Saturday, 11 April 2015

संप्रदाय का धर्म, से तालमेल ना खाय।
एक सदा उलझावता, एक सदा सुलझाय॥

- सत्यनारायण गोयंकाजी

अनेक वर्षांच्या कालखंडात आपण अनेक शब्द व अनेक शब्दांचे अर्थ हरवुन बसलो आहोत। आता संप्रदाय व धर्म हे समानार्थी शब्द झाले आहेत. पण त्यात तथागतांनी अत्यंत मोठा फरक सांगितला आहे. संप्रदाय हा काही विशिष्ट लोकांकरिता असतो, त्यांचे कर्मकांडे व परंपरा सांभाळतो. त्या संप्रदायाबाहेरील लोकांवर ह्या संप्रदायाचे बंधन नसते. ऊदा. हिंदु संप्रदाय, बौद्ध संप्रदाय, जैन व इतर संप्रदाय हे एकमेकांवर काही बंधन आणु शकत  नाहीत. प्रत्येकाला मर्यादा आहेत. याचे नियम त्याला व  याला लागु पडत नाहि. अशा प्रकारे संप्रदायाला सीमा असते. 

धर्माचे तसे नसते, धर्माला सीमा नसते. ना काळाची, ना वयाची, ना प्रदेषाची, ना जातीची. धर्म सांगतो, व्यक्ती कोणीही असो मी भेदभाव करीत नाही. मनात वाईट विचार आला कि दंड मिळतोच व मन जितके निर्मळ झाले कि सुख शांती मिळतेच. विचारांचे परिणाम हे कोणीही टाळू शकत नाही.

संप्रदायाचे ठेकेदार आपल्या संप्रदायाच्या मोठेपणा सांगण्यासाठी साधारण  माणसाला खुप मोठ्या कथांमध्ये, स्वर्ग-नरकाच्या  कल्पनांमध्ये, पुनर्जन्माच्या कोड्या मध्ये, कर्म-कांडांमध्ये गोंधळुन ताकतात. व मनुष्याची विवेक बुद्धी नष्ट करतात. 


धर्म तर मनुष्याची सर्वांगीण उन्नती करतो. तो मनुष्याला शारीरिक, मानसिक व वाचिक कर्म करताना आवाहन करतो, कि बाबा सजग राहा, कर्म करताना विचार करा। धर्म सांगतो, कुठलेही कर्म (शारीरिक,मानसिक) करताना मन, शांत, सजग व निर्मळ असणे आवश्यक आहे। तसे नसल्यास तुम्ही मलीन मनाद्वारे दु:खद फळ देणार्या झाडाच्या बीज आपल्या आयुष्यात पेरता, आणि ते कालांतराने दुखद फळ घेवुन येते। आणि निसर्गनियमानुसार प्रत्येक झाडावर अनेक फळे येतात, तसेच सुखाच्या (निरोगी मन) किंवा दुखाच्या(रोगी मन)  झाडावरही त्यानुसारच अनेको फळ येतात। अशा प्रकारे रोगी मनाद्वारे आपण विषारी झाडाची फळे आपणच आपल्या आयुष्यात नकळत पेरत असतो। अशी फळे पिकुन तयार झाल्यावर आपल्या व आपल्या नातेवाईकांना व्याकुळ व दु:खी बनवितात। धर्म सांगतो ही विषारी झाडे मनातील अनियंत्रित भावनांद्वारे (जसे भीती, वासना, क्रोध, पश्चाताप, ईर्षा, निराशा, मत्सर, अहंकार, वैर, लोभ व न्युनगंड ईत्यादी) प्रत्येक नवे झाड म्हणजे अनेक विषारी विचार-विकार आपल्या जीवनात दुखी फळे देत असतात। प्रत्येक विषारी फळ मिळते वेळी आपण आणखीन चिडतो, घाबरतो व हार मानतो। अशा प्रकारे आपण क्रोध व भीती चे नवीन बीज नकळत आपल्या मनाच्या सुपीक जमिनीत पेरतो. अशा प्रकारे विचार-बीज-फळ असे चक्र आयुष्यात नियमीत पणे। म्हणुन चांगले विचार चांगली फळे देतात व वाईट विचार वाईट, धर्माचा न्याय असा सहज, सोपा आणि अचुक असतो.

