Saturday, 5 September 2015

शोले चित्रपटातून शील वृध्दी

शोले चित्रपटातून शील वृध्दी 

मनुष्याच्या स्वभावावरती इतर बाह्य गोष्टीसोबत  चित्रपटांचा फार प्रभाव आहे. चित्रपट त्या त्या प्रेक्षकवर्गाच्या संस्कृती, चालीरीती, आचारविचार, व वेशभूषा खूप परिणाम करतात. त्यातला समाज मनावर खूप प्रभाव असलेला चित्रपटातून मी काय धम्म शिकलो, ते मांडत आहे. बुद्धाशिष्याने मनोरंजनाशीच काय कुठल्याही घटक/घटनेशी संपर्क आला कि स्मृतीमान राहुन त्यास्थितीची तुलना धर्माच्या विविध मुल्यांशी केली पाहिजे. अशाप्रकारे स्वता:तील असलेले गुण टिकवले व नवीन गुण मिळवले पाहिजे. तसेच स्वतःतील असलेले दुर्गुण ओळखून ते दूर करण्याचा व नसलेले दुर्गुण कधीही स्वभावात न येण्याचा निरंतर प्रयत्न केला पाहिजे. हाच तर सम्यक व्यायाम आहे.

ह्या चित्रपटात भलेबुरे पात्र आहेत. बोधिपथावर शीलपालन हे पहिले पाउल आहे; त्या नंतर समाधि व प्रज्ञा हि स्टेशने येतात. पण बऱ्याचदा गाडी  पहिल्या स्टेशनावरच फसते. तेव्हा शील पालनाचा धडा पुन्हा गिरवावा लागतो. 

शोलेच्या एका घटनेवरून शील पालनाचा काही संयम व युक्ती कमवुया. कथेतील पात्र जय-वीरु हे बेवारस व जगात कुणीच नातेवाइक नसलेले चोर व जीवाभावाचे मित्र असतात. वीरु जयकडे बसंतीसोबत लग्नाचा विचार मांडतो. त्यावर जय न कचरता (मुसावादा वेरमणी सिखापदं समादियामी - स्पष्ट बोलणे ) वीरुने आत्तापर्यंत अनेक मुलींसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्याची आठवण करून देतो. खऱ्या  मित्राने अशाच  प्रकारे संयमाने आपल्या मित्राचे दुर्गुण त्याला योग्य समयी व योग्य वेळी दाखवुन दिले पाहिजे. मैत्री टिकवण्यासाठी खोटे बोले नये व मित्रासाठी इतरांचे नुकसान करू नये. 

यावर वीरु जयला सध्याचा विचार गंभीर व अंतिम आहे असे सांगतो. असे आश्वासन देवून देखील जय त्याच्यासाठी लग्नाची बोलणी करण्यास नकार देतो. कारण जयला  वीरूचा स्वभाव माहिती असल्याने स्वताच्या मित्राची (आसक्ती/मोह/पुरुषसुलभ भावना किंवा प्रेम ) यांची तमा न बाळगता त्याच्याकडे चांगल्या वराकडे आवश्यक असणाऱ्या  गोष्टीची पाहणी करतो. ह्या पाहणीत त्याला असमाधानकारक उत्तर मिळते. तेव्हा तो वीरुला नकार देतो. आपल्याकडे हे असे होत नाही, कारण माझ्या मुलगा/मुलीला तिच्या/त्याच्या पेक्शा जास्त चांगला व लायक वर मिळावा  अशी आपली अपेक्षा असते. त्यासाठी स्वतःच्या मुलगा/मुलीचे  काही गुणही लपविले जातात; तसेच काही गुण वाढवून सांगितले जातात. का? कारण चांगले स्थळ हातातून जावू नये म्हणुन. तसेच स्पष्ट व्यक्त्या व खरे बोलणाऱ्या  माणसाला अशा प्रसंगी सोबतही नेत नाहीत उगाच गडबड नको म्हणुन. 

