञानदर्शन होत नाही तो पर्यंत आपण आपल्या ज्ञानमर्यादेतील सत्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तरीही त्रिकालज्ञानी सर्वजीत भगवान बुद्धांनी मनुष्याला  ज्ञानमर्यादेच्या पलीकडील गोष्टींची कल्पना करण्यास कठोर मनाई केली आहे. परंतु, नाव-नवीन ज्ञानाच्या पायऱ्या चढायला सांगितल्या आहेत. शील- समाधी-प्रज्ञा द्वारे विपश्यनेत प्रगत होऊन ज्ञानाच्या मर्यादा वाढवता येतात. 

अश्या एकूण ३४  जगातील विविध रूप-अरुप ब्रह्मलोक व वाईट जगातील देव किंवा प्रेत प्रकारच्या व्यक्तींना बुद्ध व त्यांचे अरिहंत शिष्यानी पाहिलेले व शिकविलेले आहे. हे देवलोक मनुष्यातील त्रिरत्नांना शरण गेलेल्यांची रक्षा करतात. का करतात रक्षा? कारण जी माणसे शील-समाधी -प्रज्ञेचा अभ्यास करतात, म्हणजे वास्तविक धम्माचा(निसर्गाचा) अभ्यास व अनुकरण करतात, त्यांना धर्म/धम्म वेळोवेळी ह्या देवतांद्वारेच मदत करतो. हि पोकळ कल्पना वाटले साहजिक आहे, पण ह्याचा अनुभव आलेले अनेक धर्मवान विप्पसी साधक/साधिका ह्या अनुभवाचा दुजोरा देतात. 

तसेच विपश्यना आचार्य गोयन्काजींनी एक महत्वाची गोष्ठ सांगितली आहे. ते म्हणतात जेव्हा बुद्धकाळात एखादा साधक आजारी (मानसिक/शारीरिक आजारी) पडतो. दुर्बलतेमुळे स्वतः विपश्यना करीत स्वतःला प्रेरणा देऊ शकत नाही धैर्य देऊ शकत नाही. अशा वेळेस, वरिष्ठ/सिनियर विपशयी साधकाला बोलावून , त्याच्याकडून पांढरा कच्चा धागा सुरु करून आस पासचे लोकात तो फिरवीत आजारी व्यक्तींच्या ही हातातून फिरवितात व अशा स्थितीतच विपश्यना साधना करतात. वरिष्ठ/सिनियर विपशयी साधकासोबत साधना केल्याने आजारी माणसाला मंगल मैत्री मिळते व स्वविकासाची गुरुकिल्ली असलेली विपश्यना साधना करण्यास त्यास धैर्य व प्रेरणा मिळते. आपणास हि माहिती देणारे विपश्यनाचार्य गोयन्काजीं हे महासद्धम्मज्योतिध्वज व त्रिपिटकाचार्य हे (व असे जगभरातील अनेक) जागतिक पुरस्कार प्राप्त बुध्दवाणीचे महान आचार्य होऊन गेले आहेत. (संदर्भ २)

मग का सर्व भन्तेजींनी परित्राण पाठात घेतल्यावर आपली रक्षा होते?
जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा बाहेरील औषधे घेतो. तसेच जेव्हा आठ लोकधर्मा (सुख-दुःख, मान -अपमान, निंदा-स्तुती , यश-अपयश ) पासून बैचेन होतो, व मानसिक बळ हवे असते, तेव्हा दुसरी कडून बळ, प्रेरणा व आशावाद मिळवतो. तसेच बळ आपल्याला भन्तेजींच्या सहवासाने व बुद्धगुणांचे स्मरण केल्याने मिळते. 

केवढ्या प्रमाणात रक्षा  होते? 
जेवढ्या प्रमाणात आपण सत्कर्म केलेले आहे, दहा पारमितांचे अनुकरण केले आहे तेवढ्या प्रमाणात रक्षा  होते. पण आपण सत्कर्म करीत नाही,   दहा पारमितांचे अनुकरण केले नाही पण तरीही माझी रक्षा धर्माने किंवा भन्तेजींनी करावी, हि झाली अंधश्रद्धा!! पण माझ्या सद्गुणांचे फळ मिळेपर्यंत माझ्यातील संयम टिकून राहावा व वाढावा तसेच सद्गुणी लोंकाचे आशीर्वाद घेऊन मी आणखीन सद्गुण करीत लवकरात लवकर निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर प्रगती करावी, हि झाली परित्राण पाठ घेण्याची बुद्धांच्या संघाची शिकवण. 

कारण श्रद्धा व अंधश्रद्धेतही तुमच्या मनात 'चमत्काराची अपेक्षा' आहे कि 'सदगुणाद्वारे ( व सदगुणी लोंकाच्या आशीर्वाद व प्रेरणेद्वारे)  निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर चित्त निर्मळ करीत प्रगती करावी'    अशी अपेक्षा आहे. ह्या दोन अपेक्षाच आपल्याला अंधश्रद्धा किंवा श्रद्धे कडे नेतात . कारण मन हेच सर्व इंद्रियात प्रमुख आहे. 

म्हणजे सर्व भंतेजी ह्या  आशीर्वाद व प्रेरणेद्वारे  आपल्याला धैर्यवान बनवण्यास योग्य असतात?
असे नाही. एखाद्या भंतेजी कडे शील-समाधि-प्रज्ञे द्वारे विपश्यना करीत जेवढी  निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर प्रगती केली (चित्त निर्मळ केले),  तेवढेच आपल्याला धैर्य व प्रेरणा देऊ शकतात. काहींनी जास्त प्रगती केलेली असू शकते तर काहींनी थोडी प्रगति केलेलीअसते.  