संप्रदायवाद्यांना समजत नसल्याने ते विविध कर्मकांडे, पुजा-अर्चा, जप-जाप, अमुक-तमुक वार-दिवस, व्रत-उपवास करीत मन शांत करण्याचा प्रयत्न करतात। पण त्याने मिळणारी शांती अस्थायी, तात्पुरती असते। मग पुन्हा बैचेनी घालवुन शांती मिळण्यासाठी झोपेच्या गोळ्या, काम-भोग, विविध व्यसनेही क्स्रुन शांती मिळवण्याचा प्रयत्न चालुच असतो। पण त्याने शेवटी निराशाच पदरी पडते.

कुठल्याही कालखंडात एखादा व्यक्ती जेव्हा बुद्ध होतो, तेव्हा धर्माद्वारे मनाचा सांगोपांग अभ्यास करत, "दुषित मन- दुषित  विचार- दुषित  फळ" यांचे दुष्टचक्र स्वकष्टाने कायम स्वरुपी तोडुन टाकतो। असे तेव्हाच होते, जेव्हा ध्यानाद्वारे मन कायमस्वरुपी नितांत स्वच्छ होते, शुद्ध होते, बुद्ध होते। असा व्यक्ती ईतरांना स्व:ताला कळालेला धर्म (शील-समाधि=प्रज्ञा) शिकवतो, मन सजग व शांतकरण्यासाठी विपश्यना विद्या शिकवतो। त्यामुळे मनातील नव्या विचारांवर नेहमी पहारा व जुन्याविचारांचा निचरा होत जातो। पण हे काम ज्याचे त्याने करायचे असते, कारण ध्यान एकाने केल्यावर दुसर्याचे दुषित विचार नष्ट होत नाहीत।  उदा जो पाणई पितो , त्याचीच तहान भागते, इतरांची नाही। पण एकाने केल्यावर दुसर्याला प्रेरणा नक्की मिळते.

धर्माची शिकवण अशी स्पष्ट्पणे न गोंधळवता सांगितलेली आहे, ती सुआख्यात आहे, सहज आहे। त्यात लपवण्यासारखे, फिरवुन सांगण्यासारखे काहिच नाही। धर्म सांगतो: बाबारे तु कुठल्याही देवी-देवतेला मानणारा किंवा न मानणारा, आत्म्याला मानणारा किंवा न मानणारा, कर्म-कांड करणारा किंवा न करणारा मनात अकुशल विचार येतात व तुला बैचेन व व्याकुळ बनवतात ना? मग आता शील-सदाचारात, समाधि (मन एकाग्र करणे) व प्रज्ञा (मन निर्मळ करणे) ह्या मार्गावर आलास कि व्याकुळता दुर होते कि नाही हे तपासुन तर बघ (एही पस्सिको)? कारण धर्माचा मार्ग हा तपासुन पाहण्याचा आहे.

संप्रदायात तपासुन पाहण्यावर मनाई किंवा कठीण आहे, कारण शांती हि मृत्य पश्चात असते, व  "दुषित मन- दुषित  विचार- दुषित  फळ" यावर कायम स्वरुपी उत्तर नसल्यामुळे न तपासता येणार्या गोष्टी जसे कर्म-कांडे, आत्मा, पुर्नजन्म व ईतर कल्पनांवरती खुप भर  असतो.

म्हणुन गुरुजींनी संप्रदाय व धर्मामध्ये फरक ओळखुन, धर्माचा लाभ घ्यायला संगितले आहे.

मंगल होवो!
-संबोधन धम्मपथी