काही जण म्हणतात प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असते; पण बुद्ध म्हणतात प्रेमात व युद्धातच माणसातील खरे सद्गुण व नैतिकतेची खरी परीक्षा असते. त्यामुळे अशावेळी जर तुम्ही शील पालन नाही केले तर समजावे कि तुमचे शील अजून खूप कच्चे आहे. त्यामुळे चोर असूनही आपल्या जगातील एकमेव सहकाऱ्यासाठी तो एका कर्तबगार व मेहनती मुलीच्या आयुष्याशी न खेळण्याचा योग्य निर्णय घेतो. येथे शीलाचा विजय होतो. पण वीरुनेही खूप आग्रह केल्यावर जयची  अडचण होते. कि याचे नाते घेवून जायचे तर तिच्या पालकाला (मावशीला) सांगायचे काय? याचे गाव कुठले? कुटुंब ? पगार? स्वभाव? घर? व्यसन? गुण? एकही तर बाजु सकारात्मक नाही. अशाच कात्रीत बऱ्याचदा पंचशीलाचे पालन करणारा सापडतो. त्यावर त्यास शील व बुद्धिमत्ता वापरुन परिस्थिती नेसर योग्य निर्णय घ्यावा लागतो. येथे जरी जय वास्तवात चोर असला तरीही, त्याने जेवढे जमेल तेव्हढे शील पालन केले आहे. कारण त्याला एका चांगल्या मुलीचे आयुष्य हि वाया घालवायचे नाही व स्वतःच्या प्रेमासक्त तसेच व्यसनी मित्राला चांगले गृहस्थ जीवन जगण्याच्या अधिकाराविषयीही बोलायचे आहे. 

अशा कठीण प्रसंगी समाधि आपल्याला मन एकाग्र करीत समस्या समजून घेण्यास मदत करते. व प्रज्ञा निर्णय घेतेवेळी दुर्गुणांना सद्गुणांवर विजय न मिळवायची क्षमता प्रदान करते. मी काही चुकीचे तर करीत नाही ना? मी मित्रा खातर किंवा स्वतःसाठी कोणाला फसवीत तर नाही ना? जयने समाधि  व प्रज्ञेचा  अभ्यास केलेला चित्रपटात दाखविलेला नाही. पण आपल्या जीवनात आसपास काही साधारण व्यक्ती ही समाधि  व प्रज्ञेचा  अभ्यास केलेला नसताना  उत्तम धैर्य व बुद्धिमत्ता दखवितात.जय मावशीकडे मित्राचा हात मागायला जातो. कदाचित मागील एखाद्या जन्मात (आत्म्याशिवाय पुर्नजन्म) समाधि  व प्रज्ञेचा  अभ्यास केलेला असण्याची शक्याता नाकारता येत नाही,  कारण तेव्हाच तर अशी संयमीनिर्णय घेण्याची क्षमता येते. आणि ज्यांनी विपश्यना करीत समाधि व प्रज्ञेचा अभ्यास व्यवस्थित केला त्यांना तर धैर्य उत्तमच साधता येते.

जय मावशीकडे मित्रासाठी बसंतीचा हात मागायला जातो. स्वाभाविकच त्या अनोळखी तरुणाशी मावशी चौकशी करते. धर्म चर्चेसाठी सविस्तर देत आहे. कुशल-मंगल विचारल्यावर पुढील संवाद असा:

मावशी: किती कमावतो मुलगा?
जय: आता काय बोलू मावशी, एकदा का बायको मुलांची जबाबदारी अंगावर पडली कि कमवायला ही लागेल.

(असे बोलून जयने  खऱ्याने सुरुवात केली. वीरूचा कामचुकार पणा सांगितला; पण सोबत वीरूच्या प्रेमळ मनाचीही खात्री दिली. )
मावशी: मग आता काहीच कमवित नाही?
जय : नाही. मीअसे कधी म्हणालो? पण काय करणार जुगार हा प्रकारच असा आहे, रोज रोज तर जिंकत नाही ना माणुस! कधी कधी हरतो सुद्धा.
(आता इथे जय जरी वीरूचे नाते घेवून आला असला तरी टप्प्याटप्प्याने वीरूच्या स्वभावातील गुण-दोष मावशीला झेपू शकेल एवढ्या शांत व सहज रीत्या सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण मित्राचे घर व्हावे हे त्यालाही वाटत असणार.)