म्हणजे आपल्याला योग्य भन्तेजींची नेहमी गरज असते. हो ना?
हो  खरे  आहे . तसेच निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर प्रगती हि महत्वाची आहे, मग तो व्यक्ती भंतेजी आहे कि उपासक आहे हे महत्वाचे नाही. जसे तहानलेल्याला शुद्ध भांड्यातील शुद्ध पाणी महत्वाचे आहे, ते भांडे सोन्याचे आहे कि मातीचे आहे, ते महत्वाचे नाही. 

भगवंतांनी भिक्षु संघ निर्माण करण्याचे मला हेच कारण समोर दिसते; मनुष्याला जिवंत उदाहरणाद्वारे असा विश्वास देता आला पाहिजे, कि मनुष्याकडे  जीवनातील अनित्य-अनात्म-दुःख यांना  धैर्य-समाधानाने सामोरे जात  निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर प्रगती करता येते व  चित्त सदा दुःखमुक्त ठेवता  येते. हे संघाने स्वतःची  कशावरही मालकी नसताना प्रसन्नतेचे(दुःख मुक्तीचे)  उदाहरण बनून मनुष्य समाजास समजावून सांगावे. 

असे असताना भिक्षु पैसे का मागतात ?
माझ्या माफक अभ्यासावर पैसे मागणे किंवा स्वीकारणे बुद्धकालीन भिक्षु नियमात बसत नाही. पण आज भिक्षु खूप कमी असून, त्यांना सजग-कनवाळू-मदतनीस उपासक हि खूप कमी आहेत.  त्यामुळे औषधपाणी, जेवण व राहण्याची सोय होण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे मागण्याशिवाय मला अजून तरी पर्याय दिसत नाही. तसेच काही भिक्षुनी जास्तीत-जास्त पैसे स्वीकारीत स्वतःचे विहार बनवून, मालकी स्थापन करीत विलासी जीवन जगतात असेही दिसून येते. पण त्यामुळे कोणीही सर्व भिक्षु संघाला दोष देणे व अमान्य करणे चुकीचे होईल . 

मग आपण भिक्षु ला किती पैसे द्यावेत?
बहुतेक भिक्षु स्वतःहून पैसे मागत नाहीत. पण आपण आपली आर्थिक स्थिती, भिक्षु हि शारीरिक अवस्थ-,येण्या-जाण्याचंही भाडे , जेवणाची व्यवस्था-फोन व इतर बिलाची व्यवस्था  कोण व कशी करते याचा चांगला अंदाज घेऊन भिक्षु ला आपण पुन्हा दान देऊ पर्यंत त्यांची अडचण होणार नाही ना,  तसेच ज्यादाच्या पैशामुळे कळत-नकळत अहंकार हि वाढणार नाही हे हि पाहावे.  

यावर काही निश्चित उपाय ?
यावर दिवंगत विपश्यना आचार्य गोयंकाजी म्हणाले होते (संदर्भ ३), जेव्हा  स्वतः उपासक अभ्यासू, विद्वान, प्रज्ञावान, परोपकारी व धर्यवान बनतील त्यानुसार त्यांच्याच कुटुंबातून गुणी, योग्य  व प्रामाणिक कुलपुत्र तयार होतील. व त्या कुलपत्रातून काही भिक्षु हि होतील. ह्या कामाला वेळ निश्चित लागेल पण जेवढे प्रज्ञावान विप्पसी साधक-साधिका तयार होतील, तेवढे हे काम लवकर होईल. पण जरूर होईल, असा विश्वास हि त्यांनी व्यक्त केला होता. तरीही हे खूप मह्त्वाचचे कि गोयन्काजींनी आजच्या सर्व भिक्षुंचा सदैव आदरच केला, त्यांनि भिक्षूला कधी पैसे दिल्याचंस ऐकिवात नाही, पण औषध-पाणी, चप्पल, भोजनदान, विपश्यना  केंद्रात कायम सुविधा, अंथरुण व पुस्तके हि दिली आहेत. व आपल्या सर्वांसमोर भिक्षु -उपासक संबंधाचे सर्वोत्तम उदाहरण ठेवले आहे

तसेच सध्या उपासकाने धम्मात  पुस्तकी (ग्रंथ वाचन) व प्रॅक्टिकल (विपश्यना साधने) चा अभ्यास करीत, भिक्षुंची काळजी व विपश्यना संवर्धनाची जबाबदारी  घ्यावी. 

आता शेवटी एक सांगतो, चिकित्सा करीत प्रश्न विचाराने ठीक आहे, चांगले आहे पण सत्य न समजता एखाद्यावर (किंवा संघटनेवर) आरोप करणे तेही फेसबुक सारख्या उघडउघड इलेकट्रोनिक मीडिया वर हे जरा आततायीपणाचे होते. कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणणे शहाण्या माणसाला शोभत नाही. आपण बौद्ध कुटुंबाचा भाग आहोत हे विसरू नये, हि कळकळीची विनंती!!

धन्यवाद! मंगल होवो!

संदर्भ :
१. https://en.wikipedia.org/wiki/Paritta
२. विपश्यना रिसर्च इन्स्टिटयूट, न्युज लेटर 
३. विपश्यना आचार्य गोयंकाजी यांची भाषणे 


संबोधन धम्मपथी 
मोबा: ९७७३१००८८६

http://sambodhandr.blogspot.com/