मावशी: हं… म्हणजे मुलगा जुगारी आहे?
जय : छे छे तो तर खुपच चांगला व गुणी मुलगा आहे. हो पण एकदा का दारु पिला तर चांगल्या वाईटाचे काही कळत नाही. (इथेही मनोरंजनाच्या एक सहज सामाजिक व मंगल संदेश मिळला आहे. कि दारु पिल्यावर त्यालाच काय कोणालाही काही कळत नाही) आता त्यांनंतर बसविले कोणी जुगार खेळायला तर त्यात बिचाऱ्या  वीरूचा काय दोष? (दोन वाईट गोष्टींचा संबंध बघा, जुगाराचा नाद हा  बेहोषीत असताना लागतो. दारु प्पिल्याने नशा येते. जसे थेंबे थेंबे पाणी साचते तसेच थोडेसे ही कुकर्म, नवीन कुकर्माला प्रोत्साहन देते, जन्म देते, बळ देते.  आता इथे जयने तोंडाने तर बाजु घेतली आहे, पण त्याचा उद्देश्य तर मावशीपासुन सत्य न लपविण्याचा आहे. मित्राची बाजु मांडणे  व त्याचवेळी एका होतकरु, कर्तबगार मुलीच्या आयुष्याशी  ही त्याला खेळायचे नाही आहे. अशा धर्म संकटात त्याने अशा प्रकारे चलाखीने सामना केला आहे. आपल्यालाही जीवनात अशा चलाखीने सामना करायला शिकायला हवे.)
मावशी : खरे बोलतो रे तू बाबा. दारुडा तो व जुगारी तो पण त्यात त्याचा काही दोष नाही.

(भ. बुद्ध म्हणतात, "अत्त ही अत्तनो  नाथो, अत्त हि अत्तनो गती" स्वताच्या दशेला व प्रगतीच्या (धार्मिक व व्य्यावहारिक) गतीला मनुष्य स्वतःच जबाबदार असतो. त्यांमुळे तुझ्या वर्तमानकाळाचा व भविष्यकाळाचा तूच विधाता आहेस. कारण कर्म (शारीरिक, मानसिक व वाचिक) तर कळत-नकळत किंवा मजबुरीने तूच करीत असतोस. तथागत हि कर्मे निर्दोष राहावीत  तुला  मार्गदर्शन नक्की करू शकतात. पण त्यावर चालावे तर तुलाच लागेल. जसे ज्याला तहान लागते, पाणीही त्यालाच प्यावे लागते. )

जय : मावशी तुम्ही माझ्या म्नित्राबद्दल गैरसमज करीत आहात. एकदा का त्याचे लग्न बसंतीशी झाले, तर हि जुगारीचि सवय तर दोन दिवसातच सुटून जाईल.
(हा महान व मोठा गैरसमज किंवा भाबडा आशावाद लग्न जुळवताना असतो. त्यामुळे मुलाची काही त्याज्य  दुर्लक्षित केली जातात. आणि त्या समज किंवा भाबडा आशावादाचा फटका आयुष्यभर त्या मुलीला भोगावा लागतो. कारण लग्न करताना जीवनसाथी किती निर्दोष, व्यवहारी व कर्तबगार आहे हे न बघता तो किती पैसेवाला, जात/धर्म वगैरे, किती गोरा/गोरी, किती शिकलेला, जमीन/बंगला किती? यावर जास्त लक्ष असते. ह्यात वडिलधाऱ्या  मंडळींचा अडाणीपणा, सदचराला कमी महत्व देण्याचा स्वभाव व अधार्मिकपणा असतो.)

मावशी: अरे बाळा, मला म्ह्तारीला सागतोस? ही दारु व जुगारीची सवय कधी सुटली आहे कोणाची आतापर्यंत?
(जग बघितलेली व भाबडा आशावाद न ठेवणारी माणसे चांगली जाणतात कि असे व्यसन लागले कि ते मरेपर्यंत माणसाच्या पिच्छा सोडत नाही. ते सोडण्यासाठी मनची खंबीरता व दृढनिश्चय खूप महत्वाचा. जो विपश्याने ने साजः मिळवता येतो.)

जय : मावशी तुम्ही जायला ओळखत नाही, विश्वास करा तो अशा प्रकारचा माणूस नाही. एकदा का लग्न झाले कि तो गाण्याऱ्या  स्त्री कडे जाणे सोडून देईल. मग दारु काय आपोआपच सुटेल!! (इथेही वाईट व्यसन एकमेकांवर अवलंबुन आहेत. एक लागलीकि दुसरी लागलीच म्हणुन समजा। शील पालनात कामेसु-मिच्छाचारालाही खूप महत्व आहे. शरीराने, बोलण्याने व विचारानेही मनुष्य व्यभिचार/परस्त्रीगमन करू शकतो. अशा स्थळी चावट -आचरट व वासनेने बरबटलेले लोक जात-येत असतात.)
मावशी : अरे देवा एवढेच काय ते बाकी होते? म्हणजे त्याचे गाणाऱ्या  स्त्री कडे ही येणेजाणे आहे तर?

जय: मग त्यात काय गैर आहे? अहो गाणे-ऐकायला मोठ-मोठ्या घराणातले खानदानी राजे-राजवाडेही जात असतात. खरे सांगतो!!

(नीतीमत्ता ही इतर राजे-महाराजांच्या वागण्यावरून कशी काय ठरवावी? ज्या-ज्या कर्मांनी शारीरिक-वाची-मानसिक सदाचार वाढतो ते-ते कुशल कर्म!! व ज्या-ज्या कर्मांनी माझ्यातले दुर्गुण वाढतात ते ते अकुशल कर्म!  त्यामुळे अत्त-दीप  भव: स्वतःच स्वतःचे द्वीप व्हा! जसे जीवन्याच्या महासागरात जशी अनेक वादळे येतात, तेव्हा एक द्वीप हवा असतो जहाजाला आसऱ्या साठी! तो द्वीप बाहेर कुठे शोधावा? आंतरिक शांतीच आपल्याला आपला द्वीप मिळवुन देईल )

मावशी: मग आता  एवढे ही समः कि कुठले असे घराणे आहे तुझ्या गुणवान  मित्राचे?

(घराणे हे पैसे व प्रोपर्टी साठी न पाहता त्या घराण्याची सामाजिक भान, हुशारी नव विवाहित व तरूण जोडप्याला जीवनाच्या विविध टप्प्यावर मार्गदर्शन करण्याचीहातोटी /कसब कितीआहे यासाठी पाहावे. )

जय: बस मावशी कुळाचा पत्ता लागला कि लागलीच तुम्हाला कळवतो!
(जयची मावशीला खात्री द्यायची व्यवहार कुशलता बघा. खरे तर सांगितले पण कळल्यावर सांगु हे ही कबुल केले. )

मावशी: एका गोष्टीची दाद द्यावी लागेल,शंभर दुर्गुण असोत तुझ्या मित्रात; पण तुझ्या तोंडुन त्याची स्तुती च येत असते.

जय: काय करू मावशीमाझे मनच असे आहे.

अशा प्रकारे एका लघु कथे द्वारे जावेद अख्तर व सलीम खान यांनी समाजाला दिशा द्यायचा प्रयत्न केला आहे. तो मला पटला म्हणुन मी इथे मांडला, कारण्तिथुन मला सद्धर्माची काही मुल्ये हि दिसली.

कल्याण होवो!

संबोधन धम्मपथी